अंतर -२
रात्र गेली सरून
तार्यांचे पांघरून घसरले
उरासी धरलेले अंधार मात्र
अजून कुठे सरकले
मोजत बसलो अंतर
लिहिले जन्मांतरीचे
नव्हतेच कमी झाले
ते भार सारथीचे
उधळत गेलो शब्द
विश्वासाच्या रांगोळी वरती
थेंबां-थेंबांवरूनी
मी वाट काढत दमलो
- निनाव.
लेखनविषय:
याद्या
1268
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
कवितेचा भाव आवडला...