✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वृद्ध मातापित्यांची समस्या

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
Wed, 08/17/2011 - 19:35  ·  लेख
लेख
एकत्र कुटुंबपद्धतीच्या घरांमधे वृद्धांचा प्रश्न फारसा त्रासदायक नव्हता. पणज्या, आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकू, मुलं, नातवंडं सगळीच मंडळी एका घरात रहायची. घरात अनेक माणसं असल्यामुळे वृद्धांना एकटेपणा काय ते माहित नव्हतं, घरातले कर्ते पुरूष पैसा कमावण्यासाठी घराबाहेर असायचे, स्त्रिया घर चालवण्याच्या (ज्याला आपण आता बॅकएंड किंवा पडद्याआडची कामं म्हणू शकतो) कामात गर्क असल्या तरी पोरांकडे लक्ष द्यायला आजी-आजोबा होतेच, अतिवृद्धांची काळजीही घरात घेतली जायची. औद्योगिकीकरणानंतर ही परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. आपल्या मूळ गावात नोकरी-धंदा नसल्यामुळे किंवा त्यात आवड नसल्यामुळे अनेक मुलं आणि कालांतराने मुलीही तालुका, शहरांच्या ठिकाणी येऊन राहू लागल्या. मुलं जगण्याची शक्यता खूपच वाढली, त्याचबरोबर घरांच्या, स्थावर मालमत्तांच्या किंमतीही वाढल्या, विशेषतः शहर आणि आजूबाजूच्या भागात. आता एकत्र कुटुंब असणं जागा कमी असणे, जीवनपद्धतीमधला फरक यामुळे थोडं कठीण होतं आहे. पण त्याच्याच जोडीला इतर अनेक घटकांच्या बरोबरीनेच आधुनिक औषधांच्या मदतीने जीवनमान उंचावत आहे. एकेकाळी माणसांची साठी आली की उत्सव असायचा, आता आपल्या आजूबाजूला ऐशी वर्ष जगणारे अनेक वृद्ध दिसतात. पण अनेक कारणांमुळे मुलग्यांबरोबर रहाणं वृद्ध मातापित्यांना शक्य नसतं. एकच अपत्य आणि ती मुलगी असणं, पुरूष अपत्य नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मूळ गावापासून फार लांब किंवा परदेशात असणं आणि परगावी, परदेशात अजिबातच न करमणं, व्यक्तीस्वातंत्र्याच्या पुरूष अपत्यांच्या कल्पना इत्यादी अनेक कारणांमुळे वृद्ध पालकांवर आपल्या लग्न झालेल्या मुलीकडे रहाण्याची वेळ येऊ शकते. तसंही मुलीचं बाळंतपण माहेरी करण्याची पद्धत आहे. जेव्हा मुलीला काही कारणांमुळे माहेरी येऊन रहाणं शक्य नसतं तेव्हा तिचे पालक तिच्याकडे जाऊन रहातात आणि कौतुकाने मुलगी आणि नातवंडांची देखभाल करतात. जर हे शक्य आहे तर म्हातारपणाची काठी म्हणून मुलीकडे का पाहू नये? मुलगी-जावयानेही (मुलीच्या) वृद्ध पालकांची देखभाल का करू नये?
-------
जाता जाता: (घरच्या घरी केलेलं एक निरीक्षण. या निरीक्षणात आई-मुलींच्या साधारण दहा जोड्याच अंतर्भूत आहेत, पण सगळीकडे एकसारखंच निरीक्षण आढळलं म्हणून नोंदवावसं वाटलं.) विभक्त कुटुंबात, जिथे नवरा-बायको एकत्र रहात आहेत आणि पुढे मुलं झाल्यानंतर ती, तिथे घरातल्या पद्धती या मुलीच्या घरासारख्या होतात. उदा: घरचं जेवण बनवण्याची पद्धत; आई भाजीत गूळ घालत नसेल तर मुलगीही घालत नाही. मुलीचा नवरा घरी स्वयंपाक करत असेल तरीही मुलगी त्याला तिच्या आवडीप्रमाणेच जेवण बनवायला शिकवते/सांगते. पुरूषप्रधान व्यवस्थेत घर पुरूषाचं असतं पण आतला बहुतांश किंवा सर्व कारभार मुलीच्या घरासारखा असतो. तर मग मुलाने सासर्‍याकडेच रहाण्यास काय हरकत आहे? तिथे सासर्‍याची सहानुभूतीही मिळेल आणि सासू कौतुकही करेल. ;-)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36170 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

छान

Nile
गुरुवार, 08/18/2011 - 13:30 नवीन
एकंदर देशाची वैचारिक क्रांती का काय सुरू आहे हे पाहून फार बरे वाटले. आता पन्नाशीच्या आत सुखाने मरायला मी मोकळा!
  • Log in or register to post comments

नायल्या मेल्या

प्रियाली
गुरुवार, 08/18/2011 - 14:54 नवीन
आता पन्नाशीच्या आत सुखाने मरायला मी मोकळा!
तू आजही पन्नाशीच्या आतच आहेस रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

+१

श्रावण मोडक
गुरुवार, 08/18/2011 - 15:57 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

काय करावं या म्हातार्‍यांच बुवा!

Nile
गुरुवार, 08/18/2011 - 23:41 नवीन
तू आजही पन्नाशीच्या आतच आहेस रे!
तुम्हा म्हातार्‍यांच्या तरूणांप्रती असलेल्या अशा वृत्तींमुळेच तरूणाई अशी वागू लागली आहे असे निरीक्षण नोंदवतो! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

कारुण्य

प्रियाली
Fri, 08/19/2011 - 00:22 नवीन
तुम्हा म्हातार्‍यांच्या तरूणांप्रती असलेल्या अशा वृत्तींमुळेच तरूणाई अशी वागू लागली आहे असे निरीक्षण नोंदवतो
'तरुणाई' शब्दातलं कारुण्य (की करुणाई) जाणवलं असं नोंदवते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

एवढ्या सगळ्यांनी सगळं बोलून

बिपिन कार्यकर्ते
Fri, 08/19/2011 - 00:55 नवीन
एवढ्या सगळ्यांनी सगळं बोलून झालं तरी नायल्या अजून जिवंत आहे असे नोंदवतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

च्यायला!!!

असुर
Fri, 08/19/2011 - 16:15 नवीन
च्यायला!!! :-) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

वेगवेगळी उत्तरे

पैसा
गुरुवार, 08/18/2011 - 23:45 नवीन
प्रत्येक घराचे आणि त्या घरातल्या माणसांचे प्रश्न वरवर एकसारखे वाटणारे असले तरी खूप वेगवेगळे असू शकतात, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर सगळीकडे लागू पडेल असं नाही. पण घरातल्या माणसांमध्ये संवाद असेल तर कोणताही प्रश्न त्या त्या परिस्थितीत शक्य तेवढ्या चांगल्या प्रकारे सोडवणे शक्य आहे. त्याचवेळी कोणावरही भावनिक अन्याय होऊ न देणे हेही महत्त्वाचे आहे. घरातल्या सगळ्यांचे स्वातंत्र्य, हक्क आणि जबाबदार्‍या यांचा समतोल साधूनच जर कोणताही निर्णय घेतला तर तो सगळ्यांच्याच सुखाचा होईल.
  • Log in or register to post comments

खरे तर मला आजपर्यंत कधीच

कवितानागेश
Fri, 08/19/2011 - 00:20 नवीन
खरे तर मला आजपर्यंत कधीच कुठेच मुलानीच/मुलीनीच जबाबदारी घ्यावी असा कडक नियम दिसला नाही. एक सरळ निरिक्षण असे आहे, की ज्याला/जिला जबाबदारीची जाणीव असेल, मनात माया असेल, तो/ती कुठल्याही सामाजिक नियमांशिवाय आणि प्रलोभनांशिवाय जबाबदारी उचलतो/ते. तिथे कायदे/नियम वगरै चौकटींना अर्थ नसतो. कुठल्याही सामाजिक म्हणवल्या जाणार्‍या नियमांचा उपयोग फक्त समाजाला गॉसिप करण्यासाठीच होत असतो...'यांच्याकडे किनै अस्से करतात, .....आणि त्यांच्याकडे किनै तस्सेच रहातात' ...इ...
  • Log in or register to post comments

इतके मोकळे विचार अलीकडे स्त्रियांच्याच पचनी पडत नाहीत असे वाटते.

अप्पा जोगळेकर
Fri, 08/19/2011 - 00:28 नवीन
स्वतःच्या मालकीचा फ्लॅट असणे हा मुलीशी लग्न करु इच्छिणार्‍या मुलग्यांसाठी आवश्यक असणारा बेअर मिनिमम क्रायटेरिया आहे असे दोन-चार उभ्या असलेल्या मित्रांनी सांगितले. शिवाय स्वतःची सांपत्तिक स्थिती, शिक्षण, सॅलरीचा आकडा होणार्‍या नवर्‍यापेक्षा कमी असावी असाही मुलींचा अट्टहास असतो असेदेखील कळले. त्या दॄष्टीने विशेषतः शहरी स्त्रियांचे प्रबोधन होण्याच्या दॄष्टीने या लेखाचे विशेष महत्व वाटते. तुमचा तो मित्र म्हणजे तुम्हीच तर नाही ना ? असा प्रश्न विचारल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही. :)
  • Log in or register to post comments

शिवाय स्वतःची सांपत्तिक

सविता
Fri, 08/19/2011 - 11:34 नवीन
शिवाय स्वतःची सांपत्तिक स्थिती, शिक्षण, सॅलरीचा आकडा होणार्‍या नवर्‍यापेक्षा कमी असावी असाही मुलींचा अट्टहास असतो असेदेखील कळले - आम्हाला तर उलटेच कळले होते जेव्हा आम्ही या मार्केट मध्ये "उभे" होतो. मुलाचा पगार - ३५०००, बाकी माहिती ओके टाईप्स, मुलीबद्दल अपेक्षा - सुंदर, गॄहकॄत्यदक्ष , मिळून मिसळून वागणारी वगैरे वगैरे तर बाय डिफॉल्ट पण त्याहूनही महत्वा ची अपेक्षा - मुलगी नोकरी करणारी हवी, पगार किमान १०००० पण मुलापेक्षा कमी असावा! उद्या मुलीच्या कुंपणी मध्ये तिला जास्त पगार वाढ मिळाली आणि तिला अपेक्षित नसताना सुद्धा तिचा पगार चुकून नवर्‍यापेक्षा जास्त झाला तर हे महाभाग घटस्फोट घ्यायचा विचार करतील का? असा विचार करत आम्ही त्या स्थळाची माहिती ( मेलेला उंदीर शेपटी पकडून टाकावा) तशीच बाजूला टाकली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

पैसे जास्त हवे असणं हे

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/19/2011 - 18:49 नवीन
पैसे जास्त हवे असणं हे समजण्यासारखं आहे, पण कमी पैसे मिळवणारीच व्यक्ती हवी हे थोडं अतीच नाही का वाटत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता

'अमुक' विधानाच्या उलटेच

अप्पा जोगळेकर
Fri, 08/19/2011 - 21:09 नवीन
'अमुक' विधानाच्या उलटेच तुम्हाला कळले होते असे लिहून त्याखाली जो प्रतिसाद तुम्ही टंकला आहे, त्या प्रतिसादामध्ये त्या 'अमुक' विधानाच्या उलटे असे काहीच आढळले नाही. त्यामुळे प्रतिसाद असंबद्ध वाटतो आहे. कदाचित तुम्हाला काहीतरी वेगळेच म्हणायचे असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता

लग्नाच्या बाजारात

प्रियाली
Fri, 08/19/2011 - 18:55 नवीन
लग्नाच्या बाजारात आता अटी दोन्हीकडून येणारच. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती तेव्हा फक्त -
  • गोरी आणि सुंदर बायको हवी.
  • किमान ५-१० तोळे सोनं तिच्या अंगावर पालकांनी घालायला हवं.
  • सासूसासर्‍यांच्या आज्ञेत राहणारी हवी
  • बँकेत नाहीतर शाळेत नोकरी करणारी हवी
अशा अटी येत. मुलीकडच्यांनी अपेक्षा मांडल्या तरी त्यात दम नसे, तडजोड अधिक असे. आता परिस्थिती बदलली आणि दोन्ही कडून अटी येणे सुरू झाले, निदान तेथे समानता येऊ पाहते आहे ते उत्तम झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

>> आता परिस्थिती बदलली आणि

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 08/19/2011 - 19:26 नवीन
>> आता परिस्थिती बदलली आणि दोन्ही कडून अटी येणे सुरू झाले, निदान तेथे समानता येऊ पाहते आहे ते उत्तम झाले. Two wrong do not make one right अशा अर्थाची म्हण आठवली ;-) बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

लग्नाच्या बाजारात

प्रियाली
Fri, 08/19/2011 - 19:39 नवीन
Two wrong do not make one right अशा अर्थाची म्हण आठवली
तसं सांगायचा प्रयत्नही नाही पण एक बाजू राँगच होती हे मान्य केल्याबद्दल विशेष धन्यवाद. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

लग्नाच्या बाजारात आता अटी

अप्पा जोगळेकर
Fri, 08/19/2011 - 21:19 नवीन
लग्नाच्या बाजारात आता अटी दोन्हीकडून येणारच. जन्माला आलेल्या मुलींना खचाखच मारुन टाकणे सुरुच असल्यामुळे मुलींची उपलब्धता कमी होत जाणार. त्यामुळे यापुढील काळात मुलीकडच्या बाजूने लादल्या जाणार्‍या अटी आणि माजोरडेपणा वाढतच जाणार हे उघड आहे. पूर्वीच्या काळात वरपक्षाकडच्यांनी जो मस्तवालपणा दाखवला त्याचा काळाने घेतलेला सूड म्हणा हव तर. त्यामुळे समानता येईल ही आशा फोल वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

यावरून आठवले... (समांतर अवांतर)

पंगा
Sun, 08/21/2011 - 06:21 नवीन
त्यामुळे समानता येईल ही आशा फोल वाटते.
आमचे मानसगुरुवर्य श्री. जॉर्ज मिकॅश यांनी भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्यातला भेद अतिशय थोडक्यात पण चपखलपणे समजावून सांगितला आहे, त्याची या निमित्ताने आठवण झाली. "They say that Capitalism is the exploitation of one man by another. Communism is the other way round." (टीप: उद्धरण आठवणीतून उतरवलेले आहे. या क्षणी पुस्तक डोळ्यांसमोर नाही. शब्दांत किंचित फेरफार निघाल्यास चूभूद्याघ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

जन्माला आलेल्या मुलींना खचाखच

रेवती
Mon, 08/22/2011 - 19:56 नवीन
जन्माला आलेल्या मुलींना खचाखच मारुन टाकणे एखाद्या व्यक्तीला/बाळाला मारून टाकणे यात कमालीचे क्रौर्य आहे. पूर्वीही मुलगी झाली असताना (तेंव्हा आधीच लिंगनिदान व्हायचे नाही) पालकांना नको वाटायचे पण रडत कुढत का होइना लग्नाच्या वयाची होईपर्यंत सांभाळून पाठवणी केली जायची. आपण म्हणता तशी खचाखच मारामारी सुरु झाल्यावरही लगेच आवर घातला असता (सगळ्यांनीच) तर समझोता होण्याची शक्यता होती. आता सहनशक्तीच्या बाहेचा विषय होत चाललेला आहे. आपले जगणे (हक्क), अस्तित्व आईवडीलांकडून नाकारले जाते किंमान नावडले जाते हे आणि सासरीही त्यानुसारच वागणूक मिळते हे पाहिल्यापासून मुलींनी दुसरे टोक गाठले आहे. काही गोष्टींना नाईलाज आहे. हळूहळू त्यातही समतोल येईल अशी आशा करणे मात्र सोडून चालणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

कार्यकारणभावाबद्दल साशंक

पंगा
Mon, 08/22/2011 - 21:16 नवीन
आपले जगणे (हक्क), अस्तित्व आईवडीलांकडून नाकारले जाते किंमान नावडले जाते हे आणि सासरीही त्यानुसारच वागणूक मिळते हे पाहिल्यापासून मुलींनी दुसरे टोक गाठले आहे.
या कार्यकारणभावाबद्दल साशंक आहे. तथाकथित 'दुसरे टोक' गाठणार्‍या मुली (हूएवर दे मे बी) (गट 'अ'), आणि 'आपले जगणे (हक्क), अस्तित्व नाकारले गेलेले पाहणार्‍या, सासरी त्यानुसारच वागणूक मिळते हे अनुभवणार्‍या' एवंगुणविशिष्ट मुली (गट 'ब') हे दोन्ही एकच गट आहेत, या प्रतिपादनातील तथ्याबद्दल खात्री नाही. ('अ' आणि 'ब' हे) दोन्ही गट हे मुलींचेच उपगट आहेत, याव्यतिरिक्त त्यांच्यात कितीसा परस्परसंबंध असावा, याबद्दल शंका आहे. (अगदी टोकाचे आणि ट्रिवियल उदाहरण घ्यावयाचे झाल्यास, खचाखच मारल्या जाणार्‍या मुली या पुढील आयुष्यात 'दुसरे टोक' गाठीत असतील, असे वाटत नाही. उलटपक्षी, तथाकथित 'दुसरे टोक' गाठणार्‍या मुली या जन्मतःच खचाखच मारून टाकल्या गेल्या असतील, ही शक्यतादेखील धूसर वाटते. किंचित गंभीर व्हावयाचे झाल्यास, (अ.) तथाकथित 'दुसरे टोक' गाठणार्‍या मुलींपैकी (पुन्हा, हूएवर दे मे बी) किती टक्क्यांना स्वतःच्या कुटुंबांत जन्मतःच खचाखच मारून टाकणे किंवा दुय्यम दर्जाची वागणूक हे प्रकार अनुभवायला मिळाले असावेत, आणि उलटपक्षी (ब.) स्वतःच्या कुटुंबात जन्मतःच खचाखच मारून टाकणे किंवा दुय्यम वागणूक मिळालेल्या मुलींपैकी किती टक्के मुली या पुढे जाऊन तथाकथित 'दुसरे टोक' गाठत असाव्यात, याबद्दल काही आकडेवारी किंवा परस्परसंबंध प्रस्थापित करणारी अन्य काही माहिती मिळू शकल्यास ती उद्बोधक ठरावी.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

गट अ आणि ब हे साहजिकच वेगळे

रेवती
Mon, 08/22/2011 - 21:26 नवीन
गट अ आणि ब हे साहजिकच वेगळे आहेत. पण काय आहे ना, मुली आजूबाजूला काय घडतय याकडेही बघत असतात, घरात चाललेल्या चर्चा (उदा. मुच्या लग्नाची, खर्चाची चिंता इ.) ऐकत असतात. त्याबद्दल म्हणतिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

असे बोला ना!

पंगा
Mon, 08/22/2011 - 21:35 नवीन
पण मग याचा गर्भलिंगनिदान, स्त्रीभ्रूणहत्या वगैरेंशी संबंध काय? उगाच 'कोठेतरी कुणीतरी आपल्या मुलींना मारून टाकते (अगदी 'खचाखच' वगैरे), आता फारच झाले हं, म्हणून मुली सरसकट मुलांशी लग्नाच्या बाबतीत आडमुठेपणा करतात' वगैरे म्हणण्यात काय अर्थ आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

वाद घालण्यासाठी आज मी सापडले

रेवती
Mon, 08/22/2011 - 21:49 नवीन
वाद घालण्यासाठी आज मी सापडले का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

बरीचशी सहमत आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 08/22/2011 - 23:13 नवीन
आजूबाजूला 'असले'* अनेक MCPs बघूनही मुली असा आडमुठेपणा करत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. *असले म्हणजे पंगाशेटसारखे नव्हे, पंगाशेटना MCP ठरवण्याचा क्षीण प्रयत्न कृपया करू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

?

पंगा
Mon, 08/22/2011 - 23:33 नवीन
असले म्हणजे पंगाशेटसारखे नव्हे
ठीक. 'असले' म्हणजे नेमके कसले?
पंगाशेटना MCP ठरवण्याचा क्षीण प्रयत्न कृपया करू नये.
जोरदार प्रयत्न करावा काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ठीक. 'असले' म्हणजे नेमके

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/23/2011 - 00:37 नवीन
ठीक. 'असले' म्हणजे नेमके कसले?
अहो म्हणजे आजूबाजूला, इतस्ततः प्रतिसादांमधे पसरलेले हो.
जोरदार प्रयत्न करावा काय?
तो तुमचा व्यक्तीगत प्रश्न आहे. :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

गोरी आणि सुंदर बायको

इरसाल
Tue, 08/23/2011 - 15:20 नवीन
गोरी आणि सुंदर बायको हवी. आश्चर्य आहे.आमच्याकडे गोरी आणि सुंदर मुलगी हवी असे असते.बायको म्हणून . कोण आपली गोरी आणि सुंदर बायको देईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

चांगला चर्चा प्रस्ताव.

चतुरंग
Fri, 08/19/2011 - 19:57 नवीन
माझ्या एका चुलतमामाकडे त्याचे सासू-सासरे राहायचे. त्यांना दोन मुलीच. आता सासरे नाहीत परंतु सासूबाई आहेत. मलातरी त्यांच्या वावरण्यात कधी अवघडलेपण जाणवलं नाही. तसंच मामीच्याही वागण्यात 'आता काय बाई करु, माझे आईवडील येऊन राहिलेत!' असंही कधी जाणवलं नाही. त्या त्या परिस्थितीत योग्य तो उपाय काढणे हे सगळ्यात महत्त्वाचे. किंचित अवांतर - वपुंच्या एका कथेतलं वाक्य इथे चपखल लागू होतं - लोक काय म्हणतील ह्या कल्पनेनीच आपण आपलं जगणं मुश्किल करुन घेतो! (सुटसुटीत)रंगा
  • Log in or register to post comments

एका भरटण्याची शक्यता असलेल्या

विजुभाऊ
Mon, 08/22/2011 - 15:40 नवीन
एका भरटण्याची शक्यता असलेल्या चांगल्या विषयावर संयत चर्चा काढली हे बरे आहे. वपुंच्या एका कथेतलं वाक्य इथे चपखल लागू होतं - लोक काय म्हणतील ह्या कल्पनेनीच आपण आपलं जगणं मुश्किल करुन घेतो हे मात्र एकदम बरोबर. मुलाबरोबर राहीले तरी पंचाईत / मुलीकडे राहीले तरी पंचाईत / स्वतन्त्र राहीले तरी पंचाईत
  • Log in or register to post comments

बर्‍याच जणानी परदेशात स्थाईक

मराठी_माणूस
Tue, 08/23/2011 - 16:00 नवीन
बर्‍याच जणानी परदेशात स्थाईक होउन हा प्रश्न निकालात काढला आहे. (ना रहेगा बांस ना बजेगी बांसुरी )
  • Log in or register to post comments

धागा तेवत कसा ठेवावा याचे

विजुभाऊ
Tue, 08/23/2011 - 19:36 नवीन
धागा तेवत कसा ठेवावा याचे उत्तम उदाहरण. २२/७% धागे बहुतेक वेळा अशीच उदाहरणे असतात
  • Log in or register to post comments

तीनाचा इरॅशनल अपूर्णांक.

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 08/23/2011 - 20:10 नवीन
विजुभाऊ, तीनाच्या अपूर्णांकातले लोकं असेच असतात. तुम्हीही नाही का बळी पडलात! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा