✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

परदेशात घर विकत घ्यावे का? असल्यास काय काळजी घ्यावी?

च
चित्रगुप्त यांनी
Fri, 08/05/2011 - 02:07  ·  लेख
लेख
अमेरिकेत काही वर्षांपासून रहात असलेल्या एका परिचिताने (घरभाड्याएवढा मासिक हप्ता देऊन स्वतःचे घर होईल या विचाराने) घर विकत घेतले, आता त्यांनी दुसर्‍या शहरात नोकरी धरली, तसेच मुली झाल्याने काही वर्षांनंतर भारतात परत जाण्याचा विचार करत आहेत, परंतु घेतलेले घर विकले जात नाही, व भाडेही पुरेसे मिळत नाही, अशी पंचाईत झाली आहे. यावर काय उपाय आहे, एकूणच परदेशात घर विकत घेण्यात काय काय फायदे- तोटे असतात? घ्यायचेच असेल तर काय काय काळजी घ्यावी?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24117 वाचन

💬 प्रतिसाद (98)

प्रतिक्रिया

फ्लोरीडा मधे शोर्ट टेर्म

जानम
Fri, 08/05/2011 - 03:06 नवीन
फ्लोरीडा मधे शोर्ट टेर्म गुन्तव्नुक ठिक नाही (मिन डाउन २५%) टोरोन्टॉ, वेनुव्र्र लोन्ग टेर्म साटी ठिक ...(मिन डाउन २५%) सिन्गपोर वा होन्कोन्ग लोन्ग टेर्म साटी ठिक ... (मिन डाउन ५०%) अवान्तर : "मुली झाल्याने काही वर्षांनंतर भारतात परत जाण्याचा विचार करत आहे", मुलगा झाला अस्ता तर..?
  • Log in or register to post comments

जानम...

भारी समर्थ
Fri, 08/05/2011 - 12:16 नवीन
अवान्तर : "मुली झाल्याने काही वर्षांनंतर भारतात परत जाण्याचा विचार करत आहे", मुलगा झाला अस्ता तर..?
जानम समझा करो ना यार... भारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानम

मुली झालेमुळे खरोखरच वाईट झाले

वेताळ
Fri, 08/05/2011 - 12:48 नवीन
आता त्याना ज्या भागात खाप पंचायत पावरफुल चालते अश्या ठिकाणी स्थाईक व्हा म्हणुन सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारी समर्थ

घरघर!

पिवळा डांबिस
Fri, 08/05/2011 - 03:38 नवीन
"मुली झाल्याने काही वर्षांनंतर भारतात परत जाण्याचा विचार करत आहे" मलाही हे खटकलं... याबाबत अधिक स्पष्टीकरण द्याल का? किंवा तो शब्दप्रयोग कृपया वगळाल का? (धाग्याचं काश्मीर होऊ नये म्हणून नम्रपणे विचारणा करीत आहे) आता मूळ विषयाबद्दलः १. ज्या कुठल्या देशात घर घेणार तिथली किमान पर्मनंट रेसिडेन्सी असल्याशिवाय तिथे घर घेऊ नये. २. घराच्या एकूण किंमतीच्या किमान २०% डाऊन करायची तयारी ठेवावी. ३. उरलेल्या कर्जाची परतफेड आपल्याला करता येण्याजोगे आपले उत्पन्न आहे याची खात्री करून घ्यावी. ४. मासिक खर्चात फक्त कर्जाचा हप्ताच नसतो तर आणखी प्रॉपर्टी वगैरे टॅक्सेससुद्धा असतात हे ध्यानात घ्यावं ५. अपार्टमेंटमधून घरात गेल्यावर इतर सर्व बिले (वीज, पाणी, इत्यादि) वाढतात याची जाणीव असू द्यावी ६. घर घेतल्यानंतरही त्या घरात आपल्याला हवे तसे खर्च (काही डागडुजी, काही फेरफार, फर्निचर इत्यादि) करण्यासाठी किमान २० ते ३० हजार डॉलर्स (अमेरिकेत घर असल्यास) बाजूला काढून ठेवलेले असावेत. ७. या सर्वांव्यतिरिक्त आपल्या दरमहा घरखर्चाच्या (ह्प्ता धरून) किमान ८ ते १० पट रक्कम बॅन्केत असावी. म्हणजे घर घेतलं आणि जर जॉब गेला तर किमान ८ ते १० महिने तरी रस्त्यावर पडायची वेळ येणार नाही. सारांश काय, तर घर घेण्याइतकी आपली आर्थिक पात्रता आहे याची खात्री करून घेऊनच मग या फंदात पडावं. अमेरिकेतला आजचा रियल इस्टेट क्रायसिस उद्भवण्याचे प्रमुख कारण (तशी बरीच कारणे आहेत पण हे प्रमुख) हे बर्‍याच लोकांनी आपली परतफेड करण्याची पात्रता लक्षात न घेता हावरटपणे घरं घेतली हे आहे. घर घेण्याचे फायदे बरेच आहेत. इक्विटि बिल्डअप, टॅक्स ब्रेक, फॅमिलीसाठी भरपूर मोकळी जागा, सोशल स्टॅन्डिंग, मुलांसाठी आवडीची शाळा, लाईन ऑफ क्रेडिट इत्यादि इत्यादि. पण ते सर्वांना ठाउक असल्याने इथे लिहित नाही.
  • Log in or register to post comments

मुली झाल्याने...

पंगा
Fri, 08/05/2011 - 04:01 नवीन
"मुली झाल्याने काही वर्षांनंतर भारतात परत जाण्याचा विचार करत आहे" मलाही हे खटकलं...
ही विचारपद्धती पाहिलेली आहे. ज्या गृहीतकांवर ती आधारलेली असावी असे वाटते त्यावरून ती खटकण्यासारखी आहे, असे मलाही वाटते. परंतु शेवटी हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असल्याने त्यात अधिक लक्ष घातलेले नाही. बाहेरच्यांनी निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करण्याइतका थ्रेशोल्ड यात ओलांडला गेला आहे, असे मला वाटत नाही.
याबाबत अधिक स्पष्टीकरण द्याल का?
मला वाटते स्पष्टीकरण (१) ऑबवियस असावे, आणि (२) विशेषतः सदर लेखकाने स्वतःच्या मुलींच्या संदर्भात स्वतःचा निर्णय अथवा त्याबद्दलचे मत व्यक्त केलेले नसून केवळ दुसर्‍या कोणाचेतरी मत निव्वळ उद्धृत केलेले आहे या कारणास्तव, सदर लेखकाकडून त्याचे स्पष्टीकरण हे अ‍ॅट बेस्ट अंदाजात्मक आणि अनरिलायेबल आणि अ‍ॅट वर्स्ट अशी मागणी अस्थानी असावी. सबब, अशा स्पष्टीकरणाची चर्चा न झालेलीच बरी, असे मला तरी वाटते. चुकीच्या स्रोतावरून मिळालेल्या अविश्वसनीय (अनरिलाएबल अशा अर्थी), अर्धवट आणि तर्कात्मक माहितीच्या आधारावर झालेल्या चर्चेतून निष्पन्न झालेला कोणताही निष्कर्ष हा शंकास्पद ठरावा. (उपरोल्लेखित मित्राकडून त्याचे मत थेट अश्वमुखातून कळल्यास गोष्ट वेगळी.) मात्र,
किंवा तो शब्दप्रयोग कृपया वगळाल का?
ही अपेक्षा योग्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

+०.५

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/05/2011 - 04:22 नवीन
ही विचारपद्धती पाहिलेली आहे. ज्या गृहीतकांवर ती आधारलेली असावी असे वाटते त्यावरून ती खटकण्यासारखी आहे, असे मलाही वाटते. परंतु शेवटी हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असल्याने त्यात अधिक लक्ष घातलेले नाही. बाहेरच्यांनी निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करण्याइतका थ्रेशोल्ड यात ओलांडला गेला आहे, असे मला वाटत नाही.
याच्याशी सहमत. धागालेखकाचे हे मत नाही हे मान्य आहे. पण म्हणून यावर चर्चाच नको याबाबतीत असहमती. या धाग्यावर नको हे मान्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

धागालेखकाचे हे मत नाही हे

धन्या
Fri, 08/05/2011 - 04:27 नवीन
धागालेखकाचे हे मत नाही हे मान्य आहे. पण म्हणून यावर चर्चाच नको याबाबतीत असहमती. या धाग्यावर नको हे मान्य.
आम्हाला आपलं उगाचंच दोन वकील शब्दांचा कीस पाडत आहेत असं वाटलं वरचे दोन प्रतिसाद वाचून :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

+१ मलाही काही प्रतिसादकर्ते

पक्या
Fri, 08/05/2011 - 09:05 नवीन
+१ मलाही काही प्रतिसादकर्ते शब्दांचा खिस पाडत आहे असे वाटत आहे. धागाकर्त्याला 'अपत्य झाल्याकारणाने मित्र भारतात परतण्याचा विचार करत आहे ' असे सांगावयाचे असेल. मुली झाल्या म्हणून तिथे मुली असे लिहीले आणि मुलगे झाले असते तर त्यानी मुले वा मुलगे असे लिहीले असते. अपत्य असलेली बरीच कुटुंबे माझ्या पहाण्यात आहेत जी मुलांच्या भविष्याचा विचार करून भारतात कायमची परतली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अपत्य असलेली बरीच कुटुंबे

मराठी_माणूस
Fri, 08/05/2011 - 09:08 नवीन
अपत्य असलेली बरीच कुटुंबे माझ्या पहाण्यात आहेत जी मुलांच्या भविष्याचा विचार करून भारतात कायमची परतली आहेत. सहमत. माझ्याही पहण्यात आहेत. त्यमुळे त्यात काही तरी तथ्य असणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

एक प्रकारचा विषाद वाटला ते

शुचि
Fri, 08/05/2011 - 04:30 नवीन
एक प्रकारचा विषाद वाटला ते वाक्य वाचून. त्यावर चर्चा तरी काय करायची आणि मतं तरी कोणाची बदलायची असं वाटून राहीलं. चर्चेनी लोकांची मतं बदलतात पण ते जर खुले असतील नव्या विचारांसाठी तरच. फक्त विषाद दाटून येतो. हे मत धागाकर्त्याचे नाही हे माहीत आहे. चर्चा जरूर व्हावी. सहभाग घेतला जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कारण

पंगा
Fri, 08/05/2011 - 04:46 नवीन
धागालेखकाचे हे मत नाही हे मान्य आहे. पण म्हणून यावर चर्चाच नको याबाबतीत असहमती.
कारण एवढेच की (इथे नसलेल्या) दुसर्‍याच्या (सपोज़ेड) मताबद्दल तिसर्‍याशी वाद घालणे निराधार आहे, म्हणून. (धागालेखकाने 'हे माझे मत आहे आणि या-या कारणांस्तव आहे' असे म्हटले, तर गोष्ट वेगळी. अन्यथा अशी चर्चा ही काही गृहीतकांच्या आधारावर हवेत तीर मारणे ठरेल.) बाकी कोणी कोठे आणि कोणत्या कारणास्तव रहावे किंवा राहू नये याबद्दलचा निर्णय हा वैयक्तिक आहे, आणि त्रयस्थाने ('असे करू का' असा सल्ला निर्णय घेणार्‍याने स्पेसिफिकली विचारल्याखेरीज) त्यात (व्यक्तिगत पातळीवर) हस्तक्षेप करण्याइतका थ्रेशोल्ड यात ओलांडला जातो, असे मला तरी वाटत नाही. मग भले माझी या विषयावरील धारणा काहीही असो आणि मला हा (दुसर्‍याचा त्याच्या स्वतःच्या बाबतीतील) निर्णय किंवा त्यामागील कारण कितीही न पटो. तूर्तास एवढेच. (अर्थात, हे माझे मत झाले.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आहाहाहा !!

अर्धवटराव
Sat, 08/06/2011 - 01:20 नवीन
बाकि ते "मुली असल्याचे" मुद्दे बाजुला राहु देत. ज्या वकिली भाषेत तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्याला दाद दिल्यावाचुन राहावत नाहि. भाषासौंदर्याचा असाहि नमुना. त्यात इंग्रजी शब्द फार आलेत, पण त्याला पर्यायी मराठी शब्द वापरले असते तर मला कळलं असतं का हिच शंका :( (मराठी प्रेमी) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

सहमत !!!

धन्या
Sat, 08/06/2011 - 19:13 नवीन
या लेखावरील पंगाशेठच्या प्रतिक्रिया वाचताना मला मी बाबा कदमांच्या कादंबरीतील एखाद्या वकील पात्राचे लांबलचक संवाद तर वाचत नाहीये ना असं वाटत होतं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

आसं आसं!!!!

पिवळा डांबिस
Sat, 08/06/2011 - 11:22 नवीन
श्री. चित्रगुप्त हे आमचे जुने स्नेही आहेत. तेंव्हा त्यांच्या धाग्याचा काश्मीर होऊ नये केवळ याकरताच आत्तापर्यंत गप्प होतो... पण आता श्री. चित्रगुप्त यांनीच स्वतःच्या धाग्याचा काश्मीर करायचा असे ठरवेलेले दिसते.. http://www.misalpav.com/node/18714#comment-327916 मग आता आम्हाला गप्प रहायचे काही कारण नाही... अशी मागणी अस्थानी असावी. तीव्र असहमत! मिपावर जो लेखक लिहितो त्याच्यावर ते त्याचे स्वतःच मत असो अथवा हियरसे असो, ते शब्द लिहिण्याची अंतिम जबाबदारी रहातेच. मला वाटत नाही की चित्रगुप्त यांच्या मित्राने त्यांच्यावर "बाबा, हे जरा शब्दशः असंच मिपावर लिही आणि काय प्रतिक्रिया येतात ते मला कळव" अशी जबरदस्ती केली असेल. आणि तसं जरी म्हंटलं असलं तरी शेवटी काय लिहायचं आणि काय नाही याचं तारतम्य स्वतः लेखकानं बाळगायलाच हवं. वरील धाग्यातील "मुलगी झाल्याने" हा शब्दप्रयोग दुर्दैवी आणि निषेधार्ह आहेच. लेखकाला जर तसे खरोखर वाटत असेल तर तो त्यांच्या मित्राने जरी वापरला तरी लेखकाने तो टाळायला हवा होता. जर लेखकाला खरोखरी तसे वाटत नसेल तर मग लेखकाचा निषेध करण्यात काहीही गैर नाही!!!!!!!!! त्या शब्दप्रयोगाबद्दल अधिक स्पष्टीकरण मागण्याचे कारण हेच की निव्वळ त्या दोन शब्दांखातर निषेध व्य्क्त करण्याआधी लेखकाला त्याचे जर काही स्पष्टीकरण असेल तर ते व्यक्त करण्याची संधी मिळावी. त्यात काहीही गैर आहे असे मला वाटत नाही. ही अपेक्षा योग्य वाटते. मला काहीही फिकीर पडलेली नाही..... श्री पंगा यांनी उगाचच स्वतःला संपादक समजून काय योग्य आणि काय अयोग्य याचा उहापोह चालवला आहे. करू दे त्यांना बिचार्‍यांना! पण आय डोन्ट केअर!!! श्री. पंगा यांची या धाग्याच्या मूळ विषयावर प्रतिक्रिया द्यायची क्षमता ही अतिशय मर्यादित आहे हे त्यांच्या खालील "ऐकीव माहितीवरून' या प्रतिसादावरून स्पष्ट होतंच आहे.... उगाच एखादी प्रतिक्रिया पकडायची आणि आपण स्वतः त्या धाग्यातील मूळ चर्चेत काहीही भर न टाकता उगाच त्या प्रतिक्रियेतील एखाद्या शब्दप्रयोगाचा कीस काढत आपली विद्वत्ता दाखवण्याचा आभास व्यक्त करायचा ही शैली आम्हा मिपाकरांना काही नवीन नाही. ज्यांना त्यामुळे प्रभावित व्हायचं असे त्यांना होऊदेत बिचारे, पण मी वरती म्हटल्याप्रमाणे 'आय डोन्ट केअर!!!!' -पंडित पिवळा डांबिस पंडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

मलाही...

पंगा
Sat, 08/06/2011 - 23:52 नवीन
...आपल्याबद्दल अतीव आदर आहे. प्रशंसेबद्दल आभारी आहे. :) बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

...आपल्याबद्दल अतीव आदर

पिवळा डांबिस
Mon, 08/08/2011 - 07:12 नवीन
...आपल्याबद्दल अतीव आदर आहे. सेम हियर... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

अपार्टमेंटचे भाडे भरावे

शुचि
Fri, 08/05/2011 - 04:20 नवीन
अपार्टमेंटचे भाडे भरावे लागतात शिवाय घर आपलं होत नाही ते नाहीच. वरील सविस्तर प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

दीर्घकालीन उद्दिष्टांवर अवलंबून आहे

पंगा
Fri, 08/05/2011 - 04:27 नवीन
देशात दीर्घकाळाकरिता रहावयाचे नसेल, तर अर्थात भाड्यानेच अपार्टमेंट घेणे इष्ट आहे. तसेच वारंवार बदलीची नोकरी असल्यास बहुधा घर विकत घेणे कठीण जावे. एक घर विकून दुसरे विकत घेणे (किंवा किमानपक्षी असलेले घर विकणे) हे (विशेषतः आजच्या इकॉनॉमीत) तितके सोपे नाही, आणि त्यात आर्थिक नुकसानाची शक्यताही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

परतफेड करण्याची पात्रता लक्षात न घेता हावरटपणे घरं घेतली हे आहे.

कुंदन
Fri, 08/05/2011 - 08:11 नवीन
>>परतफेड करण्याची पात्रता लक्षात न घेता हावरटपणे घरं घेतली हे आहे. कमाल आहे. बँकांनी अशा लोकांना कर्ज कसे दिले ? अशा लोकांची पत तपासली गेली नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

बँकेचा हप्ता देणे बंद करावे

नेत्रेश
Fri, 08/05/2011 - 04:06 नवीन
परवडत नसेल तर बँकेचा हप्ता देणे बंद करावे. जो पेर्यंत बँक अर्धे लोन माफ करत नाही, किंवा हप्ता परवडेल एवढा खाली आणत नाही किंवा घर ताब्यात घेत नाही, तो पर्यंत बँकेला पैसे न देता फक्त भाडेकरु कडुन भाडे घेत रहावे. या बेकार परीस्थीतीत घराचा ताबा घेण्यापेक्षा किणतीही बँक दोन-चार महीन्यानी नक्कीच ३० ते ५०% कर्ज माफ करेल. या पर्यायाकडे शेवटचा पर्याय म्हणुन पहावे. यात बेकायदेशी असे काही नाही. सर्व मोठ्या कंपन्या आणी बँका सुद्धा त्यांचा वाईट गुंतवणुकीचे हेच करत असतात. > "मुली झाल्याने काही वर्षांनंतर भारतात परत जाण्याचा विचार करत आहे" > मलाही हे खटकलं... याबाबत अधिक स्पष्टीकरण द्याल का मुली १५ / १६ वर्षांच्या झाल्यावर ईकडच्या रुढीनुसार वेगळ्या / बॉयफ्रेंड बरोबर (लग्न न करता) राहु लागतील या भीतीने कित्येक लोक मुली ८ - १० वर्षांच्या झाल्यावर परत येतात. मुलीचे लग्न होईपर्यंत तीची जबाबदारी पालकांची हे मनावर बिंबले असल्यामुळे असेल कदाचित.
  • Log in or register to post comments

