✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ?

प
प्रियाली यांनी
Wed, 08/24/2011 - 16:33  ·  लेख
लेख
काही वर्षांपूर्वी धनंजय यांनी एका गांधीवाद्याच्या समर्थनार्थ हा लेख मिपावर टाकला होता. त्या लेखावर नजर टाकली आणि थोडी आजूबाजूला फिरवली तर त्या लेखाचा उद्देश कळून येईल. हा लेख त्या लेखाचे विडंबन निश्चितच नाही पण त्या लेखाचे स्मरणरंजन म्हणता यावे. तर पुढे, "मी आलोच शेळीचे दूध पिऊन" किंवा "आज माझा उपास आहे" वगैरे खोचक वाक्ये मिपाची शान होते, गांधींच्या नावाची अ‍ॅलर्जी वगैरे असल्यासारखी काही माणसे वागत असत याला सर्व साक्षी आहेत. नथुरामने गांधीजींचा नाही तर गांधीवादाचा खून केला सॉरी सॉरी हत्या केली, सॉरी सॉरी वध केला वगैरे विधाने मिपावर चमकत असत. गांधीजींच्या राजकारणाने देशाचे नुकसान झाले वगैरे विषयांना १०० प्रतिसाद हमखास असल्याने आजही अशा विषयांची आठवण होते. कालपर्यंत अहिंसेने प्रश्न सुटणार नाहीत म्हणणारे, गांधींना आणि गांधीवादाला भंपक म्हणणारे त्यांच्यापैकीच काहीजण आज अतिशय प्रेमाने दुसर्‍या गांधीवाद्याबद्दल लेख टाकत आहेत. उपोषणापूर्वी राजघाटावर जाऊन चिंतन करणार्‍या या नेत्याच्या सेवाव्रताला सलाम ठोकत आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठींबा देत आहेत, उपासाने त्यांच्या क्षीण होणार्‍या प्रकृतीची काळजी करत आहेत. भ्रष्टाचारावर अण्णांचा तोडगाच प्रभावी असल्याचे छातीठोक सांगत आहेत. अण्णांचा मार्ग हाच खरा मार्ग हे पटवून देण्याची अहमिका लागली आहे. उजवे-डावे सर्व एकत्र होऊन अण्णा विरोधकांचा समाचार घेत आहेत. गांधीवादाला सतत विरोध करणारे आणि यापूर्वी एका गांधीवाद्याची रेवडी उडवणारे आज दुसर्‍या गांधीवाद्याचा उदो उदो करत आहेत हे पाहून वैषम्य वाटले. याला नेमके काय म्हणावे असा प्रश्नही पडला.
  • मिपावर परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत?
  • अहिंसेचे आणि उपोषणाचे महत्त्व लोकांना पटले आहे?
  • आम्ही वातकुक्कुट बनलो आहोत?
  • की आणखी काहीतरी जे आम्हा पामरांच्या आकलन शक्तीपलिकडले आहे?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16489 वाचन

💬 प्रतिसाद (98)

प्रतिक्रिया

असहमत

परिकथेतील राजकुमार
Wed, 08/24/2011 - 17:35 नवीन
निट वाच ग तै.
त्यांच्याविषयी या पुढे मिपावर काहीही (सविस्तर) लिहिण्यास, चर्चेचा कोणताही धागा काढण्यास पूर्णत: बंदी आहे याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी..
त्यांचे नाव आले का नाही ? विषय संपला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

थांब!

प्रियाली
Wed, 08/24/2011 - 17:35 नवीन
थांब! तुझ्या चर्चेत गांधींचे नाव घेते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

शत्रुविरुद्ध अहिंसेचा मार्ग

विजुभाऊ
Wed, 08/24/2011 - 17:28 नवीन
शत्रुविरुद्ध अहिंसेचा मार्ग चूकीचा आहे. त्याला त्या मार्गाने हरविणे वेळखाऊ असते. तर जनतेने निवडून दिलेल्या सरकारला वेठीस धरण्याकरिता शांततामय मार्गाने केलेले आंदोलनही चूकीचे असते. जयप्रकाश नारायणानी पोलीस आणि सैन्याला हुकूम न मानण्याची विनन्ती केली होती त्याची आठवण झाली. सरकार जनतेने निवडून दिलेले असते हा गैरसमज आहे. जे निवडून येतात ते मिळून सरकार बनवतात किंवा येत नाहीत ते सरकार बनवतात.आनि नंतर निवडून येतात. शांततामय मार्गाने आंदोलन करणे हे सर्वात प्रभावी मार्ग आहे असा आजवरचा इतिहास आहे. संघर्ष रक्तपात करून जे निवडून येतात ( जिंकतात) त्यांचा शेवट सुद्धा तसाच होतो.( उदा: तालीबान) हा देखील इतिहास आहे.( अपवाद औरंगजेब) गुगळे जी आपले विचार फारच क्रान्तीकारक आहेत. कदाचित आणखी तीस चाळीस वर्षांनन्तर ते लोकाना आपलेसे वाटू शकतील
  • Log in or register to post comments

प्रतिसादाला प्रत्युत्तर अस्थानी आणि भलतेच...

चेतन सुभाष गुगळे
Wed, 08/24/2011 - 17:49 नवीन
शाहजी, एकतर माझ्या प्रतिसादाला जिथल्या तिथे प्रत्युत्तर न देता इथे दिलेत आणि तेही चूकीचे.. << संघर्ष रक्तपात करून जे निवडून येतात ( जिंकतात) त्यांचा शेवट सुद्धा तसाच होतो.( उदा: तालीबान) हा देखील इतिहास आहे.( अपवाद औरंगजेब) >> मी रक्तपाताचा मार्ग सूचविलेला नाहीच. फक्त आंदोलनाला (ते शांततामय मार्गाने असले तरी) घटनात्मक चौकटीतला पर्याय सूचविला आहे. पुन्हा एकदा नीट वाचा. <<स्वत: निवडणूका लढवून लोकप्रतिनिधी बनून संसदेत जाणे / न्यायालयात जनहितयाचिका दाखल करणे असे घटनात्मक मार्ग उपलब्ध असतातच ना.>> अवांतर : तुम्ही पण भविष्यवेत्ते आहात काय? << गुगळे जी आपले विचार फारच क्रान्तीकारक आहेत. कदाचित आणखी तीस चाळीस वर्षांनन्तर ते लोकाना आपलेसे वाटू शकतील>> नाही असं भविष्य कसं काय वर्तविलंत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

शांततामय मार्गाने आंदोलन करणे

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 08/25/2011 - 16:29 नवीन
शांततामय मार्गाने आंदोलन करणे हे सर्वात प्रभावी मार्ग आहे असा आजवरचा इतिहास आहे. सहमत आहे. शिवाजी महाराजांनी आग्र्यामधे औरंगजेबाच्या कैदेत असताना केलेल्या आमरण उपोषणामुळेच औरंगजेबाने त्यांची सुटका केली होती. आज आण्णा रामलीला मैदानावर त्याची पुनरुक्ती करत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

की आणखी काहीतरी जे आम्हा

विसोबा खेचर
Wed, 08/24/2011 - 17:37 नवीन
की आणखी काहीतरी जे आम्हा पामरांच्या आकलन शक्तीपलिकडले आहे?
मे बी..! बाकी चालू द्या.. :) तात्या.
  • Log in or register to post comments

तात्या काका

प्रियाली
Wed, 08/24/2011 - 19:50 नवीन
सांगा की जरा एक्श्प्लेन करून. तुमच्या मौलिक प्रतिसादासाठीच तर केला हा सर्व खटाटोप. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

मध्यमवयाकडे वाटचाल

राजेश घासकडवी
Wed, 08/24/2011 - 17:39 नवीन
मिपावर गेल्या दीडेक वर्षात प्रचंड बदल झालेले आहेत याबाबत वादच नाही. त्यातले कुठचे चूक कुठचे बरोबर वगैरे चर्चा न करता, काही नमूद करू इच्छितो. त्यावरून हे स्पष्ट होईल की मिपा आता तारुण्य संपून मध्यमवयीन व्हायच्या मार्गावर आहे. - एके काळी मिपाच्या मुखपृष्ठावर खादाडीबरोबर उत्तान सुंदरीचा फोटो यायचा. आता काही पाशवी शक्तींच्या उदयामुळे पुरषांचे अर्धनग्न फोटो येतात. वर ती आपली संस्कृतीच कशी आहे याचं स्पष्टीकरणही येतं. लिंगसमानतेच्या बाबतीत पारडं दुसऱ्या बाजूला झुकलेलं आहे की काय अशी शंका येते. - एके काळी लेखांना, प्रतिसादांना गलिच्छ कॉमेंट्स येण्याचं प्रमाण खूपच जास्त होतं. आता ते कमी झालेलं आहे. - मध्यंतरी संपादक मंडळावर सदस्यांचा हल्ला व त्याला संपादक मंडळाचं आधिकारिक धोरणातून प्रत्त्युत्तर असा लढा चालू होता. आता सदस्यप्रवृ्त्ती जरा मऊ झालेली आहे. व्यवस्थापनानेही स्वयंसंपादन वगैरे परत देऊन गुण्यागोविंदाने रहाण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. - गांधीवादाविषयी लेखात उल्लेख आला आहेच. अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांवरून मिपाची मध्यमवयाकडे वाटचाल सुरू झाली हे दिसून येतं. सांधेदुखीचा त्रास सुरू झालेला आहे हे मधूनमधून मिपा दमून झोपलेलं असतं यावरून दिसून येतंच. लवकरच मिपाला डायेबिटीस, रक्तदाब वगैरेंचाही त्रास सुरू होईल असं भविष्य वर्तवतो.
  • Log in or register to post comments

तुमच भविष्य खोट ठरो हीच

Dhananjay Borgaonkar
Wed, 08/24/2011 - 17:50 नवीन
तुमच भविष्य खोट ठरो हीच प्रार्थना. मिपा कायम तरुणच राहीली पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

ओक्के

परिकथेतील राजकुमार
Wed, 08/24/2011 - 18:23 नवीन
'घासु गुर्जी होण्यापेक्षा मला जॉन अब्राहम व्हायला का आवडेल?' ह्या धाग्याची वाट बघत आहे. *धाग्याची वाट बघत आहे, गुर्जींच्या फोटूची नाही ह्याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

मेले

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/24/2011 - 19:06 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ड्वाळे पाणावले.

प्रियाली
Wed, 08/24/2011 - 21:18 नवीन
अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांवरून मिपाची मध्यमवयाकडे वाटचाल सुरू झाली हे दिसून येतं. सांधेदुखीचा त्रास सुरू झालेला आहे हे मधूनमधून मिपा दमून झोपलेलं असतं यावरून दिसून येतंच. लवकरच मिपाला डायेबिटीस, रक्तदाब वगैरेंचाही त्रास सुरू होईल असं भविष्य वर्तवतो.
गुर्जींच्या विश्लेषणाने ड्वाळे पाणावले. देव करो आणि मिपा लवकरच बरं होवो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

मध्यमवयीन

आनंदयात्री
Wed, 08/24/2011 - 23:56 नवीन
मध्यमवयीन मिपा हे कदाचित वयस्कर कार्यकर्त्यांची उठबस वाढल्यानेही असेल :) (छिद्रान्वेश्यांसाठी: कृपया आमच्यात आणि कार्यकर्त्यांमधे भांडण लावायचे उद्योग करु नयेत, उपरोल्लेखित कार्यकर्त्ये वेगळे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

कार्यकर्ते

प्रियाली
Wed, 08/24/2011 - 23:56 नवीन
कार्यकर्ते वयस्क झाले आहेत याच्याशी बाडिस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

शेवटी

श्रावण मोडक
गुरुवार, 08/25/2011 - 10:51 नवीन
शेवटी त्यानं ऐकलं माझं. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

जसा रोग तस औषध. सगळीकडेच

Dhananjay Borgaonkar
Wed, 08/24/2011 - 17:47 नवीन
जसा रोग तस औषध. सगळीकडेच तुमचा हा गांधीवादीपणा कसा उपयोगी पडेल याचे क्रुपया स्पष्टीकरण द्यावे. आण्णांच्या सध्याच्या लढ्यात हिंसा करुन काहीच साध्य होणार नाही. बसेस जाळुन तोड्फोड केली तर सरकार अट्क नाही का करणार? आणि अशा परीस्थितीत जनतेचा पाठिंबा मिळण केवळ अशक्य होईल. आता मला सांगा उद्या मुंबई बाँब्स्फोटातला गुन्हेगार सापडला तर त्याच्याशी अहिंसेने वागणार का? आणि तुम्ही जे वर जे खोचकपणे म्हणालात की वध, खुन हत्या हे त्यावेळी करण अतिशय आवश्यक होतच. कारण देशापेक्षा गांधी त्याचा वाद मोठा नाही. असो हे खुप अवांतर होतय. बाकी तुमची चर्चा चालुदे.
  • Log in or register to post comments

