Skip to main content

मुलगी का नको?

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 16/08/2011 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
धनाजीरावांच्या "मुलगी वाचवा" या धाग्याला फारसे प्रतिसाद नाहीत हे बघून मी मूळ मुद्द्यावर चर्चा व्हावी म्हणून हा धागा टाकला. मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि मला त्याचे अजिबात दू:ख नाही. उलट कधी कधी (काही लोक आत्तापासून तिचा भावी सून म्हणून विचार करतात तेव्हा) मनोमन सुखावायलाच होते.पण समाजाचा मुलीबद्दल असलेला दृष्टीकोन लक्षात घेताना काही गोष्टी लक्षात येतात. ० मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्‍या खर्चाचा मुलगी वाढविणार्‍या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही. जो मुलाच्या बाबतीत थोडाफार मिळु शकतो. ० मुलगी नवर्‍याचा वंश वाढवते - एकुलती एक मुलगी असेल तर प्रॉपर्टी परक्या घरी घेऊन जाते, हा दृष्टीकोन लोकांच्या दू:खाची नेमकी कारणे हीच आहेत. एकुलती एक मुले वाढवणे जसजसे अनिवार्य होणार तसे सध्याची समाजाची मानसिकता या समस्या जास्त गंभीर बनवणार. या दोनही समस्यांची "समाधानकारक" उत्तरे समाजाला मिळत नाहीत तो पर्यंत मुलींबद्दल समाजात आकस राहणार. टीप : ही जाहीरात नाही!

वाचने 50743
प्रतिक्रिया 171

प्रतिक्रिया

>>एकुलती एक मुलगी असेल तर प्रॉपर्टी परक्या घरी घेऊन जाते, हा दृष्टीकोन हे काही मान्य नाही बुवा.. मृत्यूपत्र करून तसं न होण्याची सोय करताच येते की..

In reply to by अर्धवट

सध्याच्या काळात, बरोबरीचा वाटा वगैरे प्रकरण सुरु झाल्यापासुन, मुलगी प्रॉपर्टी घेउन जाणार ही धास्ती लोकांना अस्तेच!

In reply to by स्वैर परी

आणि हा वाटा मुलीने नेऊ नये म्हणुन त‍‌-हेत-हेचे प्रयत्न केले जातात. मला तर असं कळलं आहे की कमाल जमीन धारणा कायद्या खाली सरकारने जी जमीन हडप केली ती त्यात्या कुटुंबातील मुलींच्या वाटणीची होती (ही ऐकिव माहिती आहे. शहानिशा केलेली नाही.). मागे न्या नरेंन्द्र चपळ्गावकरानी एका सकाळ मध्ये लेखात सतीची चाल ज्या प्रदेशात स्त्रीयाना संपत्तीत वाटा दिला गेला होता, त्या ठिकाणी जास्त प्रकर्षाने पाळली जात असल्याचे निरीक्षण नोंदविले होते. त्याची या निमित्ताने आठवण झाली.

In reply to by युयुत्सु

सतीची चाल ज्या प्रदेशात स्त्रीयाना संपत्तीत वाटा दिला गेला होता, त्या ठिकाणी जास्त प्रकर्षाने पाळली जात असल्याचे निरीक्षण नोंदविले होते. सतीची चाल प्रामुख्याने बंगाल आणि राजस्थानात होती. पैकी बंगालबाबत वरील वाक्य खरे आहे (दायभाग पद्धत). परंतु, राजस्थानबाबतमात्र हे वाक्य खरे नाही (मिताक्षर पद्धत).

वडिलोपार्जित इस्टेटिचे मृत्युपत्र करता येत नाही . स्वकष्टार्जित मालमत्तेचे आणि आपल्या वाट्याचेच मृत्युपत्र करता येते.

In reply to by युयुत्सु

>>वडिलोपार्जित इस्टेटिचे मृत्युपत्र करता येत नाही . स्वकष्टार्जित मालमत्तेचे आणि आपल्या वाट्याचेच मृत्युपत्र करता येते. मग चांगलंच आहे की.. स्वतः कमावलेली मालमत्ता मुलगी परक्या घरी नेत असेल नसेल तर बोलायचा हक्क राहतो.. वडिलोपार्जीत मालमत्तेवर कसा काय येइल..

मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्‍या खर्चाचा मुलगी वाढविणार्‍या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही. जो मुलाच्या बाबतीत थोडाफार मिळु शकतो. स्वतःच्या अपत्याच्या बाबतीतला असला विचार हा अगदी हीन दर्जाचा आहे. मुलगी म्हणजे काय पैसा आहे का, परतावा आणि फायदा मिळायला ?

धनाजीरावांच्या "मुलगी वाचवा" या धाग्याला फारसे प्रतिसाद नाहीत हे बघून मी मूळ मुद्द्यावर चर्चा व्हावी म्हणून हा धागा टाकला.
हे तिथेच लिहिले असतेत तरी तो धागा वर आलाच असता की :) का आता तुम्हीपण 'दिसमाजी काहीतरी लिहावे(च)' क्लबचे 'डायरीया' झालेले मेंबर होत आहात ?

प्रॉपर्टी घेऊन जाणार यापेक्षाही आपले अपत्य वीसेक वर्षांनी आपल्याला सोडून जाणार आणि आपल्याला म्हातारपणी तितकासा "आधार" देऊ शकणार नाही. त्याइतकेच किंवा जास्त महत्वाचे म्हणजे वंश हा आडनावाने चालतो अशी समजूत. मुलगी दुसर्‍या घरी जाते आणि आडनाव बदलते. त्यामुळे तुमची (तथाकथित) वंशपरंपरा खंडित होते. तस्मात जराशा वरच्या शैक्षणिक / आर्थिक वर्गात पैशापेक्षाही हे वरचे मुद्दे जास्त म्याटर करतात असे वाटते. त्यामुळे या वर्गात "मुलगी नको" पेक्षा "किमान एकतरी मुलगा असावा" अशी वृत्ती असते. खूपच हलाखीच्या आर्थिक परिस्थितीवाल्या वर्गात मात्र मुलगी नकोच असा अ‍ॅटिट्यूड असू शकतो कारण तिथे कमावणे / पैसा याला अत्यंत महत्व असते. त्यांना "मुलांना पैशांसाठी वाढवतात. काय ही लोभी वृत्ती.." असं म्हणणं बरोबर नाही कारण त्यांच्या वंशाला गेल्याशिवाय आपल्यासारख्या सुखवस्तूंना ते कळणार नाही. या सर्वाला उपाय म्हणजे मुलगी सासरी जाणे म्हणजे काहीतरी "गमावणे" अशी भावना नष्ट होण्यासाठी काही सिस्टीम बदल. अर्थात मुलीचे आडनाव पुढे चालावे. मुलाने आईवडिलांचे दोघांचे नाव / आडनाव लावावे वगैरे असे उपाय पुन्हा दुसर्‍या दिशेने नवे प्रश्न उभे करतीलच. (उदा. किती आडनावांची आगगाडी लावायची? मुलगा लग्नानंतर बायकोचे आडनाव लावतो म्हटल्यावर नवर्‍याच्या साईडचा वंश बुडाला. इ इ. त्यापेक्षा लग्न केल्यावर मूळ नावे आणि इस्टेटी तशाच जपाव्या हे बरं..)

In reply to by गवि

मुलगी नको असते कारण
  1. आपल्या देशात मुलगा हा सोशल सिक्युरीटी मानला जातो.
  2. मुलगी झाल्याने वंश पुढे चालत नाही ही भावना.
असो. तशी आता आईचे आडनाव लावतात काही मुलं. विशेषतः आई प्रसिद्ध घरातली असेल तर ते मुलांना बरेच पडते. उदा. आमीरचा भाचा इम्रान खान.

In reply to by गवि

"प्रॉपर्टी घेऊन जाणार यापेक्षाही आपले अपत्य वीसेक वर्षांनी आपल्याला सोडून जाणार आणि आपल्याला म्हातारपणी तितकासा "आधार" देऊ शकणार नाही." अगदी बरोबर, मुलीच्या आइवडीलांनी तिच्या घरी वृद्धापकाळी हक्कने येवुन राहणे समाजमान्य व रुढीमान्य होवोस्तर हा प्रश्न सुटणार नाही.

In reply to by शैलेन्द्र

मुलीच्या आइवडीलांनी तिच्या घरी वृद्धापकाळी हक्कने येवुन राहणे समाजमान्य व रुढीमान्य होवोस्तर हा प्रश्न सुटणार नाही.
म्हातार्‍या माणसांना आपलं राहतं घर सोडून, गाव सोडून, आजूबाजूचे शेजारी पाजारी सोडून परक्या ठीकाणी राहायला जाणं कठीण होतं असा अनुभव आहे. विशेषतः ते परावलंबी असतील तर अजूनच. अगदीच नाईलाज असेल तर माणूस नाराजीने मान्य करतो पण तो वेगळा मुद्दा. तेव्हा वरचा पर्याय मान्य करणे कठीण आहे. मुलीच्या आईवडिलांनी हक्काने मुलीकडे येऊन राहण्यापेक्षा जावयानेच लग्न झाल्यावर मुलीकडे राहायला जाणे योग्य होईल. अर्थात, या गोष्टीला किती तरुण तयार आहेत? ;)

In reply to by प्रियाली

हजारो वर्षांपूर्वी पुरुषांची घटती संख्या आणि शेतीला कमी पडणारे मनुष्यबळ याने चिंतीत होऊन मुलीनेच नवर्‍याच्या घरी राहायला जाणे योग्य होईल असा निर्णय घेतला गेला असण्याची काही शक्यता असेल का असा विचार मनाला चाटून गेला. पूर्वी बर्‍याच प्रदेशांत मातृसत्ताक पद्धत होती असं ऐकल्यासारखं वाटतंय. (देवकीची सात मुले मारली पण आठवी मुलगी मात्र मेली नाही ही गोष्ट आठवली उगाचच)

In reply to by नगरीनिरंजन

देवकीची सात मुले मारली पण आठवी मुलगी मात्र मेली नाही
देवकीची आठवी मुलगी?????? पण ती तर डीकॉय म्हणून ठेवण्यासाठी उचलून आणली होती ना, कोणाकडून तरी? (चूभूद्याघ्या.) अतिअवांतर: याला आपल्या संस्कृतीतील स्त्रीभ्रूणहत्ये(च्या प्रयत्ना)चे आद्य उदाहरण मानता येईल काय?

In reply to by पंगा

>>पण ती तर डीकॉय म्हणून ठेवण्यासाठी उचलून आणली होती ना, कोणाकडून तरी? बरोबर. पण ते मारणार्‍यांना माहित होते का? शिवाय ती उडून आकाशात गेली आणि आकाशवाणी झाली असं खरोखर झालं असेल? असो. मला त्यावरून काही सुचवायचे नाही.

In reply to by प्रियाली

अहो, यशोदेचा कृष्ण नाही का? तशीच देवकीची आठवी मुलगी. (यात गोंधळण्यासारखे काय आहे ते न कळल्याने गोंधळलेला)

In reply to by नगरीनिरंजन

यशोदेने कृष्णाचा सांभाळ केला त्याला आईचे प्रेम दिले म्हणून यशोदेचा कृष्ण. देवकीचे तसे काही नाही. उगीच नसलेले संबंध आणि मातृत्व तिच्यावर का लादा?

In reply to by प्रियाली

मी कुठे असं म्हटलंय की तिने सांभाळ केला. त्या प्रसंगापुरती तरी ती तिची मुलगी होती एवढंच मला म्हणायचं होतं. :)

In reply to by नगरीनिरंजन

तुमचे मूळ विधान त्या प्रसंगापुरते वगैरे नाही पण तरीही त्या प्रसंगात कंसाचा गैरसमज झाला की ते देवकीचे मूल आहे. आपण असले गैरसमज कशाला करून घ्या! पण असो. :)

In reply to by प्राजु

पण मुळात यशोदेने/नंदाने तरी आपली मुलगी दिलीच कशी? दुसर्‍याच्या मुलाच्या बदल्यात? मरायला? म्हणजे त्यांनाही मुलगी नकोशी होती काय? म्हणजे 'मुलगी का नको' हा प्रश्न तेव्हापासून लागू आहे तर.

In reply to by पंगा

नाही नाही. क्रिष्णाला ;) गोकुळात सोडून येताना तिथली मुलगी एक्स्चेंज म्हणून (उचलून) आणली. ती मेल्या कौंसाने मारायला घेतली तर हातातून सुटून आकाशात गेली, मग पुढे आकाशवाणी वगैरे....

In reply to by पंगा

>>म्हणजे त्यांनाही मुलगी नकोशी होती काय? किंवा मुलग्याला मारू नये म्हणून मुलीला तिथे ठेवले असेल. त्या काळी मुलीला मारत नसावेत कदाचित. असो. नेहमीप्रमाणे जे सुचवायचंय ते सोडून भलत्याच गोष्टीवर पांडित्यपूर्ण कीस काढणे चालू झालेले पाहून आश्चर्य वाटले नाही. चालू द्या.

In reply to by नगरीनिरंजन

असो. नेहमीप्रमाणे जे सुचवायचंय ते सोडून भलत्याच गोष्टीवर पांडित्यपूर्ण कीस काढणे चालू झालेले पाहून आश्चर्य वाटले नाही. चालू द्या.
अगदी अगदी! आणि हो, बादवे, माझेही तुमच्यावर खूप्खूऽऽऽऽऽऽप प्रेम आहे... अग्दी आभाळाएवढे! उम्मऽऽऽऽऽऽऽऽऽम्मा!

In reply to by पंगा

आणि हो, बादवे, माझेही तुमच्यावर खूप्खूऽऽऽऽऽऽप प्रेम आहे... अग्दी आभाळाएवढे! उम्मऽऽऽऽऽऽऽऽऽम्मा!
पंगाशेठ हा कुठला मोड आता ? बेक्कार हसायला आले वाचून.

In reply to by परिकथेतील राजकुमार

धन्यवाद. याला 'आय लव यू टू!', मोड म्हणतात. (मराठीत: 'जगाला प्रेम अर्पावे'.)

In reply to by नगरीनिरंजन

त्यावरुन कंसाने तरी कशाला देवकी आणि वसुदेवाला एकत्र एका कोठडीत ठेवायच? अस एक जोक ऐकल्याचं आठवत... :)

In reply to by वाटाड्या...

कंसाने तरी कशाला देवकी आणि वसुदेवाला एकत्र एका कोठडीत ठेवायच?
नाहीतर कहानीमें ट्विस्ट येऊन महाभारत कसे झाले असते. कित्ती कित्ती एपिसोड्स वाढले कंसाच्या एका निर्णयाने. ;)

In reply to by प्रियाली

छ्या... तुमी काय तरी गल्लत करताय प्रियालीताय... म्हाबारत पांडवांचा व्हता... किश्नाचा नाय काय... किश्ना सप्पोर्टींग रोलमदी व्हता बा...

In reply to by धन्या

त्या किस्नाने त्या गीतेपायी किती एपिसोड वाढवले. आपल्या शिरियलची हीच कमाल असते, सपोर्टींग रोलमधली क्याराक्टरं पण जाम फूटेज खाऊन जातात आणि टिआरपी वाढवतात. ;)

In reply to by प्रियाली

"म्हातार्‍या माणसांना आपलं राहतं घर सोडून, गाव सोडून, आजूबाजूचे शेजारी पाजारी सोडून परक्या ठीकाणी राहायला जाणं कठीण होतं असा अनुभव आहे." वृद्धाश्रमात राहण्यापेक्षा आपल्या माणसात राहणे कुणीही पसंत करेल.. बाकी इतर काँम्प्लीकेशन करण्यापेक्षा, जर एकुलती एक मुलगी असेल तर तिने आपल्या आई-वडिलांना स्वतःच्या घरी आणनेच श्रेयस्कर ठरते. फक्त त्याकडे मुलीच्या सासरच्यांनी व समाजाने काही वेगळी गोष्ट म्हनुन पहायला नको..

In reply to by शैलेन्द्र

म्हातार्‍यांची उचलबांगडी कशीही होवो आम्ही घरजावई* होणार नाही मुलीकडे राहायला जाणार नाही असे का? ;) * हा शब्द मला पसंत नाही.

In reply to by शैलेन्द्र

आतापर्यंत सरसकट मुलींच्या आईबापांवर अन्याय चालला होता हे मान्य आहे का? ;) मुलाच्या आईवडिलांनी जावं की सुनेकडे राहायला मुलासोबत.

In reply to by प्रियाली

हेहे.. साधा उपाय म्हणजे, आई बाबांनी आपापल्या मुलांकडे रहायला जाव.. मुलगा मुलगी न बघता.. आणी त्यासाठी प्रत्येक कुटुंबाने स्वता:चे वेगळे घर करावे..

In reply to by प्रियाली

अगदी बरोबर! 'आत्तापर्यंत' हे ठीक आहे. पण कधीपासून ते सांगता येईल काय? त्यापूर्वी परिस्थिती उलट नव्हतीच आणि मुलगे मुलींकडे जात नव्हते हे सिद्ध झाले आहे काय? पूर्वी बर्‍याच प्रदेशांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती असं ऐकलंय ते खोटं आहे का? असो. मुद्दा एवढाच आहे की हे ही एक चक्रच असू शकते. यात मुलीच्या किंवा मुलाच्या भ्रूणहत्येचे समर्थन करण्याचा हेतू नाही. आता चाललंय त्याच्या उलट निर्णय घेऊन चक्र उलट फिरण्याशिवाय काहीही होणार नाही. आज मुलांना म्हत्व आहे म्हणून स्त्रीभ्रूणहत्या होतात, उद्या मुलींना महत्व आले तर पुरुषभ्रूणहत्या होतील. म्हणून व्यवस्थेत वेगळा काहीतरी बदल हवा असे वाटते.

In reply to by नगरीनिरंजन

पण कधीपासून ते सांगता येईल काय? त्यापूर्वी परिस्थिती उलट नव्हतीच आणि मुलगे मुलींकडे जात नव्हते हे सिद्ध झाले आहे काय? पूर्वी बर्‍याच प्रदेशांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती असं ऐकलंय ते खोटं आहे का?
मी तरी भारतात परिस्थिती उलट असल्याबद्दल ऐकलेले नाही. तसे काही जमातींमध्ये मातृसत्ताक पद्धती असल्याचे ऐकले आहे पण सरसकट तशी परिस्थिती असल्याचे ऐकलेले नाही. तुम्ही ठामपणे म्हणताय तर त्या बर्‍याच प्रदेशांची माहिती द्या बघू.
मुद्दा एवढाच आहे की हे ही एक चक्रच असू शकते. यात मुलीच्या किंवा मुलाच्या भ्रूणहत्येचे समर्थन करण्याचा हेतू नाही. आता चाललंय त्याच्या उलट निर्णय घेऊन चक्र उलट फिरण्याशिवाय काहीही होणार नाही. आज मुलांना म्हत्व आहे म्हणून स्त्रीभ्रूणहत्या होतात, उद्या मुलींना महत्व आले तर पुरुषभ्रूणहत्या होतील. म्हणून व्यवस्थेत वेगळा काहीतरी बदल हवा असे वाटते.
म्हणजे काय? चक्रात घालून फिरवल्याप्रमाणे शब्द वाटले. अर्थ काहीच कळला नाही. ;)

In reply to by प्रियाली

माझा नृवंशशास्त्राचा अभ्यास नसल्याने आत्ता माहिती देऊ शकत नाही. मिळवून देईन. उर्वरित भाग कळला नाही त्याला मी काही करु शकत नाही. कसला बदल? : पैशाचं अतोनात महत्व कमी करु शकत नसल्यास विवाहाचं अतोनात महत्व कमी करणे, विवाहाशिवायच्या शरीरसंबंधांना व संततीला हीनत्व न देणे आणि योनिशुचितेच्या कल्पना बाद करणे असे काही बदल करता येतील.

In reply to by नगरीनिरंजन

विवाहाशिवायच्या शरीरसंबंधांना व संततीला हीनत्व न देणे आणि योनिशुचितेच्या कल्पना बाद करणे असे काही बदल करता येतील.
तुम्ही तर अगदी संस्कृतीच्या मुळावरच घाव घालायला उठलात राव ;)

In reply to by नगरीनिरंजन

संस्कृतीवर कुणी घाला घातला तर त्यांच्या घरांवर दगड मारायचीही संस्कृती आहे... जपून राहा ;)

In reply to by नगरीनिरंजन

विवाहाशिवायच्या शरीरसंबंधांना व संततीला हीनत्व न देणे आणि योनिशुचितेच्या कल्पना बाद करणे असे काही बदल करता येतील.
अभिनंदन वांझोट्या चर्चेपेक्षा एकदम मूळमूद्याला हात घातल्या बद्दल खरोखर अभिनंदन. पण लगेच केवळ एखादा असा विचार अभ्यासासाठी मांडणेही त्यावर मूक्त चर्चा/मंथन न करता तडक संस्कृती वोरोधी ठरवले जाइल असं वाटलच होतं. पण हे संस्कृती विरोधी ठरवणार्‍यांना एकच प्रश्न ? स्त्रियांना पूरूषांसमान मानणे हे तूमच्या संस्कृती विरोधी नाही काय ? पूरूषांनी कसेही बदफैली जगावे आणी स्त्रीने मात्र लग्न करूनच मग माता बनावे.. वा वा वा, छान उध्दार होणार अशा संस्कृती रक्षकांकडून स्त्रियांचा :(. एकदम समान.

In reply to by आत्मशून्य

समांतर अवांतर- समानतेच्या गफ्फात व्यसनी बाई चालेल का? जी कारणे पुरुष सर्रास दारु प्यायला देतात ती बायकोने दिली गेली व समाजाने स्वीकारली तर ती समानता म्हणायची का संस्कृती बुडाली म्हणून गळा काढायचा? दुवा फु बै फु

In reply to by सहज

काकूला मिशा असत्या तर तिला काका म्हटले असते म्हणण्यासारखे झाले. असो, थोडा गोंधळ आहे आपल्या विधानात, तूम्ही संस्कृती बुडाली म्हणून गळा नक्कि केव्हां काढणार ? १) स्त्रि ने दारू पीली म्हणून ? की २) तीने गफ्फा मारताना पूरूषांची कारणे ढापली म्हणून ? का ३) ह्या गोश्टी समाजाने स्विकारल्या म्हणून ? बाकी प्रश्न क्लिअर झाला की संस्कृती रक्षक याचे उत्तर तूम्हाला नक्कि देतील ही अपेक्षा आहे..

In reply to by नगरीनिरंजन

संस्कृतीला मूळव्याध झाला तर घाव घालावेच लागतील.
संस्कृतीला मूळव्याध झाला आहे हे तुमचे वैयक्तिक मत आहे परंतु तसे मानून बघायला गेले तर जगातील प्रत्येक संस्कृती मूळव्याधीग्रस्त आहे असेच म्हणावे लागेल. ज्या देशांत योनिशुचिता, कुमारीमाता वगैरे प्रश्नांना प्रश्न मानले जात नाहीत त्यांच्याकडे वेगळ्या अडचणी आहेत. कोणतीही संस्कृती घाव घालून दोन तुकडे केल्याने सुधरत नसते तेव्हा संस्कृतीत बदल हवे असतील तर ते टप्प्या टप्प्याने, पायरी-पायरीने यायला हवेत असे वाटते. त्यातील पहिली पायरी, मुलांनी लग्न झाल्यावर शक्य असल्यास मुलीकडे राहायला जावं. (या विचाराने अनेक मिपाकर पुरुष का बरे गठळले ते कळले नाही. ;) )

In reply to by प्रियाली

अडचणी या असो की वेगळ्या, जोपर्यंत योग्य ते बदल घडवण्याचे प्रयत्न होतात तो पर्यंत आशा असतेच. मुलीच्या घरी मुलाने जाऊन राहिल्याने हळूहळू मुलींचे महत्व वाढत जाईल हे खरेच, पण मग हळूहळू मुलींचे महत्व आजच्या मुलांएवढे होऊन फक्त अदलाबदल होऊन हा प्रश्न उलटा होऊन पुन्हा उद्भवणार नाही असे ठामपणे म्हणता येईल का? बायकोच्या घरी जाऊन राहायचे या कल्पनेने मिपाकर पुरुष गळाठले कारण स्वतःच्या घरात बायको इतका अधिकार आणि नियम गाजवते तर तिच्या घरी गेलो तर काय होईल याची कल्पना करून पाहिली असेल बहुतेकांनी. यावर एक छान कल्पनारंजक गोष्ट होईल खरी. जसा सालस गरीब बायकांना दुष्ट सासरच्यांचा त्रास असतो, माहेरी जाऊ दिले जात नाही, माहेरच्या कोणाला येऊ दिले जात नाही तसं सालस जावयांच्या बाबतीत व्हायला किती वर्षे लागतील असा अंदाज आहे?

In reply to by नगरीनिरंजन

हळूहळू मुलींचे महत्व आजच्या मुलांएवढे होऊन फक्त अदलाबदल होऊन हा प्रश्न उलटा होऊन पुन्हा उद्भवणार नाही असे ठामपणे म्हणता येईल का?
अदलाबदल होणे म्हणजे १००% असे थोडेच? जिथे गरज असेल तिथे मुलांनी मुलीकडे जावे, किंवा मुलींनी मुलांकडे. उलट त्यामुळे बॅलन्स येईल असे वाटते.
यावर एक छान कल्पनारंजक गोष्ट होईल खरी. जसा सालस गरीब बायकांना दुष्ट सासरच्यांचा त्रास असतो, माहेरी जाऊ दिले जात नाही, माहेरच्या कोणाला येऊ दिले जात नाही तसं सालस जावयांच्या बाबतीत व्हायला किती वर्षे लागतील असा अंदाज आहे?
कधी लिहिताय? वाचण्यास उत्सुक....

In reply to by प्रियाली

>>जिथे गरज असेल तिथे मुलांनी मुलीकडे जावे, किंवा मुलींनी मुलांकडे. उलट त्यामुळे बॅलन्स येईल असे वाटते. हे पटले. कोणतीही रुढी करण्यापेक्षा परिस्थितीप्रमाणे लोकांना जगू देणे आपल्या समाजाला इतके अवघड का जाते कोण जाणे? एकत्र राहणार नाही अशी अट घालणे आणि ती मान्य करणे हे सध्याच्या काळात होते आहेच. कदाचित पुढच्या पिढीत तुम्ही म्हणता तसेही होईल.

In reply to by नगरीनिरंजन

पण तरीही कल्पनाविलासाच्या बाबतीत प्रियालीशी सहमत. वेताळाला पुन्हा झाडावर चढवाच.

In reply to by नगरीनिरंजन

खरं आहे. संस्कृतीला मूळव्याध झाला तर घाव घालावेच लागतील. हा हा हा चालूद्या. तुमच्याकडे मूळव्याध झालीतर घाव घालतात का? आम्ही तर काही लोकांना कैलास जीवन लावताना पाहीले आहे. बाकी संकृती बदलण्याच्या गोष्टी करणारे अंमळ अपरीपक्व असतात असे आमचे वैयक्तीक मत आहे. बाकी चालूद्या.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

परिपक्व म्हणजे मराठीत पिकलेले ना हो? आम्ही अंमळ नाही तर अगदी १००% अपरिपक्व आहोत आणि बालीशही आहोत हे आम्हाला मान्य आहे आणि मरेपर्यंत आम्ही तसेच राहायचा प्रयत्न करणार आहोत. चालू आहेच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

तुमच्याकडे मूळव्याध झालीतर घाव घालतात का? आम्ही तर काही लोकांना कैलास जीवन लावताना पाहीले आहे.
हो असेच काही उपाय करतात (कैलास जीवन, प्रिपरेशन एच वगैरे) असे ऐकले होते खरे. क्वचित्प्रसंगी शस्त्रक्रिया करावी लागते असेही ऐकले होते, पण शस्त्रक्रियेच्या निश्चित स्वरूपाविषयी कल्पना नव्हती. ती करून देऊन माझ्या सामान्यज्ञानात भर घातल्याबद्दल श्री. नगरीनिरंजन यांचे मनापासून आभार. शस्त्रक्रिया इतकी अघोरी आणि "मूलगामी" असेल याची कल्पना नव्हती. असो.

In reply to by पंगा

>>शस्त्रक्रिया इतकी अघोरी आणि "मूलगामी" असेल याची कल्पना नव्हती. शस्त्रक्रिया मूलगामी नसेल आणि मुळावर नुसतीच मलमपट्टी लावून ठेवली तर मूळ बरे होत नाही आणि पुनःपुन्हा वाढते. >>असो हो हो. असो. असो.