परवडत नसेल तर बँकेचा हप्ता

धन्या
Fri, 08/05/2011 - 04:38 नवीन
परवडत नसेल तर बँकेचा हप्ता देणे बंद करावे. जो पेर्यंत बँक अर्धे लोन माफ करत नाही, किंवा हप्ता परवडेल एवढा खाली आणत नाही किंवा घर ताब्यात घेत नाही, तो पर्यंत बँकेला पैसे न देता फक्त भाडेकरु कडुन भाडे घेत रहावे. या बेकार परीस्थीतीत घराचा ताबा घेण्यापेक्षा किणतीही बँक दोन-चार महीन्यानी नक्कीच ३० ते ५०% कर्ज माफ करेल.
हे बरं आहे राव... परिस्थिती किंवा सिस्टीममधील लुपहोल्सचा असा गैरफायदा घ्यायचा का? त्यापेक्षा आपणच आपली औकात पाहून पाय पसरले तर?
या पर्यायाकडे शेवटचा पर्याय म्हणुन पहावे. यात बेकायदेशी असे काही नाही.
अशी आपणच आपली समजूत घालायची का?
सर्व मोठ्या कंपन्या आणी बँका सुद्धा त्यांचा वाईट गुंतवणुकीचे हेच करत असतात.
त्या मोठया कंपन्या आणि बँकांना काय काशी घालायची ती घालू दया. आपण जेव्हा घर घेतो ती आपली वाईट गुंतवणुक असते का? असं कुणी परदेशात घर घेण्यासाठी/घर घेतल्यावर करत असेल तर तो (अनिवासी*) भारतीय आपल्या देशाचं नाव रोशन वगैरे करतोय असे म्हणायला हरकत नाही :) *सामान्य निवासी भारतीय परदेशात घर घेण्याच्या भानगडीत पडणार नाही असं मी गृहीत धरले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

मुली झाल्याने काही वर्षांनंतर भारतात परत

चित्रगुप्त
Fri, 08/05/2011 - 09:08 नवीन
सदर व्यक्तीच्या भारतात राहणार्‍या पालकांकडून असे कळले की नेत्रेश यांनी लिहिल्याप्रमाणे: "मुली १५ / १६ वर्षांच्या झाल्यावर ईकडच्या रुढीनुसार वेगळ्या / बॉयफ्रेंड बरोबर (लग्न न करता) राहु लागतील या भीतीने कित्येक लोक मुली ८ - १० वर्षांच्या झाल्यावर परत येतात... ......हेच त्यांचे कारण आहे. त्यांचेच एक भाऊ सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले, त्यांच्या दोन मुलींची लग्ने अद्याप होऊ शकली नाहीत, (आता त्यांना तशी शक्यताही फार कमी वाटते) तिकडल्या पद्ध्तीप्रमाणे मुलींना स्वातंत्र्य दिले नसावे (सातच्या आत घरात) (अर्थात हा भारतात राहणार्‍या त्यांच्या भावाचा अंदाज आहे) तसेच भारतातून अमेरिकेत जाणारे उपवर तरूण भारतातच वाढलेल्या मुलींशी लग्न करणे पसंत करतात, असा त्यांचा वर- संशोधनाचे बाबतीतला अनुभव आहे. ..... घरचेच असे उदाहरण असल्याने त्यांना असे वाटणे साहजिक वाटते. ...... मुलीचे लग्न होईपर्यंत तिची जबाबदारी पालकांची .... ही भारतीय लोकांतील रूढी गैर आहे, असे मानता येत नाही. "मुली झाल्याने" हे शब्द धाग्यातून काढून टाकण्यास मला काहीच अडचण नाही, तरी हा मुद्दा ही हल्लीची एक वस्तुस्थिती आहे, त्यावर चर्चा होणे अप्रशस्त नाही, असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

प्रकाटाआ

धन्या
Fri, 08/05/2011 - 04:37 नवीन
चुकीच्या जागी दिलेला प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments

गैरफायदा ?

नेत्रेश
Fri, 08/05/2011 - 04:45 नवीन
> परिस्थिती किंवा सिस्टीममधील लुपहोल्सचा असा गैरफायदा घ्यायचा का? अहो गैरफायदा कसला, हा उपाय फायद्यासाठी नसुन नुकसान कमी करण्यासाठी आहे. आणी करारानुसार बॅंकेला घर ताब्यात घ्यायचा अधीकार आहेच की. हप्ता देणे बंद करणे = नुकसान कमी करणे = हा निव्वळ बिझनेस डीसीजन झाला. आता सरकारने व्याजाचा दर वाढवला तर बँक कर्जाचा हप्ता वाढवतेच ना? ईथे मुळात बँकेने जास्त व्याजाच्या लोभाने अवास्तव कर्ज देउन चुक केली आहे. > त्यापेक्षा आपणच आपली औकात पाहून पाय पसरले तर? कर्ज देण्या आधी औकात जोखण्याचे काम बँकेचे असते. बँकेने कर्ज दीले म्हणुन तर त्याने घ घेतले. > असं कुणी परदेशात घर घेण्यासाठी/घर घेतल्यावर करत असेल तर तो (अनिवासी*) भारतीय आपल्या देशाचं नाव रोशन वगैरे करतोय असे म्हणायला हरकत नाही असे करण्याचे प्रमाण अमेरीकन लोकांलध्येच जास्त आहे. भारतीय लोक परवडत नसतानाही कर्ज फेडीत बसतात - बिझनेस सेंन्स कमी आणी चुकीच्या समजुतींचा पगडा. > *सामान्य निवासी भारतीय परदेशात घर घेण्याच्या भानगडीत पडणार नाही असं मी गृहीत धरले आहे. गृहीतक चुकीचे आहे. ५-६ वर्षांच्या वास्तव्यानंतर (स्टेब जॉब आणी ग्रीनकार्ड मिळाल्यावर) बहुतेक लोक घर घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

बापरे...

धन्या
Fri, 08/05/2011 - 05:06 नवीन
अहो गैरफायदा कसला, हा उपाय फायद्यासाठी नसुन नुकसान कमी करण्यासाठी आहे. आणी करारानुसार बॅंकेला घर ताब्यात घ्यायचा अधीकार आहेच की. हप्ता देणे बंद करणे = नुकसान कमी करणे = हा निव्वळ बिझनेस डीसीजन झाला.
आधी न झेपणार्‍या हप्त्यांचे घर घ्यायचे नंतर बँकेचे हप्ते देणे बंद करायचे. मार्केटच्या स्थितीमुळे घर ताब्यात घेणे बँकेला परवडणारे नसते त्यामुळे मग बँक झक मारुन तडजोडीला तयार होते. आणि घराचे हप्ते कमी करते... या सगळ्याला बिझनेस डीसीजन म्हणायचं... अवघड आहे :)
कर्ज देण्या आधी औकात जोखण्याचे काम बँकेचे असते. बँकेने कर्ज दीले म्हणुन तर त्याने घ घेतले.
पुन्हा चेंडू बँकेच्याच कोर्टात :)
असे करण्याचे प्रमाण अमेरीकन लोकांलध्येच जास्त आहे. भारतीय लोक परवडत नसतानाही कर्ज फेडीत बसतात - बिझनेस सेंन्स कमी आणी चुकीच्या समजुतींचा पगडा.
अरेरे... आम्हा भारतियांना बिझनेस करण्याची अक्कल कधी येणार...
> *सामान्य निवासी भारतीय परदेशात घर घेण्याच्या भानगडीत पडणार नाही असं मी गृहीत धरले आहे. गृहीतक चुकीचे आहे. ५-६ वर्षांच्या वास्तव्यानंतर (स्टेब जॉब आणी ग्रीनकार्ड मिळाल्यावर) बहुतेक लोक घर घेतात.
माहितीसाठी धन्यवाद... तुम्ही दिलेली माहिती पडताळण्याचा प्रयत्न करेन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

संपुर्ण चित्र पहा

नेत्रेश
Fri, 08/05/2011 - 05:32 नवीन
१. ज्या घराची खरी किंमत साधारण २ लाख डॉलर आहे, ते घ्यायला बँक ४ लाख कर्ज देते २. बँक ज्याला कर्ज देते त्याचे उत्पन्न आणी क्रॅडीटवर जास्त विचार न करता कर्ज देते यामध्ये बँकेचे काय चुकले? - घराच्या खर्‍या किंमतीपेक्षा जास्त कर्ज देउन बँक रीस्क घेत असते. भविश्यात घरांच्या किंमती वाढल्या तर बँकेला फायदाच होणार असतो. - आपल्या कर्जाचे रक्षण करण्यासाठी भारतातील बँका कर्ज्दाराला २०% रक्कम स्वत: उभी करायला सांगतात. अमेरीकेतील बँक सुद्धा हे सांगु शकली असती. पण कदाचित ग्राहक दुसर्‍या बॅंकेकडे जाईल आणी आपले कमीशन बुडेल या भीतीने फेडायची औकात नसलेल्यांनाही शुन्य डाउनपेमेंट्वर कर्ज दीले. -म्हणजे बँकेसाठी कर्ज देणे हे एक बिझनेस डील असते. मग ते कर्ज घेणार्‍यासाठी सुद्धा बिझनेस डीलच असते. आणी ज्या बिझनेस मधुन फायदा होणार नाही तो का चालु ठेवावा? कट-द्-लॉस. -शीवाय बँकेने अवास्तव कर्ज देउन त्या घराचा आणी पर्यायाने त्या भागातील ईतर घरांचा दर वाढवुन ठेवलेला आहे. या सगळ्यात कर्ज घेणार्‍या कर्ज पेक्षा देणारा जास्त बेजबाबदार आणी दोषी असतो. मग होणारे नुकसान दोघांनी भरायला नको का? बँकेला आर्थीक नुकसान होईल. कर्ज बुडवणार्‍याचे क्रेडीट ७ वर्षांसाठी खराब होईल. शीवाय त्याचेही आर्थीक नुकसान होणार आहेच. या सगळ्यात, अनैतीक, बेकायदेशीर, न पटण्यासारखे काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

या सगळ्यात, अनैतीक,

धन्या
Fri, 08/05/2011 - 10:42 नवीन
या सगळ्यात, अनैतीक, बेकायदेशीर, न पटण्यासारखे काय आहे?
तुमच्या या प्रतिसादातून काहीसं मत व्यक्त होतं की बँक जर "येनेकेन प्रकारेण" आपला फायदा बघते. तर मग आपणही "येनेकेन प्रकारेण" आपला फायदा का करुन घेऊ नये... भले मग त्यासाठी आपली पत (क्रेडीट) पणाला लागलं तरी हरकत नाही. असो. हा ज्याच्या त्याच्या परसेप्शनचा प्रश्न आहे. मात्र तुमच्या प्रतिसादांच्या रुपाने खुपच रोचक माहिती पुढे आली जी अमेरिकेच्या रीयल ईस्टेट मार्केटमधलं वास्तव असू शकते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

हम्म!

पिवळा डांबिस
Fri, 08/05/2011 - 04:37 नवीन
परवडत नसेल तर बँकेचा हप्ता देणे बंद करावे. जो पेर्यंत बँक अर्धे लोन माफ करत नाही, किंवा हप्ता परवडेल एवढा खाली आणत नाही किंवा घर ताब्यात घेत नाही, तो पर्यंत बँकेला पैसे न देता फक्त भाडेकरु कडुन भाडे घेत रहावे. या बेकार परीस्थीतीत घराचा ताबा घेण्यापेक्षा किणतीही बँक दोन-चार महीन्यानी नक्कीच ३० ते ५०% कर्ज माफ करेल. या पर्यायाकडे शेवटचा पर्याय म्हणुन पहावे. यात बेकायदेशी असे काही नाही. यात मला दोन धोके दिसतात... १. बॅन्क घर ताब्यात घेईल किंवा कर्ज रि-निगोशियेट करेल पण या सर्व व्यवहारात त्या माणसाच्या पर्सनल क्रेडिट रेटिंगची वाट लागेल. आणि मग पुन्हा जेंव्हा काही बेसिक गरजांसाठी आवश्यकता असेल (सध्याची गाडी मोडल्यावर दुसरी गाडी घेतेवेळी, नवीन अपार्टमेंट रेन्ट करतांना, नवीन जॉब घेतेवळी) तेंव्हा प्रॉब्लेम्स येऊ शकतात. २. जर बॅन्केचा हप्ता न भरता फक्त भाडं घेत राहिलं आणि जर बॅन्केने घर ताब्यात घेण्यासाठी त्या भाडेकरूवर एव्हिक्शन नोटिस लावली तर तो भाडेकरू लीज पूर्ण व्हायच्या आत घर सोडावं लागलं म्हणून मालकाला कोर्टात खेचू शकतो. मग त्या अडचणीला तोंड द्यावे लागेल. तेंव्हा हे धाडसी उपाय करण्याअगोदर वकिलाचा सल्ला घ्यावा असं मला वाटतं...
  • Log in or register to post comments

तेंव्हा हे धाडसी उपाय

धन्या
Fri, 08/05/2011 - 04:42 नवीन
तेंव्हा हे धाडसी उपाय करण्याअगोदर वकिलाचा सल्ला घ्यावा असं मला वाटतं...
नेत्रेशरावांनी आपल्या प्रतिसादात जे काही सुचवलं आहे ते तुम्हाला धाडसी वाटतं? म्हणजे प्रतिसादात जे काही म्हटलंय ते आपली जोखिम घ्यायची तयारी असेल तर करायला हरकत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

माझं म्हणणं इतकंच की..

पिवळा डांबिस
Fri, 08/05/2011 - 04:46 नवीन
आपली जोखिम घ्यायची तयारी असेल तर करायला हरकत नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? मी स्वतः ते करणार नाही किंवा कोणाला करायचा सल्ला देणार नाही. पण जर कुणाला करावंसं वाटलं तर मी काय करणार? किमान वकिलाचा सल्ला तरी घ्या हे सुचवलं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आता बरं वाटलं...

धन्या
Fri, 08/05/2011 - 04:52 नवीन
मला तुमच्या प्रतिसादाचा जो अर्थ लागला त्याने मी बुचकळयात पडलो होतो... पिडाकाकांसारखी व्यक्ती अशा मताला कशी काय दुजोरा देऊ शकते...
मी स्वतः ते करणार नाही किंवा कोणाला करायचा सल्ला देणार नाही.
हे आपल्याला आवडलं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मी स्वतः ते करणार नाही

नेत्रेश
Fri, 08/05/2011 - 05:02 नवीन
> मी स्वतः ते करणार नाही किंवा कोणाला करायचा सल्ला देणार नाही हे ठीक आहे हो. पण ज्याचा लॉस होतोय, कमावलेले सगळे पैसे बॅड अ‍ॅसेट सांभाळण्यात जात असतील तर मग दुसरा काय ईलाज? परत यात काही बेकायदेशीर नाही. बँक री निगोशीयेट करायचे चान्सेस आहेत. शीवाय कर्जदार थकबाकीदार झाल्यावर काय करायचे ते करारार लीहीलेले असतेच. > वकिलाचा सल्ला तरी घ्या हे सुचवलं हो, वकील सर्व अ‍ॅनॅलाईझ करुन हा उपाय कमीत कमी धोका पत्करुन कसा करावा ते सांगेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

(ऐकीव माहितीवरून)

पंगा
Fri, 08/05/2011 - 04:50 नवीन
आजच्या मार्केटच्या परिस्थितीत अनेकदा बँकांनाही अशी शेकड्याने घरे ताब्यात घेऊन ती नंतर विकत बसणे फायद्याचे नसते, म्हणून बँकच अनेकदा अशा काही तडजोडीवर येण्याची शक्यता असते, असे ऐकलेले आहे. (प्रत्यक्ष अनुभव नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

पण तरीही...

धन्या
Fri, 08/05/2011 - 04:57 नवीन
आजच्या मार्केटच्या परिस्थितीत अनेकदा बँकांनाही अशी शेकड्याने घरे ताब्यात घेऊन ती नंतर विकत बसणे फायद्याचे नसते, म्हणून बँकच अनेकदा अशा काही तडजोडीवर येण्याची शक्यता असते, असे ऐकलेले आहे.
मार्केटच्या परिस्थितीमुळे बँक अशी काही तडजोड करायला तयार होते म्हणून आपण त्याचा फायदा उचलायचा, हे मनाला पटत नाही. पंगाराव, हे चर्चेच्या ओघात मांडलेलं मत आहे. तुमच्या प्रतिसादाला हा उपप्रतिसाद नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

मालकाला कोर्टात खेचू शकतो

नेत्रेश
Fri, 08/05/2011 - 05:07 नवीन
भाडेकरु मालकाला कोर्टात खेचायची शक्यता नाही, कारणः १. मालक लोन वर डिफॉल्ट झाला आणी बँक फोरक्लोज करणार हे समजल्या बरोबर भाडेकरु भाडे देणे बंद करतो. २. रहात असलेल्या भाडेकरुला लीज पुरे व्हायच्या आधी बाहेर काढणे फार कठीण असते. बहुतेक बँका भाडेकरुला घर खाली करायला पैदे देतात (कॅश फॉर कीज). ३. या सगळ्यात भाडेकरुला ३ ते ६ महीने बीन भाड्याचे रहायला मिळते, शीवाय घर खाली करायला पैसे मि़ळतात ते वेगळे. अमेरीकेत लाखो घरमालकांनी हेच केले आहे (म्हणुनच सब्-प्राईमचा घोळ झाला आहे). नवीन गाडी, अपार्ट्मेंट लीज हे सगळे क्रेडीट खराब व्हायच्या आधी करावे. ---------- पण बहुतेक बँक लोन कमी करेल आणी घर सोडुन देण्याची वेळच येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मानलं राव तुम्हाला...

धन्या
Fri, 08/05/2011 - 05:17 नवीन
सदसद बुद्धी का काय म्हणतात ती थोडा वेळ बाजूला तुमचे सगळे प्रतिसाद पुन्हा वाचून काढले... राव पॉईंट आहे तुमच्या बोलण्यात... तुम्ही दिलेली अमुल्य माहिती वापरुन मलाही आता सॅन फ्रान्सिस्कोच्या डाऊन टाऊन मध्ये घर घ्यावंसं वाटू लागलं आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

शाबास!!

पिवळा डांबिस
Fri, 08/05/2011 - 05:21 नवीन
मलाही आता सॅन फ्रान्सिस्कोच्या डाऊन टाऊन मध्ये घर घ्यावंसं वाटू लागलं आहे अभिनंदन!!! हाऊस वार्मिंग पार्टीला कधी येऊ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

नक्की बोलावेन...

धन्या
Fri, 08/05/2011 - 05:27 नवीन
हाऊस वार्मिंग पार्टीला कधी येऊ?
लवकरच निमंत्रण देईन काका. आता जरा नेत्रेश रावांच्या युक्त्या वापरून सहजासहजी गंडवता येईल अशी बँक कुठली आहे ते आधी शोधून काढतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

आता बघा!

पिवळा डांबिस
Fri, 08/05/2011 - 05:34 नवीन
आता जरा .... युक्त्या वापरून सहजासहजी गंडवता येईल अशी बँक कुठली आहे ते आधी शोधून काढतो म्हणुनच मी मघाशी म्हंटलं होतं की वकिलाचा सल्ला घ्या... तर तुम्हाला ते काहीतरीच वाटलं!!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

सदसद बुद्धी

नेत्रेश
Fri, 08/05/2011 - 05:37 नवीन
सदसद बुद्धी ... हाच शब्द शोधत होतो. बरोबर शब्द वापरलात तुम्ही. ही चुकीच्या ठीकाणी वापरलेली सदसद बुद्धीच आपल्याला (मराठी माणसाला) धंद्या, उद्योगात मागे ठेबते :) - आणी खरोखर घर घेणार असाल तर अजुनही अमुल्य माहीती पुरवेन ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

?

नितिन थत्ते
Fri, 08/05/2011 - 13:34 नवीन
>>ही चुकीच्या ठीकाणी वापरलेली सदसद बुद्धीच आपल्याला (मराठी माणसाला) धंद्या, उद्योगात मागे ठेबते नेत्रेश या आयडीधारी व्यक्तीशी कोणताही व्यवहार करायचा नाही अशी खूणगाठ बांधली आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

कांग्रेसवाले का ओ तुम्ही,

५० फक्त
Fri, 08/05/2011 - 08:13 नवीन
कांग्रेसवाले का ओ तुम्ही, सदसदविवेकबुद्धी म्हणतात त्याला, विवेक बरोबर विसरलात तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

कांग्रेसवाले का ओ तुम्ही,

धन्या
Fri, 08/05/2011 - 09:56 नवीन
कांग्रेसवाले का ओ तुम्ही, सदसदविवेकबुद्धी म्हणतात त्याला, विवेक बरोबर विसरलात तुम्ही.
नाय वो. आम्ही कुठल्याच पक्षाच्या बाजूने नाही. सगळे लेकाचे सारखेच. एकाच माळेचे मणी. प्रत्येकाला आपली बँक खाती कशी भरतील याची पडलेली असते. जनसेवा वगैरे उगाचच आपली तोंडी लावायला वगैरे असते. आमचा पक्ष, उपवर मुलींवर ल़क्ष :P तो प्रतिसाद लिहिला तेव्हा सदसदविवेकबुद्धी हा शब्द नेमका आठवत नव्हता. मग जसा आठवला तसा टंकला. शब्द सांगितल्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

बुकमार्क करते आहे हा धागा.

शुचि
Fri, 08/05/2011 - 05:34 नवीन
बुकमार्क करते आहे हा धागा. कधीतरी उपयोगी पडेल.
  • Log in or register to post comments

कशाला उपयोगी पडेल हा धागा, घर

५० फक्त
Fri, 08/05/2011 - 08:09 नवीन
कशाला उपयोगी पडेल हा धागा, घर घ्यायला, बँका बुडवायला का धाग्याचा खफ करायला, मला तर काय वाटतं परदेशात घर घेणं हे प्रत्येकाच्या शुन्यलब्धी परांचन गतिवर अवलंबुन असावं कारण एकदा परांचन गति कमी होउ लागली की आसाभोवती फिरण्याचा वेग कर्जदार आणि बँक आणि भाडेकरु यांच्या एकमेकांपासुन असणा-या अंतरावर व त्यांच्या परस्पर व्यास व त्यांच्या विक्षिप्त विचलन गतीच्या डिफर्नशियल इक्वेशन च्या महत्त्म भाजकावर अवलंबुन असतो. आणि कर्ज घेणारा ते कर्ज फेडेल का नाही ते बँकेनं त्याचा आणि आपला ऑरा एकमेकांना छेदतो का टँजेशिअल जातो हे चेक करुन ठरवावं, वर धनंजयने दिलेली आयडिया ध्रुविय प्रदेशात घर घेण्यासाठी अ‍ॅक्सिस बँकेकडुन कर्ज घेण्यासाठी वापरता येईल, तेवढाच अजुन एक अक्ष आणि त्याचं ध्रुविय अंतर व ध्रुविय प्रदेशातल्या घरातला गोठलेला भाडेकरु व गोठवेलेले कर्ज खाते, सगळं एकदम जुळुन येईल. धनाजीराव, जायचं का रविवारी धुवावार, साइड बिजनेस करायला..
  • Log in or register to post comments

कशाला उपयोगी पडेल हा धागा, घर

धन्या
Fri, 08/05/2011 - 10:25 नवीन
कशाला उपयोगी पडेल हा धागा, घर घ्यायला, बँका बुडवायला का धाग्याचा खफ करायला
बेक्कार हसतोय राव तुमचा हा प्रश्न ऐकून. एखादा गुन्हा होतो आणि मग वृत्तपत्रांमध्ये येते की हा गुन्हा करताना गुन्हेगारांनी अमुक अमुक चित्रपटात दाखवलेली मोडस ऑपरेंडी वापरली आहे. य धाग्यावर सुद्धा परदेशात घर घेऊन, घराचे हप्ते थकवून बँकेला कसं गंडवायचं याचं मुद्देसुद वर्णन प्रतिसादांच्या रुपात आलंय. न जाणो कुणी हे सारं वाचून प्रेरणा घेतली तर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

घर घेण्याबद्दल

उदय
Fri, 08/05/2011 - 09:54 नवीन
घर घेण्याचे फायदे-तोटे याबद्दल. अपार्टमेंट मध्ये भाडे भरत राहण्यापेक्षा स्वत:चे घर घेऊन तितक्याच पैशात कर्जाचा हप्ता भरता येईल आणि काही वर्षानंतर स्वत:च्या मालकीचे घर होईल या हेतूने घर विकत घेतले जाते. घर घेण्यापूर्वी काही गोष्टींचा गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. मुख्य म्हणजे तुम्ही किती वर्षे त्या घरात रहाणार, तुमच्या घराची किंमत तुमच्या उत्पन्नाच्या कितीपट आहे, घराच्या हप्त्याव्यतिरिक्त खर्च काय आहेत आणी किती आहेत (property tax, home insurance, maintenance etc) याचा विचार करणे पण आवश्यक आहे. माझे Thumb rule म्हणजे किमान ५ वर्षे त्याच घरात राहिले पाहिजे, वार्षिक उत्पन्नाच्या ४ पट किंवा कमी घराची किंमत हवी, घराच्या किमतीच्या १% किंवा कमी किमतीत भाड्याने घर मिळत असेल तर घर विकत घेऊ नये. (या Thumb rule बद्दल स्पष्टीकरण हवे असेल तर मी सांगू शकेन, पण मूळ प्रश्न तो नाहीये, म्हणून आत्ताच काही लिहित नाही. मी हा विचार फक्त अमेरिकेतच नाही, तर भारतात पण करीन. जर ५० लाखाचे घर २५,००० रुपये महिना भाडयाने मिळत असेल तर मग विकत कशाला घ्या? ) घर घेण्याचे फायदे जसे जसे कर्ज कमी होत जाईल तसे तसे हळूहळू घराची मालकी आपल्याला मिळते. काही वर्षानी कर्जमुक्त स्वत:च्या घरात राहता येते. (अपार्टमेंट मध्ये भाडे वाढत जाते आणी मालकी मिळत नाही). अजून एक फायदा म्हणजे अपार्टमेंट पेक्षा मोठ्या जागेत स्वत:ला हवे तसे राहता येते. (घराला आतून भडक लाल किंवा निळा रंग देता येतो.) बाकी अनेक गोष्टी आहेत ज्या इथे लिहित नाही जसे सामाजिक स्थेर्य, बागकाम करता येणे इ. अमेरिकेत घर घेण्याचा आणी ग्रीनकार्डचा काही संबंध नाही. मी स्वत: ग्रीनकार्ड होण्यापूर्वी घर घेतले आहे. २०% down payment हे सुद्धा खरे नाही. मी ५% देऊन घर घेतले. सध्याच्या Fannie Mae guidelines प्रमाणे २०% down payment लागते, पण जर क्रेडीट रेटिंग उत्तम असेल तर त्यालाही मार्ग आहे. पण महत्वाचे म्हणजे घर बाळगणे परवडणार आहे का ते बघणे महत्वाचे आहे. >> परवडत नसेल तर बँकेचा हप्ता देणे बंद करावे. जो पेर्यंत बँक अर्धे लोन माफ करत नाही, किंवा हप्ता परवडेल एवढा खाली आणत नाही किंवा घर ताब्यात घेत नाही, तो पर्यंत बँकेला पैसे न देता फक्त भाडेकरु कडुन भाडे घेत रहावे. वरील विधान जरा धाडसी आहे, असे म्हणेन मी. बँक धंदा करायला बसली आहे. मालकाने कर्जाचा हप्ता भरला नाही, तर बँक अर्धे लोन माफ करणार नाही. Bank would rather foreclose a house and then sell it in the market for pennies for a dollar, in the process they will ruin the credit rating of the borrower. (In reality, bank probably would have sold the loan to Fannie Mae, Freddie Mac and they will do the foreclosure.) माझ्या मते तर सध्या real estate investment करायची सुवर्ण संधी आहे. फक्त तुम्ही कुठे घर विकत घेता आणी तुम्हाला घराच्या किमतीच्या १% इतके भाडे दर महिन्याला मिळते की नाही ते बघणे महत्वाचे.
  • Log in or register to post comments

उत्तम प्रतिसाद

धन्या
Fri, 08/05/2011 - 10:30 नवीन
चित्रगुप्तांना धागा काढताना ज्या प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत त्या प्रश्नांची उत्तरे या प्रतिसादात मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय

जान है तो जहां है

प्रियाली
Fri, 08/05/2011 - 17:14 नवीन
वरच्या प्रतिसादाशी +१. सामान्य मराठी माणसाची सतत धडपड आपल्या मालकीचं एक घर असावं अशी असते. ही त्याची मानसिकता आहे. घर घेताना आपले उत्पन्न, घराचे दृश्य खर्च आणि अदृश्य खर्च (अदृश्य म्हणजे हिडन या अर्थी - जे पटकन ध्यानात येत नाहीत. जसे, फर्नीचर, लॉन मोवर, स्नो ब्लोअर, स्प्रिंकलर्स, सिक्युरिटी सिस्टम इ.इ.) नक्कीच लक्षात घ्यावेत. त्यामुळे लोकांनी हावरटपणे घरे घेतली, आपली लायकी नसताना घरे घेतली वगैरे गोष्टी दुय्यम आहेत. घर घेताना कदाचित परिस्थिती चांगली होती पण नंतर मंदीच्या काळात ती पालटली अशी अनेक उदाहरणे दिसतात. मला वाटते कुटुंब म्हणून आयुष्यातील चढ-उतारांना तोंड द्यायला हवे. पैसा येतो आणि जातो. जी वर्षे त्यांनी मोकळेपणी त्या घरात काढली त्याला ही क्रेडिट देता येईल. घराच्या किंमती उतरल्या आहेत, कदाचित नुकसान सोसून तुमच्या मित्राला परत यावे लागेल हे सर्व खरे असले तरी सद्य बँक बॅलन्स काय आहे याचाही विचार करावा. भर तारुण्यात अपघातात किंवा कॅन्सर वगैरे सारख्या रोगांना बळी पडल्याने नोकरी गेली आणि खर्चही भरमसाठ झाला वगैरे सारखी उदाहरणे दिसतात. त्यापेक्षा अगदी नाहीच गेले घर तर जेवढे हातात मिळेल, परत येईल त्यावर सुख मानून त्यांनी परत यावे. शेवटी माणूस धडधाकट असेल तर पैसे मिळवायचे आणि घालवायचे अनेक उपाय शोधता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय

मान गये !!!

धन्या
Sat, 08/06/2011 - 19:18 नवीन
मुळच्या माहितीपुर्ण प्रतिसादाला व्यवहार आणि भावनिक गुंतागुंत (अ‍ॅटॅचमेंट) यांचा समतोल साधत दिलेला उपप्रतिसाद !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा