खालील कविता माझी नाहीं पण प्रत्येकाने वाचावी अशी आहे. मिपाच्या कायद्यात बसत नाहीं. म्हणून संपादकांना असे करणे रुचले नाहीं तर अवश्य उडवावी!
सुधीर काळे
सुनीला गोंधळेकर यांची ही अप्रतिम कविता प्रत्येकाने वाचायलाच हवी!
आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय?
यांना तुरुंगात घालायचं नाय, यांना बाहेर ठेवायचं नाय
यांना बोलू द्यायचं नाय, मग गप्प करायचं काय?
आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? II१II
जमली अवघड प्रश्नांची साय, खाली उकळत दुध हाय
तोंड भाजून घ्यायचं का काय, जीभ दातात अडकली हाय
आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? II2II
टी. व्ही. सारखाच वरडत हाय, कापडं अंगावर ठेवली न्हाय
माझा अडला ह्यो गाढव आता, हरीचे धरतोया पाय
आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? II३II
उपवास यांना करायचा हाय, पाणी आमच्या तोंडचं जाय
अन्न गोड लागना माय, घास घशात अडकून रहाय
आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? II4II
पब्लिक त्याच्याच माग माग जाय, त्याला अडवाव कसा नि काय ?
बाहेर जायला दारच न्हाय, पब्लिक हसून म्हणतंय बाय
आमचा फाटक्यात अडकला पाय , या अण्णांचं करायचं काय? II5II
-सुनीला गोंधळेकर
काव्यरस
वाचने
3101
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
(No subject)
रीडिफवरील लाइव्ह अपडेट 15:26
ह्या लाइव्ह अपडेट चा कवितेशी
In reply to रीडिफवरील लाइव्ह अपडेट 15:26 by नितिन थत्ते
संबंध असायलाच हवा का?
In reply to ह्या लाइव्ह अपडेट चा कवितेशी by मराठी_माणूस
श्रीयुत थत्ते, गांधी जाऊन ६३
In reply to संबंध असायलाच हवा का? by नितिन थत्ते
याची काय गरज होती.. उगीचच
In reply to रीडिफवरील लाइव्ह अपडेट 15:26 by नितिन थत्ते
समजून घ्या हो. त्यांचा पाय पण
In reply to याची काय गरज होती.. उगीचच by सौप्र
भ्रष्टाचार एक चूइंगम है अण्णा हजारे सिंघम है.
In reply to रीडिफवरील लाइव्ह अपडेट 15:26 by नितिन थत्ते
द्वेषाची कावीळ झाली की सगळं जग पिवळंच दिसत
In reply to रीडिफवरील लाइव्ह अपडेट 15:26 by नितिन थत्ते
"इक सवाल मैं करूँ, एक सवाल तुम करो हर सवालका सवालही जवाब हो!"
This cartoon says it better!
कधी कधी ब्रम्हानंदी टाळी
भ्रष्ट नेते, सुस्त सरकार
काय बी करू शकत नाय (मला सुचलाय काय बाय )