Skip to main content

शब्दांचे पारतंत्र्य

लेखक निनाव यांनी शुक्रवार, 19/08/2011 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
अडकले शब्द अर्थांच्या साखळीत जीवन त्यांचे झाले तसे अर्थहीन नसून वजन तयांसी - वेढले अनर्थांनी जडले असे वादास - झाले पराधीन कुणी उचलले अर्थ - केले शब्दांचे शस्त्र जखम भरण्यास गेले आयुष्य - झाले अर्थहीन कुणी सडवले - न-वापरता - वाटे तयांसी हे धन अभाव भावनेचे - दोष कुणाचा - शब्द मात्र स्वातंत्र्यहीन!
लेखनविषय:

वाचने 1023
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

निनाव - छान जमलीय कविता - कुणी उचलले अर्थ - केले शब्दांचे शस्त्र जखम भरण्यास गेले आयुष्य - झाले अर्थहीन

छान विचार!!!

शेवटची तीन्ही कडवी आवडली. पहीले कडवे कळाले नाही. कवितेच्या कनेक्टींग द डॉट्स मध्ये मी कोणता तरी डॉट चुकते आहे असे वाटते.

वा... :)