शब्दांचे पारतंत्र्य
अडकले शब्द अर्थांच्या साखळीत
जीवन त्यांचे झाले तसे अर्थहीन
नसून वजन तयांसी - वेढले अनर्थांनी
जडले असे वादास - झाले पराधीन
कुणी उचलले अर्थ - केले शब्दांचे शस्त्र
जखम भरण्यास गेले आयुष्य - झाले अर्थहीन
कुणी सडवले - न-वापरता - वाटे तयांसी हे धन
अभाव भावनेचे - दोष कुणाचा - शब्द मात्र स्वातंत्र्यहीन!
लेखनविषय:
याद्या
1015
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
निनाव - छान जमलीय कविता
मस्त
शेवटची तीन्ही कडवी आवडली.
वा...