✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

परदेशात घर विकत घ्यावे का? असल्यास काय काळजी घ्यावी?

च
चित्रगुप्त यांनी
Fri, 08/05/2011 - 02:07  ·  लेख
लेख
अमेरिकेत काही वर्षांपासून रहात असलेल्या एका परिचिताने (घरभाड्याएवढा मासिक हप्ता देऊन स्वतःचे घर होईल या विचाराने) घर विकत घेतले, आता त्यांनी दुसर्‍या शहरात नोकरी धरली, तसेच मुली झाल्याने काही वर्षांनंतर भारतात परत जाण्याचा विचार करत आहेत, परंतु घेतलेले घर विकले जात नाही, व भाडेही पुरेसे मिळत नाही, अशी पंचाईत झाली आहे. यावर काय उपाय आहे, एकूणच परदेशात घर विकत घेण्यात काय काय फायदे- तोटे असतात? घ्यायचेच असेल तर काय काय काळजी घ्यावी?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24117 वाचन

💬 प्रतिसाद (98)

प्रतिक्रिया

हुच्चानी हुच्चांसाठी काढलेला

स्पा
Fri, 08/05/2011 - 10:34 नवीन
हुच्चानी हुच्चांसाठी काढलेला हुच्च धागा --डोम्बीव्लीतही घर न परवडणारा ( निच्चभृकथेतील स्पाकुमार)
  • Log in or register to post comments

(No subject)

मी ऋचा
Fri, 08/05/2011 - 12:22 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

धाग्यातलं परत जाण्याविषयीचं

गवि
Fri, 08/05/2011 - 11:06 नवीन
धाग्यातलं परत जाण्याविषयीचं वाक्य वाचून माझ्या सर्व परदेशस्थ मित्रांची आठवण झाली. आपण कधीतरी परत जाणार आहोत किंवा (काही वर्षांनी) परत भारतात जायचं यासाठी एक कारण सतत जागृत ठेवावं लागतं. प्रत्यक्ष परत भारतात कधी न येता... पण मनाच्या समजुती (?) साठी "पुढे कधीतरी" आपण नक्की परत जाऊ यासाठी सॉलिड कारण सतत मनात गणितातल्या "हातच्या"सारखे धरुन ठेवून. ते लोक खरंच सुखी की जे मोकळेपणाने स्वतःशी मान्य करतात की आपण इथेच रहायचे. आणि घरबीर घेण्याच्या योजना करुन यथावकाश घेऊन सेटल होऊनही टाकतात. नपेक्षा मग, ........ पोरांचा विचार, आईबाबांचा विचार, आपल्या संस्कृतीचा विचार, इथे परदेशात शिल्लक टाकलीच पाहिजे तरच भारतात जाऊन बस्तान बसवता येईल तस्मात सध्या कष्ट करुन कमवू आणि नंतर काही वर्षांनी परत जाऊ.. अशा असंख्य एक्स+१ "प्लॅनिंग्ज" पेक्षा सरळसरळ तिथेच डिक्लेअर करुन सेटल होणं चांगलं आणि स्पष्ट आहे. अर्थात ज्याचे त्याचे अनुभव ज्याच्या त्याच्या आसपासचे. काही जणांनी असे लोक खरंच परत आल्याचं म्हटलं आहे. परत येण्यामागचं कारण "तिथून जावं लागलं" असं नसून खरंच परत येण्याच्या ओढीने आले असतील तर मग मात्र मान्य करायलाच लागेल की असेही लोक असतात.
  • Log in or register to post comments

सहमत...

धन्या
Fri, 08/05/2011 - 11:15 नवीन
अर्थात ज्याचे त्याचे अनुभव ज्याच्या त्याच्या आसपासचे. काही जणांनी असे लोक खरंच परत आल्याचं म्हटलं आहे. परत येण्यामागचं कारण "तिथून जावं लागलं" असं नसून खरंच परत येण्याच्या ओढीने आले असतील तर मग मात्र मान्य करायलाच लागेल की असेही लोक असतात.
अगदी अगदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हुच्चानी हुच्चांसाठी काढलेला हुच्च धागा...

चित्रगुप्त
Fri, 08/05/2011 - 11:13 नवीन
हा हुच्च प्रतिसाद अतिशय आवडला.
  • Log in or register to post comments

उद्बोधक चर्चा!

नगरीनिरंजन
Fri, 08/05/2011 - 12:30 नवीन
बिझिनेस सेन्स, भाड्याचे प्रमाण, कमाई वगैरे गोष्टी वाचून ड्वाळे पाणावले. मला वाटलं प्रश्न परदेशात घर घेण्यासंबंधी आहे, पण प्रत्यक्षात प्रश्न मात्र परदेशात प्रॉपर्टी घेण्यासंबंधी आहे असं दिसतंय.
  • Log in or register to post comments

अरेरे

नितिन थत्ते
Fri, 08/05/2011 - 13:15 नवीन
बॅंकेचे कर्ज-हप्ते थकवणे- बँकेची अडचण- कर्ज रिनिगोशिएशन विषयावरची सुशिक्षित मराठी लोकांची (कदाचित इतर ठकांप्रमाणेच) अशी विचारसरणी बनली आहे/बनू लागली आहे हे पाहून मनापासून वाईट वाटले. :( स्वत: चुकीचा निर्णय घेतला याची जवाबदारी स्वत: घ्यायला नको? ती बॆंकेची अडचण जाणून बॆंकेवर लोटायची हे पटले नाही.
  • Log in or register to post comments

सुशिक्षित मराठी लोकांची विचारसरणी

कुंदन
Fri, 08/05/2011 - 13:27 नवीन
का? सुशिक्षित मराठी माणुस मराठी माणसाला ठकवु शकत नाही असा काही नियम आहे का चाचा ? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

माझ्या मते

आनंदयात्री
Sat, 08/06/2011 - 01:28 नवीन
माझ्या मते काकांचा मुळ विरोध ब्यांकांना बुडवण्याला आहे, त्याला तसे ठोस कारणही आहे. जे मला पटतेही आहे. त्याचे कारण म्हणजे बर्‍याच ब्यांका कस्टम सिस्टीम्स वरुन ईआरपीवर शिफ्ट होणार अशी काकांना खबर लागलेलीआहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

अच्छा...

पंगा
Sat, 08/06/2011 - 01:31 नवीन
...म्हणजे मराठी माणसाने मराठी माणसाला न बुडवण्याचा प्रकार आहे तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

जेन्युइन

नितिन थत्ते
Sat, 08/06/2011 - 11:19 नवीन
ब्यांका ईआरपी वर शिफ्ट होणार किंवा कसे याचे महत्त्व माझ्यापेक्षा बिकांना जास्त असावी. ;) माझी नाराजी जेन्युइन म्हणजे सुशिक्षित मराठी* लोक असा विचार करतात हे पाहून होती. मी Naive होतो असे म्हणण्याची सर्वांना मोकळीक आहेच. :) *सुशिक्षित मराठी लोक सज्जन/पापभीरू असतात असा माझा समज होता. तो नाहीसा झाला. माझा एवढातरी फायदा या धाग्यामुळे नक्कीच झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

सुशिक्षित आणि सुसंस्कृत मध्ये

प्यारे१
Sat, 08/06/2011 - 11:26 नवीन
सुशिक्षित आणि सुसंस्कृत मध्ये गल्लत होते आहे का चाचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

श्या !

परिकथेतील राजकुमार
Fri, 08/05/2011 - 14:13 नवीन
अनिवासी वा अनिवासी हितचिंतकांनी अनिवासी सदस्यांसाठी काढलेला धागा ! अनिवासी भारतियांच्या अनिवासी समस्यांवर निवासी सदस्यांनी मतप्रदर्श करावे काय ? किंवा "मंद *काही अनिवासी हे सॅमकाका माफ कर...' अशी कविता करावी काय ? जुने स्कोर सेटल करण्याची इच्छा असणारे 'काही' च्या जागी 'सारे' असा शब्द वापरु शकतात.
  • Log in or register to post comments

अनिवासी भारतियांच्या अनिवासी

धन्या
Fri, 08/05/2011 - 14:29 नवीन
अनिवासी भारतियांच्या अनिवासी समस्यांवर निवासी सदस्यांनी मतप्रदर्श करावे काय ?
आम्ही तर निवासी सदस्य असूनही भरभरुन प्रतिसाद दिलेत धाग्यावर. अर्थात कधी काळी आम्हीही अनिवासी भारतीय होतो हा भाग वेगळा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

"मंद *काही अनिवासी हे सॅमकाका

यकु
Fri, 08/05/2011 - 16:29 नवीन
"मंद *काही अनिवासी हे सॅमकाका माफ कर...' अशी कविता करावी काय ?
कवितेच्या प्रतिक्षेत ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अरे काय हे अनिवासी अनिवासी...

चित्रगुप्त
Fri, 08/05/2011 - 16:33 नवीन
अरे काय हे अनिवासी अनिवासी... हा घ्या आगामी हुच्च धागा: निवासी भारतीयांनी निवासाची समस्या सोडवण्यासाठी स्वदेशात निवास न करणार्‍या मुलांकडून पैसे मागवून निवास स्थान खरेदी करण्यातील संभाव्य अडचणी, धोके, फायदे व तोटे.....
  • Log in or register to post comments

वेल सेड

पंगा
Fri, 08/05/2011 - 16:58 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

घर?

विसुनाना
Fri, 08/05/2011 - 17:41 नवीन
मी तरी बुवा एक स्वतंत्र बेटच विकत घेण्याचा विचार करत आहे. माझा हा चॉईस कसा वाटतो? :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

प्रियाली
Fri, 08/05/2011 - 17:43 नवीन
घ्या घ्या बेट घ्या. त्यावर एक घर बांधा, डेक बांधा, टेनिस कोर्ट, स्विमिंगपूल, जकुझी वगैरे सर्व सुखसोयी उपलब्ध करून घ्या आणि आम्हाला बोलवा - कट्टा करायला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

फायनान्स करणार का?

विसुनाना
Fri, 08/05/2011 - 17:46 नवीन
जरूर. तुमचं प्रायव्हेट जेट उतरण्यासाठी एक विमानतळही बांधतो. तेवढं जरा फायनान्सचं बघता का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

बँक आहे ना

प्रियाली
Fri, 08/05/2011 - 17:51 नवीन
अहो बँका आहेत ना! त्यांना ठकवायचे उपायही वर दिले आहेत. आम्ही गरीब माणसं कुठे पुरे पडणार? बाकी, विमानतळाची ऐडिया मस्तच आहे. अंमलात आणाच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

वा वा

परिकथेतील राजकुमार
Fri, 08/05/2011 - 17:49 नवीन
आणि आम्हाला बोलवा - कट्टा करायला.
म्हणजे 'झपाटलेले बेट' तयार होईल तिथे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

झोम्बीलँड

प्रियाली
Fri, 08/05/2011 - 17:52 नवीन
विसुनानांना बेटाचे नावच झोम्बीलँड ठेवायला सांगूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अरेच्या!

विसुनाना
Fri, 08/05/2011 - 18:04 नवीन
एकाच नावाची दोन बेटं जगात चालणार नाहीत असं वाटतंय. आठवणीप्रमाणं तुमच्या बेटाचं नावही झॉम्बीलँडच आहे ना? की बदललं आता?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

एकाच नावाची दोन बेटं जगात

विजुभाऊ
Sun, 08/07/2011 - 10:51 नवीन
एकाच नावाची दोन बेटं जगात चालणार नाहीत असं वाटतंय.महाराष्ट्रात बावीस वडगावे आहेत असे कुठेतरी वाचले होते. एका नावाची दोन बेटे असतील तर त्याला खुर्द आणि बुद्रुक अशी कंसात नावे द्याना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

महाराष्ट्रात बावीस वडगावे

धन्या
Tue, 08/09/2011 - 04:50 नवीन
महाराष्ट्रात बावीस वडगावे आहेत असे कुठेतरी वाचले होते. एका नावाची दोन बेटे असतील तर त्याला खुर्द आणि बुद्रुक अशी कंसात नावे द्याना.
आमचेही वडगांव यात आले. आमचा गावाकडचा पत्ता: मु. वडगांव कोंड पो. गोरेगांव (वडगांव हे गाव आमच्या गावापासून फक्त दोन किमी वर आहे). त्यामुळे दुसर्‍या बेटाच्या नावापुढे कोंड असा शब्दही लावता येईल. आणि आमचे दुसरे वडगांवः आम्ही ज्या सिंहगड रोडवर राहतो, तिथेही दोन किमीवर एक वडगांव आहे. त्यामुळे बावीसातले तीन वडगांव तर आमचेच गांव आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

चालेल तर- आमचे खुर्द

विसुनाना
Tue, 08/09/2011 - 10:32 नवीन
तसे असेल तर आमचे झाँम्बीलँड(खु||). बुद्रुक म्हणवण्याची आमची पात्रता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

जागा घेउन घ्रर बान्घायचे

जानम
Fri, 08/05/2011 - 19:43 नवीन
जागा घेउन घ्रर बान्घायचे अस्यास येथे :)
  • Log in or register to post comments

जागा घेउन घ्रर बान्घायचे

जानम
Fri, 08/05/2011 - 19:43 नवीन
जागा घेउन घ्रर बान्घायचे अस्यास येथे :)
  • Log in or register to post comments

आइला...

गजा गाजरे
Sat, 08/06/2011 - 01:08 नवीन
डोक्याची पार मन्डई करुन टाकली ...... त्याला साण्गा आपल्या मन्डईतच घर घॅ की....... अम्हि मराठी ........हो का........मग मराठी तच बोला कि.........
  • Log in or register to post comments

अम्हि मराठी ........हो

धन्या
Sat, 08/06/2011 - 18:03 नवीन
अम्हि मराठी ........हो का........मग मराठी तच बोला कि.........
मालक, तुमचा हा सव्वा तीन ओळींचा ("आइला" ही पाव ओळ + पुढच्या तीन ओळी) प्रतिसाद पाहून हसावे की रडावे हेच कळत नाही. शब्दांवर जाऊ नका, भावना समजून घ्या असं स्वत:ला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतू राहवलं नाही म्हणून पुढच्या ओळी टंकतोय. या सव्वा तीन ओळीत मराठीच्या शुद्धलेखनाची पार वाट लावून टाकली आहे तुम्ही. मराठीतच बोला असा अट्टाहास करणार्‍याने निदान स्वतः शुद्ध मराठी लिहावं असं अपेक्षित आहे. नाही तर मग ते "लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः कोरडे पाषाण" असे होईल. बघा पटतंय का? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गजा गाजरे

थोडे स्पष्टीकरण

नेत्रेश
Sat, 08/06/2011 - 04:05 नवीन
मी वर दिलेला सल्ला आणी त्या अनुशंगाने मांडलेलेली मते वाचुन बर्‍याच जणांचा गैरसमज झाला आहे. बहुतेकांची व्यवहार आणी तत्वे यांची गल्लत झाल्यामुळे मी मांडलेली मते चुकीची वाटत असावीत. १. बँक ही बिझनेस करण्यासाठीच बसली आहे. बिझनेस करण्याचा मुख्य उद्येश नफा कमावणे हा असतो. कर्ज देणे हा बॅकेचा नफा कमावण्याचा मार्ग आहे. कोणताही बिझनेस करताना त्यातील रीस्क अ‍ॅनॅलाईझ करणे आणी त्या नुसार निर्णय घेणे हे बिझनेस करणार्‍याचे काम आहे, ग्राहकांचे नव्हे. २. जेव्हा आपण बँकेकडुन कर्ज घेतो तेव्हा ते बुडविण्यासाठी नक्कीच घेत नाही. आपला फायदा होणार असेल तरच आपण कर्ज घेतो. घर घेण्यासाठी कर्ज घेतले म्हणजे आपल्याला रहायला आपल्या मालकीचे घर मीळाले हा आपला फायदा झाला. आपण ब्यँकेला व्याज दीले हा बँकेचा फायदा झाला. बँकेने कर्ज देउन व आपण व्याज देउन कुणावर उपकार केलेले नसतात. कर्ज देणे आणी घेणे हा दोन्ही पक्षांसाठी निव्वळ व्यवहार झाला. यशस्वी होण्यासाठी व्यवहारात आपला फायदा बघणे हे दोन्ही पक्षांचे काम आहे. आपला फायदा होण्यासाठी आपली गुंतवणुक सुरक्षीत ठीकाणी करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. आपली गुंतवणुक जपण्यासाठी कर्जदाराची परत फेडीची ऐपत आणी ईच्छा जोखणे हे बँकेच कर्तव्य आहे. त्यासाठी भारतात क्रेडीट रेटींग सिस्टीम नसतानाही भारतातल्या बँका अमेरीकेतील बँकांपेक्षा जास्त काळजीपुर्वक घरकर्ज वाटप करत आहेत. ३. आपण जेव्हा बँकेकडुन कर्ज घेतो तेव्हा बँकेशी केलेल्या करारात काही कारणांमुळे कर्ज फेडता आले नाही तर काय करायचे हे लिहीलेले असते. बहुतेक वेळा आपण घेतेलेले घरच तारण म्हणुन असते. म्हणजे बँके मान्य केलेले असते की थकबाकी वसुल करण्यासाठी बँक ते घ्रर कर्जाच्या उर्वरीत रक्कमेच्या बदल्यात (वीकत) घेणार आहे. म्हणजे बँकेने हे मान्य केलेले असते की त्यांनी कर्ज म्हणुन दीलेली रक्कम घराचा किंमतीपेक्षा कमी आहे आणी घए ताब्यात घेउन बँक आपली रक्कम वसुल करु शकते. जर घरांच्या किंमती पडल्या आणी बाजुचे घर अर्ध्या किंमतीत / अर्ध्या हप्तामध्ये मिळु लागले तर आधी घेतलेले कर्ज हे घेणार्‍यासाठी बॅड इव्हेस्ट्मेंट ठरते. जेव्हा शेअर बासारात कींमती पडु लागतात तेव्हा जास्त नुकसान टाळण्यासाठी लोक शेअर्स विकतात. ईथे तुम्ही बँकेला केलेल्या करारा नुसार घर परत देत अहात. यात कसली फसवा-फसवी नाही. सर्व काही करारा नुसार, कायदेशीर पणे केले जाते. ३. या व्यवहाराकडे असेही पहाता येईल - - घर बँकेने बिल्डर / मालकाकडुन पुर्ण पैसे देउन विकत घेतले आणी तुम्हाला जास्त किंमतीला (व्याज घेउन) हप्तामध्ये विकले. - तुम्ही सर्व हप्ते भरल्यावर घर तुमचे होणात, तोपर्यंत बँकेची मालकी रहाणार. - काही हप्ते भरल्यावर तुम्हाला असे लक्षात आले की आता तसेच घर अर्ध्या कींमतीला मिळत आहे. मग जास्त दराचे घर घेण्यापेक्षा तुम्ही बँकेला सांगता आधीचे हप्ते ठेउन घे, मला तुझ्याकडुन घर विकत घ्यायचे नाही. - अगदी याच प्रमाणे आपण मोबाईल फोन, केबल वाला, भाजीवाला यांनी दर वाढवले तर दुसरीकडची सर्वीस घेतो, तसेच दुसरीकडुन चांगल्या दरात दुसरे घर घेतले तर काय बिघडले? ----------------------------------------------------------------------------------------------- आता अर्धे कर्ज माफ करुन घेण्याविशयी- १. सध्या अमेरीकेत बृयाच ठीकाणी अशी परीस्थीती आहे की जर तुम्ही हप्ता देणे बंद केले आणी बँकेने घर (फोरल्कोज करुन) परत घेतले तरी ते बँकेकडुन पडलेल्या दरातही घ्यायला ग्राहक नाहीत. २. बँकेने ताब्यात घेतलेल्या घरावरचा प्रोपर्टी टॅक्स आणी मेंतेनन्स बँकेला भरावा लागतो. ही रक्कम खुप असते. बर्‍याच ठीकाणी बँक अशी घरे फुकट द्यायलाही तयार असते पण घ्यायला कुणी तयार नसते. ३. बँक ऑफ अमेरीकाने अशी हजारो घरे पाडुन सपाट जमीन डोनेट केली आहे. सपाट जमीनीवर घरापेक्षा खुप कमी टॅक्स लागतो. घर असलेली जमीन डोनेशन म्हणुन फुकटही घेतली जात नाही. बँक स्वतःचे पैसे टाकुन जमीन सपाट करुन मग डोनेट करते. दक्षीण कॅलिफोर्नियातला नविन घर पाडतानाचा व्हिडीओ: http://www.youtube.com/watch?v=4Ilayp2ykts ४. या सगळ्या व्यापापेक्षा बहुतेक वेळा ज्याने आधी घर घेतले आहे त्याचे अर्धे कर्ज माफ करुन त्याला त्याच घरात ठेवणे हे बँकेला परवडणारे असते. ५. या सर्व प्रकाराला संपुर्ण्पणे बँकाच जबाबदार आहेत. अनिर्बंध कर्ज वाटप, त्यामुळे अवास्तव प्रमाणात वाढलेल्या घरांच्या किंमती. अयोग्य व्यक्तींना केलेले (कमीशनच्या हव्यासापोटी) केलेले कर्ज वाटप. व्यक्तीगत लाभापोटी वस्तुस्थीती ग्राहकांपासुन लपवुन, कमी उत्पन्न असलेल्या लोकांना सुरवातीला कमी रकमेचे हप्ते लाउन घरे घेण्यास प्रोत्साहीत करणारे बँकर्स आणी त्यांचे एजंटस हे जास्त जबाबदार आहेत. ------------------------------------------------------------------------------- मला वाटते हे सर्व वाचुन तुम्हाला माझी भुमीका थोडीफार पटली असेल.
  • Log in or register to post comments

नेत्रेश

बाळकराम
Sat, 08/06/2011 - 15:57 नवीन
पटेश! १००% सहमत! हा अगदी व्यवहारी विचार आहे- बँक आपला धंदा बघते आपण आपलं हित बघायचं! बरेच लोक उगाच सज्जनपणाचे च्युइंगम चघळत बसले आहेत किंवा आपल्या अव्यवहारीपणाला सज्जनपणाचे नाव देऊन स्वतःची फसवणूक करत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

+१०००

नितिन थत्ते
Sat, 08/06/2011 - 16:15 नवीन
सहमत आहे. म्हातार्‍यांच्या बरळीकडे फार लक्ष देऊ नये. म्हातार्‍यांना उगाच व्यवहार म्हणजे फ्रॉड्युलंट इंटेन्शन नव्हे असे वाटत असते. आमच्या एका मित्राचे खालील विचार आम्हाला पटतात. We are different.. आमच्याकडे आमचा स्वत:चा ऍटीटयूड आहे. एखाद्या गोष्टीकडे बघायची ताकद आहे, दृष्टी आहे.. मग ती इमॅच्युअर का असेना, पण तरी तो आमच्याकडे आहे.. 23 व्या वर्षी आयआयटीत प्रोफेसर होण्यासाठी कष्ट लागतातच..पण, ते घ्यायची तयारी आमच्यात आहे, हे जास्त महत्वाचे...आणि, सर्वात महत्त्वाचे ''चला जग जिंकुया'' म्हणणारा Confidence. हा पुर्वी नव्हता ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम

येस्स वी आर...!!! हल्ली

प्यारे१
Sat, 08/06/2011 - 16:24 नवीन
येस्स वी आर...!!! ;) हल्ली मिपावर त्यांचे ' वर्च्युअल काका' आल्याचे समजते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

गल्लत होतीये...

धन्या
Sat, 08/06/2011 - 19:41 नवीन
हल्ली मिपावर त्यांचे ' वर्च्युअल काका' आल्याचे समजते.
प्यारेजी "काका" शब्द वापरुन तुम्ही गल्लत करत आहात असे आम्हास खेदाने म्हणावेसे वाटते. थत्ते चाचांनी गणनायक नातलगांचे विचार इथे उधृत करताना "आमच्या एका मित्राचे खालील विचार आम्हाला पटतात." अशी वाक्यरचना करून त्यांचा मित्र असा उल्लेख केला आहे. तुम्ही मात्र उगाचच त्यांचे काका पुतण्याचे नाते दाखवून जालावरचा काका - पुतण्या असा सनातन वाद पुन्हा एकदा उकरून काढत आहात असे आम्हास वाटते. (दोन वर्षांपूर्वी एका जालीय काकाचा धसका घेतलेला) धनाजीराव वाकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

म्हातारे कोण?

बाळकराम
Mon, 08/08/2011 - 00:43 नवीन
सॉरी हं, पण माझा कुणाला म्हातारा वगैरे म्हणण्याचा उद्देश नव्हता हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

मालक, तुमचे मुद्दा क्रमांक १

धन्या
Sat, 08/06/2011 - 18:48 नवीन
मालक, तुमचे मुद्दा क्रमांक १ आणि २ पुर्णपणे पटले. तुम्ही जे लिहिले आहे ते गृहकर्जच नाही तर बँकेकडून घेतलेल्या कुठल्याही कर्जाला लागू होते. परंतू मुद्दा क्रमांक ३ पासून मात्र तुम्ही तुमच्या आधीच्याच प्रतिसादांची री ओढलेली आहे.
जर घरांच्या किंमती पडल्या आणी बाजुचे घर अर्ध्या किंमतीत / अर्ध्या हप्तामध्ये मिळु लागले तर आधी घेतलेले कर्ज हे घेणार्‍यासाठी बॅड इव्हेस्ट्मेंट ठरते. जेव्हा शेअर बासारात कींमती पडु लागतात तेव्हा जास्त नुकसान टाळण्यासाठी लोक शेअर्स विकतात. ईथे तुम्ही बँकेला केलेल्या करारा नुसार घर परत देत अहात. यात कसली फसवा-फसवी नाही. सर्व काही करारा नुसार, कायदेशीर पणे केले जाते.
आधी घेतलेले कर्ज हे घेणार्‍यासाठी बॅड इव्हेस्ट्मेंट ठरणे हा घर घेणाराचा प्रॉब्लेम आहे, बँकेचा नाही. तुम्ही म्हणत आहात तसं बँकेशी केलेल्या करारानुसार तुम्ही घर बॅंकेला परत करत आहात हे लॉजिकली अगदी बरोबर आहे. परंतू याच्या अनुषंगाने तुम्ही जे म्हणताय की या सर्व बाबींमूळे यात कसलीही फसवा-फसवी नाही हे मात्र पुर्णपणे चुकीचे आहे. कारण जेव्हा केलेल्या करारानंतर जेव्हा आपण घर बॅंकेला परत करण्याचा निर्णय घेतो, त्यानंतर घडणारा घटनाक्रम लक्षात घेता असं म्हणावंसं वाटतं की ही फसवणूकच आहे. नव्हे, ही "कॅल्क्युलेटेड" फसवणूक आहे. तुम्ही करारानूसार बॅकेला घर परत करायला जाणार, बँकेला घर परत घेणं कुठल्याच दृष्टीने परवडणार नाही. अगदी घर ताब्यात घेऊन सपाट जमीन करण्यासाठी बुलडोझर चालवायचा म्हटला तरी भुर्दंड बँकेलाच बसणार. हे सगळं टाळण्यासाठी बँक झक मारुन घराची किंमत कमी लावून घराचे हप्ते अर्ध्यावर आणणार... हरिदासाची कथा पुन्हा मुळ पदावर आली ना भाऊ... :)
आता अर्धे कर्ज माफ करुन घेण्याविशयी-
या मथळ्याखालील पहिले चार मुद्दे वरील स्पष्टीकरणाशीच येऊन थांबतात. पाचव्या मुद्दयात मात्र तुम्ही स्वतःच तुमच्या आधी मांडलेल्या मतांशी फारकत घेत आहात असे वाटते. आतापर्यंत तुम्ही सर्व वस्तुस्थितीचा अभ्यास करुन बँकेशी केलेला आधीचा करार मोडून घराची किंमत किंवा घराचे हप्ते अर्ध्यावर आणायला मजबूर (हा शब्द मराठी नाही. मराठी शब्द "असहाय्य" असा काहीसा आहे.) कसे करता येते हे विस्ताराने मांडले आहे. आणि पाचव्य मुद्दयात मात्र तुम्ही चक्क पलटी मारली आहे. (इथे मी घूमजाव हा हिंदी शब्द वापरण्याचा मोह टाळला आहे हे अतिशय नम्रपणे सुचित करु ईच्छीतो.) पाचव्या मुद्दयात आपण चक्क या सार्‍याला बॅंकेलाच जबाबदार धरले आहे. म्हणजे आपण सारी गणितं जुळवून, आपली पत (क्रेडीट) पणाला लावून बँकेला पद्धतशीर गंडवायचं आणि वरुन मग आपणच बँकेने केलेल्या अनिर्बंध कर्ज वाटपामुळे हे सारं झालं अशी बोंब मारायची... वा राव... चांगलंय.... आपलाच, (एकेकाळी सॅन फ्रान्सिस्को बे एरीयाचा रहीवासी असलेला बँक ऑफ अमेरिकेचा ग्राहक) धनाजीराव वाकडे (या प्रतिसादातील मते हे केवळ आपण मांडलेल्या मतांवरचं माझं मत प्रदर्शन आहे. कृपया ही मते वैयक्तिक टीपणी म्हणून घेऊ नये. :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

बँकांच्या गृहकर्जाविषयी माहिती

चित्रगुप्त
Sat, 08/06/2011 - 09:35 नवीन
बँकांच्या गृहकर्जाविषयी नेमकेपणे सविस्तर माहिती दिलीत हे फार चांगले केले. हा धागा अनिवासींच्या जास्त कामाचा असला, तरी त्यानिमित्ताने इथे घडून आलेली चर्चा व मिळालेली माहिती पुष्कळांच्या कामास येण्यासारखी आहे. प्रतिसांदांबद्दल सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments

विविध देशांमधील ...

कुंदन
Sat, 08/06/2011 - 17:01 नवीन
पैसे विविध देशांमधील मित्रांकडुन उधारीवर घ्यावेत , अन अशा देशात घर घ्यावे की जिथे कोणी घेणेकरी पोहोचणार नाही.
  • Log in or register to post comments

पैसे विविध देशांमधील

धन्या
Sat, 08/06/2011 - 18:53 नवीन
पैसे विविध देशांमधील मित्रांकडुन उधारीवर घ्यावेत , अन अशा देशात घर घ्यावे की जिथे कोणी घेणेकरी पोहोचणार नाही.
नेत्रेशे रचिला पाया | कुंदन झालासे कळस || :D नेत्रेशभाऊ आणि कुंदनराव, दोघांनीही ह. घे. हे. वे. सां. न. ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

नेत्रेशे रचिला पाया ?

नेत्रेश
Tue, 08/09/2011 - 00:00 नवीन
माझा सल्ला हा मित्र / नातेवाईकांकडुन उधारीवर घेतलेल्या पैशांबाबत कधीच नव्हता. आपल्या अडचणीच्यावेळी त्यांनी आपले स्वतःचे पैसे काढुन देलेले असतात. पैसे कर्जावर देणे व त्यावर व्याज घेउन नफा कमावणे हा त्यांचा उद्येश नसतो. तेव्हा ते पैसे प्रसंगी स्वतः उपाशी राहुनही फेडावेत असे माझे मत आहे. माझा सल्ला हा कट-द-लॉस हा आहे. तुमचा संपुर्ण कर्ज फेडण्याचा सला हा कीतीही आदर्शवादी असला तरी या परीस्थीतीत तो पाळणे शक्य नाही. घेतलेले कर्ज फेडता न आल्यामुळे संपुर्णपणे दीवाळखोरीत जाउन आपण स्वतः आणी बँकेचे पैसे हे दोन्ही संपुर्ण बुडण्यापेक्षा बँकेबरोबर निगोशीयेट करुन दोघांनीही थोडा-थोडा लॉस सहन करुन मध्यम मार्ग काढावा असा माझा सल्ला आहे. अडचणीत आलेल्या बिझनेसना मदत करण्यासाठी कर्ज कमी करण्यापासुन व्याज माफ करण्यापर्यंत सवलती जगभरातील बँका देत असतात. परवडत नसताना कर्ज चुकवीता चकवीता बिझनेस बुडणे हे बँकांनाही परवडणार नाही. शेवटी बँकाना पैसा उद्योगांना कर्ज देउनच मिळत असतो. बिझनेस्/उद्योग आणी ग्राहक टीकले तर बँका टीकतील. तेव्हा बिझनेस मध्ये आदर्शवाद चुकीच्या ठीकाणी वापरुन सर्वांचेच नुकसन करण्यापेक्षा सर्वांना मान्य होईल असा मार्ग काढणे केव्हाही श्रेयस्कर. जर तुम्हाला असे वाटत असेल की मी कुणाला फसवणुकीचा, गंडवण्याचा सल्ला दीलेला आहे, तर तुम्हाला माझे म्हणणे अजुनही कळलेले नाही. या पेक्षा चांगले समजाऊन सांगणे मला तरी जमणार नाही, पण इथे बर्‍याचजणांना माझे म्हणणे समजलेले आणी पटलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

नेत्रेशभाऊ, तुमची मते तुम्ही

धन्या
Tue, 08/09/2011 - 05:08 नवीन
नेत्रेशभाऊ, तुमची मते तुम्ही मांडलीत. माझी मते मी मांडली. आपले या मुद्दयावर एकमत व्हायलाच हवं असं नाही. वरचा प्रतिसाद मी गंमतीत लिहिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, कृपया माझा प्रतिसाद हलकेच घ्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

मु.पो.वाकडेवाडी

गजा गाजरे
Sat, 08/06/2011 - 21:08 नवीन
अम्हि मराठी ........हो का........मग मराठी तच बोला कि......... @वाकडेराव .....आमचे हे आसेच आस्ते.......वाकड्यात लिहिणे.... मु.पो.वाकडेवाडी - गजा ....
  • Log in or register to post comments

@वाकडेराव .....आमचे हे आसेच

धन्या
Sun, 08/07/2011 - 01:06 नवीन
@वाकडेराव .....आमचे हे आसेच आस्ते.......वाकड्यात लिहिणे....
आमच्या नावावर केलेली कोटी आम्हास विशेष आवडली. आम्ही आपल्या प्रतिसादाला उत्तर देऊन झाल्यावर लिहिलं होतं की पटतंय का बघा म्हणून. तुमच्या प्रतिसादावरून तुम्हाला माझं म्हणणे पटलेले दिसत नाही. हरकत नाही. वी अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री :) तुमच्या प्रतिसादाच्या स्वरुपावरून एक शंका आली, ती लागलीच विचारुन घेतो. तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहात काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गजा गाजरे

श्री. वाकडे साहेब

गजा गाजरे
Mon, 08/08/2011 - 03:34 नवीन
कोणत्या पक्षाचा झेण्डा घेऊन आम्ही मराठी च्या बोबा मारत नाही......आमची वा़कडेगिरी ही एकटयाची......... आपली मैत्री अशीच राहु दे.......
  • Log in or register to post comments

कोणत्या पक्षाचा झेण्डा घेऊन

धन्या
Mon, 08/08/2011 - 04:28 नवीन
कोणत्या पक्षाचा झेण्डा घेऊन आम्ही मराठी च्या बोबा मारत नाही.
हरकत नाही. पण तो विचारु करु शकता. झिंदाबाद, मुर्दाबाद करायला पक्षांना कार्यकर्ते लागतातच की ;)
आपली मैत्री अशीच राहु दे.......
अगदी माझ्या मनातलं बोललात.. फक्त तेव्हढं मराठी सुधारायचं पाहा... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गजा गाजरे

राम राम

गजा गाजरे
Tue, 08/09/2011 - 14:41 नवीन
पण तो विचारु करु शकता. झिंदाबाद, मुर्दाबाद करायला पक्षांना कार्यकर्ते लागतातच की मला वाटते ते तुम्हाला चागले जमेल.....मिपा वर नाव आहे तुमचे राजे.........पाउसा सारख्या प्रतिक्रिया पाड्ता की राव तुम्ही............... फक्त तेव्हढं मराठी सुधारायचं पाहा... ते तर होइलच .......इथे लेखक कमी अणि तुमच्यासारखे खेचाखेचीकारा भरपुर आहेत......तेव्हा ते तर हवेच ....नाहि काय.............
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा