Skip to main content

रानफुल

लेखक आनंदयात्री यांनी शनिवार, 20/08/2011 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
रानफुलाच्या पिवळसर पिंगट पाकळीला मी भुललो, तोच क्षण त्याचं अन माझं आयुष्य जोडणारा. मंतरलेल्या रानात रानफुल आणी मी, बघत होतो, प्रतिबिंबं, आमच्याच डोळ्यात तरारलेली. "तू आणि मी, आपण दोघं सारखेच !" उमलतो पण गंधाला पारखे. रानफुल सुखावलं .. रानफुल सुखावलं तेव्हा दिसली होती, माझ्याच प्रतिबिंबाची हलकी काळसर बेगडी किनार. रानफुलं रानातच उमलतात .. फुलतात .. असे म्हणत एकेदिवशी, मी परतलो .. जनरितीनुसार. जातांना फुल म्हणाले होते, सुकले तरी चालेल, पण ठेवशील ना मला डायरीत ? .. जनरितीनुसार ? - आनंदयात्री
लेखनविषय:

वाचने 3735
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

त-र-ल!!! सुरेख. >> रानफुलाच्या पिवळसर पिंगट पाकळीला मी भुललो, तोच क्षण त्याचं अन माझं आयुष्य जोडणारा. >> क्या बात है! >> "तू आणि मी, आपण दोघं सारखेच !" उमलतो पण गंधाला पारखे. >> मस्त!!

लेखनही नाजुक वाटतय इतकं आवडलं. आनंदयात्रींना व्हॅक्युमक्लीनर देवून ही कविता पूर्ण केल्याबद्दल सौ. यात्रींचे अभिनंदन!

कविता आवडली. शेवटच्या ओळी अप्रतिम आहेत.

या कवितेचं कौतुक करायला माझ्याकडे इतके नाजूक, कवितेला शोभेलसे शब्द नाहीत.

सुकलेले रानफुल म्हणाले होते डायरी चालेल, पण आंद्याला कुठे ठेवायचा?.. जनरितीनुसार? उत्तर : अर्थातच त्याची जागा ताटाखाली. हॅ हॅ हॅ पुरुष कुठला!!

ही कविता मिपावरच्या (नव)कवींच्या अभ्याक्रमात ( जी ऑप्शनला टाकता येणार नाही अशी) टाकली जावी काय? आवांतर : हा मनुक्ष मोजकच लिखाण करतो पण जे लिहितो ते 'कोलीती'वालं.

फारच छान..! नेहमिच तुमच्या लिखनाच्या प्रतिक्षेत...

कविता आवडली.

मस्तच बर का. आवडली कविता.

अरे वा बरेच दिवसांनी लिहिलंस मात्र लिहिलंस ते (नेहमीप्रमाणे) चोक्कस! मस्त!

गझलेच्या जवळ जाणारे काव्य आवडले. त्यातही शेवट जास्त आवडला.

सुंदर ...................................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

नेहमीप्रमाणेच उत्कट, उत्कृष्ट!

आमच्या आंद्यामधला 'आनंदयात्री' बर्‍याच दिवसांनी जागा झालेला दिसतोय. उत्तम! त्याला आता झोपू देऊ नका साहेब.... :)

नाजूक अनुभव आहे. (रानफुलाचा पिंगट रंग डोळ्यांसमोर लवकर उभा राहात नाही.)
... तेव्हा दिसली होती, माझ्याच प्रतिबिंबाची हलकी काळसर बेगडी किनार.
मस्त कल्पना. ("बेगडी" या स्पष्टीकरणात्मक शब्दाचा मोह टाळायला हवा होता, असे राहूनराहून वाटते.)

क्लास! काल कविता वाचली होती, पण काय प्रतिक्रिया लिहावी ते सुचलं नाही. निराळ्या अर्थाने, 'जाईन विचारीत रानफुला'ची आठवण झाली.