कुठे ते एके काळचे 'आजची खादाडी'सोबतच्या पुष्ट स्त्रिया आपल्या दमदार छातीवर लेवूनही त्यांच्या भाराने अजिबात न वाकणारे आमचे 'रीतीभातीचे' संकेतस्थळ अन कुठे हे आजकालचे उच्छृंखल बाजारू संकेतस्थळ. जगदंब जगदंब!!!
बरं! बरं! इतके नाराज होण्याचे काही कारण नाही. सर्वांचेच पोट भरेल अशीही व्यवस्था करता येईलच की.
त्याचं असं झालं की हात बाईचा कशावरून असा तांत्रिक मुद्दा राजेशनी काढला. शिवाय प्रियालीचा धागा... कुणाचा हात अचानक, कुठून कोणाच्या खांद्यावर येऊन पडतो असे प्रश्न लोकांना पडायला नकोत म्हणून स्वच्छ आणि स्पष्ट फोटो दिला.
छ्या, जुन्या मालकांनी सोय केली आहे की! म्हणून टाक "ज्याची त्याची जाण, समज, इ.इ ...."! हाय काय नाय काय!!
तरी एक बरं केलंस हां, सल्लूचा टॉपलेस फोटोच टाकलास.
या धाग्यातली कविता आणि प्रतिसादातले अन्य लिखित विनोद मी मनापासून एंजॉय केले. कवितेमधे (काहीशा मिष्किलपणे) व्यक्त झालेल्या पुरुषप्रतिमेबद्दल मी प्रस्तुत कवितेच्या कर्तीच्या मतांशी सहमती व्यक्त करतो.
मात्र , जॉन अब्राहम आणि/किंवा इतर पुरुषविशेष यांची इथल्या धाग्यावर लावलेली अर्धनग्न चित्रे म्हणजे "आजची खादाडी" आणि इतर प्रसंगी इथल्या संकेतस्थळावर वेळोवेळी लावल्या गेलेल्या स्त्रियांच्या कमी अधिक कपड्यांमधल्या चित्रांना दिलेली दाद आहे असं समजायचं काय ?
माझ्यापुरतं बोलायचं तर मला कुणाही लिंगी व्यक्तीची तोकड्या कपड्यांमधली चित्रे आणि मुख्यम्हणजे त्यावर केलेल्या कमेंट्स हा प्रकार अत्युच्च अभिरुचीचा वाटत नाही.
अर्थात "हॉट ऑर नॉट" इत्यादि स्वरूपाच्या गोष्टींवर बंदी घालायची काहीच गरज नाही. सेक्स-व्हॉयलन्स-धार्मिक संवेदनशील मजकूर- वैयक्तिक टिकाटिप्पणी वगळता कुठल्याही अभिव्यक्तीवर कदापि बंदी घातली जाऊ नये या माझ्या (आजवर ठामपणे जोपासलेल्या) भूमिकेत जराही बदल मी करत नाही. उपरोक्त कुठल्याही "सेन्सॉरेबल" प्रकाराला वगळता बाकी कुणीही काहीही लिहो नाहीतर डकवो, त्यावर बंदी नाही आणि माझी हरकतही नाहीच.
प्रश्न व्यक्तींना, त्यांच्या शारिरीक अवयवांना वस्तुरुप देण्याचा आहे. आजवर "आजची खादाडी" टाईप स्त्रीदेहाला वस्तुरूप करणार्या प्रवृत्तींबरोबर माझी रुचिभिन्नता मी व्यक्त करत आलो. इथे डकवलेल्या चित्रांच्या संदर्भातसुद्धा ही रुचिभिन्नता व्यक्त करणे मी अपरिहार्य समजतो आणि त्याची इथे नोंद करतो.
या धाग्यातली कविता आणि प्रतिसादातले अन्य लिखित विनोद मी मनापासून एंजॉय केले. कवितेमधे (काहीशा मिष्किलपणे) व्यक्त झालेल्या पुरुषप्रतिमेबद्दल मी प्रस्तुत कवितेच्या कर्तीच्या मतांशी सहमती व्यक्त करतो.
धन्यवाद. :)
याचबरोबर, अर्धनग्न कत्रिनाचे फोटो पाहून एखाद्याच्या भावना दुखावल्या असतील किंवा रुचीहिनता वाटत असल्यास मी क्षमा मागते आणि गरज भासल्यास केवळ कत्रिनाचा फोटो संपादकांनी क्रॉप करून लावावा अशी मी विनंतीही करते.
तरीही असे नमूद करेनच की कत्रिनाने घातलेले कपडे आज पार्ट्यांमध्ये, अॅवार्ड सेरेमनीला आणि इतर सार्वजनिक प्रसंगात सर्रास घातले जातात. ते तोकडे असले तरी प्रचलित आहेत असे वाटते. तांत्रिक भाषेत तो फोटो अर्धनग्नही नाही कारण खांदे, हात आणि पाय दाखवणे याला अर्धनग्न म्हणता येत नाही असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
मात्र , जॉन अब्राहम आणि/किंवा इतर पुरुषविशेष यांची इथल्या धाग्यावर लावलेली अर्धनग्न चित्रे म्हणजे "आजची खादाडी" आणि इतर प्रसंगी इथल्या संकेतस्थळावर वेळोवेळी लावल्या गेलेल्या स्त्रियांच्या कमी अधिक कपड्यांमधल्या चित्रांना दिलेली दाद आहे असं समजायचं काय ?
प्रश्नाचे उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलेले आहे. एखादी गोष्ट विनाकारण आणि वेळोवेळी होत गेली की ती उबगवाणी ठरते. मिपावर वेळोवेळी लावल्या गेलेल्या चित्रांना आणि एखादे वेळी आलेल्या या धाग्याला एका पारड्यात तोलू नये ही विनंती. (तोट्याचा सौदा आहे. वजन सारखे भरणे केवळ अशक्य.)
प्रश्न व्यक्तींना, त्यांच्या शारिरीक अवयवांना वस्तुरुप देण्याचा आहे. आजवर "आजची खादाडी" टाईप स्त्रीदेहाला वस्तुरूप करणार्या प्रवृत्तींबरोबर माझी रुचिभिन्नता मी व्यक्त करत आलो. इथे डकवलेल्या चित्रांच्या संदर्भातसुद्धा ही रुचिभिन्नता व्यक्त करणे मी अपरिहार्य समजतो आणि त्याची इथे नोंद करतो.
मला वाटतं तसा उद्देश नव्हता पण चिंजंच्या प्रतिसादातून तशी गंमत केली गेल्याने इतरांनीही त्याला प्रतिसाद दिला असे वाटते. रुची ही रोज एकसारखी ठेवून भागत नाही, कधीतरी रुचीपालट करावा लागतो तसेच हे असावे. परंतु, रुचीपालट हा ही एखादेवेळेसच होतो यावरही विश्वास ठेवावा.
माझ्यापुरतं बोलायचं तर मला कुणाही लिंगी व्यक्तीची तोकड्या कपड्यांमधली चित्रे आणि मुख्यम्हणजे त्यावर केलेल्या कमेंट्स हा प्रकार अत्युच्च अभिरुचीचा वाटत नाही.
मला वाटतं आलेल्या कमेंट्स अतिशय साध्या आहेत. या संकेतस्थळाने वेळोवेळी यापेक्षा मोठ्या कमेंट्स आणि कॉम्प्लिमेंट्स (वहिनीपासून आयटम बॉम्ब) रिचवल्या आहेत आणि "हिक्क" सुद्धा केलेले नाही.
कत्रिनाच्या कपड्यांबद्दल उहापोह झाला आहेच, आता जॉन आणि सल्लूकडे वळू. त्यांनी कपडे न घालणे हा अभिरुचीचा प्रकार नसून आपल्या संस्कृतीचा प्रकार आहे. मिपाच्या उजवीकडे उघडे ज्ञानेश्वर महाराज बसले आहेत. त्यांच्या फोटोवर कोणी आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. (कृपया, ज्ञानेश्वर आणि जॉन यांच्यातील समान धागा केवळ "पुरुष" एवढाच आहे असे समजावे. बाकी, समानता नसावी.)
खालील फोटोवर कोणी आक्षेप घेईल असे वाटत नाही. येथेही खालचे पुरुष अर्धनग्न आहेत.
तुमच्या तरुण/लहानपणी हा फोटो घरात लावला होता का? तुमच्या नसला तरी इतर अनेकांच्या असेल -
सांगायचा मुद्दा एवढाच आहे की पुरुषांचे अर्धनग्न फोटो ही आमची संस्कृती आहे. त्यात अभिरुचीहीनतेचा संबंध नाही परंतु कत्रिनाच्या अर्धनग्न नसलेल्या पण एखाद्याला तसे वाटू शकते टैप फोटोबद्दल मी माफी मागायला तय्यार आहे. :) पण अगदी त्याच फोटोसारखा राधाकृष्णाचा फोटो (जवळपास तेवढ्याच कपड्यांतला) माझ्या घरात विराजमान आहे असे नमूद करते.
पुरुषांचे अर्धनग्न फोटो ही आमची संस्कृती आहे. त्यात अभिरुचीहीनतेचा संबंध नाही परंतु कत्रिनाच्या अर्धनग्न नसलेल्या पण एखाद्याला तसे वाटू शकते टैप फोटोबद्दल मी माफी मागायला तय्यार आहे
आम्ही स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते आहोत ;)
'स्त्री हवी आहे' असा विषय घेऊन आपणच पुरुषांना हव्या असलेल्या अपेक्षित स्त्री बद्दलच्या भावना समृद्ध अनुभव किंवा कल्पनेच्या साह्याने मांडू शकाल असे वाटते. लेखन गद्य असले तरी त्याला आम्ही पद्य म्हणून वाचू त्याची कल्जी करु नये. :)
सर, लेखनासाठी शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
(सरांचा विद्यार्थी)
इतके कठीण नाही स्त्रीकडून अपेक्षा करणे पण तशी अपेक्षा करायला फारसे पुरुष तयार नसावेत की काय असा प्रश्न पडला कारण परिवर्तन त्यांच्या पथ्यावर पडणारे नाही. ही बघा कशी वाटते -
बायका हव्या आहेत...
आजच्या पुरुषांना हव्या आहेत बायका
कणखर, खंबीर आणि कर्तृत्ववान बायका,
शारीरिक पुरुषत्व असूनही मानसिक दौर्बाल्याला समजून घेणार्या
आजच्या जगात पुरुषांना सर्वपरिने साथ देण्यास उत्सुक असणार्या बायका
बँकांची कामं तुंबली असता
आनंदाने ती कामे करणार्या बायका,
घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभ्या राहणार्या बायका,
रडारडीच्या सिरिअल्सवर थुंकणार्या बायका,
माहेरच्यांची फुका बढाई न मारणार्या बायका,
पुरुषांना पॅरलल पार्किंग शिकवणार्या बायका,
पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामं करणार्या बायका,
कुठे मिळतील अशा बायका?,
इतिहासातही तशा होत्याच
वर्तमानात संख्या वाढते आहे,
लिंगनिरपेक्ष समानतेसाठी या बायकांसाठी सर्वांनाच ट्रेनिंग सेंटरमध्ये भरती व्हावे लागेल कदाचित ;)
स्त्रिया हव्या आहेत
आजच्या जगात हव्या आहेत स्त्रिया
कणखर, विचारी आणि कर्तृत्ववान स्त्रिया,
शारीरिक पुरूषत्व असलेल्या माणसांचीही मनं समजून घेणार्या
आजच्या जगात समता पहाण्यास उत्सुक असणार्या स्त्रिया
कष्टाची कामं समोर दिसता
हातात यंत्र उचलणार्या स्त्रिया,
घराबाहेर पडून स्वतःची ओळख शोधणार्या स्त्रिया,
स्त्रीदाक्षिण्यावर थुंकणार्या स्त्रिया आणि
जातीची फुका बढाई न मारणार्या स्त्रिया,
मुलांनाही स्वयंपाक शिकवणार्या स्त्रिया,
जागोजाग पेटणार्या युद्धाचा विरोध करणार्या स्त्रिया,
कुठे मिळतील अशा स्त्रिया?
इतिहासातही थोड्या होत्याच
वर्तमानात संख्या वाढते आहे,
समानतेसाठी सर्वांनाच ट्रेनिंग सेंटरमध्ये भरती व्हावे लागेल कदाचित
गव्यानं मुसंडीच मारली की. :D
लै झ्याक्क मजा आली आजच्या सुक्कीरवारच्या संध्याकाळचा माहौल बनला हों...
जाताजाता (जॉनप्रेमींना काडी.): तो जॉन पदोपदी ज्याची सहीसही कॉपी करत असतो त्या Antonio Banderas च्या बाबतीत जॉनप्रेमींचं मत जाणून घ्यायला उत्सुक. ;)
नकटं असण्यात काय वाईट आहे ब्वॉ? मी पण नकटीच आहे, माझी आवडही नकटी असण्यात काय गैर आहे.
बाकी जिथे अभिजात साहित्यही कशा-ना-कशावर आधारित असतं तिथे जॉननेही Antonio Banderas ची नक्कल केली तर कुठे बिघडलं? त्यातून इथे कोणाला पडलं आहे त्याच्या अभिनयक्षमतेचं?
उत्तम नक्कल करणं ही पण एक कलाच हो! आमचा लाडका सोनू निगम नाही का खूप मजेशीर नकला करत? आणि मायकल जॅक्सनची नक्कल केलेलं दिवाना दिल हे गाणंतर सुपरहिट आहेच.
संबंधच काय जॉनने तलवारी आणि बंदूका चालवण्याचा आणि त्याची वस्तू बनवण्याचा? अनुष्कावैनींना इंटीग्रेशन आणि टेनिस खेळता येतं याचा तरी कुठे पुरावा आहे?
बाकी गव्हर्नेटरला येतात हो पिस्तुलं चालवायला. पण शी: त्याचे टॉपलेस फोटो टाकायचे का?
कुठेतरी वाचलं होतं "स्त्रीला एकाच* पुरुषाकडून सगळं हवं असतं आणि....".
एकूण कवितेतल्या अपेक्षा वाचून ते खरं ठरलं.
*कवयित्रीने पुरूष हवे आहेत असे अनेकवचनी म्हटल्याने एकाच पुरूषाकडून सगळ्या अपेक्षा नाहीत असे म्हणता येईल.
वाक्याचा दुसरा भागही खराच असणार. ;)
एकेकाळची मध्यमवर्गीय मानसिकता अशी की छापलेलं दिसलं की खरं मानायचं. याचं नवं व्हर्जन मी अलिकडेच ऐकलं, वय वर्ष साडेसहाचा एक पोरगा, "इंटरनेटवर प्रकाशित झालेलं सगळं खरंच असतं."
तर मतितार्थ हा की, "मोठे व्हा".
हेच ते, ज्याची त्याची समज, जाण वगैरे. एखाद्या किंवा काही स्त्रियांबाबत हे खरं असेलही म्हणून उगाच सगळ्या स्त्रियांबद्दल जेनेरिक विधान का करता आहात चिच्चा?
कवयित्रीने पुरूष हवे आहेत असे अनेकवचनी म्हटल्याने एकाच पुरूषाकडून सगळ्या अपेक्षा नाहीत असे म्हणता येईल.
गर्ल कॉमरेडरीची काळजीही आहे कवयित्रीला, असा माझा अंदाज! पण म्हणून एकाच पुरूषाने या सगळ्या गोष्टी केल्या तर आनंदच आहे हो!
>>एकाच पुरूषाने या सगळ्या गोष्टी केल्या तर आनंदच आहे हो!
तेच तर. अर्धा भाग खरा ठरतोय. ;)
>>तर मतितार्थ हा की, "मोठे व्हा".
हे मोठे व्हा हेही आम्ही इंटरनेटवरच वाचलं ना !!!!!! :)
कविता पुरूषावरील असल्यामुळे, "अखुड शिंगी, बहुकामी" अपेक्षा आहे असे म्हणतो... :-)
या वर्णानाशी बर्यापैकी जुळेल असा एकमेवाद्वितीय पुरूष फक्त हाच असेल ;)
त्याला अॅक्शनमध्ये पहायचे असेल तर पूर्ण चित्रपट पहायचा पेशन्स आहे का नाही याची चाचणी करण्यासाठी आणि नाहीतर निव्वळ स्वत:ला विसरायला म्हणून खालील चित्रफीत पहा:
आता बास करा मंडळी!
माझ्यासारख्या शिनियर शिट्टीझनला मधे पडायला लावू नका.;)
मगाशीच एक जान की कायसे नावाचा शिनेमात काम कर्णारा बुवा भेट्ला होता.
म्हटलं,"मेल्या तुला पुरेशे पैशे मिळ्तात की नै? आमचा माळीबुवासुधा आंगभर कपडे घालून येतोय."
त्याचं उत्तर आयकायला कै थांब्ले नै, तुळशीला पाणी घालून आपली घरात परत आले.
मिळाला का वेळ मिपावर यायला!
भांडी घासून झालेली दिस्तात, चला लाँड्रीकडे.......
रांधा, वाढा, उष्टी काढा असं कर्णार्यांनी जास्त प्रश्न विचारू नयेत्.......आपण बरं नि आपलं काम बरं!
कविता आणि त्यानंतर चालु झालेला दंगा याने खूपच मनोरंजन झाले.
यानिमित्ताने आमचाही थोडासा फुटकळपणा -
बायका हव्या आहेत...
आजच्या पुरुषांना हव्या आहेत बायका,
आधुनिक, नखरेल आणि आकारबाज बायका,
स्त्रीत्वाचे भांडवल न करणार्या बायका
आणि पुरुषांच्या ह्या जगात स्वकर्तृत्वाने स्थान निर्माण करणार्या बायका.
दुपारच्या वेळेत डेस्कवर न झोपणार्या बायका,
चहा पिऊन झाल्यावर घरी पळण्याचे वेध न लागणार्या बायका,
प्रॉडक्शन रीलीजसाठी उशिरापर्यंत थांबणार्या बायका,
आणि डिफेक्ट आल्यावर हात वर न करणार्या बायका.
बसमधे लेडिज सीटवरुन उठायला न लावणार्या बायका,
आणि लोकलच्या जेन्टस डब्यात न लुडबूडणार्या बायका,
हॉटेलातल्या जेवणाचा तिरस्कार करणार्या बायका,
आपण असताना कशाला पाहिजे कामासाठी बाई असं म्हणणार्या बायका,
सायनाची मॅच बघू देणार्या बायका,
आणि सचिनच्या सेंचुरीवर उड्या मारणार्या बायका,
भाड्याच्या घरातसुद्धा पिरपिर न करणार्या बायका,
आणि चिक्कार पैसे मिळवूनसुद्धा टिमकी न वाजवणार्या बायका.
कुठे मिळतील अशा बायका?,
इतिहासात अस्तित्वात नव्हत्याच.
वर्तमानातदेखील औषधालासुद्धा सापडत नाहीत.
ट्रेनिंग सेंटर उघडलं तरीसुद्धा भविष्य धूसरच आहे.
वरील काही ओळींतून फुटकळपणा सिद्ध होतोय खरा. ;)
पुरुष सॉफ्टवेअर टेस्टींग करतात तेव्हा हास्यास्पद दिसतात, हे काम बायकांना शोभून दिसतं असं माझ्या एका अमेरिकन मैत्रिणीचं म्हणणं होतं. असं काही नसतं, लिंगनिरपेक्ष समानता बाळग असं सांगून मी थकले होते पण तिचा आपला तोच हेका की टेस्टींग करताना सहनशील असावं लागतं, डिफेक्ट काढून दाखवला की इतरांनी केलेला अपमान सहन करावा लागतो... हे बायकी काम, पुरुषांचा तो प्रांतच नव्हे पण मला नाही हं पटत असलं काही. ;)
आपली
(टेस्ट को-ऑर्डिनेटर) प्रियाली
गेल्या अडीच महिन्यात लोकलींमधे 'जेण्टस' डबा आला आहे आणि फेसबुक, ट्वीटर, मिपा, मटा, बीबीसी, न्यूयॉर्क टाईम्स, पोलिस टाईम्समधे एक साधी खरड, बातमी, चौकट काहीही नाही. फारच कुचंबणा होते ब्वॉ परदेशात राहून! :-(
आपल्याला तर बुवा "भयंकर कंटाळा आला आहे!" असल्या तक्रारी दुपारच्या जेवणानंतर घरी जाईपर्यंत करण्यापेक्षा दुपारी डेस्कावर डुलकी काढायला आवडतं. आणि दिवस कोणताही असो, चार वाजताचा चहाचा ब्रेक सहाच्या स्नॅकब्रेकपर्यंत वाढवून गप्पा मारायला फार मजा यायची. आख्ख्या 'विश्वाचं गॉसिप' करायला इतर कोणती वेळ चांगली असणार?
बाकी प्रियालीशी बाडीस.
कुठे मिळतील असे पुरुष? >>
असं कसं काय विचारू शकता तुम्ही? पुरूष म्हणजे काय निर्जीव वस्तू आहेत काय मिळायला? निर्जीव वस्तू मिळतात तर सजीव व्यक्ती भेटतात. असो, तुम्हाला असे पुरूष कुठे भेटतील किंवा मिळतील असा प्रश्न विचारावासा वाटला कारण तुमच्या
कवितेत व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करणारे पुरूष "इतिहासात दुर्मिळ होते वर्तमानातही थोडेथोडकेच आहेत" असं तुम्ही पुढे म्हणताय.
आता प्रौढ असणारे पुरूष हे स्त्रियांनीच घडविलेले आहेत. आम्ही लहान असताना आमचे बाबा चरितार्थाकरिता कार्यालयात नोकरीला जात. साधारण दहा तास तरी घराबाहेर असत. आम्ही जास्त काळ आईच्याच सहवासात असू. त्याचप्रमाणे शाळेत ही शिक्षकांपेक्षा शिक्षिकांचीच संख्या जास्त होती. साधारण हाच अनुभव अनेकांचा असतो की वयाच्या अठरापर्यंत व्यक्ती घडत असते आणि या घडण्याच्या काळात अवतीभवती असणार्या प्रौढ व्यक्तींपैकी पुरुषांपेक्षा स्त्रियाच (आई / आजी / काकू / शिक्षिका इत्यादी) जास्त असतात. असे असूनही स्त्रियांकडूनच घडविले गेलेले पुरूष स्त्रियांच्याच अपेक्षांप्रमाणे असत नाहीत ही आश्चर्याचीच गोष्ट आहे.
याबाबत माझा स्वत:चा एक अनुभव (विस्तारभयास्तव सविस्तर तपशील टाळून) इथे मांडतो. मी २००८ साली दिल्ली मुंबई असा प्रवास राजधानी एक्स्प्रेसने करीत होतो. तेव्हा सहप्रवासी महिलेशी माझ्या बराच वेळ मनमोकळ्या गप्पा रंगल्या. काही मुद्यांवर आम्ही एकमेकांशी चक्क वाद ही घातला. इतका वेळ संवाद साधल्यावर आम्हाला एकमेकांच्या व्यावसायिक व खासगी जीवनाविषयी देखील बरीच माहिती मिळाली त्याचप्रमाणे स्वभाविषयीही ढोबळ मानाने कल्पना आली. त्यावेळी मी तिशीत होतो तर ती महिला साधारण पंचेचाळिशीची असावी (कारण तिचा मोठा मुलगा इंजिनीयरिंगच्या दुसर्या वर्षात शिकत असल्याचे तिने सांगितले होते). शेवटी निरोप घेताना तिने मला सांगितले, "तुझ्या स्वभावातल्या काही गोष्टी मला पटल्या, तर अनेक बाबी खटकल्या. अर्थात तुझ्यासारख्या स्वभावाचा माझा मुलगा असेल तर मला आनंदच आहे. पण थॅंक गॉड माझा नवरा तुझ्यासारख्या स्वभावाचा नाहीय. अशा स्वभावाचा मुलगा मिळणे अतिशय अभिमानाचे ठरेल, पण असा नवरा मिळाला तर ते फारच त्रासदायक ठरणार."
म्हणजे तिला नवरा म्हणून त्रासदायक वाटू शकणारा पुरूषाचा स्वभाव तिच्या मुलाचा असेल तर अभिमान वाटतो यातच सारे काही आले. स्त्रिया अशा पद्धतीने जर मुलांना वाढवत असतील तर त्यांनी वाढवून मोठे केलेले हे पुरूष पुढे इतर स्त्रियांना नकोसेच वाटणार.
तरीही या वरून योग्य तो बोध घेऊन तुम्ही आताच वय वर्षे पाच किंवा त्याहून कमी वयाच्या मुलग्यांना तुमच्या अपेक्षांप्रमाणे घडवू / वाढवू शकता. त्याकरिता तुम्ही शिक्षिका होणे अतिशय उत्तम. कारण तुम्ही जास्तीत जास्त मुलांना घडवू शकाल. म्हणजे निदान पुढे पंधरा वीस वर्षांनंतर तरी त्यावेळच्या महिलांना तरी असे पुरूष कुठे मिळतील? हा गहन प्रश्न पडायला नको.
असं कसं काय विचारू शकता तुम्ही? पुरूष म्हणजे काय निर्जीव वस्तू आहेत काय मिळायला? निर्जीव वस्तू मिळतात तर सजीव व्यक्ती भेटतात. असो, तुम्हाला असे पुरूष कुठे भेटतील किंवा मिळतील असा प्रश्न विचारावासा वाटला कारण तुमच्या कवितेत व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करणारे पुरूष "इतिहासात दुर्मिळ होते वर्तमानातही थोडेथोडकेच आहेत" असं तुम्ही पुढे म्हणताय.
विडंबनांवर इतका गहन विचार करणार्या माणसांचे मला अतिशय कौतुक वाटत आले आहे. त्या कौतुकास गूगळे आज पात्र ठरले. अभिनंदन! ;)
आता प्रौढ असणारे पुरूष हे स्त्रियांनीच घडविलेले आहेत. आम्ही लहान असताना आमचे बाबा चरितार्थाकरिता कार्यालयात नोकरीला जात. साधारण दहा तास तरी घराबाहेर असत. आम्ही जास्त काळ आईच्याच सहवासात असू. त्याचप्रमाणे शाळेत ही शिक्षकांपेक्षा शिक्षिकांचीच संख्या जास्त होती. साधारण हाच अनुभव अनेकांचा असतो की वयाच्या अठरापर्यंत व्यक्ती घडत असते आणि या घडण्याच्या काळात अवतीभवती असणार्या प्रौढ व्यक्तींपैकी पुरुषांपेक्षा स्त्रियाच (आई / आजी / काकू / शिक्षिका इत्यादी) जास्त असतात. असे असूनही स्त्रियांकडूनच घडविले गेलेले पुरूष स्त्रियांच्याच अपेक्षांप्रमाणे असत नाहीत ही आश्चर्याचीच गोष्ट आहे.
याला पिढ्यान पिढ्या पुरुषप्रधान संस्कृतीत दबलेल्या स्त्रियांची मानसिकता म्हणतात आणि असे प्रसंग सांगून आपल्या वरची जबाबदारी झटकणार्याला प्रभूमास्तरांचा ए.एम.सी. उर्फ एम.सी.पी. म्हणतात. पुन्हा एकवार अभिनंदन!
थॅंक गॉड माझा नवरा तुझ्यासारख्या स्वभावाचा नाहीय. अशा स्वभावाचा मुलगा मिळणे अतिशय अभिमानाचे ठरेल, पण असा नवरा मिळाला तर ते फारच त्रासदायक ठरणार."
चला बाईंचे वर्तमान गर्तेत असले तरी भविष्य उज्ज्वल आहे. हे ही नसे थोडके.
तरीही या वरून योग्य तो बोध घेऊन तुम्ही आताच वय वर्षे पाच किंवा त्याहून कमी वयाच्या मुलग्यांना तुमच्या अपेक्षांप्रमाणे घडवू / वाढवू शकता. त्याकरिता तुम्ही शिक्षिका होणे अतिशय उत्तम. कारण तुम्ही जास्तीत जास्त मुलांना घडवू शकाल. म्हणजे निदान पुढे पंधरा वीस वर्षांनंतर तरी त्यावेळच्या महिलांना तरी असे पुरूष कुठे मिळतील? हा गहन प्रश्न पडायला नको.
छे! छे! मला वयाने वाढलेल्या पण बालबुद्धी राखणार्या पुरुषांना शिकवण्यात अधिक इंटरेस्ट वाटतो.
अवांतरः गूगळेंचा प्रतिसाद वाचून काही दिवसांपूर्वी एन.डी.टीव्हीवर तवलिनसिंग आणि चेतन भगत यांच्यातील बोलाचाल आठवली. ती पाहून खो खो खो हसले होते कारण तवलिनसिंग चेतन भगतवर इतक्या उखडल्या की (असे काहीसे) म्हणाल्या; "तू एक थर्डक्लास लेखक आहेस, तू लिहिलेल्या भंपक कादंबर्यांपायी तुला जेलमध्येच टाकायला हवे."
चेतन भगत बाईंच्या या अतिरेकीपणावर कसनुसा चेहरा करून "इतकं का मी वाईट लिहितो?" असं विचारता झाला. बिच्चारा!
बरे झाले बाईंनी गूगळेंचा प्रतिसाद नाही वाचला, नाहीतर एका ऐवजी दोन चेतनांना..... ;) ह. घ्या
प्रतिक्रिया
ना तेरी ना मेरी
In reply to अरेरे! by चिंतातुर जंतू
वरच्या त्या जॉनच्या फोटोत काय
In reply to ना तेरी ना मेरी by प्रियाली
हात बाईचा कशावरून...
In reply to वरच्या त्या जॉनच्या फोटोत काय by ३_१४ विक्षिप्त अदिती
छ्या, जुन्या मालकांनी सोय
In reply to हात बाईचा कशावरून... by प्रियाली
या पुरुषाने तर कानात रिंगा
In reply to हात बाईचा कशावरून... by प्रियाली
हाहाहा!
सॉल्लिड करमणूक
अर्रर्र...श्रावणात काय हे
प्रतिसाद
आले
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
स्पष्टीकरण
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
पुरुषांचे अर्धनग्न फोटो ही
In reply to स्पष्टीकरण by प्रियाली
अरे वा, छान विडंबन!
ठाकरी कविता
कंसातला पुरुष
:)
सेक्सिस्ट
In reply to :) by मन१
(स्त्री)
सर तुम्ही लिव्हाच.
In reply to (स्त्री) by विनायक प्रभू
प्र.का.टा.आ.
In reply to (स्त्री) by विनायक प्रभू
कोणीच तयार नाही?
In reply to (स्त्री) by विनायक प्रभू
छान आहे कविता.
In reply to कोणीच तयार नाही? by प्रियाली
पथ्य
In reply to कोणीच तयार नाही? by प्रियाली
टंका की
In reply to पथ्य by विनायक प्रभू
थोडा बदल करून लिहीलं आहे
In reply to कोणीच तयार नाही? by प्रियाली
अरे अरे अरे
In reply to थोडा बदल करून लिहीलं आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
ख त रा!! प्रियाली बाई ऐकत
In reply to कोणीच तयार नाही? by प्रियाली
दहाड ४४
In reply to कोणीच तयार नाही? by प्रियाली
ओह्हो
"या जॉनला कोणीतरी कोपर्यात
कसं जमणार? त्याला मागूनपुढून
In reply to "या जॉनला कोणीतरी कोपर्यात by गवि
अच्छा.. म्हणजे फोटोत
In reply to कसं जमणार? त्याला मागूनपुढून by नगरीनिरंजन
अग्ग्ग्ग्ग्गं!!!!
In reply to अच्छा.. म्हणजे फोटोत by गवि
दोघे नकटे आहेत
In reply to अग्ग्ग्ग्ग्गं!!!! by धमाल मुलगा
निषेध निषेध...
In reply to दोघे नकटे आहेत by प्रियाली
नकटं असण्यात काय वाईट आहे
In reply to दोघे नकटे आहेत by प्रियाली
उफ उफ्फ मिरची....
In reply to नकटं असण्यात काय वाईट आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
होय तर. आहेच आमचा जॉन
In reply to उफ उफ्फ मिरची.... by धमाल मुलगा
गिरे तो ब्बी.... ;)
In reply to होय तर. आहेच आमचा जॉन by ३_१४ विक्षिप्त अदिती
संबंधच काय जॉनने तलवारी आणि
In reply to गिरे तो ब्बी.... ;) by धमाल मुलगा
संबंध..
In reply to संबंधच काय जॉनने तलवारी आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
शेपूट घालण्यात आलेली आहे
In reply to संबंध.. by धमाल मुलगा
फरक
In reply to गिरे तो ब्बी.... ;) by धमाल मुलगा
पण टोण्याला अजून तलवारीचे चपळ
In reply to गिरे तो ब्बी.... ;) by धमाल मुलगा
सध्या केवळ कवितेचा आणि
पूर्वार्ध
कुठेतरी वाचलं होतं
In reply to पूर्वार्ध by नितिन थत्ते
बघा
In reply to कुठेतरी वाचलं होतं by ३_१४ विक्षिप्त अदिती
तेच तर. अर्धा भाग खरा
In reply to बघा by नितिन थत्ते
_/\_
एकमेवाद्वितीय
अखुडशिंगी?
In reply to एकमेवाद्वितीय by विकास
सहमत
In reply to अखुडशिंगी? by धनंजय
अरे कर्मा!
In reply to सहमत by विकास
हाहाहाहा
In reply to अरे कर्मा! by धमाल मुलगा
धमुण्णा, तुझी का रे इतकी
In reply to अरे कर्मा! by धमाल मुलगा
काय
आता बास करा
क्काय
In reply to आता बास करा by रेवती
मिळाला का वेळ मिपावर
In reply to क्काय by आनंदयात्री
माझ्या
In reply to मिळाला का वेळ मिपावर by रेवती
+१
In reply to माझ्या by आनंदयात्री
अतिशय मनोरंजक धागा
हम्म्म
In reply to अतिशय मनोरंजक धागा by अप्पा जोगळेकर
पुरुष टेश्टर्स
In reply to अतिशय मनोरंजक धागा by अप्पा जोगळेकर
गेल्या अडीच महिन्यात
In reply to अतिशय मनोरंजक धागा by अप्पा जोगळेकर
हा बघा
तो डार्क टॉल ह्यान्डसम असेल
कुठे मिळतील?
चेतन भगत
In reply to कुठे मिळतील? by चेतन सुभाष गुगळे