Skip to main content

...

लेखक प्रियाली यांनी शुक्रवार, 19/08/2011 01:34 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 31373
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

In reply to by चिंतातुर जंतू

कुठे ते एके काळचे 'आजची खादाडी'सोबतच्या पुष्ट स्त्रिया आपल्या दमदार छातीवर लेवूनही त्यांच्या भाराने अजिबात न वाकणारे आमचे 'रीतीभातीचे' संकेतस्थळ अन कुठे हे आजकालचे उच्छृंखल बाजारू संकेतस्थळ. जगदंब जगदंब!!!
बरं! बरं! इतके नाराज होण्याचे काही कारण नाही. सर्वांचेच पोट भरेल अशीही व्यवस्था करता येईलच की.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्याचं असं झालं की हात बाईचा कशावरून असा तांत्रिक मुद्दा राजेशनी काढला. शिवाय प्रियालीचा धागा... कुणाचा हात अचानक, कुठून कोणाच्या खांद्यावर येऊन पडतो असे प्रश्न लोकांना पडायला नकोत म्हणून स्वच्छ आणि स्पष्ट फोटो दिला.

In reply to by प्रियाली

छ्या, जुन्या मालकांनी सोय केली आहे की! म्हणून टाक "ज्याची त्याची जाण, समज, इ.इ ...."! हाय काय नाय काय!! तरी एक बरं केलंस हां, सल्लूचा टॉपलेस फोटोच टाकलास.

In reply to by प्रियाली

या पुरुषाने तर कानात रिंगा देखील घातलेल्या आहेत. म्हणजे त्याच्या उपयुक्तपणात 'दागिने शेअर करता येणारा' ही भर पडली.

मस्त जमलिये कविता! जबरदस्त विडंबन. --मयुरा.

सॉल्लिड करमणूक होतेय. संपादकीय सल्ला : मस्करीची कुस्करी होणार नाही याची काळजी घ्या.

या धाग्यातली कविता आणि प्रतिसादातले अन्य लिखित विनोद मी मनापासून एंजॉय केले. कवितेमधे (काहीशा मिष्किलपणे) व्यक्त झालेल्या पुरुषप्रतिमेबद्दल मी प्रस्तुत कवितेच्या कर्तीच्या मतांशी सहमती व्यक्त करतो. मात्र , जॉन अब्राहम आणि/किंवा इतर पुरुषविशेष यांची इथल्या धाग्यावर लावलेली अर्धनग्न चित्रे म्हणजे "आजची खादाडी" आणि इतर प्रसंगी इथल्या संकेतस्थळावर वेळोवेळी लावल्या गेलेल्या स्त्रियांच्या कमी अधिक कपड्यांमधल्या चित्रांना दिलेली दाद आहे असं समजायचं काय ? माझ्यापुरतं बोलायचं तर मला कुणाही लिंगी व्यक्तीची तोकड्या कपड्यांमधली चित्रे आणि मुख्यम्हणजे त्यावर केलेल्या कमेंट्स हा प्रकार अत्युच्च अभिरुचीचा वाटत नाही. अर्थात "हॉट ऑर नॉट" इत्यादि स्वरूपाच्या गोष्टींवर बंदी घालायची काहीच गरज नाही. सेक्स-व्हॉयलन्स-धार्मिक संवेदनशील मजकूर- वैयक्तिक टिकाटिप्पणी वगळता कुठल्याही अभिव्यक्तीवर कदापि बंदी घातली जाऊ नये या माझ्या (आजवर ठामपणे जोपासलेल्या) भूमिकेत जराही बदल मी करत नाही. उपरोक्त कुठल्याही "सेन्सॉरेबल" प्रकाराला वगळता बाकी कुणीही काहीही लिहो नाहीतर डकवो, त्यावर बंदी नाही आणि माझी हरकतही नाहीच. प्रश्न व्यक्तींना, त्यांच्या शारिरीक अवयवांना वस्तुरुप देण्याचा आहे. आजवर "आजची खादाडी" टाईप स्त्रीदेहाला वस्तुरूप करणार्‍या प्रवृत्तींबरोबर माझी रुचिभिन्नता मी व्यक्त करत आलो. इथे डकवलेल्या चित्रांच्या संदर्भातसुद्धा ही रुचिभिन्नता व्यक्त करणे मी अपरिहार्य समजतो आणि त्याची इथे नोंद करतो.

In reply to by मुक्तसुनीत

आले किरवंत आपलं विचारजंत आपलं ... जाउ द्या....

