हा हा हा! अरे देवा, काय दिवस आले आहेत! कुठे ते एके काळचे 'आजची खादाडी'सोबतच्या पुष्ट स्त्रिया आपल्या दमदार छातीवर लेवूनही त्यांच्या भाराने अजिबात न वाकणारे आमचे 'रीतीभातीचे' संकेतस्थळ अन कुठे हे आजकालचे उच्छृंखल बाजारू संकेतस्थळ. जगदंब जगदंब!!!
- स्मरणरंजनाने चिंतातुर जंतू
जाताजाता: याची आठवण झाली:
मला एक पुरुष हवा आहे!
या घराला एक आडदांड पुरुष हवा आहे
बटणं सापडत नाहीत म्हणून
आरडाओरडा करून
घर डोक्यावर घेणारा,
आमटीला फोडणी खमंग पडली
म्हणून खुशालून जाणारा,
केसांतून बोटे फिरली की,
बाळ होऊन कुशीत घुसणारा
दमदार पावलांनी तिन्ही सांजेचा
केविलवाणा अंधार उधळून लावणारा
पुरुष हवा आहे
या घराला - एक आडदांड पुरुष हवा आहे
नाही हे मी म्हणत नाही
या भिंतीच म्हणून राहिल्यात केव्हापासून
अनुराधा पोतदार
(कॅक्टस फ्लॉवर या काव्यसंग्रहातून)
३ बायका आनंद उपभोगत आहेत हे बघवणार कसं?
लगेच यांची संकेतस्थळं "बाजारू" होतात .... कपाळाला आठ्या चढतात. रीतभात बुडते.
इतर धाग्यांवर धांगडधिंगा चालतो ते बरीक चालतं.
'आमची आवड' काय आहे हे पण आता तुम्ही पुरूष आम्हाला सांगणार का?
मग? शेवटी प्रश्न रीतीभातीचा आहे आणि त्यामुळे संकेतस्थळाच्या इज्जतीचा पण! स्थळज्येष्ठ सदस्यांनीच रीतभात सोडली तर मग आपली महान संस्कृती आपलं वस्त्रहरण होताना कुणाचा धावा करील?
हो, पण रीतभात काय तुमच्यासारख्या संकेतस्थळकनिष्ठ सदस्यांनी आम्हाला सांगायचं होय? व्यक्तीला वस्तू बनवून त्यांचे फोटो टाकणे हीच इथली 'जुनी' रीतभात; जुन्या काळीही आम्ही हेच करत आलो आहोत. बाकी कसली संस्कृती आणि कसल्या वस्त्रहरणाच्या गोष्टी करता तुम्ही नवखे लोकं?
हंक म्हणजे काय? असा प्रश्न मला पडला. इंग्रजी - मराठी शब्दकोशातले अर्थ पाहिले. ते खालीलप्रमाणे :-
hunk (हंक) - (पाव, मांस इ. चा) जाड तुकडा
hunker (हंकर) - उकिडवा बसणे, वाकणे
hunkers (हंकर्स) - शरीराचा पार्श्वभाग, जघन
hunks (हंक्स) - लहरी वृद्ध माणूस, कंजूष माणूस
जॉनविषयी हंक हे विशेषण वापरताना नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे?
अर्बनडिक्शनरीच्या मताप्रमाणे:
१. An attractive male, usually with nice chiseled abs and a very sexy tan.
२. Extremely Hot Male Model.
Usually Tanned, Built, Tall, And Poses In Underwear.
अजूनही पाच अर्थ आहेत, ते लिंकवर वाचता येतीलच.
ऑक्सफर्ड शब्दकोषानुसारः
१. a large piece of something, especially food, cut or broken off a larger piece:
२. informal a large, strong, sexually attractive man
डिक्शनरी.कॉमच्या लिंकवर हे सापडलं.
१. a large piece or lump; chunk.
२. Slang .
a handsome man with a well-developed physique.
a large or fat person.
भाईकाकांचं 'खुर्च्या' ऐकल्यापासून इंग्लिश->मराठी शब्दकोष पहाणं मी सोडून दिलं.
इतके सगळे अर्थ देऊन भाषाविषयक माझ्या सामान्य ज्ञानात भर टाकल्याबद्दल धन्यवाद. पण माझं कुतुहल कायम आहेच.
<< जॉनविषयी हंक हे विशेषण वापरताना नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे?>>
छे, छे, हे भाषाविषयक ज्ञान नसून ही इंटरनेटच्या अधिक वापराविषयक माहिती आहे.
हां, आणि हंकचा मला अभिप्रेत असणारा अर्थ तोच जो माणसाचं सर्वात जास्त वस्तूकरण करणारा, अश्लील आहे तो!
कुठे ते एके काळचे 'आजची खादाडी'सोबतच्या पुष्ट स्त्रिया आपल्या दमदार छातीवर लेवूनही त्यांच्या भाराने अजिबात न वाकणारे आमचे 'रीतीभातीचे' संकेतस्थळ अन कुठे हे आजकालचे उच्छृंखल बाजारू संकेतस्थळ. जगदंब जगदंब!!!
बरं! बरं! इतके नाराज होण्याचे काही कारण नाही. सर्वांचेच पोट भरेल अशीही व्यवस्था करता येईलच की.
त्याचं असं झालं की हात बाईचा कशावरून असा तांत्रिक मुद्दा राजेशनी काढला. शिवाय प्रियालीचा धागा... कुणाचा हात अचानक, कुठून कोणाच्या खांद्यावर येऊन पडतो असे प्रश्न लोकांना पडायला नकोत म्हणून स्वच्छ आणि स्पष्ट फोटो दिला.
छ्या, जुन्या मालकांनी सोय केली आहे की! म्हणून टाक "ज्याची त्याची जाण, समज, इ.इ ...."! हाय काय नाय काय!!
तरी एक बरं केलंस हां, सल्लूचा टॉपलेस फोटोच टाकलास.
या धाग्यातली कविता आणि प्रतिसादातले अन्य लिखित विनोद मी मनापासून एंजॉय केले. कवितेमधे (काहीशा मिष्किलपणे) व्यक्त झालेल्या पुरुषप्रतिमेबद्दल मी प्रस्तुत कवितेच्या कर्तीच्या मतांशी सहमती व्यक्त करतो.
मात्र , जॉन अब्राहम आणि/किंवा इतर पुरुषविशेष यांची इथल्या धाग्यावर लावलेली अर्धनग्न चित्रे म्हणजे "आजची खादाडी" आणि इतर प्रसंगी इथल्या संकेतस्थळावर वेळोवेळी लावल्या गेलेल्या स्त्रियांच्या कमी अधिक कपड्यांमधल्या चित्रांना दिलेली दाद आहे असं समजायचं काय ?
माझ्यापुरतं बोलायचं तर मला कुणाही लिंगी व्यक्तीची तोकड्या कपड्यांमधली चित्रे आणि मुख्यम्हणजे त्यावर केलेल्या कमेंट्स हा प्रकार अत्युच्च अभिरुचीचा वाटत नाही.
अर्थात "हॉट ऑर नॉट" इत्यादि स्वरूपाच्या गोष्टींवर बंदी घालायची काहीच गरज नाही. सेक्स-व्हॉयलन्स-धार्मिक संवेदनशील मजकूर- वैयक्तिक टिकाटिप्पणी वगळता कुठल्याही अभिव्यक्तीवर कदापि बंदी घातली जाऊ नये या माझ्या (आजवर ठामपणे जोपासलेल्या) भूमिकेत जराही बदल मी करत नाही. उपरोक्त कुठल्याही "सेन्सॉरेबल" प्रकाराला वगळता बाकी कुणीही काहीही लिहो नाहीतर डकवो, त्यावर बंदी नाही आणि माझी हरकतही नाहीच.
प्रश्न व्यक्तींना, त्यांच्या शारिरीक अवयवांना वस्तुरुप देण्याचा आहे. आजवर "आजची खादाडी" टाईप स्त्रीदेहाला वस्तुरूप करणार्या प्रवृत्तींबरोबर माझी रुचिभिन्नता मी व्यक्त करत आलो. इथे डकवलेल्या चित्रांच्या संदर्भातसुद्धा ही रुचिभिन्नता व्यक्त करणे मी अपरिहार्य समजतो आणि त्याची इथे नोंद करतो.
या धाग्यातली कविता आणि प्रतिसादातले अन्य लिखित विनोद मी मनापासून एंजॉय केले. कवितेमधे (काहीशा मिष्किलपणे) व्यक्त झालेल्या पुरुषप्रतिमेबद्दल मी प्रस्तुत कवितेच्या कर्तीच्या मतांशी सहमती व्यक्त करतो.
धन्यवाद. :)
याचबरोबर, अर्धनग्न कत्रिनाचे फोटो पाहून एखाद्याच्या भावना दुखावल्या असतील किंवा रुचीहिनता वाटत असल्यास मी क्षमा मागते आणि गरज भासल्यास केवळ कत्रिनाचा फोटो संपादकांनी क्रॉप करून लावावा अशी मी विनंतीही करते.
तरीही असे नमूद करेनच की कत्रिनाने घातलेले कपडे आज पार्ट्यांमध्ये, अॅवार्ड सेरेमनीला आणि इतर सार्वजनिक प्रसंगात सर्रास घातले जातात. ते तोकडे असले तरी प्रचलित आहेत असे वाटते. तांत्रिक भाषेत तो फोटो अर्धनग्नही नाही कारण खांदे, हात आणि पाय दाखवणे याला अर्धनग्न म्हणता येत नाही असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
मात्र , जॉन अब्राहम आणि/किंवा इतर पुरुषविशेष यांची इथल्या धाग्यावर लावलेली अर्धनग्न चित्रे म्हणजे "आजची खादाडी" आणि इतर प्रसंगी इथल्या संकेतस्थळावर वेळोवेळी लावल्या गेलेल्या स्त्रियांच्या कमी अधिक कपड्यांमधल्या चित्रांना दिलेली दाद आहे असं समजायचं काय ?
प्रश्नाचे उत्तर तुमच्या प्रश्नातच दडलेले आहे. एखादी गोष्ट विनाकारण आणि वेळोवेळी होत गेली की ती उबगवाणी ठरते. मिपावर वेळोवेळी लावल्या गेलेल्या चित्रांना आणि एखादे वेळी आलेल्या या धाग्याला एका पारड्यात तोलू नये ही विनंती. (तोट्याचा सौदा आहे. वजन सारखे भरणे केवळ अशक्य.)
प्रश्न व्यक्तींना, त्यांच्या शारिरीक अवयवांना वस्तुरुप देण्याचा आहे. आजवर "आजची खादाडी" टाईप स्त्रीदेहाला वस्तुरूप करणार्या प्रवृत्तींबरोबर माझी रुचिभिन्नता मी व्यक्त करत आलो. इथे डकवलेल्या चित्रांच्या संदर्भातसुद्धा ही रुचिभिन्नता व्यक्त करणे मी अपरिहार्य समजतो आणि त्याची इथे नोंद करतो.
मला वाटतं तसा उद्देश नव्हता पण चिंजंच्या प्रतिसादातून तशी गंमत केली गेल्याने इतरांनीही त्याला प्रतिसाद दिला असे वाटते. रुची ही रोज एकसारखी ठेवून भागत नाही, कधीतरी रुचीपालट करावा लागतो तसेच हे असावे. परंतु, रुचीपालट हा ही एखादेवेळेसच होतो यावरही विश्वास ठेवावा.
माझ्यापुरतं बोलायचं तर मला कुणाही लिंगी व्यक्तीची तोकड्या कपड्यांमधली चित्रे आणि मुख्यम्हणजे त्यावर केलेल्या कमेंट्स हा प्रकार अत्युच्च अभिरुचीचा वाटत नाही.
मला वाटतं आलेल्या कमेंट्स अतिशय साध्या आहेत. या संकेतस्थळाने वेळोवेळी यापेक्षा मोठ्या कमेंट्स आणि कॉम्प्लिमेंट्स (वहिनीपासून आयटम बॉम्ब) रिचवल्या आहेत आणि "हिक्क" सुद्धा केलेले नाही.
कत्रिनाच्या कपड्यांबद्दल उहापोह झाला आहेच, आता जॉन आणि सल्लूकडे वळू. त्यांनी कपडे न घालणे हा अभिरुचीचा प्रकार नसून आपल्या संस्कृतीचा प्रकार आहे. मिपाच्या उजवीकडे उघडे ज्ञानेश्वर महाराज बसले आहेत. त्यांच्या फोटोवर कोणी आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. (कृपया, ज्ञानेश्वर आणि जॉन यांच्यातील समान धागा केवळ "पुरुष" एवढाच आहे असे समजावे. बाकी, समानता नसावी.)
खालील फोटोवर कोणी आक्षेप घेईल असे वाटत नाही. येथेही खालचे पुरुष अर्धनग्न आहेत.
तुमच्या तरुण/लहानपणी हा फोटो घरात लावला होता का? तुमच्या नसला तरी इतर अनेकांच्या असेल -
सांगायचा मुद्दा एवढाच आहे की पुरुषांचे अर्धनग्न फोटो ही आमची संस्कृती आहे. त्यात अभिरुचीहीनतेचा संबंध नाही परंतु कत्रिनाच्या अर्धनग्न नसलेल्या पण एखाद्याला तसे वाटू शकते टैप फोटोबद्दल मी माफी मागायला तय्यार आहे. :) पण अगदी त्याच फोटोसारखा राधाकृष्णाचा फोटो (जवळपास तेवढ्याच कपड्यांतला) माझ्या घरात विराजमान आहे असे नमूद करते.
From Untitled Album
* फोटो विविध संकेतस्थळांवरून घेऊन येथे लावले आहेत. ते मी काढलेले नाहीत.
पुरुषांचे अर्धनग्न फोटो ही आमची संस्कृती आहे. त्यात अभिरुचीहीनतेचा संबंध नाही परंतु कत्रिनाच्या अर्धनग्न नसलेल्या पण एखाद्याला तसे वाटू शकते टैप फोटोबद्दल मी माफी मागायला तय्यार आहे
आम्ही स्त्री पुरुष समानतेचे पुरस्कर्ते आहोत ;)
'स्त्री हवी आहे' असा विषय घेऊन आपणच पुरुषांना हव्या असलेल्या अपेक्षित स्त्री बद्दलच्या भावना समृद्ध अनुभव किंवा कल्पनेच्या साह्याने मांडू शकाल असे वाटते. लेखन गद्य असले तरी त्याला आम्ही पद्य म्हणून वाचू त्याची कल्जी करु नये. :)
सर, लेखनासाठी शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
(सरांचा विद्यार्थी)
इतके कठीण नाही स्त्रीकडून अपेक्षा करणे पण तशी अपेक्षा करायला फारसे पुरुष तयार नसावेत की काय असा प्रश्न पडला कारण परिवर्तन त्यांच्या पथ्यावर पडणारे नाही. ही बघा कशी वाटते -
बायका हव्या आहेत...
आजच्या पुरुषांना हव्या आहेत बायका
कणखर, खंबीर आणि कर्तृत्ववान बायका,
शारीरिक पुरुषत्व असूनही मानसिक दौर्बाल्याला समजून घेणार्या
आजच्या जगात पुरुषांना सर्वपरिने साथ देण्यास उत्सुक असणार्या बायका
बँकांची कामं तुंबली असता
आनंदाने ती कामे करणार्या बायका,
घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभ्या राहणार्या बायका,
रडारडीच्या सिरिअल्सवर थुंकणार्या बायका,
माहेरच्यांची फुका बढाई न मारणार्या बायका,
पुरुषांना पॅरलल पार्किंग शिकवणार्या बायका,
पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामं करणार्या बायका,
कुठे मिळतील अशा बायका?,
इतिहासातही तशा होत्याच
वर्तमानात संख्या वाढते आहे,
लिंगनिरपेक्ष समानतेसाठी या बायकांसाठी सर्वांनाच ट्रेनिंग सेंटरमध्ये भरती व्हावे लागेल कदाचित ;)
स्त्रिया हव्या आहेत
आजच्या जगात हव्या आहेत स्त्रिया
कणखर, विचारी आणि कर्तृत्ववान स्त्रिया,
शारीरिक पुरूषत्व असलेल्या माणसांचीही मनं समजून घेणार्या
आजच्या जगात समता पहाण्यास उत्सुक असणार्या स्त्रिया
कष्टाची कामं समोर दिसता
हातात यंत्र उचलणार्या स्त्रिया,
घराबाहेर पडून स्वतःची ओळख शोधणार्या स्त्रिया,
स्त्रीदाक्षिण्यावर थुंकणार्या स्त्रिया आणि
जातीची फुका बढाई न मारणार्या स्त्रिया,
मुलांनाही स्वयंपाक शिकवणार्या स्त्रिया,
जागोजाग पेटणार्या युद्धाचा विरोध करणार्या स्त्रिया,
कुठे मिळतील अशा स्त्रिया?
इतिहासातही थोड्या होत्याच
वर्तमानात संख्या वाढते आहे,
समानतेसाठी सर्वांनाच ट्रेनिंग सेंटरमध्ये भरती व्हावे लागेल कदाचित
तेच तर म्हणतोय
खल्लास ! __/\__
अरेरे!
आता का म्हणे उच्छृंखल बाजारू?
छोड यार
जॉन? नक्को बाई!
आप्पडिया
च्यायला ...
रीतभात
हो, पण रीतभात काय
हवेत तसे काही जुने, चिरंजीव फोटू
ही आमची लुंगी अन हिच्यावर आमचा फार जीव...
बासरी वाजवणारा
हा पण चाल्तोय का बघा!
अच्छा!
हंक म्हणजे काय?
हे ही पहा
- a handsome man with a well-developed physique.
- a large or fat person.
भाईकाकांचं 'खुर्च्या' ऐकल्यापासून इंग्लिश->मराठी शब्दकोष पहाणं मी सोडून दिलं.मूळ प्रश्न अनुत्तरीतच..
उत्तर
छे, छे
ना तेरी ना मेरी
वरच्या त्या जॉनच्या फोटोत काय
हात बाईचा कशावरून...
छ्या, जुन्या मालकांनी सोय
या पुरुषाने तर कानात रिंगा
हाहाहा!
सॉल्लिड करमणूक
अर्रर्र...श्रावणात काय हे
प्रतिसाद
आले
स्पष्टीकरण
पुरुषांचे अर्धनग्न फोटो ही
अरे वा, छान विडंबन!
ठाकरी कविता
कंसातला पुरुष
:)
सेक्सिस्ट
(स्त्री)
सर तुम्ही लिव्हाच.
प्र.का.टा.आ.
कोणीच तयार नाही?
छान आहे कविता.
पथ्य
टंका की
थोडा बदल करून लिहीलं आहे
अरे अरे अरे
ख त रा!! प्रियाली बाई ऐकत
दहाड ४४
ओह्हो
"या जॉनला कोणीतरी कोपर्यात