Skip to main content

बाळासाहेबासुध्दा आपली पोळी भाजायला सरसावलेत आता!

भाकरी यांनी या दिवशी प्रकाशित केले.
लेखनप्रकार
बाळासाहेबानी अण्णाना पत्र पाठवलं आहे. त्यातला थोडा मजकूर (मटा मधून) पहा - -----------------आपणांस आठवत असेलच , ४ ऑक्टोबर १९९६ रोजी आपण मला मातोश्री या निवासस्थानी भेटलात. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून आपल्या दोघांत चर्चाही झाली. तेव्हाही सर्व थरांत व्यापून राहिलेला भ्रष्टाचार मोडून काढण्याचे वचन मी आपणास दिले होते आणि आपणही त्यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाला होतात की , शिवसेनाप्रमुख हाच आता आशेचा किरण आहे. केवळ तेच हा सर्वव्यापी भ्रष्टाचार मोडून काढण्याचे धाडस दाखवू शकतात. अन्य कोणातही हिंमत नाही. आम्ही समन्वयाने एकत्र काम करू. मग यश निश्तितच ! असा विश्वासही आपण तेव्हा व्यक्त केला होता , पण दुर्दैवाने त्याचदरम्यान आमच्यावर काही कौटुंबिक आपत्ती कोसळल्या व आपल्यातला संपर्क तुटला तरी आम्ही आमच्या भूमिकेवर आजही ठाम आहोत व तुमचाही लढा वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. -------------- काय कमाल आहे. देशभरातून अण्णांच्या आंदोलनाला मिळणारा पठिंबा बघून थोर बाळासाहेबाना थेट १५ वर्षांपूर्वी झालेली भेट आठवली!! पण एक मात्र आहे हं, ४ ऑक्टोबर १९९६ पासून ते आजतागायत भ्रष्टाचाराविरूध्द बाळासाहेबानी काहीही केलं नसलं तरी ते त्यांच्या "भूमिकेवर आजही ठाम आहेत". !!!!!
प्रियाली

आमचे संत तात्याबा महाराज राजघाटावर चिंतन करून आलेल्या अण्णांना "अण्णा प्लीज जपा" असं म्हणू शकतात तर बिचार्‍या बाळासाहेबांनी काय पाप केलंय? कदाचित त्यांचं थोडंफार परिवर्तन झालं असेल किंवा समाज नावाच्या गुंतागुंतीच्या प्रकारामुळे त्यांना अस करणं भाग पडलं असेल किंवा ते "मोठे" झाले असतील.
25/08/2011 - 03:16 Permalink
स्पंदना

व्वा! काय पत्र लिहिलय. एकुण सारी तरुण पिढी अण्णाच्या माग गेली म्हंटल्यावर हा परिवर्तनाचा भाग आठवला असावा अस दिसतय. चालु दे. नशिबान या वेळी हे आण्दोलन बुद्धीवादी अन प्रामाणिक लोकांच्या सहाय्य्यान उभ राहिलए आहे, अदर्वाइज बहुतेक दा आपापली पोळी भाजुन घेण्या पुरता उपयोग असतो या आंदोलनांचा.
25/08/2011 - 07:12 Permalink
चिरोटा

In reply to by स्पंदना

नशिबान या वेळी हे आण्दोलन बुद्धीवादी अन प्रामाणिक लोकांच्या सहाय्य्यान उभ राहिलए आहे,
ह्याचाच अनेक राजकारणी आणि 'ज्येष्ठ' पत्रकारांना त्रास होतोय. आंदोलनात 'रंजले गांजलेले' असते तर अरुणा/अरुन्धती रॉय,केतकर अण्णांच्या बाजुलाच उपोषणाला बसले असते.
25/08/2011 - 08:37 Permalink
चिरोटा

शिवाजी पार्कवर 'लाखांच्या' सभा घेणे वेगळे आणि लाखांचे आंदोलन चालवणे वेगळे हे बाळासाहेबांना कळ्ले असावे. पा भे ने म्हंटल्याप्रमाणे पुढारी कुंपणावर बसून आहेत्. पुढचा काही काळ बघता कुंपणावर बसण्यावाचून त्यांना दुसरा पर्याय पण नाही.
25/08/2011 - 08:29 Permalink
दत्ता काळे

बाळासाहेब अण्णांना "वाकड्या तोंडाचा गांधी" म्हणाले होते. आता त्यांच्याबद्दल ते चांगलं बोलताहेत. त्यांचे मत बदलले असेल किंवा हा राजकारणी धूर्तपणाही असेल पण जे काही आहे ते एकूण चळवळीच्या दृष्टीने सकारात्मक आहे. फक्त बा.सा.च्या विधानात अण्णांनी उपोषण सोडून देऊन ते केजरीवाल, बेदी ह्यांना करायला लावावे हे जे वाक्य आहे त्यात "सरकारची भूमिका आता ठाम राहील मग उपोषण पुढे कितीही चालू राहीले तरी हरकत नाही, त्यावर जी कृती करायची ती आम्ही करूच" असा गर्भितार्थ तर दडला नाही नां ? कि जो ( कदाचित सर्वपक्षीय सभेत ठरला असेल आणि ) बा.सां.ना माहीत / कळाला असेल.
25/08/2011 - 12:14 Permalink
मदनबाण

In reply to by दत्ता काळे

बाळासाहेब अण्णांना "वाकड्या तोंडाचा गांधी" म्हणाले होते. महाराष्ट्रात १९९५ मध्ये सत्तारूढ झालेल्या शिवसेना-भाजप युतीचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याबद्दल 'वाकड्या तोंडाचा गांधी' अशी अण्णांची संभावना बाळासाहेबांनी केली होती.
25/08/2011 - 20:12 Permalink
मराठी_माणूस

ते एकूण चळवळीच्या दृष्टीने सकारात्मक आहे. जर खरेच उपरती झाली असती तर आपल्या आधिच्या खालच्या दर्ज्याच्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला असता. तसा उल्लेख पत्रात दिसत नाही. ही सकारात्मकता धोरणीपणातुन आलेली आहे.
25/08/2011 - 13:06 Permalink
सोत्रि

उद्धवला बाशिंग बांधुन त्यांनी घोड्यावर बसवले खरे पण 'तलवार' केव्हा व कशी पाज़ळावी हे त्याला शिकवायला ते विसरले. मग त्यांना उद्धवला रांकेला लावायला अश्या कोलांट्या उड्या वेळोवेळी माराव्या लागतात. अवांतर: भाकरीची कोणीतरी पोळी भाजते आहे म्हणुन झालेली चिडचिड चेहेर्‍यावर अंमळ हसु आणुन गेली. - (भाकरी आणि पोळी दोन्ही 'गरजेनुसार' भाजणारा) सोकाजी
25/08/2011 - 13:16 Permalink
अनंत छंदी

जाऊ द्या हो, तुम्ही तरी किती गंभीरपणे घेता? शेवटी "बाळ" लिला म्हणून सोडून द्या! ;) म्हातारपण म्हणजे दुसरं "बाळ"पणच की. :))
25/08/2011 - 17:17 Permalink