Skip to main content

सस्नेह निमंत्रण (ऋचा)

लेखक ऋचा यांनी सोमवार, 07/07/2008 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रति, समस्त मिसळपाव.कॉम कुटुंबीय, सप्रेम नमस्कार, येत्या जुलै महिन्याच्या १२ तारखेस तुमचा मैत्रिण "ऋचा" विवाहबध्द होत आहे. वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे,इथेच आमंत्रण देत आहे. कृपया हेच आग्रहाचे निमंत्रण समजुन ह्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून आम्हांस आपले शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती. आपलीच, ऋचा उपाख्य क्षितिजा विवाहस्थळ : कोहीनूर मंगल कार्यालय, एरंडवणा प्रभात रस्ता,गल्ली क्र. ८, गरवारे कॉलेज समोर पुणे-४ मुहुर्तः १२ जुलै-२००८ वेळः स. १० वा. १८ मि.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5937
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

:P अभिनंदन! आपले वैवाहिक जीवन सुखासमाधानाचे जाऊ दे हीच शुभेछा! निमंत्रणाबद्दल धन्यवाद.मलेशियात असल्यामुळे येऊ शकत नाही.क्षमस्व.

चि.सौ.का. क्षितिजा हीस आमचे अनेक शुभाशिर्वाद. ठाण्याला आलात कधी तर आमच्या घरी नक्की या!

ऋचा उपाख्य क्षितिजा, अनेकानेक शुभेच्छा ! सचीन जी!

आणि लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.! तुला तुझ्या वैवाहिक जीवनात भरपूर सुख आणि समृद्धी लाभो.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

तुला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.! तुला तुझ्या वैवाहिक जीवनात भरपूर सुख आणि समृद्धी लाभो! "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

नवनवीन क्षितिजे शोधत. हार्दिक शुभेच्छा, वैवाहित जीवन सुखी समृद्धी होवो!

चि. सौ. कां. ऋचा हिस, विवाहनिमित्त शुभेच्छा! होणार्‍या नवर्‍याचे नांव लिहिले नाहीस. (नांव घ्यायला आतापासुन लाजतेस?) संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा !!! वैवाहिक जीवनात भरपूर सुख आणि समृद्धी लाभो!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.!

तुमचे वैवाहीक जीवन सुखाचे आणि समाधानाचे होवो. पुण्याचे पेशवे