आता मला सांगा उद्या मुंबई

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 08/25/2011 - 16:27 नवीन
आता मला सांगा उद्या मुंबई बाँब्स्फोटातला गुन्हेगार सापडला तर त्याच्याशी अहिंसेने वागणार का? हो आम्ही त्याच्यासमोर रोज उपोषणाला बसू. :) आणि तुम्ही जे वर जे खोचकपणे म्हणालात की वध, खुन हत्या हे त्यावेळी करण अतिशय आवश्यक होतच. कारण देशापेक्षा गांधी त्याचा वाद मोठा नाही. असो हे खुप अवांतर होतय. बाकी तुमची चर्चा चालुदे. चुकता आहात माणसावरून देश ओळखला जातो. आम्ही की नै आमच्या काऊंटीतल्या शॉपिंग मॉल मधे जातो तेव्हा गोरे लोक विचारतात कुठले हो तुम्ही? आम्ही म्हणतो "आम्ही इंडीयाचे". मग त्यांना काहीच कळत नाही. मग आम्ही म्हणतो "आम्ही गांधींच्या देशातले". मग बरोब्बर कळते त्यांना. त्यामुळे तुमचे म्हणणे पटले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

त्रास

विनायक प्रभू
Wed, 08/24/2011 - 17:47 नवीन
डायबेटीस, रक्तदाब वगैरे चा त्रास सुरु झाल्यावर होणारी इतर डीस्फंक्शन्स वर औषधाचा साठा करावा काय?
  • Log in or register to post comments

आता काही पाशवी शक्तींच्या

दत्ता काळे
Wed, 08/24/2011 - 18:02 नवीन
आता काही पाशवी शक्तींच्या उदयामुळे पुरषांचे अर्धनग्न फोटो येतात. वर ती आपली संस्कृतीच कशी आहे याचं स्पष्टीकरणही येतं. .. हे एकूण मतप्रवाहातून उलट्या दिशेने वहातंय, असं वाटतंय. अगोदरची काही वैचारीक खुन्नस आहे कां ?
  • Log in or register to post comments

हे राम!

श्रावण मोडक
Wed, 08/24/2011 - 18:56 नवीन
हे राम!!!
  • Log in or register to post comments

आले आले

चतुरंग
Wed, 08/24/2011 - 19:03 नवीन
लोकांच्यात काड्या सारायला! ;) काडीरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

राम का नाम बदनाम न करो

चेतन सुभाष गुगळे
Wed, 08/24/2011 - 19:11 नवीन
देखो ओ दीवानों तुम यह काम न करो; राम का नाम बदनाम न करो। http://www.youtube.com/watch?v=IautKhwCjq0&playnext=1&list=PL187870CC40132C92
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सर्व प्रकाराचे दोषी

प्रियाली
Wed, 08/24/2011 - 19:27 नवीन
या सर्व प्रकाराचे दोषी हेच आहेत. ;) घासुगुर्जी आता मोकळा श्वास घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

राम का नाम बदनाम न करो। मुहमे

विजुभाऊ
Wed, 08/24/2011 - 19:18 नवीन
राम का नाम बदनाम न करो। मुहमे राम बगल मे ....... असे एक वाक्य डोळ्यापुढे चमकून गेले
  • Log in or register to post comments

की आणखी काहीतरी जे आम्हा

आत्मशून्य
Wed, 08/24/2011 - 19:34 नवीन
की आणखी काहीतरी जे आम्हा पामरांच्या आकलन शक्तीपलिकडले आहे?
बरोबर. (हा धागा कौल असायला हवा होता)
  • Log in or register to post comments

ह्म्म्म...

धमाल मुलगा
Wed, 08/24/2011 - 19:35 नवीन
एव्हढं कशाला डोकेफोड करुन घ्यायची? एका वाक्यात उत्तर देता येईल. मिपा हे समाजाच्या एका सरमिसळलेल्या मोठ्या भागाचे प्रतिबिंब आहे, आणि समाज ही एक गुंतागुंतीची चीज आहे. शिंपल! अवांतरः एकुणातच, पडलेले प्रश्न हे हितचिंतेमधून पडले असावेत काय?
  • Log in or register to post comments

सहमत

आनंदयात्री
Wed, 08/24/2011 - 20:18 नवीन
सहमत आहे. मिपा मोठ्या समाजाचे प्रतिबिंब आहे :) मोठ्या समाजात डावे, उजवे, अतिरेकी छुपे देशद्रोही हे सगळे येणारच .. अंमळ टाईमपास करायचा असेन तेव्हा वाचेन इतर प्रतिक्रिया सविस्तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

इतर प्रतिक्रिया सविस्तर. हे

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 08/25/2011 - 16:37 नवीन
इतर प्रतिक्रिया सविस्तर. हे देखील सध्याच्या प्रवाहाला अनुसरून लिहीण्याची पद्धत आहे का? पळा मारतंय आता. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

प्रकाटाआ

नगरीनिरंजन
Wed, 08/24/2011 - 19:51 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

काही का असेना.

नगरीनिरंजन
गुरुवार, 08/25/2011 - 03:16 नवीन
काही का असेना. काँग्रेसवाल्यांनाच आता गांधीवाद/दी नडतोय याचाच आम्हाला सगळ्यात जास्त आनंद आहे. ;-)
  • Log in or register to post comments

ह्म्म्म.... माझ्या टाळक्यातले

मदनबाण
Wed, 08/24/2011 - 21:50 नवीन
ह्म्म्म.... माझ्या टाळक्यातले इचार :--- गांधीवादी असो वा सावरकरवादी देशाचे काही तरी भले झाले पाहिजे असा विचार टाळक्यात का नसावा ? व्यक्ती विरोध आणि व्यक्तीच्या विचारांना विरोध या दोन गोष्टी आहेत... प्रत्येकाचे प्रत्येक विचार पटायलाच हवे असे नाहीत्,तसेच त्या व्यक्तीचे काही विचार पटायलाही हरकत नसावी... अण्णा भगतसिंग आणि राजगुरु यांना विसरु नका असे देखील त्यांच्या भाषणात म्हणाले आहेत... अण्णा स्वतः गांधीवादी असुन त्यांनी ही नावे घेतली आहेत. असो... जाता जाता :--- सध्या आंदोलन शांतता मार्गाने चालु आहे, परंतु असामाजिक तत्व अशाच संधीच्या शोधात असतात ! उद्या जर या स्थितीचा फायदा घेउन कोणी हिंसाचार सुरु केला तर तो थांबवणे महाकठिण जाईल... परिस्थीती चिघळण्याच्या आधीच तोडगा निघायला हवा असे वाटते आहे. अण्णांची सध्याची प्रकॄती पाहुन काळजी वाटते आहे. कालाय तस्मे नमः !
  • Log in or register to post comments

थोडा फरक आहे, थोडा नाही

धनंजय
Wed, 08/24/2011 - 21:52 नवीन
थोडा फरक आहे, थोडा नाही. अण्णा हजारे आंदोलनाबाबत एका धाग्यात अभय बंगांनी* केलेल्या विश्लेषणाबाबत (ते पटले म्हणून) माझी आणि अन्य दोन-तीन सदस्यांची मते आली. अभय बंग यांनी बिनायक सेन* यांच्याबाबतही असेच काही विश्लेषण केले होते. सरकारचे आणि कोर्टाचे चुकल्याचे म्हटले होते. (अभय बंग या बाबतीत स्वतःशी सुसंगत आहेत.) परंतु त्या बाबतीतले विश्लेषण मिसळपावावर अनेकांनी एक तर ऐकले नव्हते, नाहीतर न पटूनही बंगांबाबतच्या आदरामुळे बिनायक सेन विरोधी मत असलेल्या लोकांनी सरसकट दुर्लक्षिले होते. अण्णा हजारे आंदोलनानंतरच्या पुढल्या विषयात गांधीवाद/घटना-अधिकार्‍यांचे सार्वभौमत्व वगैरे सगळ्या बाबतीत लोक पुनर्विचार करतील. वेगवेगळे लोक पुन्हा वेगवेगळी मते मूलभूत तत्त्वे म्हणून मांडतील. आणि वयोमानानुसार आणि जुन्या ओळखीनुसार तर फरक आहेच. दोन-तीन वर्षांचे जालीय वय म्हणजे जुने-जाणतेपणच होय. कित्येक जुन्या-जाणत्या लोकांचे एकामेकांत तावातावाने "तात्त्विक" भांडून झाले आहे. आता त्यांच्या आपापसातल्या प्रतिसाद-उपप्रतिसादांत थोडीफार सबूर दिसून येते. - - - (*वैद्यकीय उपचारांवेगळा संदर्भात प्रसिद्ध व्यक्तींचे "डॉ." हे बिरुद न वापरण्याची प्रथा आहे. मला पटणारी प्रथा आहे.)
  • Log in or register to post comments

अं?

प्रियाली
Wed, 08/24/2011 - 23:37 नवीन
वैद्यकीय उपचारांवेगळा संदर्भात प्रसिद्ध व्यक्तींचे "डॉ." हे बिरुद न वापरण्याची प्रथा आहे म्हणून बंगांना डॉ. बंग म्हणू नये या व्यतिरिक्त असणारा वरील प्रतिसाद मला कोणीतरी मराठीत भाषांतरित करून द्यावा. अनुवादही चालेल. शक्य असल्यास चर्चेशी त्याचा संबंधही सांगावा. मंडळ आभारी असेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

म्हणजे (शिक्षणाने डॉक्टर

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/25/2011 - 00:13 नवीन
म्हणजे (शिक्षणाने डॉक्टर असणार्‍या पण) वैद्यकीय व्यवसायात नसणार्‍या लोकांनी उदा. बिनायक सेन, अभय बंग, श्रीराम लागू, मोहन आगाशे, सलील कुलकर्णी इ. डॉ. असं स्वतःला म्हणवू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

आणि प्रा. डॉ?

प्रियाली
गुरुवार, 08/25/2011 - 00:38 नवीन
म्हणजे (शिक्षणाने डॉक्टर असणार्‍या पण) वैद्यकीय व्यवसायात नसणार्‍या लोकांनी उदा. बिनायक सेन, अभय बंग, श्रीराम लागू, मोहन आगाशे, सलील कुलकर्णी इ. डॉ. असं स्वतःला म्हणवू नये.
आणि प्रा. डॉनी? ;) असो. डॉक्टरांचं कळलं पण बाकी प्रतिसादाचा अर्थ कळला नाही असं म्हणायचं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रस्तावातील प्रश्नांचे संदर्भ

धनंजय
गुरुवार, 08/25/2011 - 01:04 नवीन
प्रस्तावातील प्रश्न : मिपावर परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत? प्रतिसादातील उत्तर "थोडा फरक आहे, थोडा नाही." राजेश घासकडवी यांनी गेल्या दोन-तीन वर्षांतली काही परिवर्तने नमूद केली आहेत. त्याला जोड म्हणून मी हे नमूद केले आहे की जुने-जाणते पूर्वी तितक्या अटीतटीने एकमेकांच्या विरोधातले मुद्दे मांडत नसावेत. (म्हणजे थोडा फरक झाला.) हे वातकुक्कुट होणे नव्हे. विविध मतवाद्यांचे पूर्ण मतपरिवर्तन वगैरे झालेले नाही. (म्हणजे थोडा फरक नाही.) प्रस्तावातील प्रश्न : अहिंसेचे आणि उपोषणाचे महत्त्व लोकांना पटले आहे? मिसळपावावरील बर्‍याच चर्चांत उपोषणाचा उल्लेख सरकारवर दबाव आणण्याचे तंत्र, घटनात्मक लोकशाही वगैरे प्रक्रियेला ब्लॅकमेल करण्याचे तंत्र वगैरे, अशा प्रकारे वाद झालेले आहेत. याबाबतीत अण्णा हजारे प्रकरणात उपोषणासारख्या "घटनाबाह्य" दबावतंत्राचे समर्थन करण्यासाठी अभय बंग यांची मुलाखत दाखला म्हणून दिली गेली. माझा मुद्दा आहे, की "घटनाबाह्य वैयक्तिकरीत्या शांततामय दबावतंत्राचे" महत्त्व हे मिसळपावावरती अगदी हल्लीच, बिनायक सेन प्रकरणात सर्वमान्य नव्हते. अभय बंगांचे बिनायक सेन यांना समर्थन आहे, ही बाब लक्षणीय आहे. मिसळपावावरच्या मतभिन्नतेमध्ये उपोषणासारख्या घटनाबाह्य दबावतंत्राचे समजून आलेले महत्त्व हे तात्पुरते आहे, असे माझे स्पष्टीकरण आहे. प्रस्तावातील प्रश्न : आम्ही वातकुक्कुट बनलो आहोत? नाही. कुठल्या राजकीय गन्तव्यांना समर्थन देऊ याबाबत बहुतेक मिसळपाव सदस्यांचे मत स्थिर आहे. वैयक्तिक रीत्या शांततामय पण घटनाबाह्य उपाय त्या गन्तव्याच्या समर्थनात असले, तेव्हा त्यांचे महत्त्व समजून येणे, मात्र वैयक्तिक रीत्या शांततामय पण घटनाबाह्य उपाय त्यावेगळ्या गन्तव्याच्या समर्थनात असल्यास त्यांचा धोका समजणे : हे वातकुक्कुट नसून स्थैर्य आहे. प्रस्तावातील प्रश्न : की आणखी काहीतरी जे आम्हा पामरांच्या आकलन शक्तीपलिकडले आहे? हा प्रश्न अलंकारिक वाटतो, उत्तर अपेक्षित नसावे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

पूर्ण मतपरिवर्तन

प्रियाली
गुरुवार, 08/25/2011 - 03:09 नवीन
विविध मतवाद्यांचे पूर्ण मतपरिवर्तन वगैरे झालेले नाही.
हे लक्षात आले आहेच. पूर्ण मतपरिवर्तन न होणे धोकादायक वाटते. तो संधीसाधूपणाही असू शकेल.
मिसळपावावरच्या मतभिन्नतेमध्ये उपोषणासारख्या घटनाबाह्य दबावतंत्राचे समजून आलेले महत्त्व हे तात्पुरते आहे
शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

प्रतिसाद

मुक्तसुनीत
Wed, 08/24/2011 - 22:04 नवीन
"मिपा गांधीवादी बनते आहे का ?" या प्रश्नाचे अनेक अर्थ असू शकतात. मिपाचे चालक गांधीवादी बनलेत का ? मिपाचे प्रशासकीय अधिकारी तसे बनले आहेत का ? मिपाचे अधिकाधिक सभासद गांधीवादी बनलेत का ? मिपाचे सर्व सभासद गांधीवादी बनलेत का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्या मते "नाही" अशीच आहेत. एकंदर मिपावर - आणि अन्य संस्थळांवर देशकालसंदर्भातल्या सद्यस्थितीचे प्रतिबिंब पडताना दिसते. वर्तमानकालीन परिस्थितीमधे अण्णा हजारे या गांधीवादी व्यक्तीच्या आंदोलनाचा प्रभाव भारतीयांच्या मनावर आहे हे उघड आहे. याचंच प्रतिबिंब इथे पडताना दिसतंय, इतकंच. उद्या कुठल्या अन्य स्वरूपाच्या विचारसरणीतल्या व्यक्ती/घटना ठळक बातम्यांमधे यायला लागल्या तर तशा स्वरूपाच्या चर्चा उद्भवतील.
  • Log in or register to post comments

अण्णांचा प्रभाव

प्रियाली
गुरुवार, 08/25/2011 - 00:09 नवीन
अण्णांचा प्रभाव पडणे याच्याशीच संबंधित आहे हा विषय. जर मला स्मगर्लस पसंत नसतील तर मला दाउद पसंत नसेल आणि वीरप्पनही पसंत नसेल पण एखाद्याला गांधी पसंत नसतील तर त्यांना अण्णा पसंत का असावेत? जर गांधींच्या उपोषणाने आणि उपासाने देशाचे प्रश्न सुटले नाहीत, सुटणार नसतील तर अण्णांना पाठिंबा का बरे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

"पाठिंबा"

मुक्तसुनीत
गुरुवार, 08/25/2011 - 00:22 नवीन
अहो उद्या कदाचित "दाऊदभाई जरा जपा" इतपत येतील धागे. म्हणजे काही पाठिंबा नव्हे ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

अरे यावरून आठवले मिपा सदस्या

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 08/25/2011 - 16:40 नवीन
अरे यावरून आठवले मिपा सदस्या गांधीवादी बरेच दिवसात मिपावर फिरकेलेले दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

वातकुक्कुट

पिवळा डांबिस
Wed, 08/24/2011 - 22:04 नवीन
काही असो, मिपावर जास्तीत जास्त वातकुक्कुट (आणि वातकुक्कुट्या!!) असाव्यात असं आम्हाला नेहमीच वाटतं... आमच्या सागुतीसाठी उपयोगी पडतात हो! -राक्षस ऑफ पाताळविजयम् ;)
  • Log in or register to post comments

आधी काय?

पैसा
Wed, 08/24/2011 - 23:26 नवीन
आधी कोंबडी की आधी अंडं या प्रश्नाइतकाच कठीण प्रश्न प्रियालीला पडलाय खरा... पण पिडांकडे याचंही उत्तर आहे... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

प्रश्न

प्रियाली
Wed, 08/24/2011 - 23:28 नवीन
प्रश्न कठीण नाही पण उत्तर किती कठीण आहे ते कळतंय. ;) आम्हाला वातकुक्कुटच आवडतात. कोंबडी या स्त्रीलिंगी सतत अत्याचार झाल्याने वातकुक्कुटींना बाजूला ठेवावे आणि वातकुक्कुटाचीच सागुती करावी. आमंत्रण द्यायला विसरू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ही पाकृ

पैसा
गुरुवार, 08/25/2011 - 00:01 नवीन
"ही पाकृ अंडी न घालता करावी" आणि रासवट खिचडीला जसे खिचडा म्हणण्यात येते, तसंच वातकुक्कुटाच्या सागुतीला सागुती न म्हणता "तो सागुता" म्हणण्यात यावे अशी उपसूचना मांडण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

-राक्षस ऑफ पाताळविजयम्

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/24/2011 - 23:18 नवीन
ह्हा ह्हा ह्हा...भक्षस ऑफ विजयीपाताळम :wink: ....ह्हा ह्हा ह्हा :bigsmile:
  • Log in or register to post comments

आमचं मत.

Nile
गुरुवार, 08/25/2011 - 04:28 नवीन
साम्यं आहे पण त्याचा अन गांधीवादाचा फार संबंध नाही असं आमचं मत आहे. आता आम्हाला अजून मोठं व्हायचं आहे त्यामुळे आमच्या मताला कीती महत्त्व द्यायचं ते मोठ्यांनीच ठरवावे (आणि मोठे नसल्याने कसंही असलं तरी आमचं मत आम्ही देणारचं) गांधींमुळे देशाचं आणि पर्यायाने प्रत्येक भारतीयाचं (म्हणजे 'माझं') मोठं नुकसान झालं असा एक समज बर्‍याच लोकांमध्ये दिसतो. तद्वतच, ह्या भ्रष्टाचारामुळे देशाचं अन (पर्यायाने 'माझं') फार नुकसान होत आहे (मग आम्ही लायसन काढायाला स्वखुशीने १०० च्या नोटा देत असलो तरी) असा पक्का समज जनमानसात आहे असे दिसते. साम्य हे की, गांधीविरोधी मते प्रकट करून किंवा त्या विरोधात (जमेल तितका) सक्रीय सहभाग घेऊन आपण आपले देशप्रेम व्यक्त करतो आहोत असे मान'सीक' समाधान लोकांना लाभत असावे. तसेच (रोजच्या भ्रष्टाचाराला मदत करत असूनही) या अण्णांच्या लढ्याला समर्थन दिल्याने आपण देशासाठी काहीतरी करत आहोत (आणि भ्रष्टाचाराला हातभार लावल्याच्या पापाचे क्षालन करीत आहोत) असे लोकांना वाटत असावे असे आमचे मत झाले आहे. खरं तर सामान्य माणूस समर्थन देताना प्रत्येक वेळी माझे समर्थन कोणत्या 'वादाला' आहे याची काळजी करत असेल असे आम्हाला वाटतच नाही. 'वरलीया रंगाला' भूलून्/प्रेरीत होऊन तो समर्थन करत असतो. दूरगामी परिणामाची चिंता विचारवंत/जंत इत्यादींनी करावी असे त्याने गृहीतच धरलेले असावे. असो.
  • Log in or register to post comments

गांधींबद्द्ल थोडेसे

वसईचे किल्लेदार
गुरुवार, 08/25/2011 - 09:58 नवीन
आजचे आंदोलन गांधीवादी आहे कि नाही हा मुद्दा बाजूला ठेउन गांधींबद्द्ल थोडेसे ... गाधींना बोलण्याआधी अवीनाश धर्माधीकार्यांचा आवाज जरुर ऐकावा. http://www.esnips.com/web/MahatmaGandhi-AvinashDharmadhikari
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा