✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुलगी का नको?

य
युयुत्सु यांनी
Tue, 08/16/2011 - 14:01  ·  लेख
लेख
धनाजीरावांच्या "मुलगी वाचवा" या धाग्याला फारसे प्रतिसाद नाहीत हे बघून मी मूळ मुद्द्यावर चर्चा व्हावी म्हणून हा धागा टाकला. मला स्वत:ला एक मुलगी आहे आणि मला त्याचे अजिबात दू:ख नाही. उलट कधी कधी (काही लोक आत्तापासून तिचा भावी सून म्हणून विचार करतात तेव्हा) मनोमन सुखावायलाच होते.पण समाजाचा मुलीबद्दल असलेला दृष्टीकोन लक्षात घेताना काही गोष्टी लक्षात येतात. ० मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्‍या खर्चाचा मुलगी वाढविणार्‍या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही. जो मुलाच्या बाबतीत थोडाफार मिळु शकतो. ० मुलगी नवर्‍याचा वंश वाढवते - एकुलती एक मुलगी असेल तर प्रॉपर्टी परक्या घरी घेऊन जाते, हा दृष्टीकोन लोकांच्या दू:खाची नेमकी कारणे हीच आहेत. एकुलती एक मुले वाढवणे जसजसे अनिवार्य होणार तसे सध्याची समाजाची मानसिकता या समस्या जास्त गंभीर बनवणार. या दोनही समस्यांची "समाधानकारक" उत्तरे समाजाला मिळत नाहीत तो पर्यंत मुलींबद्दल समाजात आकस राहणार. टीप : ही जाहीरात नाही!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
50232 वाचन

💬 प्रतिसाद (171)

प्रतिक्रिया

>>एकुलती एक मुलगी असेल तर

अर्धवट
Tue, 08/16/2011 - 14:12 नवीन
>>एकुलती एक मुलगी असेल तर प्रॉपर्टी परक्या घरी घेऊन जाते, हा दृष्टीकोन हे काही मान्य नाही बुवा.. मृत्यूपत्र करून तसं न होण्याची सोय करताच येते की..
  • Log in or register to post comments

सहमत

मराठी_माणूस
Tue, 08/16/2011 - 14:23 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

असहमत!

स्वैर परी
Tue, 08/16/2011 - 15:46 नवीन
सध्याच्या काळात, बरोबरीचा वाटा वगैरे प्रकरण सुरु झाल्यापासुन, मुलगी प्रॉपर्टी घेउन जाणार ही धास्ती लोकांना अस्तेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

आणि हा वाटा मुलीने नेऊ नये

युयुत्सु
Tue, 08/16/2011 - 18:13 नवीन
आणि हा वाटा मुलीने नेऊ नये म्हणुन त‍‌-हेत-हेचे प्रयत्न केले जातात. मला तर असं कळलं आहे की कमाल जमीन धारणा कायद्या खाली सरकारने जी जमीन हडप केली ती त्यात्या कुटुंबातील मुलींच्या वाटणीची होती (ही ऐकिव माहिती आहे. शहानिशा केलेली नाही.). मागे न्या नरेंन्द्र चपळ्गावकरानी एका सकाळ मध्ये लेखात सतीची चाल ज्या प्रदेशात स्त्रीयाना संपत्तीत वाटा दिला गेला होता, त्या ठिकाणी जास्त प्रकर्षाने पाळली जात असल्याचे निरीक्षण नोंदविले होते. त्याची या निमित्ताने आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वैर परी

अर्धसत्य

सुनील
गुरुवार, 08/18/2011 - 10:28 नवीन
सतीची चाल ज्या प्रदेशात स्त्रीयाना संपत्तीत वाटा दिला गेला होता, त्या ठिकाणी जास्त प्रकर्षाने पाळली जात असल्याचे निरीक्षण नोंदविले होते. सतीची चाल प्रामुख्याने बंगाल आणि राजस्थानात होती. पैकी बंगालबाबत वरील वाक्य खरे आहे (दायभाग पद्धत). परंतु, राजस्थानबाबतमात्र हे वाक्य खरे नाही (मिताक्षर पद्धत).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

