Skip to main content

...

लेखक प्रियाली यांनी शुक्रवार, 19/08/2011 01:34 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 31373
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

In reply to by प्रियाली

माझा अतिशय नावडता लेखक आहे तो. फक्त जेल मध्ये त्याला सक्तमजूरी वर पाठवावे नाहीतर रिकामा बसला तर तिथे अजून काही तरी लिहील. किंवा सरळ त्याला फासावरच चढवावे. दोनवेळा अभिनंदन केल्याबद्दल धन्यवाद. पण मला वयाने वाढलेल्या पण बालबुद्धी राखणार्‍या पुरुषांना शिकवण्यात अधिक इंटरेस्ट वाटतो.>> ही इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर एखाद्या असायलम मध्येच रुग्णप्रशिक्षक व्हा.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

ही इच्छा पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर एखाद्या असायलम मध्येच रुग्णप्रशिक्षक व्हा.
तुम्ही योग्य जागी भेटलात याचा आनंद वाटतो. :) शिकवणी कधी सुरू करायची म्हणता? ;)

In reply to by चेतन सुभाष गुगळे

श्री. गुगळे, तुम्ही हा धागा पूर्ण आणि नीट वाचला आहेत का अशी शंका आली. त्याशिवाय राजधानी एक्सप्रेसमधे भेटलेल्या एका स्त्रीशी झालेल्या गप्पांवरून तुम्ही समस्त किंवा बहुसंख्य स्त्रियांच्या विचारांची कल्पना करता आहात का अशीही एक शंका आली. अशी कल्पना करायला काही ना नाही, पण ती वस्तुस्थितीच्या कितपत जवळ जाणारी असेल याबाबतीत मला शंका आहे. एकेकाळी नवर्‍याला घरकामात मदत करायला लावणार्‍या बायका, स्वतःच्या मुलाने सुनेस मदत केल्यास चिडतात वगैरे गोष्टी अनेक गोष्टींमधे वाचल्या आहेत.
त्याकरिता तुम्ही शिक्षिका होणे अतिशय उत्तम. कारण तुम्ही जास्तीत जास्त मुलांना घडवू शकाल.
हा हा हा ... शाळेत का मुलांना घडवतात? आमच्या वेळेस तर गधा मजदूरी केली की काम झालं इतपतच आम्हाला शाळेतून घडवलं गेलं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

श्रीमती ३_१४विक्षिप्त अदिती तुमच्या शंकांचं निरसन करतो. त्याकरिता इथल्याच संदर्भांचा वापर करतो. श्री. गुगळे, तुम्ही हा धागा पूर्ण आणि नीट वाचला आहेत का अशी शंका आली>> या शंकेच्या निरसनाकरिता साक्षात याच धाग्याच्या उगमकर्त्या प्रियाली यांनी माझ्या प्रतिसादाला दिलेल्या उपप्रतिसादातील हे वाक्य वाचा. विडंबनांवर इतका गहन विचार करणार्‍या माणसांचे मला अतिशय कौतुक वाटत आले आहे. त्या कौतुकास गूगळे आज पात्र ठरले. अभिनंदन!>> मी धागा पूर्ण आणि नीट वाचला आहे हे समजण्याकरिता यापेक्षा मोठा पुरावा तो दुसरा कोणता? त्याशिवाय राजधानी एक्सप्रेसमधे भेटलेल्या एका स्त्रीशी झालेल्या गप्पांवरून तुम्ही समस्त किंवा बहुसंख्य स्त्रियांच्या विचारांची कल्पना करता आहात का अशीही एक शंका आली. अशी कल्पना करायला काही ना नाही, पण ती वस्तुस्थितीच्या कितपत जवळ जाणारी असेल याबाबतीत मला शंका आहे.>> या शंकेच्या निरसनार्थ तुमचीच पुढची वाक्यं वापरतो. एकेकाळी नवर्‍याला घरकामात मदत करायला लावणार्‍या बायका, स्वतःच्या मुलाने सुनेस मदत केल्यास चिडतात वगैरे गोष्टी अनेक गोष्टींमधे वाचल्या आहे>> वगैरे गोष्टी गोष्टींमध्येच वाचल्या असल्यात तरी त्या वस्तुस्थितीवर च आधारीत होत्या. अन्यथा ४९८ अ कलमाखाली केल्या गेलेल्या तक्रारींमध्ये पती, दीर ,सासरा या पुरूषमंडळींसोबतच सासू, नणंद, जाऊ या महिला मंडळींनाही आरोपी केल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचायला मिळाल्या नसत्या. शाळेत का मुलांना घडवतात? आमच्या वेळेस तर गधा मजदूरी केली की काम झालं इतपतच आम्हाला शाळेतून घडवल>> ते तुम्ही तुमच्या लिखाणातून सिद्ध करून दाखवित असताच शिवाय तुमच्या वापरकर्त्या नावा मधील एका शब्दावरून त्याची कल्पना येतेच. त्याविषयी आम्ही कुठलीही वेगळी शंका उपस्थित करणार नाहीत.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

या शंकेच्या निरसनाकरिता साक्षात याच धाग्याच्या उगमकर्त्या प्रियाली यांनी माझ्या प्रतिसादाला दिलेल्या उपप्रतिसादातील हे वाक्य वाचा.
पहिल्याच ओळीत प्रियालीने 'प्रेरणा' काय हे पण सांगितलं आहे.
वगैरे गोष्टी गोष्टींमध्येच वाचल्या असल्यात तरी त्या वस्तुस्थितीवर च आधारीत होत्या.
हे मी अमान्य करतच नाहीये. पण या आणि अशाच गोष्टींवरून सर्वसामान्य, बहुसंख्य स्त्रिया अशाच असतात असा काही तुमचा समज आहे का अशी शंका आली.
ते तुम्ही तुमच्या लिखाणातून सिद्ध करून दाखवित असताच शिवाय तुमच्या वापरकर्त्या नावा मधील एका शब्दावरून त्याची कल्पना येतेच.
आम्हाला आम्ही स्वकष्टाने कमावलेल्या ३.१४, अर्थात इरॅशनल, विक्षिप्तपणाचा पुरता अभिमान आहे; हा विक्षिप्तपणा शालेय शिक्षणातून आलेला नाही. असा काही संबंध जोडता आला तर तो निव्वळ योगायोग असेल याची कृपया सर्वांनीच नोंद घ्यावी.
----
अवांतरः "श्रीमती ३_१४विक्षिप्त अदिती" यातलं श्रीमती हे विशेषण पाहून अंमळ गंमत वाटली. (आंतरजालावर निव्वळ आयडीरूपी) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अवांतरः "श्रीमती ३_१४विक्षिप्त अदिती" यातलं श्रीमती हे विशेषण पाहून अंमळ गंमत वाटली. >> बहुधा हे विशेषण नको असावं. कारण पुढे विक्षिप्त शब्द येत असल्यावर श्रीमती तील मतीला रजा देणंच भाग आहे आणि नुसतं श्री विशेषण तर पुरूषांकरिताच वापरलं जातं.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

छे, छे! श्री. हे लघुरूप श्रीयुत या शब्दाचं असतं, 'श्रीमती'मधे मती आहे, श्रीयुतमधे मतीचा संबंधच नाही. (या केविलवाण्या न-विनोदाबद्दल मला मिपा वाचकसंघाने माफ करावं अशी विनंती.) '३_१४ विक्षिप्त अदिती' हा आंतरजालावरील आयडी आहे. तुम्ही आयडीशी संवाद साधता आहात, जिवंत माणसाशी नाही असं काहीसं सुचवायचं होतं. विशेषण नको आहे हा अंदाज योग्य आहे, पण विश्लेषण पारच चुकलं आहे. आणि का हो, विक्षिप्त लोकांना मती का असू नये? आम्हीही माणूसच आहोत, आम्हालाही आपलं म्हणा. अवांतरावरही विकेट काढता येते हे नवीनच आहे. एकेकाळी अवांतरावरून चांदण्या द्यायचे. पण ते एक असो.

अच्छा असे प्रशिक्षक आधी माझ्या हाताखालीच शिकायला येतात हे तुम्हाला कळले तर... कधीही या. खाली संपर्क तपशील दिला आहेच.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

अच्छा असे प्रशिक्षक आधी माझ्या हाताखालीच शिकायला येतात हे तुम्हाला कळले तर...
पुन्हा एकवार अभिनंदन! पण मी तुमची शिकवणी घेण्याबद्दल म्हणत होते.
खाली संपर्क तपशील दिला आहेच.
कृपया, मिपाचा वापर जाहीराती आणि धंद्यासाठी करू नये.

In reply to by प्रियाली

पुन्हा एकवार अभिनंदन! पण मी तुमची शिकवणी घेण्याबद्दल म्हणत होते.>> अभिनंदनाबद्दल पुनश्च आभार पण मला शिकवणी द्यायचा विचार केलात म्हणजे तुमचा अंदाज चूकला म्हणायचा. तुमच्या माहितीकरिता - मी असायलममध्ये नसतो. माझ्या घरातच राहतो. कृपया, मिपाचा वापर जाहीराती आणि धंद्यासाठी करू नये. >> मी कधीच करीत नाही (तसं करायला मी ज्योतिषी थोडाच आहे?). माझे शत्रू सुद्धा माझ्यावर हा आरोप करू शकणार नाहीत. मी स्वाक्षरीत संपर्क तपशीलच फक्त देत असतो. व्यवसायाचा उल्लेख कधीच करीत नाही.