रानफुल
रानफुलाच्या पिवळसर पिंगट पाकळीला मी भुललो,
तोच क्षण त्याचं अन माझं आयुष्य जोडणारा.
मंतरलेल्या रानात रानफुल आणी मी,
बघत होतो, प्रतिबिंबं, आमच्याच डोळ्यात तरारलेली.
"तू आणि मी, आपण दोघं सारखेच !"
उमलतो पण गंधाला पारखे.
रानफुल सुखावलं ..
रानफुल सुखावलं तेव्हा दिसली होती,
माझ्याच प्रतिबिंबाची हलकी काळसर बेगडी किनार.
रानफुलं रानातच उमलतात .. फुलतात ..
असे म्हणत एकेदिवशी, मी परतलो .. जनरितीनुसार.
जातांना फुल म्हणाले होते, सुकले तरी चालेल,
पण ठेवशील ना मला डायरीत ? .. जनरितीनुसार ?
-
आनंदयात्री
लेखनविषय:
याद्या
3716
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
त-र-ल!!! सुरेख. >>
लेखनही नाजुक वाटतय इतकं
मस्त !! आवडली.
सुरेख
मस्त!
वाह वाह वाह!!! क्या बात!!
_/\_
फारच छान..!
कविता छान .. आनखिन येवुद्या
छान रे आंद्या!
छान
स्पीचलेस !!
मस्तच ....
चोक्कस
अफलातून.. ग्रेट...
अप्रतीम. भन्नाट. जबरा. खरंच
सुंदर
सुंदर
काव्य आवडले.
अप्रतिम
आंद्या ...........डायरेक्ट
ह्म्म्म...
टिपीकल आंद्याटाईप कविता..
नाजूक अनुभव
तरीही येतो वास फुलांना...
क्या बात है!