Skip to main content

...

लेखक प्रियाली यांनी शुक्रवार, 19/08/2011 01:34 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 31425
प्रतिक्रिया 150

प्रतिक्रिया

पुरषाची गरज स्त्रियांना फक्त एका गोष्टीसाठी लागते जी तुम्ही विसरलात या यादीत प्रियाली . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . पॅरलल पार्कींग!!!! ;)

In reply to by शुचि

अर्थात पॅरलल पार्किंग जमत नाही असे कारण दिल्याने (आवडत्या) पुरुषाने गाडीत घालून हिंडवून आणायची मजा घ्यायची असली तर कदाचित ठीक आहे. बाकी विडंबन आवडले!

In reply to by इंटरनेटस्नेही

कुणाचा निषेध ? कुणाचा अपमान ? नक्की कशाबद्दल निषेध ? थोडेसे स्पष्टीकरण दिल्यास बरं होईल. कळावे.

प्रियाली, कविता आवडली. अस्सल पाशवी अभिव्यक्ती! त्यातच ही माझी थोडी भर.
Get this widget | Track details | eSnips Social DNA

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कविता तर छानच आहे अन तुम्ही केलेले तुमच्या आवाजातील सादरीकरण मला व (माझ्या) बायकोला दोघांनाही आवडले.

रामा गड्यावर केलेली कविता आवडली. अशी गड्यावर केलेली कविता इतिहासात आढळणे विरळाच, त्यामुळे कवियत्रीच्या क्रांतिकारी विचारांचे कौतुक वाटते! :P

In reply to by Nile

तुझ्या घरी लेका ही कामं रामागडी करायचा तर मग आई काय करायची? बर्‍याचशा घरी ही कामे बायका करतात. कामवाल्या नाही, घरवाल्या. माझ्या घरीही ही कामे आम्ही दोघे करतो. असो. मूळ कवितेचा जीवच कमी असल्याने तेवढंच लिहावं लागलं. अन्यथा, पुरुष हवे आहेत, सलमानसारखे वारंवार, जिथेतिथे शर्ट काढून फेकणारे, जॉन अब्राहमसारखी पुढूनमागून शरीरयष्टी लाभलेले, चट्टेरीपट्टेरी चड्डीतही हँडसम दिसणारे, ठिगळांच्या बनियनमध्येही खुलून दिसणारे पुरुष हवे आहेत. अशी अनेक कडवी करता येतील.

In reply to by प्रियाली

मेले, वारले, खपले ... विनोदामुळे नव्हे, असे पुरूष स्वप्नात दिसल्यामुळे, हाय मर जावां!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वर नायल्याच्या उपप्रतिसादात एक डिस्क्लेमर द्यायचा राहिला. डिस्क्लेमर: वरील कडव्यामुळे आपली लक्तरे पब्लिकमध्ये धुतली गेली असे कोणाला वाटले आणि निषेध* वगैरे करायची उबळ आली तर मी काडीची किंमत देणार नाही. ;) * सल्लू आणि जॉनने असा निषेध केला तर गोष्ट वेगळी. ;)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इस बातपे जॉन अब्राहम का मेरा पसंदीदा गाना हो जाए ;) http://www.youtube.com/watch?v=7_eP1xKrbKM

In reply to by शुचि

हा जॉन? मला हा गरीबांचा जॉन, मार्क रॉबिन्सन आणि कोणी जीनी दिसते आहे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हो हाच जॉन. मला हा खूप आवडतो असं नाही पण मला ते गाणं खूप आवडतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मार्क रॉबिन्सन आहे तो, शुचि. अर्थात तोही वाईट नाही. जॉन अब्राहमला पुढूनमागून बघायचा असेल तर इथे बघा. मिपावर चढवले तर आहेतच इथले संस्कृती रक्षक अश्लील अश्लील ओरडायला. ;) खालून दुसरा (शेकन्ड लाश्ट) फोटो बघाच बघा!

In reply to by आनंदयात्री

मला का बॉ सॉरी ? बाकी हा कंपूने कंपूसाठी काढलेला धागा आहे असे निरिक्षण नोंदवतो. प्रियालीतै सारख्या 'शिणिअर' व्यक्तिने अशी कविता करावी व असे प्रतिसाद द्यावे ह्याचे दु:ख झाले. आज आम्ही बालगंधर्व चौकात एक उदबत्ती लावून ह्याचा निषेध करूच ! एकतर ती आधी मिपावर कोणाला दिसत नाही आणि दिसते तेंव्हा हे असले भलते सलते काहीतरी करत असते ;) ७_१२ सतत साडेसाती

In reply to by प्रियाली

संस्कृती रक्षकांची भीती नको म्हणून मी हा रूद्राक्षांची माळ असणाराच फोटो टाकते. संस्कृतीही नको बुडायला आणि जॉनही दिसेल. मला हा फोटोच जास्त आवडतो. शेवटून दुसर्‍या फोटोत अँगल थोडा चुकलेला आहे, नै प्रियाली?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मुलीची पोझ स्ट्रॅटेजिक आहे ;) फोटो आवडला हेवेसांनल.

