पौर्णिमेचा चंद्रमा..
नोकरी मिळाल्यानंतर सुखाने राहणारा पुरुष जगाला बघवत नाही हेच खरं. आता हेच बघा ना! मला नोकरी लागली आणि आई-बाबांचा धोशा सुरु झाला, 'विद्याधर! आता वेळ घालवू नकोस. मनावर घे. आम्हाला लवकर सून बघायची आहे. तू फक्त हो म्हण. बाकी स्थळे बघण्याचा उपद्व्याप आम्ही आनंदाने करु.'
मी हा हट्ट फारसा मनावर घेतला नाही. कारणे दोन. एक तर माझी भटकण्याची आवड आणि दुसरी माझी दिसेल त्या विषयावर वाद घालण्याची खोड. घरी वाद घालायला लागलो, की आई-बाबा कंटाळून म्हणायचे, 'ए बाबा! तू सारखा भटकत असतोस तेच परवडले. सॅक उचल आणि चालू लाग हवे तिथे.' मग पडत्या फळाची आज्ञा समजून मी घराबाहेर पडायचो. तर सांगायचा मुद्दा म्हणजे आई काळजीने म्हणायची, ' लग्न झाल्यावर याच्या बायकोचे कसं होणार, ही काळजी मला आतापासूनच लागून राहिली आहे. हा सारखा कुठल्याही विषयावरुन तिच्याशी वाद घालत बसणार. पळून जाईल बिचारी.' आता बहुतेक वेळ घराबाहेर रमणारा आणि घरात असताना वाद घालत बसलेला नवरा कुठल्या मुलीला चालेल? म्हणून मी लग्नाचा विषय टाळायचो किंवा फार चर्चा सुरु झाली, की ती बंद करण्याचा हमखास उपाय म्हणजे वाद घालत बसायचो.
अलंग-कुलंग-मलंग असे सगळे गड पालथे घालून झाल्यावर माझ्या मनाने अनवट पर्यटनस्थळे बघायचे वेड घेतले आणि असाच एकदा माझ्या चुलतमावशीच्या गावाला कुंडलपूरला गेलो. तर तीच कहाणी मी तुम्हाला सांगावी म्हणतो. मावशीने अगदी आग्रहाने कुंडलपूरला येण्याचे आमंत्रण दिले होते. जवळची कुंडला नदी आणि ऐतिहासिक मेरुगड या निसर्गरम्य परिसरात माझे मन रमेल, असे मावशीला वाटत होते. कुंडलपूर म्हणजे बर्यापैकी वसतीचे गाव. ना धड खेडे, ना धड शहर. पण मला पहिल्याच दिवशी आवडले. किती शांत परिसर आणि लोक पण शांत. जो तो आपल्या उद्योगात. निसर्गातील शांतता मला आवडते, पण लोक शांत असलेले मला बघवत नाहीत. माणसाने कसे थकेपर्यंत वाद घातले पाहिजेत. भांडणे हमरीतुमरीवर आली पाहिजेत. एकमेकांच्या जातीचा-धर्माचा-कुळाचा उद्धार झाला पाहिजे, हे माझे साधे-सरळ तत्त्वज्ञान.
आमची श्यामल मावशी कुंडलपूरच्या बाहेरच्या भागात म्हणजे एका शांत कॉलनीत राहायला होती. आजूबाजूला सगळे बैठे बंगले. प्रगाढ शांतता. दोन दिवसांनी मीच कंटाळलो. त्यावर मावशी म्हणाली, 'का रे विद्याधर? माझ्याकडे मन रमत नाही का तुझं?' त्यावर मी म्हणालो, ' अगं मला इथे वाद घालायला कुणी भेटत नाही. ही शांतता मला असह्य होते. तुझी ती कुंडला नदी आणि मेरुगड मी एकाच दिवसात बघून आलो. आता अजून दोन दिवस करु काय? त्यापेक्षा मी आजच जातो घरी परत.'
मावशीने क्षणभर माझ्याकडे रोखून बघितले आणि म्हणाली, 'अरे काळजी करु नकोस. चार बंगले पुढेच आमचे अण्णाशास्त्री पुराणिक राहतात. त्यांना अशीच जन्मभर वाद घालायची खोड.आहे. त्यांच्याकडे पुस्तकांचा खूप संग्रह आहे. जा त्यांच्याकडे.'
'कोण हे अण्णाशास्त्री? काय पंडित वगैरे आहेत का?' मी विचारले.
' हो. पंडितच आहेत आणि तुझ्यासारखेच विक्षिप्त पण. अतिशय वाचनप्रेमी माणूस. सरकारच्या ज्ञानकोश प्रकल्पात होते. बायको वारली अचानक. मग सगळे गुंडाळून इथे कुंडलपूरसारख्या शांत गावात आमच्या कॉलनीत बंगला बांधून राहिलेत. पुष्कळ उपद्व्याप करतात. याज्ञिकी करतात, भविष्य सांगतात, मुलांना शिकवतात. पण सगळ्यात आवडता छंद म्हणजे वाद घालणे. त्याला कंटाळून कुणी फार बोलत नाही त्यांच्याशी. गंमत म्हणजे त्यांची मुलगी पौर्णिमा मात्र वडिलांच्या अगदी विरुद्ध स्वभावाची बघ. अगदी शांत आणि मितभाषी. तू अण्णाशास्त्रींकडे जा. तुमच्या दोघांची वाद घालायची खुमखुमी पूर्ण होईल.'
मला काय तेच हवे होते. अण्णाशास्त्री ज्योतिषी काय! बघतोच बच्चंजी. माझा तर या कुडमुड्यांवर भलताच राग. खोटारडे कुठले? ज्योतिषाला शास्त्र म्हणतात लेकाचे आणि लोकांना फसवतात. मग एका रम्य दुपारी मी अण्णाशास्त्रींकडे गेलो. ते काहीतरी वाचत होते. मी माझी ओळख करुन दिली. काही प्राथमिक गप्पा झाल्यावर मी थेट विषयाला हात घातला, 'ज्योतिष हे शास्त्र नसताना तुम्ही लोकांची फसवणूक का करता?' त्यावर अण्णाशास्त्री म्हणाले, ' कशावरुन तुम्ही असे म्हणता?' मी म्हटलो, 'आता हेच बघा ना. तुमचे राहू आणि केतू हे ग्रह म्हणजे खरं तर क्रांतिवृत्तावरचे दोन काल्पनिक छेदनबिंदू असताना तुम्ही त्याला छायाग्रह मानता आणि लोकांची भविष्येही वर्तवता. याला काय शास्त्र म्हणायचे?' त्यावर अण्णाशास्त्री उसळून म्हणाले, ' असले प्रश्न विचारणारे बरेच बघितलेत मी. मला सांगा तुमचा साध्या पंचांगाचा तरी अभ्यास आहे का?' तिथी-वार-नक्षत्र-राशी-नाडी-योग-करण हे सगळे ठाऊक आहे का तुम्हाला?'
त्यावर मग मी पेटलोच. आमचा घमासान वाद झाला. बाहेरुन बघणार्याला वाटले असते, की या घरात तुंबळ युद्धच चालू आहे. आमचे भांडण रंगात आले असताना अचानक बेल वाजली. अण्णाशास्त्रींनी दार उघडले आणि त्यांची मुलगी पौर्णिमा आत आली. तिला बघताच माझा श्वासच अडकला. काय झालं ते कळलंच नाही. मी एकदम स्तब्ध झालो. पौर्णिमेने एकंदर रागरंग पाहिला आणि चहा करायला किचनकडे वळली. ती जाताच अण्णाशास्त्री माझ्याकडे बघून म्हणाले, ' तर कुठपर्यंत आलो होतो आपण? हं तर अमावस्येचे तीन महत्त्वाचे प्रकार. दर्श, सिनिवाली आणि कुहू. तसे पौर्णिमेचे प्रकार नाहीत. वर्षातल्या सगळ्या पौर्णिमा महत्त्वाच्या. त्यातल्या काही चांगल्या तर काही वाईट. त्यांचे महत्त्व ग्रहांच्या अंशात्मक योगांवर ठरते.'
'मला तर पौर्णिमा कधीच वाईट दिसत नाही.' मी म्हटलो, 'खरं सांगू का? चंद्रमा मनसो जातः म्हणजे चंद्र हा मनाचा कारक असतो. म्हणूनच पौणिमा जवळ आली, की मनातल्या भावना उचंबळून येतात.'
हे वाक्य म्हणायला आणि पौर्णिमा चहाचे कप घेऊन यायला एकच गाठ पडली. माझे शब्द ऐकताच तिने क्षणभर माझ्याकडे पाहिले आणि कप समोर ठेऊन गोरीमोरी होत ती अंतर्धान पावली.
संध्याकाळी मी मावशीला विचारले, 'मावशी! अण्णाशास्त्रींची मुलगी काय करते गं? लग्न नाही का झाले तिचे?' त्यावर मावशी म्हणाली, ' का रे? आवडली काय तुला? अरे पण तिचे जमणे कठीण आहे. तिच्या पत्रिकेत कडक मंगळ आहे म्हणे. स्वतः अण्णाशास्त्रींनीच मला सांगितले. मी एकदा पौर्णिमेच्या लग्नाबद्दल विचारले होते त्यांना, पण या कारणावरुन ते बघत नाहीयेत तिचे. पण मुलगी एकदम लाखमोलाची आहे हो. घरकामात एकदम प्रवीण. जाईल ते घर उजळवून सोडेल. बिच्चारीचे या पत्रिकेतल्या मंगळाने जमत नाही.'
दुसर्या दिवशी मी घरी परत जायला निघालो. पोचवायला आलेल्या मावशीला एवढंच म्हणालो, 'मावशी! पौर्णिमा मला आवडली. अण्णाशास्त्रींना सांग तिच्या पत्रिकेतील कडक मंगळ मीच आहे. जामातो दशमो ग्रहः आणि तोच जास्त प्रबळ.' विचारुन कळव.
आठ-दहा दिवसांत मावशीचे घरी पत्र आले. पुढं काय झालं हे ओळखायला तुम्ही लोक चाणाक्ष आहातच.
तर सांगायचा मुद्दा हाच, की
'पौर्णिमेचा चंद्रमा, चकोरा जीवन'
याद्या
6440
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
कथेच्या निमित्ताने ही
सहमत आहे.
In reply to कथेच्या निमित्ताने ही by ईश आपटे
सहमत तर मीही आहे हो.....
In reply to सहमत आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा हा. मस्त रे प्रभु. मग
हाहाहा मस्त!!!अहो पण
आपला तर पौर्णिमाच काय
ज्या चंद्रामुळे हे आकाशनाट्य
In reply to आपला तर पौर्णिमाच काय by डॉ.श्रीराम दिवटे
आवडेश
वा वा!
कथा आवडली
बघा, शेवटी पौर्णीमेने केलाच
हेच
In reply to बघा, शेवटी पौर्णीमेने केलाच by बिपिन कार्यकर्ते
+२
In reply to बघा, शेवटी पौर्णीमेने केलाच by बिपिन कार्यकर्ते
मस्त कथा!
पौर्णिमेचा चंद्रमा, चकोरा जीवन'
>एकदम मस्त कथा आवडली,
फस्क्लास!!!! असा हसलोय शेवट
एकुण तुमच्या मावशीन ज्या
मस्त गोष्ट! मला 'अभिमान'
हा हा हा! कथा आवडली.
वाह वाह! अभिनंदन!!
प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार...
छान आहे
हम्म
+१
In reply to हम्म by रमताराम
ही सत्यकथा असू शकेल, आत्मकथा मात्र नाही...
In reply to हम्म by रमताराम
छ्या:
In reply to ही सत्यकथा असू शकेल, आत्मकथा मात्र नाही... by योगप्रभू
एकुलती एक मुलगी
In reply to छ्या: by रमताराम
हॅ हॅ हॅ
In reply to एकुलती एक मुलगी by ३_१४ विक्षिप्त अदिती
अपेक्षाभंगच हो
In reply to छ्या: by रमताराम
हा हा हा.
In reply to ही सत्यकथा असू शकेल, आत्मकथा मात्र नाही... by योगप्रभू
योगप्रभू शब्दच एकेरी आहे..
In reply to हा हा हा. by Nile
छान..
+१
मस्त कथा!
मला वाटलं ईश आपटेंनी गंभीरपणे घेतलं...
In reply to मस्त कथा! by पैसा
प्रभूदेवा
वा वा!! प्रभुआजोबांच्या