In reply to by मुक्तसुनीत

या धाग्यातली कविता आणि प्रतिसादातले अन्य लिखित विनोद मी मनापासून एंजॉय केले. कवितेमधे (काहीशा मिष्किलपणे) व्यक्त झालेल्या पुरुषप्रतिमेबद्दल मी प्रस्तुत कवितेच्या कर्तीच्या मतांशी सहमती व्यक्त करतो.
धन्यवाद. :) याचबरोबर, अर्धनग्न कत्रिनाचे फोटो पाहून एखाद्याच्या भावना दुखावल्या असतील किंवा रुचीहिनता वाटत असल्यास मी क्षमा मागते आणि गरज भासल्यास केवळ कत्रिनाचा फोटो संपादकांनी क्रॉप करून लावावा अशी मी विनंतीही करते. तरीही असे नमूद करेनच की कत्रिनाने घातलेले कपडे आज पार्ट्यांमध्ये, अ‍ॅवार्ड सेरेमनीला आणि इतर सार्वजनिक प्रसंगात सर्रास घातले जातात. ते तोकडे असले तरी प्रचलित आहेत असे वाटते. तांत्रिक भाषेत तो फोटो अर्धनग्नही नाही कारण खांदे, हात आणि पाय दाखवणे याला अर्धनग्न म्हणता येत नाही असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
मात्र , जॉन अब्राहम आणि/किंवा इतर पुरुषविशेष यांची इथल्या धाग्यावर लावलेली अर्धनग्न चित्रे म्हणजे "आजची खादाडी" आणि इतर प्रसंगी इथल्या संकेतस्थळावर वेळोवेळी लावल्या गेलेल्या स्त्रियांच्या कमी अधिक कपड्यांमधल्या चित्रांना दिलेली दाद आहे असं समजायचं काय ?
प्रश्नाचे उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलेले आहे. एखादी गोष्ट विनाकारण आणि वेळोवेळी होत गेली की ती उबगवाणी ठरते. मिपावर वेळोवेळी लावल्या गेलेल्या चित्रांना आणि एखादे वेळी आलेल्या या धाग्याला एका पारड्यात तोलू नये ही विनंती. (तोट्याचा सौदा आहे. वजन सारखे भरणे केवळ अशक्य.)
प्रश्न व्यक्तींना, त्यांच्या शारिरीक अवयवांना वस्तुरुप देण्याचा आहे. आजवर "आजची खादाडी" टाईप स्त्रीदेहाला वस्तुरूप करणार्‍या प्रवृत्तींबरोबर माझी रुचिभिन्नता मी व्यक्त करत आलो. इथे डकवलेल्या चित्रांच्या संदर्भातसुद्धा ही रुचिभिन्नता व्यक्त करणे मी अपरिहार्य समजतो आणि त्याची इथे नोंद करतो.
मला वाटतं तसा उद्देश नव्हता पण चिंजंच्या प्रतिसादातून तशी गंमत केली गेल्याने इतरांनीही त्याला प्रतिसाद दिला असे वाटते. रुची ही रोज एकसारखी ठेवून भागत नाही, कधीतरी रुचीपालट करावा लागतो तसेच हे असावे. परंतु, रुचीपालट हा ही एखादेवेळेसच होतो यावरही विश्वास ठेवावा.
माझ्यापुरतं बोलायचं तर मला कुणाही लिंगी व्यक्तीची तोकड्या कपड्यांमधली चित्रे आणि मुख्यम्हणजे त्यावर केलेल्या कमेंट्स हा प्रकार अत्युच्च अभिरुचीचा वाटत नाही.
मला वाटतं आलेल्या कमेंट्स अतिशय साध्या आहेत. या संकेतस्थळाने वेळोवेळी यापेक्षा मोठ्या कमेंट्स आणि कॉम्प्लिमेंट्स (वहिनीपासून आयटम बॉम्ब) रिचवल्या आहेत आणि "हिक्क" सुद्धा केलेले नाही. कत्रिनाच्या कपड्यांबद्दल उहापोह झाला आहेच, आता जॉन आणि सल्लूकडे वळू. त्यांनी कपडे न घालणे हा अभिरुचीचा प्रकार नसून आपल्या संस्कृतीचा प्रकार आहे. मिपाच्या उजवीकडे उघडे ज्ञानेश्वर महाराज बसले आहेत. त्यांच्या फोटोवर कोणी आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. (कृपया, ज्ञानेश्वर आणि जॉन यांच्यातील समान धागा केवळ "पुरुष" एवढाच आहे असे समजावे. बाकी, समानता नसावी.) खालील फोटोवर कोणी आक्षेप घेईल असे वाटत नाही. येथेही खालचे पुरुष अर्धनग्न आहेत. तुमच्या तरुण/लहानपणी हा फोटो घरात लावला होता का? तुमच्या नसला तरी इतर अनेकांच्या असेल - सांगायचा मुद्दा एवढाच आहे की पुरुषांचे अर्धनग्न फोटो ही आमची संस्कृती आहे. त्यात अभिरुचीहीनतेचा संबंध नाही परंतु कत्रिनाच्या अर्धनग्न नसलेल्या पण एखाद्याला तसे वाटू शकते टैप फोटोबद्दल मी माफी मागायला तय्यार आहे. :) पण अगदी त्याच फोटोसारखा राधाकृष्णाचा फोटो (जवळपास तेवढ्याच कपड्यांतला) माझ्या घरात विराजमान आहे असे नमूद करते.
From Untitled Album
* फोटो विविध संकेतस्थळांवरून घेऊन येथे लावले आहेत. ते मी काढलेले नाहीत.

In reply to by प्रियाली

पुरुषांचे अर्धनग्न फोटो ही आमची संस्कृती आहे. त्यात अभिरुचीहीनतेचा संबंध नाही परंतु कत्रिनाच्या अर्धनग्न नसलेल्या पण एखाद्याला तसे वाटू शकते टैप फोटोबद्दल मी माफी मागायला तय्यार आहे आम्ही स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते आहोत ;)

पुढचा सगळा दंगा वाचून चमचमीत अंडाकरी ओरपल्यासारखं वाटतंय! ;) (माजीडायपरचेंजर+डिशवॉशर+पुजारी+रामागडी) रंगा

अगदी ठाकरी शैलीतील रोकठोक कविता आवडली. आमचीही प्रेरणा पुरुषच हे पहिले वाक्य वाचून 'अखेर सरकार नमले' की काय अशी क्षणभर भीती वाटली. मग 'लिंक' लागली.

विडंबन आणि प्रतिक्रिया भन्नाट. विडंबन ज्या मूळ कवितेचे आहे, त्याबाबत श्रीमती आदितींशी सहमत.

In reply to by मन१

सेक्सिस्ट .. सेक्सिस्ट !!

ह्या विषयावर कविता अपेक्षित. कोण घेतोय पुढाकार?

In reply to by विनायक प्रभू

'स्त्री हवी आहे' असा विषय घेऊन आपणच पुरुषांना हव्या असलेल्या अपेक्षित स्त्री बद्दलच्या भावना समृद्ध अनुभव किंवा कल्पनेच्या साह्याने मांडू शकाल असे वाटते. लेखन गद्य असले तरी त्याला आम्ही पद्य म्हणून वाचू त्याची कल्जी करु नये. :) सर, लेखनासाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे (सरांचा विद्यार्थी)

In reply to by विनायक प्रभू

ह्या विषयावर कविता अपेक्षित. कोण घेतोय पुढाकार?
इतके कठीण नाही स्त्रीकडून अपेक्षा करणे पण तशी अपेक्षा करायला फारसे पुरुष तयार नसावेत की काय असा प्रश्न पडला कारण परिवर्तन त्यांच्या पथ्यावर पडणारे नाही. ही बघा कशी वाटते - बायका हव्या आहेत... आजच्या पुरुषांना हव्या आहेत बायका कणखर, खंबीर आणि कर्तृत्ववान बायका, शारीरिक पुरुषत्व असूनही मानसिक दौर्बाल्याला समजून घेणार्‍या आजच्या जगात पुरुषांना सर्वपरिने साथ देण्यास उत्सुक असणार्‍या बायका बँकांची कामं तुंबली असता आनंदाने ती कामे करणार्‍या बायका, घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभ्या राहणार्‍या बायका, रडारडीच्या सिरिअल्सवर थुंकणार्‍या बायका, माहेरच्यांची फुका बढाई न मारणार्‍या बायका, पुरुषांना पॅरलल पार्किंग शिकवणार्‍या बायका, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामं करणार्‍या बायका, कुठे मिळतील अशा बायका?, इतिहासातही तशा होत्याच वर्तमानात संख्या वाढते आहे, लिंगनिरपेक्ष समानतेसाठी या बायकांसाठी सर्वांनाच ट्रेनिंग सेंटरमध्ये भरती व्हावे लागेल कदाचित ;)

In reply to by प्रियाली

>> रडारडीच्या सिरिअल्सवर थुंकणार्‍या बायका, माहेरच्यांची फुका बढाई न मारणार्‍या बायका, पुरुषांना पॅरलल पार्किंग शिकवणार्‍या बायका, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामं करणार्‍या बायका, >> हाहा मस्त!!

In reply to by प्रियाली

पथ्यावर पडणार नाही हे मात्र खरे. मग पत्थ्यावर पडणार्‍या काही ओळी येउ द्यात. मी टंकल्या असत्या पण नको. फारच त्रास होइल सगळ्यांना.

In reply to by विनायक प्रभू

टंका की. त्रास तुम्हाला होतो की दुसर्‍यांना ते नंतर बघता येईल.

In reply to by प्रियाली

स्त्रिया हव्या आहेत आजच्या जगात हव्या आहेत स्त्रिया कणखर, विचारी आणि कर्तृत्ववान स्त्रिया, शारीरिक पुरूषत्व असलेल्या माणसांचीही मनं समजून घेणार्‍या आजच्या जगात समता पहाण्यास उत्सुक असणार्‍या स्त्रिया कष्टाची कामं समोर दिसता हातात यंत्र उचलणार्‍या स्त्रिया, घराबाहेर पडून स्वतःची ओळख शोधणार्‍या स्त्रिया, स्त्रीदाक्षिण्यावर थुंकणार्‍या स्त्रिया आणि जातीची फुका बढाई न मारणार्‍या स्त्रिया, मुलांनाही स्वयंपाक शिकवणार्‍या स्त्रिया, जागोजाग पेटणार्‍या युद्धाचा विरोध करणार्‍या स्त्रिया, कुठे मिळतील अशा स्त्रिया? इतिहासातही थोड्या होत्याच वर्तमानात संख्या वाढते आहे, समानतेसाठी सर्वांनाच ट्रेनिंग सेंटरमध्ये भरती व्हावे लागेल कदाचित

कविता आणि प्रतिसाद वाचून वाटू लागलं, 'संस्थळ वयात आलं'*! ;) *मराठी नाटकाविषयी असं माधव मनोहरांनी म्हटलं होतं. हा केवळ अतिरिक्त खुलासा आहे!!!

In reply to by गवि

गव्यानं मुसंडीच मारली की. :D लै झ्याक्क मजा आली आजच्या सुक्कीरवारच्या संध्याकाळचा माहौल बनला हों... जाताजाता (जॉनप्रेमींना काडी.): तो जॉन पदोपदी ज्याची सहीसही कॉपी करत असतो त्या Antonio Banderas च्या बाबतीत जॉनप्रेमींचं मत जाणून घ्यायला उत्सुक. ;)

In reply to by धमाल मुलगा

जाताजाता (जॉनप्रेमींना काडी.): तो जॉन पदोपदी ज्याची सहीसही कॉपी करत असतो त्या Antonio Banderas च्या बाबतीत जॉनप्रेमींचं मत जाणून घ्यायला उत्सुक.
दोघे नकटे आहेत पण मी नेहमी 'चेहरा क्या देखती हो?' असा प्रश्न स्वतःला विचारते. मला तर ब्रॅड पीटही नकटा वाटतो. ;)

In reply to by प्रियाली

नकटं असण्यात काय वाईट आहे ब्वॉ? मी पण नकटीच आहे, माझी आवडही नकटी असण्यात काय गैर आहे. बाकी जिथे अभिजात साहित्यही कशा-ना-कशावर आधारित असतं तिथे जॉननेही Antonio Banderas ची नक्कल केली तर कुठे बिघडलं? त्यातून इथे कोणाला पडलं आहे त्याच्या अभिनयक्षमतेचं? उत्तम नक्कल करणं ही पण एक कलाच हो! आमचा लाडका सोनू निगम नाही का खूप मजेशीर नकला करत? आणि मायकल जॅक्सनची नक्कल केलेलं दिवाना दिल हे गाणंतर सुपरहिट आहेच.

In reply to by धमाल मुलगा

होय तर. आहेच आमचा जॉन मिरचीसारखा तेजतर्रार! "वस्तू बनवायला" Antonio Banderas चा काही काही उपयोग नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>आहेच आमचा जॉन मिरचीसारखा तेजतर्रार! पण टोण्याला अजून तलवारीचे चपळ हात करता येत नाहीत की नीट पिस्तुलं चालवता येत नाहीत :P

In reply to by धमाल मुलगा

संबंधच काय जॉनने तलवारी आणि बंदूका चालवण्याचा आणि त्याची वस्तू बनवण्याचा? अनुष्कावैनींना इंटीग्रेशन आणि टेनिस खेळता येतं याचा तरी कुठे पुरावा आहे? बाकी गव्हर्नेटरला येतात हो पिस्तुलं चालवायला. पण शी: त्याचे टॉपलेस फोटो टाकायचे का?

In reply to by धमाल मुलगा

हा वाक्प्रयोग जुना झाल्याचं वरच्या प्रतिसादातून लक्षात आलं. बाकी चालू द्या, असंही आता म्हणता येणार नाही. पण ते एक असो.

In reply to by धमाल मुलगा

सांड आणि बैलात जो फरक असतो तोच फरक आहे अँटोनिओ आणि जॉन मध्ये हे आमचे वैयक्तिक मत आहे. बाकी चालू द्या.

In reply to by धमाल मुलगा

पण टोण्याला अजून तलवारीचे चपळ हात करता येत नाहीत की नीट पिस्तुलं चालवता येत नाहीत
धम्या त्याला 'जे' चालावायचं ते चालवता येतं ह्ये काय कमी आहे का?

कुठेतरी वाचलं होतं "स्त्रीला एकाच* पुरुषाकडून सगळं हवं असतं आणि....". एकूण कवितेतल्या अपेक्षा वाचून ते खरं ठरलं. *कवयित्रीने पुरूष हवे आहेत असे अनेकवचनी म्हटल्याने एकाच पुरूषाकडून सगळ्या अपेक्षा नाहीत असे म्हणता येईल. वाक्याचा दुसरा भागही खराच असणार. ;)

In reply to by नितिन थत्ते

कुठेतरी वाचलं होतं ...
एकेकाळची मध्यमवर्गीय मानसिकता अशी की छापलेलं दिसलं की खरं मानायचं. याचं नवं व्हर्जन मी अलिकडेच ऐकलं, वय वर्ष साडेसहाचा एक पोरगा, "इंटरनेटवर प्रकाशित झालेलं सगळं खरंच असतं." तर मतितार्थ हा की, "मोठे व्हा".
"स्त्रीला एकाच* पुरुषाकडून सगळं हवं असतं आणि....".
हेच ते, ज्याची त्याची समज, जाण वगैरे. एखाद्या किंवा काही स्त्रियांबाबत हे खरं असेलही म्हणून उगाच सगळ्या स्त्रियांबद्दल जेनेरिक विधान का करता आहात चिच्चा?
कवयित्रीने पुरूष हवे आहेत असे अनेकवचनी म्हटल्याने एकाच पुरूषाकडून सगळ्या अपेक्षा नाहीत असे म्हणता येईल.
गर्ल कॉमरेडरीची काळजीही आहे कवयित्रीला, असा माझा अंदाज! पण म्हणून एकाच पुरूषाने या सगळ्या गोष्टी केल्या तर आनंदच आहे हो!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>>एकाच पुरूषाने या सगळ्या गोष्टी केल्या तर आनंदच आहे हो! तेच तर. अर्धा भाग खरा ठरतोय. ;) >>तर मतितार्थ हा की, "मोठे व्हा". हे मोठे व्हा हेही आम्ही इंटरनेटवरच वाचलं ना !!!!!! :)

In reply to by नितिन थत्ते

तेच तर. अर्धा भाग खरा ठरतोय
होय ना! आमच्यासाठी मात्र दिवास्वप्नच. असो. तो काय "spice of life" काय तो आम्हीही चाखतो. ;-)
हे मोठे व्हा हेही आम्ही इंटरनेटवरच वाचलं ना
'सगळं खरं नसतं' या वाक्याचं विरूद्धार्थी वाक्य 'सगळं खोटंच असतं' असा नाही ना!

धम्माल! प्रियाली, अदिती आणि शुचि यानी काही म्हणायला शिल्लक ठेवलं नाही!! तेव्हा तिघीनाही साष्टांग नमस्कार!

कविता पुरूषावरील असल्यामुळे, "अखुड शिंगी, बहुकामी" अपेक्षा आहे असे म्हणतो... :-) या वर्णानाशी बर्‍यापैकी जुळेल असा एकमेवाद्वितीय पुरूष फक्त हाच असेल ;) त्याला अ‍ॅक्शनमध्ये पहायचे असेल तर पूर्ण चित्रपट पहायचा पेशन्स आहे का नाही याची चाचणी करण्यासाठी आणि नाहीतर निव्वळ स्वत:ला विसरायला म्हणून खालील चित्रफीत पहा:
---------------------------------------------------------------------------------------
बाकी या विषयावरील Multiplicity नामक मजेशीर चित्रपट जर पाहीला नसला तर अवश्य पहा!

In reply to by विकास

प्रतिसादातली चित्रे बघा राव! शिंगाळू (इंग्रजी अनुवाद सांगू का?) हरकाम्या/बहुकामी हवा

In reply to by धनंजय

"हरकाम्या" हा जास्त चपखल शब्द आहे. शिंगाळू (इंग्रजी अनुवाद सांगू का?) हिंट डोक्यावरून गेली... अवश्य सांगा.

In reply to by विकास

शिंग =horn शिंगाळू = horny. काय राव, मान्सानं इतकंपण सभ्य असू नये राव.

In reply to by धमाल मुलगा

काय लेका तूही... छ्या. त्यांनी विचारलं, तू सांगितलंस - इतकं सोपं आहे का हे? ;)

काय चावटपणा लावलाय रे मुलांनो !

आता बास करा मंडळी! माझ्यासारख्या शिनियर शिट्टीझनला मधे पडायला लावू नका.;) मगाशीच एक जान की कायसे नावाचा शिनेमात काम कर्णारा बुवा भेट्ला होता. म्हटलं,"मेल्या तुला पुरेशे पैशे मिळ्तात की नै? आमचा माळीबुवासुधा आंगभर कपडे घालून येतोय." त्याचं उत्तर आयकायला कै थांब्ले नै, तुळशीला पाणी घालून आपली घरात परत आले.

In reply to by आनंदयात्री

मिळाला का वेळ मिपावर यायला! भांडी घासून झालेली दिस्तात, चला लाँड्रीकडे....... रांधा, वाढा, उष्टी काढा असं कर्णार्‍यांनी जास्त प्रश्न विचारू नयेत्.......आपण बरं नि आपलं काम बरं!

In reply to by आनंदयात्री

असा बगीचा डोळ्यासमोर आला :)

कविता आणि त्यानंतर चालु झालेला दंगा याने खूपच मनोरंजन झाले. यानिमित्ताने आमचाही थोडासा फुटकळपणा - बायका हव्या आहेत... आजच्या पुरुषांना हव्या आहेत बायका, आधुनिक, नखरेल आणि आकारबाज बायका, स्त्रीत्वाचे भांडवल न करणार्‍या बायका आणि पुरुषांच्या ह्या जगात स्वकर्तृत्वाने स्थान निर्माण करणार्‍या बायका. दुपारच्या वेळेत डेस्कवर न झोपणार्‍या बायका, चहा पिऊन झाल्यावर घरी पळण्याचे वेध न लागणार्‍या बायका, प्रॉडक्शन रीलीजसाठी उशिरापर्यंत थांबणार्‍या बायका, आणि डिफेक्ट आल्यावर हात वर न करणार्‍या बायका. बसमधे लेडिज सीटवरुन उठायला न लावणार्‍या बायका, आणि लोकलच्या जेन्टस डब्यात न लुडबूडणार्‍या बायका, हॉटेलातल्या जेवणाचा तिरस्कार करणार्‍या बायका, आपण असताना कशाला पाहिजे कामासाठी बाई असं म्हणणार्‍या बायका, सायनाची मॅच बघू देणार्‍या बायका, आणि सचिनच्या सेंचुरीवर उड्या मारणार्‍या बायका, भाड्याच्या घरातसुद्धा पिरपिर न करणार्‍या बायका, आणि चिक्कार पैसे मिळवूनसुद्धा टिमकी न वाजवणार्‍या बायका. कुठे मिळतील अशा बायका?, इतिहासात अस्तित्वात नव्हत्याच. वर्तमानातदेखील औषधालासुद्धा सापडत नाहीत. ट्रेनिंग सेंटर उघडलं तरीसुद्धा भविष्य धूसरच आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

ओ अप्पा असं दंगा चालू असताना उगीच खरंखुरं शिरेस नाही व्हायचं बरं का...अडचण होते ना.

In reply to by अप्पा जोगळेकर

वरील काही ओळींतून फुटकळपणा सिद्ध होतोय खरा. ;) पुरुष सॉफ्टवेअर टेस्टींग करतात तेव्हा हास्यास्पद दिसतात, हे काम बायकांना शोभून दिसतं असं माझ्या एका अमेरिकन मैत्रिणीचं म्हणणं होतं. असं काही नसतं, लिंगनिरपेक्ष समानता बाळग असं सांगून मी थकले होते पण तिचा आपला तोच हेका की टेस्टींग करताना सहनशील असावं लागतं, डिफेक्ट काढून दाखवला की इतरांनी केलेला अपमान सहन करावा लागतो... हे बायकी काम, पुरुषांचा तो प्रांतच नव्हे पण मला नाही हं पटत असलं काही. ;) आपली (टेस्ट को-ऑर्डिनेटर) प्रियाली

In reply to by अप्पा जोगळेकर

गेल्या अडीच महिन्यात लोकलींमधे 'जेण्टस' डबा आला आहे आणि फेसबुक, ट्वीटर, मिपा, मटा, बीबीसी, न्यूयॉर्क टाईम्स, पोलिस टाईम्समधे एक साधी खरड, बातमी, चौकट काहीही नाही. फारच कुचंबणा होते ब्वॉ परदेशात राहून! :-( आपल्याला तर बुवा "भयंकर कंटाळा आला आहे!" असल्या तक्रारी दुपारच्या जेवणानंतर घरी जाईपर्यंत करण्यापेक्षा दुपारी डेस्कावर डुलकी काढायला आवडतं. आणि दिवस कोणताही असो, चार वाजताचा चहाचा ब्रेक सहाच्या स्नॅकब्रेकपर्यंत वाढवून गप्पा मारायला फार मजा यायची. आख्ख्या 'विश्वाचं गॉसिप' करायला इतर कोणती वेळ चांगली असणार? बाकी प्रियालीशी बाडीस.

mithun हिंदी पिच्चरातला ओरिगिनल टॉल डार्क अ‍ॅण्ड हॅण्डसम हीरो!

तो डार्क टॉल ह्यान्डसम असेल पण बोलायला लागला की मात्र शेजारच्या माणूस दोन मैलांवर असल्यासारखे का बोलतो कोण जाणे?

कुठे मिळतील असे पुरुष? >> असं कसं काय विचारू शकता तुम्ही? पुरूष म्हणजे काय निर्जीव वस्तू आहेत काय मिळायला? निर्जीव वस्तू मिळतात तर सजीव व्यक्ती भेटतात. असो, तुम्हाला असे पुरूष कुठे भेटतील किंवा मिळतील असा प्रश्न विचारावासा वाटला कारण तुमच्या कवितेत व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करणारे पुरूष "इतिहासात दुर्मिळ होते वर्तमानातही थोडेथोडकेच आहेत" असं तुम्ही पुढे म्हणताय. आता प्रौढ असणारे पुरूष हे स्त्रियांनीच घडविलेले आहेत. आम्ही लहान असताना आमचे बाबा चरितार्थाकरिता कार्यालयात नोकरीला जात. साधारण दहा तास तरी घराबाहेर असत. आम्ही जास्त काळ आईच्याच सहवासात असू. त्याचप्रमाणे शाळेत ही शिक्षकांपेक्षा शिक्षिकांचीच संख्या जास्त होती. साधारण हाच अनुभव अनेकांचा असतो की वयाच्या अठरापर्यंत व्यक्ती घडत असते आणि या घडण्याच्या काळात अवतीभवती असणार्‍या प्रौढ व्यक्तींपैकी पुरुषांपेक्षा स्त्रियाच (आई / आजी / काकू / शिक्षिका इत्यादी) जास्त असतात. असे असूनही स्त्रियांकडूनच घडविले गेलेले पुरूष स्त्रियांच्याच अपेक्षांप्रमाणे असत नाहीत ही आश्चर्याचीच गोष्ट आहे. याबाबत माझा स्वत:चा एक अनुभव (विस्तारभयास्तव सविस्तर तपशील टाळून) इथे मांडतो. मी २००८ साली दिल्ली मुंबई असा प्रवास राजधानी एक्स्प्रेसने करीत होतो. तेव्हा सहप्रवासी महिलेशी माझ्या बराच वेळ मनमोकळ्या गप्पा रंगल्या. काही मुद्यांवर आम्ही एकमेकांशी चक्क वाद ही घातला. इतका वेळ संवाद साधल्यावर आम्हाला एकमेकांच्या व्यावसायिक व खासगी जीवनाविषयी देखील बरीच माहिती मिळाली त्याचप्रमाणे स्वभाविषयीही ढोबळ मानाने कल्पना आली. त्यावेळी मी तिशीत होतो तर ती महिला साधारण पंचेचाळिशीची असावी (कारण तिचा मोठा मुलगा इंजिनीयरिंगच्या दुसर्‍या वर्षात शिकत असल्याचे तिने सांगितले होते). शेवटी निरोप घेताना तिने मला सांगितले, "तुझ्या स्वभावातल्या काही गोष्टी मला पटल्या, तर अनेक बाबी खटकल्या. अर्थात तुझ्यासारख्या स्वभावाचा माझा मुलगा असेल तर मला आनंदच आहे. पण थॅंक गॉड माझा नवरा तुझ्यासारख्या स्वभावाचा नाहीय. अशा स्वभावाचा मुलगा मिळणे अतिशय अभिमानाचे ठरेल, पण असा नवरा मिळाला तर ते फारच त्रासदायक ठरणार." म्हणजे तिला नवरा म्हणून त्रासदायक वाटू शकणारा पुरूषाचा स्वभाव तिच्या मुलाचा असेल तर अभिमान वाटतो यातच सारे काही आले. स्त्रिया अशा पद्धतीने जर मुलांना वाढवत असतील तर त्यांनी वाढवून मोठे केलेले हे पुरूष पुढे इतर स्त्रियांना नकोसेच वाटणार. तरीही या वरून योग्य तो बोध घेऊन तुम्ही आताच वय वर्षे पाच किंवा त्याहून कमी वयाच्या मुलग्यांना तुमच्या अपेक्षांप्रमाणे घडवू / वाढवू शकता. त्याकरिता तुम्ही शिक्षिका होणे अतिशय उत्तम. कारण तुम्ही जास्तीत जास्त मुलांना घडवू शकाल. म्हणजे निदान पुढे पंधरा वीस वर्षांनंतर तरी त्यावेळच्या महिलांना तरी असे पुरूष कुठे मिळतील? हा गहन प्रश्न पडायला नको.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

असं कसं काय विचारू शकता तुम्ही? पुरूष म्हणजे काय निर्जीव वस्तू आहेत काय मिळायला? निर्जीव वस्तू मिळतात तर सजीव व्यक्ती भेटतात. असो, तुम्हाला असे पुरूष कुठे भेटतील किंवा मिळतील असा प्रश्न विचारावासा वाटला कारण तुमच्या कवितेत व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करणारे पुरूष "इतिहासात दुर्मिळ होते वर्तमानातही थोडेथोडकेच आहेत" असं तुम्ही पुढे म्हणताय.
विडंबनांवर इतका गहन विचार करणार्‍या माणसांचे मला अतिशय कौतुक वाटत आले आहे. त्या कौतुकास गूगळे आज पात्र ठरले. अभिनंदन! ;)
आता प्रौढ असणारे पुरूष हे स्त्रियांनीच घडविलेले आहेत. आम्ही लहान असताना आमचे बाबा चरितार्थाकरिता कार्यालयात नोकरीला जात. साधारण दहा तास तरी घराबाहेर असत. आम्ही जास्त काळ आईच्याच सहवासात असू. त्याचप्रमाणे शाळेत ही शिक्षकांपेक्षा शिक्षिकांचीच संख्या जास्त होती. साधारण हाच अनुभव अनेकांचा असतो की वयाच्या अठरापर्यंत व्यक्ती घडत असते आणि या घडण्याच्या काळात अवतीभवती असणार्‍या प्रौढ व्यक्तींपैकी पुरुषांपेक्षा स्त्रियाच (आई / आजी / काकू / शिक्षिका इत्यादी) जास्त असतात. असे असूनही स्त्रियांकडूनच घडविले गेलेले पुरूष स्त्रियांच्याच अपेक्षांप्रमाणे असत नाहीत ही आश्चर्याचीच गोष्ट आहे.
याला पिढ्यान पिढ्या पुरुषप्रधान संस्कृतीत दबलेल्या स्त्रियांची मानसिकता म्हणतात आणि असे प्रसंग सांगून आपल्या वरची जबाबदारी झटकणार्‍याला प्रभूमास्तरांचा ए.एम.सी. उर्फ एम.सी.पी. म्हणतात. पुन्हा एकवार अभिनंदन!
थॅंक गॉड माझा नवरा तुझ्यासारख्या स्वभावाचा नाहीय. अशा स्वभावाचा मुलगा मिळणे अतिशय अभिमानाचे ठरेल, पण असा नवरा मिळाला तर ते फारच त्रासदायक ठरणार."
चला बाईंचे वर्तमान गर्तेत असले तरी भविष्य उज्ज्वल आहे. हे ही नसे थोडके.
तरीही या वरून योग्य तो बोध घेऊन तुम्ही आताच वय वर्षे पाच किंवा त्याहून कमी वयाच्या मुलग्यांना तुमच्या अपेक्षांप्रमाणे घडवू / वाढवू शकता. त्याकरिता तुम्ही शिक्षिका होणे अतिशय उत्तम. कारण तुम्ही जास्तीत जास्त मुलांना घडवू शकाल. म्हणजे निदान पुढे पंधरा वीस वर्षांनंतर तरी त्यावेळच्या महिलांना तरी असे पुरूष कुठे मिळतील? हा गहन प्रश्न पडायला नको.
छे! छे! मला वयाने वाढलेल्या पण बालबुद्धी राखणार्‍या पुरुषांना शिकवण्यात अधिक इंटरेस्ट वाटतो. अवांतरः गूगळेंचा प्रतिसाद वाचून काही दिवसांपूर्वी एन.डी.टीव्हीवर तवलिनसिंग आणि चेतन भगत यांच्यातील बोलाचाल आठवली. ती पाहून खो खो खो हसले होते कारण तवलिनसिंग चेतन भगतवर इतक्या उखडल्या की (असे काहीसे) म्हणाल्या; "तू एक थर्डक्लास लेखक आहेस, तू लिहिलेल्या भंपक कादंबर्‍यांपायी तुला जेलमध्येच टाकायला हवे." चेतन भगत बाईंच्या या अतिरेकीपणावर कसनुसा चेहरा करून "इतकं का मी वाईट लिहितो?" असं विचारता झाला. बिच्चारा! बरे झाले बाईंनी गूगळेंचा प्रतिसाद नाही वाचला, नाहीतर एका ऐवजी दोन चेतनांना..... ;) ह. घ्या