In reply to by शुचि

पूर्ण विदा नसताना असले भलतेसलते निष्कर्ष काढणं योग्य नाही.

In reply to by राजेश घासकडवी

How much I wish I had पूर्ण विदा. त्या फोटोग्राफरला मेल्याला मधेच थांबायची अवदसा सुचली. पूर्ण पायापर्यंत घेतला असता तर .... पण नाही :( _________________ ऑन सिरीअस नोट - फोटो खूप सुरेख आहे. फोटोग्राफर ने बरोबर फ्रेम केलेला आहे. काहीही सुधारणा नको.

In reply to by शुचि

त्या फोटोग्राफरला मेल्याला मधेच थांबायची अवदसा सुचली. पूर्ण पायापर्यंत घेतला असता तर .... पण नाही.... :(
येथील (बर्‍यापैकी) ज्येष्ठ मिपाकर या नात्याने सतत कमरेखाली जाणे हे अयोग्य अन अश्लील आहे असे मत नोंदवतो.... बाकी, पायापर्यंत जाता जाता १८० अंशाच्या कोनात वळला असता तर अजुन छान वाटले असते.....

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असती अमुची बोटे इतकी सुंदर तर आम्हीही जॉन सोबत असा फोटु काढला असता. हं! शेवटून दुसरा फोटू अंमळ गंडला आहे खरा. ;)

In reply to by प्रियाली

असं नाही गं म्हणायचं: अशीच अमुची बोटे असती सुंदर, नीमुळती। आम्हीही फोटू काढला असता वदली प्रियाली (/अदिती)॥

In reply to by प्रियाली

पण दोष आमचा नाही हो. आम्ही वाढलो खेड्यात. नातवाला पाठीवर घेऊन शेणाने घर सारवणारी आजी आमची. तेव्हा कविता वाचून अशा सगळ्या आमच्या आज्या, मावश्या अन काकवांची खडतर आयुष्यंच आम्हाला आठवावी यात आमचा तो काय दोष? त्यामुळेच कवितेतील मागण्या पाहता त्यांना एखादा अशी सगळे कामं करणारा रामा गडी मिळाला असता तर कीती बरे झाले असते असा एक साधा अन सरळ विचार आमच्या भाबड्या मनात आला आणि आम्ही तो वेंधळेपणाने बोलून दाखवाला इतकेच. पण आमचा स्वभावच मेला गरीब त्याला आम्ही तरी काय करणार! अर्थात, तिथेच आमचे चुकले म्हणा. तुम्हा मॉडर्नं, हुशार अन चान चान स्त्रियांच्या फेमीनीस्ट मागण्यांची कल्पना नसताना प्रतिसाद दिला हे आमचं खरंच चुकलं. तर ते असो. पण चुकीचे परिमार्जन म्हणून, उघड्या-नागड्या "पुरुषांना पुढून मागून" बघायच्या का असेनात, तुमच्या इच्छा पुर्‍या होवोत अशाच शुभेच्छा! (सर्व पाशवी बायांनी हा प्रतिसाद हलके घेणे)

In reply to by Nile

या मधे दिलेल्या गोष्टी तुम्ही जर जाणिवपुर्वक करत नसाल तर अजुन आपण कर्मठ समाजातच वावरतो आहे.

In reply to by अभिजीत राजवाडे

जाऊद्या हो "राज"वाडे साहेब! तुम्हाला सामान्यांच्या परिस्थीतीची काय ती कल्पना असणार. ;-)

जबरदस्त विडंबन. ओरिजनल असतं तर मात्र पूढील निरीक्षण नॉंदवले असते
शारीरिक पुरुषत्व नसूनही मानसिक प्राबल्य जोपासणार्‍या बायकांच्या जगात त्यांना साथ देण्यास उत्सुक असणारे पुरुष
बि.डी.एस.एम म्हणा की.
घरात कचरा झाला असताना व्हॅक्युम क्लिनरने घर चकाचक करणारे पुरुष, किचनमध्ये आनंदाने भांडी घासून देणारे पुरुष,
थोडक्यात कॉम्प्योटर निरक्षर पूरूष, कारण निट आवरलेलं घर हे घरचा कॉम्प्योटर बिघडल्याचं लक्षंण आहे. म्हणजे तूम्हाला घरकामाला गडीच हवाय तरं.... बरं बरं. ठीकाय.
पुरुषी इगोवर थुंकणारे पुरुष
लिंगनिरपेक्ष समानता हाच या धाग्याचा मूळ धागा असल्याने तृतीयपंथीयांच्या उल्लेखाला अनूमोदन. बॉबी डार्लिंगशी संपर्क साधा.
घरच्या चुली फुंकणारे पुरुष
घरचि चूल कशीही असो, बाहेरच्या चूली कशा आहेत त्यावरच बहूतांश घरच्या चूलीचं भवितव्य अवलंबून असतं बघा...
अडचणीतही बायकोचाच सल्ला घेणारे पुरुष, घरासाठी मरमरून काम करणारे पुरुष
हे बघा सूसायडल टेंडन्सी असलेल्या व्यक्तींची मागणी करणे निरोगी मनाचे लक्षण न्हवे.
लिंगनिरपेक्ष समानतेसाठी या पुरुषांसाठी एखादं ट्रेनिंग सेंटर उघडावं लागेल कदाचित
लिंगनिरपेक्ष समानता अपेक्षित असताना केवळ पूरूषच हवेत अशी मागणि करणे, म्हणजे कम्यूनीजमच होय.

मी या कवितेतल्या विचारांशी १०० टक्के सहमत आहे. कवितेसाठी अभिनंदन. यात अपमानकारक काहीच वाटत नाही.

छान विडंबन, पण थोडं सात्विक झालेलं आहे. गर्ल कॉमरेडरीकडून जरा अधिक जहाल, जळजळीत, चमचमीत येईल अशी अपेक्षा होती. म्हणजे मालवणी चिकन ची अपेक्षा असताना चांगली पण घरगुती मटकीची उसळ मिळावी असं वाटलं.
पुरुष हवे आहेत, सलमानसारखे वारंवार, जिथेतिथे शर्ट काढून फेकणारे, जॉन अब्राहमसारखी पुढूनमागून शरीरयष्टी लाभलेले, चट्टेरीपट्टेरी चड्डीतही हँडसम दिसणारे, ठिगळांच्या बनियनमध्येही खुलून दिसणारे पुरुष हवे आहेत.
ही कविता पूर्ण करावी अशी विनंती करतो.

In reply to by राजेश घासकडवी

मालवणी चिकन ची अपेक्षा असताना चांगली पण घरगुती मटकीची उसळ मिळावी असं वाटलं.
आज गुरुवार आहे. बुधवार-शनिवार वेगळा माल मिळतो. तशी मी बनवलेली मटकीची उसळही चविष्ट असते. एकदा टाकेन पाककृती. ;) बाकीची कडवी लवकरच पूर्ण करेन.

टॉडाहँ नंतरच्या दोन ओळीत नापास झालेले, पण बाकी चाचण्यांत पास होणारे कोणी सापडल्यास यादी पाठवून द्या. चुली फुंकणे आजकाल ग्लॅमरस आहे, पण त्यानंतर ही भांडी घासण्याची कटकट नकोशी आहे.

हा हा हा! अरे देवा, काय दिवस आले आहेत! कुठे ते एके काळचे 'आजची खादाडी'सोबतच्या पुष्ट स्त्रिया आपल्या दमदार छातीवर लेवूनही त्यांच्या भाराने अजिबात न वाकणारे आमचे 'रीतीभातीचे' संकेतस्थळ अन कुठे हे आजकालचे उच्छृंखल बाजारू संकेतस्थळ. जगदंब जगदंब!!! - स्मरणरंजनाने चिंतातुर जंतू जाताजाता: याची आठवण झाली: मला एक पुरुष हवा आहे! या घराला एक आडदांड पुरुष हवा आहे बटणं सापडत नाहीत म्हणून आरडाओरडा करून घर डोक्‍यावर घेणारा, आमटीला फोडणी खमंग पडली म्हणून खुशालून जाणारा, केसांतून बोटे फिरली की, बाळ होऊन कुशीत घुसणारा दमदार पावलांनी तिन्ही सांजेचा केविलवाणा अंधार उधळून लावणारा पुरुष हवा आहे या घराला - एक आडदांड पुरुष हवा आहे नाही हे मी म्हणत नाही या भिंतीच म्हणून राहिल्यात केव्हापासून अनुराधा पोतदार (कॅक्‍टस फ्लॉवर या काव्यसंग्रहातून)

In reply to by चिंतातुर जंतू

आता का म्हणे उच्छृंखल बाजारू? "लुटा लुत्फ तिरामिसूचा, आजच्या हंक जॉनसोबत" असं काही लिहीलं की रीतभात येणार का?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

३ बायका आनंद उपभोगत आहेत हे बघवणार कसं? लगेच यांची संकेतस्थळं "बाजारू" होतात .... कपाळाला आठ्या चढतात. रीतभात बुडते. इतर धाग्यांवर धांगडधिंगा चालतो ते बरीक चालतं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"लुटा लुत्फ तिरामिसूचा, आजच्या हंक जॉनसोबत" असं काही लिहीलं की रीतभात येणार का?
तिरामिसू एकवेळ चालेल पण हंक जॉनऐवजी एखादा दाक्षिणात्य मिशाळ, केसाळ पुष्ट पुरुष लुंगीत दाखवलात तर 'जुनी' रीतभात पाळाल ;-)

In reply to by चिंतातुर जंतू

पुरुष हवा आहे, अध्येमध्ये लुंगी वर करून पोटाशी बांधणारा ;) फोटो येथून साभार.

In reply to by चिंतातुर जंतू

त्या मुच्छडांमधे तुम्हाला का हो एवढा रस? 'आमची आवड' काय आहे हे पण आता तुम्ही पुरूष आम्हाला सांगणार का? एटा चॉलबे ना।

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'आमची आवड' काय आहे हे पण आता तुम्ही पुरूष आम्हाला सांगणार का?
मग? शेवटी प्रश्न रीतीभातीचा आहे आणि त्यामुळे संकेतस्थळाच्या इज्जतीचा पण! स्थळज्येष्ठ सदस्यांनीच रीतभात सोडली तर मग आपली महान संस्कृती आपलं वस्त्रहरण होताना कुणाचा धावा करील?

In reply to by चिंतातुर जंतू

हो, पण रीतभात काय तुमच्यासारख्या संकेतस्थळकनिष्ठ सदस्यांनी आम्हाला सांगायचं होय? व्यक्तीला वस्तू बनवून त्यांचे फोटो टाकणे हीच इथली 'जुनी' रीतभात; जुन्या काळीही आम्ही हेच करत आलो आहोत. बाकी कसली संस्कृती आणि कसल्या वस्त्रहरणाच्या गोष्टी करता तुम्ही नवखे लोकं?

In reply to by Nile

बासरीवाला लुंगीतला पुरुष आणि त्याच्याभोवतालच्या मॉडर्न गौळणी बघून डोळे दिपले. भारी...

In reply to by चिंतातुर जंतू

हंक जॉनऐवजी एखादा दाक्षिणात्य मिशाळ, केसाळ पुष्ट पुरुष लुंगीत दाखवलात तर 'जुनी' रीतभात पाळाल
अच्छा! या आवडी माहिती नव्हत्या. ;)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हंक म्हणजे काय? असा प्रश्न मला पडला. इंग्रजी - मराठी शब्दकोशातले अर्थ पाहिले. ते खालीलप्रमाणे :- hunk (हंक) - (पाव, मांस इ. चा) जाड तुकडा hunker (हंकर) - उकिडवा बसणे, वाकणे hunkers (हंकर्स) - शरीराचा पार्श्वभाग, जघन hunks (हंक्स) - लहरी वृद्ध माणूस, कंजूष माणूस जॉनविषयी हंक हे विशेषण वापरताना नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

अर्बनडिक्शनरीच्या मताप्रमाणे: १. An attractive male, usually with nice chiseled abs and a very sexy tan. २. Extremely Hot Male Model. Usually Tanned, Built, Tall, And Poses In Underwear. अजूनही पाच अर्थ आहेत, ते लिंकवर वाचता येतीलच. ऑक्सफर्ड शब्दकोषानुसारः १. a large piece of something, especially food, cut or broken off a larger piece: २. informal a large, strong, sexually attractive man डिक्शनरी.कॉमच्या लिंकवर हे सापडलं. १. a large piece or lump; chunk. २. Slang .
  • a handsome man with a well-developed physique.
  • a large or fat person.
भाईकाकांचं 'खुर्च्या' ऐकल्यापासून इंग्लिश->मराठी शब्दकोष पहाणं मी सोडून दिलं.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

इतके सगळे अर्थ देऊन भाषाविषयक माझ्या सामान्य ज्ञानात भर टाकल्याबद्दल धन्यवाद. पण माझं कुतुहल कायम आहेच. जॉनविषयी हंक हे विशेषण वापरताना नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे?>>

In reply to by चेतन सुभाष गुगळे

जॉनविषयी हंक हे विशेषण वापरताना नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे?
अदितीला कोणता अर्थ अभिप्रेत आहे ते माहित नाही पण मला वरील सर्व अर्थ एकत्रित करून जितका व्यापक अर्थ निघेल तो चालेल.

In reply to by चेतन सुभाष गुगळे

छे, छे, हे भाषाविषयक ज्ञान नसून ही इंटरनेटच्या अधिक वापराविषयक माहिती आहे. हां, आणि हंकचा मला अभिप्रेत असणारा अर्थ तोच जो माणसाचं सर्वात जास्त वस्तूकरण करणारा, अश्लील आहे तो!