आपले पुढारी नेहमीच कुंपणावर बसून एखाद्या फांदीवरच्या बिलंदर माकडाप्रमाणे उड्या मारत असतात. जिकडे तुकडा दिसला तिकडे उडी टाकयची आणि तुकडा फस्त केला की तिथून सटकून पुन्हा फांदीवर (कुंपणावर) येऊन अधाशीपणे आपली शेपटी हलवत ठेवायची ही आपल्या पुढार्यांची खूप जुनी खोड आहे.
बाळासाहेंबांनी अण्णांना 'वाकड्या तोंडाचा गांधी' म्हटले होते. आता तमाम जनता, अगदी झाडून सगळे, म्हणजे शिक्षक, प्राध्यापक, रिक्षावाले, सफाई कामगार, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक, सिनेनट, वेश्या, रुग्णवाहिका चालक, नोकरदार, उच्चभ्रू, तृतीयपंथी, भाजीवाले, आयटी कामगार, असे सगळे अगदी मनापासून, कुठलाही भेदभाव न पाळता, कुठेही आंदोलनाला हिंसेचे गालबोट न लावता, जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन लाखोंच्या संख्येने या चळवळीला सक्रीय पाठिंबा देत आहेत म्हणून बाळासाहेबांच्या मनातली राजकीय आकडेमोड त्यांच्या पत्रातून बाहेर पडली असावी. अगदी ढोबळ का असेना, पण पाठिंबा देऊन, अण्णांच्या प्रकृतीची काळजी वाहून जर जनतेमध्ये भ्रष्टाचारविरोधी प्रतिमा फुकटात पदरात पाडून घेता येत असेल तर ते शिवसेनेलाही हवे आहे आणि भाजपलादेखील!
सध्या भाजप आणि शिवसेना हळू-हळू लपत-छपत आंदोलनाला क्षीण पाठिंबा देत आहेत कारण स्वच्छ आहे. थोडा तुकडा पदरात पाडून घ्यायचा! राष्ट्रवादी अगदी सावध आहे, नेहमीप्रमाणे! कुठल्याच बाबतीत हिरीरीने बाजू मांडून ठाम भूमिका घ्यायची नाही ही सीनीयर पवारांची खासियत. जिथे धूर्त राजकारणाची मेख दिसली तिथे कावेबाजपणे वार करून आपला फायदा करून घ्यायचा त्यांचा स्वभाव! अर्थात त्यांच्या या विश्वासघातकी स्वभावामुळे त्यांचे अपरिमित नुकसान झालेले आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही आणि पुढेही कधी येणार नाही. मावळ गोळीबार असो, अण्णांचे आंदोलन असो किंवा अजून काही, सीनीयर पवार बिळात जाऊन बसतात. दिवसेंदिवस काहीच बोलत नाहीत. अगदी बोललेच तर ते इतके गुळमुळीत आणि निरर्थक असते की कुणालाच काहीच कळत नाही. ते ठामपणे भ्रष्टाचारावर कधी बोलत पण नाहीत. अर्थात त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात ठाम भूमिका घेणे म्हणजे सूर्याने प्रकाशाच्या विरोधात आंदोलन करण्यासारखे आहे. राष्ट्रवादीमध्ये अजून कुणी फार महत्वाचं नाहीच आहे. ज्युनीयर पवार स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारून घेण्यात पटाईत आहेत. 'आव्हा'न करणारा नेता सवंग आहे. आबा अगदीच बापुडवाणे आहेत.
परवाच्या सर्वपक्षीय बैठकीत शहाजोगपणे 'संसद सर्वश्रेष्ठ' चे पालुपद आळवतांना बिस्किटे, सुकामेवा तोंडात टाकतांना मी जेंव्हा पुढार्यांना पाहिले तेव्हा मला त्यांच्या अप्पलपोटेपणाचा आणि स्वार्थीपणाचा किळसवाणा प्रकार बघून फांदीवरच्या माकडाची आठवण झाली. राम मंदिराचे, हिंदुत्वाचे, काळ्या धनाचे तुकडे असले की भाजपमधली स्वार्थी परंतु नाकर्ती माकडे गोळा होतात; जातपात, ब्राह्मणद्वेष, सवंग लोकप्रियता हे तुकडे असले की राष्ट्रवादीची कुटील, गुंडप्रवृत्तीची आणि परमस्वार्थी माकडे गोळा होतात. यांच्यातल्या मुंबईतल्या एका भरगच्च मिशी असलेल्या माकडाची शेपटी आणि जीभ जास्तच लांब आहेत. मागे लक्ष्मण माने काही पत्रके फेकत असतांना चिथावणीखोरपणे हे माकड त्यांना 'आगे बढो' ची एनर्जी देत होते. मागासवर्गीयांच्या भावनेला हीनपणे हात घालून राजकारण करणारे हे विध्वंसक प्रवृत्तीचे आणि सतत नकारात्मक 'आव्हा'न करणारे माकड नेस्तनाबूत होणे ही आजच्या काळाची गरज आहे. असो. कोट्यवधी रुपयांचे तुकडे दिसल्यावर काँग्रेसची माकडे गोळा होतात. असा हा सगळा माकडांचा खेळ आहे. दुर्दैवाने त्यांना ताब्यात ठेवणारा मदारी अजूनतरी आपल्या देशात पैदा झालेला नाही. अण्णा हजारेंच्या आंदोलनातून असा मदारी अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाल्याने सगळ्याच माकडांच्या शेपटांना आग लागली आहे.
अरुंधती रॉय, काही पुढारी आणि अजून काही दीडशहाणी मंडळी 'संसद सर्वोच्च' 'संसद सर्वश्रेष्ठ' वगैरे असली कुचकामी, तद्दन भंपक आणि निरर्थक हाकाटी पिटून चालत्या गाडीला खिळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत आणि 'आपण काहीतरी वेगळे' म्हणून लोकप्रियता मिळवण्याच्या फालतू प्रकारात स्वत:चे महत्व वाढवण्याचा निरुद्योग करीत आहेत. कसली डोंबलाची संसद श्रेष्ट? कसली लोकशाही? जिथे सगळी भ्रष्टाचारी नेतेमंडळी एकत्र येऊन जनतेच्या पैशावर डल्ला मारतात ती संसद श्रेष्ट? ती संसद पवित्र? जिथे पैसे घेऊन-देऊन चर्चा घडवल्या जातात ती संसद पवित्र? एवढाच यांना संसदेच्या पावित्र्याचा पुळका आहे तर हे स्वत:हून काही ठोस पावले का नाही उचलत? स्वतःहून भ्रष्टाचार का नाही थांबवत? आणि जनतेने निवडून दिलेली नेतेमंडळी आहे म्हणून यांना जनतेला वाट्टेल तसे लुटण्याचा, नागविण्याचा अधिकारही याच 'पवित्र' संसदेने दिला ना? मग संसद सर्वश्रेष्ठ असूच शकत नाही. संसद आहे एक अशी इमारत जी मूकपणे या माकडांचे चाळे सहन करते; जी लाचार आहे; जिचे मूक आक्रंदन कुणालाच कळत नाही. जिथे नानाविध युक्त्या-क्लृप्त्या करून, कोलांट्याउड्या मारून सत्तेवर आणि जनतेच्या पैशांवर राजरोसपणे बलात्कार करण्याचा अधिकार ही हलकट नेतेमंडळी स्वत:च्या पदरात पाडून घेतात ती संसद श्रेष्ट कशी असू शकते? पवित्र कशी असू शकते?
आज मी मतदानाला गेल्यावर मला काय दिसते? एक चोर आहे; दुसरा दरोडेखोर आहे; तिसरा लँडमाफिया आहे; चौथा वाळूमाफिया आहे. मी कुणाला मतदान करू जेणेकरून संसदेचे किंवा विधानसभेचे किंवा महापालिकेचे पावित्र्य जपले जाईल? यातले कुठलेही माकड कोणत्याही गृहात गेले तरी तिथे अधाशीपणे चरणारच आहे. मग कुठले गृह पवित्र? आणि आता अशा अटीतटीच्या वेळीच या चोरांना संसदेचे पावित्र्य, संविधान या गोष्टींचा पुळका कसा येतो? इतर वेळेस लाज सोडून पैसे खातांना आणि देश विकायला काढतांना यांच्यातली सदसद्विवेकबुद्धी शेण खायला जाते का? लालूप्रसाद यादवसारखा नेता आयुष्यभर बिहारला अत्यंत हलाखीच्या अवस्थेत आणि दरिद्री ठेवून स्वतःच्या तुंबड्या भरत राहतो आणि हा परमभ्रष्ट नेता संसदेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष? स्थायी समितीचा दुसरा सदस्य म्हणजे भ्रष्टाचाराचा डेपो असणारा अमर सिंग? असे जनतेच्या हिताच्या विरोधातले सोयीस्कर निर्णय घेऊ शकणारी ही संसद पवित्र? हा भारतातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा विनोद आहे. शेतकर्यांवर गोळीबार करून नामानिराळा राहणार्या पक्षाच्या त्यावर चकार शब्द न बोलणार्या एका मुरब्बी नेत्याला आश्रय देणारी संसद श्रेष्ठ? कॉमनवेल्थचा घोटाळा करून, बीआरटीमध्ये पैसे खाऊन गब्बर होणार्या कलमाडीला निवांतपणे बूड टेकवू देणारी संसद पवित्र? आज कलमाडीच्या आणि इतर कित्येक लँडमाफियांच्या भ्रष्ट वागण्याने आणि धोरणांमुळे पुण्याची काय दयनीय अवस्था झालेली आहे हे या अरुंधती रॉयसारख्या निरुद्योगी आणि बिनडोक लोकांना दिसत नाही?
अर्थात हा सगळा नेत्यांचा दोष नाहीये. आपल्यासारख्या सामान्य लोकांचा दोष देखील आहे. आपण भारतीय मूलतः अप्रामाणिक, मुजोर, आणि आळशी असतो. इतरांच्या सुख-दःखाशी आपल्याला काहीही देणे-घेणे नसते. शिस्त पाळणे, प्रामाणिकपणे काम करणे आपल्याला जमतच नाही. बसमधला कंडक्टर सुटे पैसे कधी स्वतःहून देत नाही. पैसे देऊन लोकांची मुजोरी आपल्या इथे सहन करावी लागते. रिक्षावाले तर असहाय लोकांना लुटायला टपलेलेच असतात. म्हणूनच किल्लारी किंवा कच्छ मधल्या भूकंपात आपल्या भारतीय बांधवांनी लुटालुटीचा नंगा नाच घातला. अक्षरशः मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणीच काय लोणचे पण आपण भारतीयांनी सोडले नाही यातच आपल्या लोकांची मानसिकता दिसून येते. अशा लोकांना पुढारी कसे मिळणार? आपल्यासारखेच भ्रष्ट आणि मुजोर, गुंडप्रवृत्तीचे! आपल्याला तक्रार करायला तशी फारशी जागा नाहीये.
अण्णांच्या या 'न भूतो न भविष्यति' आंदोलनामुळे या वागणूकीला मनातून, कुठूनतरी आतून आव्हान केले जाईल ही अपेक्षा आहे. सगळी जनता या आंदोलनातून काहीतरी शिकेल अशी आशा आहे. त्याचबरोबर पुढार्यांच्या बेताल वागणूकीला चाप बसेल अशीही एक भाबडी आशा आहे. चौर्याहत्तर वर्षांचा एक म्हातारा; कुटुंब नसणारा, कुठलेच पाश, कुठल्याच वासना नसणारा, कुठलीच स्वार्थी महत्वाकांक्षा नसणारा, एक असा माणूस जो दहा दिवस अन्नाशिवाय तग धरून आहे, कशासाठी? नोकरीसाठी? अनुदानासाठी? कर्जमाफीसाठी? आरक्षणासाठी? नाही, एकशेवीस कोटी जनतेच्या भल्यासाठी! ही साधी गोष्ट नाही. कुठलाच भेद-भाव न ठेवता लाखो लोकांना इतके परिणामकारक आंदोलन करायला भाग पाडणे, त्यांना जागे करणे, त्यांच्या मनातल्या माणसाला जागवणे ही गोष्ट एक खूप महान घटना आहे. भारतात कित्येक दशकांत अशी घटना कधी घडलेली नाही. हे एक खूप मोठे स्थित्यंतर आहे. त्याचा फायदा करून घेणे आपल्या हातात आहे. ते खरे आपले प्रत्येकाचे मोलाचे योगदान ठरेल!
वाचने
3682
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख भिडला (अवांतर:ते ठामपणे
सामान्य भारतियाच्या मनातल्या
जळजळीत लेख
रोखठोक आणि सामान्य लोकांच्या
जळजळीत लेख. लेखाचे इंग्रजी
लेख आवडला. आपण भारतीय मूलतः
अप्रतिम
+१
In reply to अप्रतिम by सुकामेवा
किंमत
आत्मपरीक्षणाची संधी हॅ हॅ हॅ
अप्रतिम लेख ... एकदम मनातले
डेव्हिल्स अॅडव्होकेट
In reply to अप्रतिम लेख ... एकदम मनातले by गणेशा
करप्शन इज अॅन अॅडीक्शन
In reply to डेव्हिल्स अॅडव्होकेट by अन्या दातार
मनातलं बोललात,,,
अर्थात हा सगळा नेत्यांचा दोष
अतिशय छान. सर्वसामन्यांचे
अर्थकारण
जनमानसाचा उच्चार
>>अर्थात त्यांच्या या
एकदम रोख ठोक विचार आवडले.
आसूडाचे फटके मारावेत तसा झाला
प्रचंड सहमत....
प्रचंड आवडला
अप्रतिम !
तुमच्या लेखाची लिंक चे पु वर