वडिलोपार्जित इस्टेटिचे

युयुत्सु
Tue, 08/16/2011 - 14:16 नवीन
वडिलोपार्जित इस्टेटिचे मृत्युपत्र करता येत नाही . स्वकष्टार्जित मालमत्तेचे आणि आपल्या वाट्याचेच मृत्युपत्र करता येते.
  • Log in or register to post comments

>>वडिलोपार्जित इस्टेटिचे

अर्धवट
Tue, 08/16/2011 - 14:22 नवीन
>>वडिलोपार्जित इस्टेटिचे मृत्युपत्र करता येत नाही . स्वकष्टार्जित मालमत्तेचे आणि आपल्या वाट्याचेच मृत्युपत्र करता येते. मग चांगलंच आहे की.. स्वतः कमावलेली मालमत्ता मुलगी परक्या घरी नेत असेल नसेल तर बोलायचा हक्क राहतो.. वडिलोपार्जीत मालमत्तेवर कसा काय येइल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

एकदम बरोबर

मराठी_माणूस
Tue, 08/16/2011 - 14:33 नवीन
एकदम बरोबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

मुलगी ही परक्यांच धन हा समज -

मराठी_माणूस
Tue, 08/16/2011 - 14:21 नवीन
मुलगी ही परक्यांच धन हा समज - त्यामुळे मुली वाढविण्यावर होणार्‍या खर्चाचा मुलगी वाढविणार्‍या कुटुंबाला परतावा/फायदा मिळत नाही. जो मुलाच्या बाबतीत थोडाफार मिळु शकतो. स्वतःच्या अपत्याच्या बाबतीतला असला विचार हा अगदी हीन दर्जाचा आहे. मुलगी म्हणजे काय पैसा आहे का, परतावा आणि फायदा मिळायला ?
  • Log in or register to post comments

कमावती मुलगी ही पैसा नसली तरी

युयुत्सु
Tue, 08/16/2011 - 14:24 नवीन
कमावती मुलगी ही पैसा नसली तरी लक्ष्मी असतेच...
  • Log in or register to post comments

सहमत!

स्वैर परी
Tue, 08/16/2011 - 15:58 नवीन
१००% सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

कमावती मुलगी ही पैसा नसली तरी

युयुत्सु
Tue, 08/16/2011 - 14:24 नवीन
कमावती मुलगी ही पैसा नसली तरी लक्ष्मी असतेच...
  • Log in or register to post comments

कमावती मुलगी ही पैसा नसली तरी

युयुत्सु
Tue, 08/16/2011 - 14:26 नवीन
कमावती मुलगी ही पैसा नसली तरी लक्ष्मी असतेच...
  • Log in or register to post comments

धनाजीरावांच्या "मुलगी वाचवा"

परिकथेतील राजकुमार
Tue, 08/16/2011 - 14:41 नवीन
धनाजीरावांच्या "मुलगी वाचवा" या धाग्याला फारसे प्रतिसाद नाहीत हे बघून मी मूळ मुद्द्यावर चर्चा व्हावी म्हणून हा धागा टाकला.
हे तिथेच लिहिले असतेत तरी तो धागा वर आलाच असता की :) का आता तुम्हीपण 'दिसमाजी काहीतरी लिहावे(च)' क्लबचे 'डायरीया' झालेले मेंबर होत आहात ?
  • Log in or register to post comments

प्रॉपर्टी घेऊन जाणार

गवि
Tue, 08/16/2011 - 14:42 नवीन
प्रॉपर्टी घेऊन जाणार यापेक्षाही आपले अपत्य वीसेक वर्षांनी आपल्याला सोडून जाणार आणि आपल्याला म्हातारपणी तितकासा "आधार" देऊ शकणार नाही. त्याइतकेच किंवा जास्त महत्वाचे म्हणजे वंश हा आडनावाने चालतो अशी समजूत. मुलगी दुसर्‍या घरी जाते आणि आडनाव बदलते. त्यामुळे तुमची (तथाकथित) वंशपरंपरा खंडित होते. तस्मात जराशा वरच्या शैक्षणिक / आर्थिक वर्गात पैशापेक्षाही हे वरचे मुद्दे जास्त म्याटर करतात असे वाटते. त्यामुळे या वर्गात "मुलगी नको" पेक्षा "किमान एकतरी मुलगा असावा" अशी वृत्ती असते. खूपच हलाखीच्या आर्थिक परिस्थितीवाल्या वर्गात मात्र मुलगी नकोच असा अ‍ॅटिट्यूड असू शकतो कारण तिथे कमावणे / पैसा याला अत्यंत महत्व असते. त्यांना "मुलांना पैशांसाठी वाढवतात. काय ही लोभी वृत्ती.." असं म्हणणं बरोबर नाही कारण त्यांच्या वंशाला गेल्याशिवाय आपल्यासारख्या सुखवस्तूंना ते कळणार नाही. या सर्वाला उपाय म्हणजे मुलगी सासरी जाणे म्हणजे काहीतरी "गमावणे" अशी भावना नष्ट होण्यासाठी काही सिस्टीम बदल. अर्थात मुलीचे आडनाव पुढे चालावे. मुलाने आईवडिलांचे दोघांचे नाव / आडनाव लावावे वगैरे असे उपाय पुन्हा दुसर्‍या दिशेने नवे प्रश्न उभे करतीलच. (उदा. किती आडनावांची आगगाडी लावायची? मुलगा लग्नानंतर बायकोचे आडनाव लावतो म्हटल्यावर नवर्‍याच्या साईडचा वंश बुडाला. इ इ. त्यापेक्षा लग्न केल्यावर मूळ नावे आणि इस्टेटी तशाच जपाव्या हे बरं..)
  • Log in or register to post comments

+१| इम्रान खान

प्रियाली
Tue, 08/16/2011 - 15:01 नवीन
मुलगी नको असते कारण
  1. आपल्या देशात मुलगा हा सोशल सिक्युरीटी मानला जातो.
  2. मुलगी झाल्याने वंश पुढे चालत नाही ही भावना.
असो. तशी आता आईचे आडनाव लावतात काही मुलं. विशेषतः आई प्रसिद्ध घरातली असेल तर ते मुलांना बरेच पडते. उदा. आमीरचा भाचा इम्रान खान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

"प्रॉपर्टी घेऊन जाणार

शैलेन्द्र
Tue, 08/16/2011 - 15:06 नवीन
"प्रॉपर्टी घेऊन जाणार यापेक्षाही आपले अपत्य वीसेक वर्षांनी आपल्याला सोडून जाणार आणि आपल्याला म्हातारपणी तितकासा "आधार" देऊ शकणार नाही." अगदी बरोबर, मुलीच्या आइवडीलांनी तिच्या घरी वृद्धापकाळी हक्कने येवुन राहणे समाजमान्य व रुढीमान्य होवोस्तर हा प्रश्न सुटणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

या उलट

प्रियाली
Tue, 08/16/2011 - 17:20 नवीन
मुलीच्या आइवडीलांनी तिच्या घरी वृद्धापकाळी हक्कने येवुन राहणे समाजमान्य व रुढीमान्य होवोस्तर हा प्रश्न सुटणार नाही.
म्हातार्‍या माणसांना आपलं राहतं घर सोडून, गाव सोडून, आजूबाजूचे शेजारी पाजारी सोडून परक्या ठीकाणी राहायला जाणं कठीण होतं असा अनुभव आहे. विशेषतः ते परावलंबी असतील तर अजूनच. अगदीच नाईलाज असेल तर माणूस नाराजीने मान्य करतो पण तो वेगळा मुद्दा. तेव्हा वरचा पर्याय मान्य करणे कठीण आहे. मुलीच्या आईवडिलांनी हक्काने मुलीकडे येऊन राहण्यापेक्षा जावयानेच लग्न झाल्यावर मुलीकडे राहायला जाणे योग्य होईल. अर्थात, या गोष्टीला किती तरुण तयार आहेत? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

या गोष्टीला किती तरुण तयार

वपाडाव
Tue, 08/16/2011 - 18:22 नवीन
या गोष्टीला किती तरुण तयार आहेत
पोरगी "माल"दार असेल तर आणी तरच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

>>जावयानेच लग्न झाल्यावर

नगरीनिरंजन
Tue, 08/16/2011 - 18:51 नवीन
>>जावयानेच लग्न झाल्यावर मुलीकडे राहायला जाणे योग्य होईल. हे गंभीरपणे लिहीलं आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

किंचित बदल

प्रियाली
Tue, 08/16/2011 - 19:36 नवीन
जावयानेच लग्न झाल्यावर बायकोकडे राहायला जाणे योग्य होईल असे वाचावे. हे गंभीर मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

ओके.

नगरीनिरंजन
Tue, 08/16/2011 - 20:36 नवीन
हजारो वर्षांपूर्वी पुरुषांची घटती संख्या आणि शेतीला कमी पडणारे मनुष्यबळ याने चिंतीत होऊन मुलीनेच नवर्‍याच्या घरी राहायला जाणे योग्य होईल असा निर्णय घेतला गेला असण्याची काही शक्यता असेल का असा विचार मनाला चाटून गेला. पूर्वी बर्‍याच प्रदेशांत मातृसत्ताक पद्धत होती असं ऐकल्यासारखं वाटतंय. (देवकीची सात मुले मारली पण आठवी मुलगी मात्र मेली नाही ही गोष्ट आठवली उगाचच)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

?

पंगा
Tue, 08/16/2011 - 21:03 नवीन
देवकीची सात मुले मारली पण आठवी मुलगी मात्र मेली नाही
देवकीची आठवी मुलगी?????? पण ती तर डीकॉय म्हणून ठेवण्यासाठी उचलून आणली होती ना, कोणाकडून तरी? (चूभूद्याघ्या.) अतिअवांतर: याला आपल्या संस्कृतीतील स्त्रीभ्रूणहत्ये(च्या प्रयत्ना)चे आद्य उदाहरण मानता येईल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

>>पण ती तर डीकॉय म्हणून

नगरीनिरंजन
Wed, 08/17/2011 - 04:13 नवीन
>>पण ती तर डीकॉय म्हणून ठेवण्यासाठी उचलून आणली होती ना, कोणाकडून तरी? बरोबर. पण ते मारणार्‍यांना माहित होते का? शिवाय ती उडून आकाशात गेली आणि आकाशवाणी झाली असं खरोखर झालं असेल? असो. मला त्यावरून काही सुचवायचे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

देवकीची आठवी मुलगी?

प्रियाली
Tue, 08/16/2011 - 21:11 नवीन
ती कोण बरे? (गोंधळात)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

अहो, यशोदेचा कृष्ण नाही का?

नगरीनिरंजन
Wed, 08/17/2011 - 04:16 नवीन
अहो, यशोदेचा कृष्ण नाही का? तशीच देवकीची आठवी मुलगी. (यात गोंधळण्यासारखे काय आहे ते न कळल्याने गोंधळलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

यशोदेने कृष्णाचा सांभाळ

प्रियाली
Wed, 08/17/2011 - 06:40 नवीन
यशोदेने कृष्णाचा सांभाळ केला त्याला आईचे प्रेम दिले म्हणून यशोदेचा कृष्ण. देवकीचे तसे काही नाही. उगीच नसलेले संबंध आणि मातृत्व तिच्यावर का लादा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

मी कुठे असं म्हटलंय की तिने

नगरीनिरंजन
Wed, 08/17/2011 - 07:44 नवीन
मी कुठे असं म्हटलंय की तिने सांभाळ केला. त्या प्रसंगापुरती तरी ती तिची मुलगी होती एवढंच मला म्हणायचं होतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

अरेच्चा!

प्रियाली
Wed, 08/17/2011 - 14:40 नवीन
तुमचे मूळ विधान त्या प्रसंगापुरते वगैरे नाही पण तरीही त्या प्रसंगात कंसाचा गैरसमज झाला की ते देवकीचे मूल आहे. आपण असले गैरसमज कशाला करून घ्या! पण असो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

ओक्के.

नगरीनिरंजन
Wed, 08/17/2011 - 14:54 नवीन
ओक्के.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

अहो मुलगी यशोदेला होती हो.

प्राजु
Tue, 08/16/2011 - 22:05 नवीन
अहो मुलगी यशोदेला होती हो. देवकीचा आठवा मुलगा म्हणजे कृष्ण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

?

पंगा
Tue, 08/16/2011 - 22:28 नवीन
पण मुळात यशोदेने/नंदाने तरी आपली मुलगी दिलीच कशी? दुसर्‍याच्या मुलाच्या बदल्यात? मरायला? म्हणजे त्यांनाही मुलगी नकोशी होती काय? म्हणजे 'मुलगी का नको' हा प्रश्न तेव्हापासून लागू आहे तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

नाही नाही.क्रिष्णाला

रेवती
Wed, 08/17/2011 - 00:09 नवीन
नाही नाही. क्रिष्णाला ;) गोकुळात सोडून येताना तिथली मुलगी एक्स्चेंज म्हणून (उचलून) आणली. ती मेल्या कौंसाने मारायला घेतली तर हातातून सुटून आकाशात गेली, मग पुढे आकाशवाणी वगैरे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

>>म्हणजे त्यांनाही मुलगी

नगरीनिरंजन
Wed, 08/17/2011 - 04:23 नवीन
>>म्हणजे त्यांनाही मुलगी नकोशी होती काय? किंवा मुलग्याला मारू नये म्हणून मुलीला तिथे ठेवले असेल. त्या काळी मुलीला मारत नसावेत कदाचित. असो. नेहमीप्रमाणे जे सुचवायचंय ते सोडून भलत्याच गोष्टीवर पांडित्यपूर्ण कीस काढणे चालू झालेले पाहून आश्चर्य वाटले नाही. चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

+२

पंगा
Wed, 08/17/2011 - 09:26 नवीन
असो. नेहमीप्रमाणे जे सुचवायचंय ते सोडून भलत्याच गोष्टीवर पांडित्यपूर्ण कीस काढणे चालू झालेले पाहून आश्चर्य वाटले नाही. चालू द्या.
अगदी अगदी! आणि हो, बादवे, माझेही तुमच्यावर खूप्खूऽऽऽऽऽऽप प्रेम आहे... अग्दी आभाळाएवढे! उम्मऽऽऽऽऽऽऽऽऽम्मा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

भेंडी !

परिकथेतील राजकुमार
Wed, 08/17/2011 - 19:05 नवीन
आणि हो, बादवे, माझेही तुमच्यावर खूप्खूऽऽऽऽऽऽप प्रेम आहे... अग्दी आभाळाएवढे! उम्मऽऽऽऽऽऽऽऽऽम्मा!
Image removed. Image removed. पंगाशेठ हा कुठला मोड आता ? बेक्कार हसायला आले वाचून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

गवार!

पंगा
गुरुवार, 08/18/2011 - 00:15 नवीन
धन्यवाद. याला 'आय लव यू टू!'१,२ मोड म्हणतात. (मराठीत: 'जगाला प्रेम अर्पावे'.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बाकी...

वाटाड्या...
गुरुवार, 08/18/2011 - 01:12 नवीन
त्यावरुन कंसाने तरी कशाला देवकी आणि वसुदेवाला एकत्र एका कोठडीत ठेवायच? अस एक जोक ऐकल्याचं आठवत... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

खुप साधी गोष्ट आहे ना. अगदी

धन्या
गुरुवार, 08/18/2011 - 10:01 नवीन
खुप साधी गोष्ट आहे ना. अगदी शेंबडया पोराला सुद्धा कळेल हे. पण म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...

एन जी ओ असतील त्या काळचे जे

शुचि
गुरुवार, 08/18/2011 - 19:12 नवीन
एन जी ओ असतील त्या काळचे जे मध्ये पडले असतील ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...

पब्लिक डिमांड

प्रियाली
गुरुवार, 08/18/2011 - 19:16 नवीन
कंसाने तरी कशाला देवकी आणि वसुदेवाला एकत्र एका कोठडीत ठेवायच?
नाहीतर कहानीमें ट्विस्ट येऊन महाभारत कसे झाले असते. कित्ती कित्ती एपिसोड्स वाढले कंसाच्या एका निर्णयाने. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...

छ्या... तुमी काय तरी गल्लत

धन्या
गुरुवार, 08/18/2011 - 19:35 नवीन
छ्या... तुमी काय तरी गल्लत करताय प्रियालीताय... म्हाबारत पांडवांचा व्हता... किश्नाचा नाय काय... किश्ना सप्पोर्टींग रोलमदी व्हता बा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

नाय नाय

प्रियाली
गुरुवार, 08/18/2011 - 19:40 नवीन
त्या किस्नाने त्या गीतेपायी किती एपिसोड वाढवले. आपल्या शिरियलची हीच कमाल असते, सपोर्टींग रोलमधली क्याराक्टरं पण जाम फूटेज खाऊन जातात आणि टिआरपी वाढवतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हाहाहा... तरी बरंय त्यावेळी

धन्या
गुरुवार, 08/18/2011 - 20:17 नवीन
हाहाहा... तरी बरंय त्यावेळी सिरियलींमध्ये पॉवरपाईंट ईफेक्ट वापरण्याची अनिष्ट रुढी नव्हती... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

"म्हातार्‍या माणसांना आपलं

शैलेन्द्र
Tue, 08/16/2011 - 21:14 नवीन
"म्हातार्‍या माणसांना आपलं राहतं घर सोडून, गाव सोडून, आजूबाजूचे शेजारी पाजारी सोडून परक्या ठीकाणी राहायला जाणं कठीण होतं असा अनुभव आहे." वृद्धाश्रमात राहण्यापेक्षा आपल्या माणसात राहणे कुणीही पसंत करेल.. बाकी इतर काँम्प्लीकेशन करण्यापेक्षा, जर एकुलती एक मुलगी असेल तर तिने आपल्या आई-वडिलांना स्वतःच्या घरी आणनेच श्रेयस्कर ठरते. फक्त त्याकडे मुलीच्या सासरच्यांनी व समाजाने काही वेगळी गोष्ट म्हनुन पहायला नको..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

म्हणजेच

प्रियाली
Tue, 08/16/2011 - 21:17 नवीन
म्हातार्‍यांची उचलबांगडी कशीही होवो आम्ही घरजावई* होणार नाही मुलीकडे राहायला जाणार नाही असे का? ;) * हा शब्द मला पसंत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

मुलांनाही आई बाबा असतात हो..

शैलेन्द्र
Tue, 08/16/2011 - 22:03 नवीन
मुलांनाही आई बाबा असतात हो.. एकाला न्याय देताना दुसर्‍यावर अन्याय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

अरेच्चा!

प्रियाली
Tue, 08/16/2011 - 23:02 नवीन
आतापर्यंत सरसकट मुलींच्या आईबापांवर अन्याय चालला होता हे मान्य आहे का? ;) मुलाच्या आईवडिलांनी जावं की सुनेकडे राहायला मुलासोबत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

हेहे.. साधा उपाय म्हणजे, आई

शैलेन्द्र
Tue, 08/16/2011 - 23:55 नवीन
हेहे.. साधा उपाय म्हणजे, आई बाबांनी आपापल्या मुलांकडे रहायला जाव.. मुलगा मुलगी न बघता.. आणी त्यासाठी प्रत्येक कुटुंबाने स्वता:चे वेगळे घर करावे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

अगदी बरोबर! 'आत्तापर्यंत' हे

नगरीनिरंजन
Wed, 08/17/2011 - 04:37 नवीन
अगदी बरोबर! 'आत्तापर्यंत' हे ठीक आहे. पण कधीपासून ते सांगता येईल काय? त्यापूर्वी परिस्थिती उलट नव्हतीच आणि मुलगे मुलींकडे जात नव्हते हे सिद्ध झाले आहे काय? पूर्वी बर्‍याच प्रदेशांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती असं ऐकलंय ते खोटं आहे का? असो. मुद्दा एवढाच आहे की हे ही एक चक्रच असू शकते. यात मुलीच्या किंवा मुलाच्या भ्रूणहत्येचे समर्थन करण्याचा हेतू नाही. आता चाललंय त्याच्या उलट निर्णय घेऊन चक्र उलट फिरण्याशिवाय काहीही होणार नाही. आज मुलांना म्हत्व आहे म्हणून स्त्रीभ्रूणहत्या होतात, उद्या मुलींना महत्व आले तर पुरुषभ्रूणहत्या होतील. म्हणून व्यवस्थेत वेगळा काहीतरी बदल हवा असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा