✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ते दिवस आता कुठे

अ — अरूण म्हात्रे, Wed, 08/03/2011 - 01:41
ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची दूर ती गेली तरी ही सावली भेटायची... त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी हात देताना तिला माझीच फांदी व्हायची पावसाला पेच होता,ह्या सरी वळवू कुठे चिंबताना त्या पुलाखाली नदी थांबायची वर निळी कौले नभाची,डोंगराची भिंत ती ते नदीकाठी भटकणे,हीच शाळा व्हायची कैक वाटा चाललो,पण विसरलो पोचायचे नेमक्या वळणातूनी ही पावले परतायची गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची.

प्रतिक्रिया द्या
7050 वाचन

💬 प्रतिसाद (18)

गवत ही भोळे असे की साप खेळू

प्राजु
Wed, 08/03/2011 - 02:13 नवीन
गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची सुरेख!!
  • Log in or register to post comments

फाटके होते खिसे अन् नोटही

शुचि
Wed, 08/03/2011 - 05:07 नवीन
फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची. ह्या ओळी कोणाच्या तरी सहीमध्ये आधी वाचल्या होत्या. फिदा झाले होते (आहे) त्या ओळींवर.
  • Log in or register to post comments

सह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ही

मनिष
Wed, 08/03/2011 - 10:06 नवीन
खूप दिवसांपासून (पुपे च्या सहीत वाचल्यापासून) ही कविता कुठे मिळेल का बघत होतो. पुर्ण कविता वाचल्यावर खूपच आवडली.
त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी हात देताना तिला माझीच फांदी व्हायची
आणि
गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची.
हे अफलातून आहे. तुमच्या अजून कविता वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments

+१ असेच म्हणतो

अर्धवट
Wed, 08/03/2011 - 10:14 नवीन
+१ असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

+ २

मेघवेडा
Mon, 08/08/2011 - 13:36 नवीन
तंतोतंत. "फाटके होते खिसे.." अफलातूनच. "कैक वाटा.." सुद्धा आवडला. अजून वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

मस्त कविता! "फाटके होते खिसे

नगरीनिरंजन
Wed, 08/03/2011 - 10:50 नवीन
मस्त कविता! "फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची" हे तर खासच.
  • Log in or register to post comments

मस्त........!!!

मनराव
Wed, 08/03/2011 - 10:57 नवीन
मस्त........!!!
  • Log in or register to post comments

वाहव्वा अप्रतीम

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/03/2011 - 11:05 नवीन
क्या बात है...! और पीलाईये जाम एसे,एक से दील भरता नही प्यास भी अधुरी है,और प्यासा भी अधूरा...रह जाता है....!
  • Log in or register to post comments

प्रत्येक कडवे खास! अतिशय

राघव
Wed, 08/03/2011 - 11:42 नवीन
प्रत्येक कडवे खास! अतिशय सुंदर रचना.. खूप खूप आवडली.. येऊ देत अजून!! :) राघव
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर

पाषाणभेद
Wed, 08/03/2011 - 13:48 नवीन
खुपच सुंदर
  • Log in or register to post comments

मस्तच कविता!!!

किसन शिंदे
Wed, 08/03/2011 - 14:06 नवीन
मस्तच कविता!!!
  • Log in or register to post comments

आपली माझी आवडती कविता येथे

गणेशा
Wed, 08/03/2011 - 14:17 नवीन
आपली माझी आवडती कविता येथे वाचायला दिल्यामुळे खुप छान वाटले. गेल्याच वेळेस ही कविअत द्या असे बोलणार होतोच.. पुन्हा पुन्हा वाचावी असी मस्त कविता ...
  • Log in or register to post comments

कविता आवडली. खुप छान.

जागु
Wed, 08/03/2011 - 14:22 नवीन
कविता आवडली. खुप छान.
  • Log in or register to post comments

मस्तं !

पल्लवी
गुरुवार, 08/04/2011 - 15:12 नवीन
मस्तं शब्द ! मस्तं कल्पना ! मस्स्स्स्तं नादमय कविता ! :)
  • Log in or register to post comments

खुपच छान कविता.. अगदी आतुन

शैलेन्द्र
गुरुवार, 08/04/2011 - 19:33 नवीन
खुपच छान कविता.. अगदी आतुन आल्यासारखी.. पावसातुन, मातीतुन उमलल्यासारखी .. फारच छान..
  • Log in or register to post comments

माझी आवडती कविता

अभिजीत राजवाडे
Sat, 08/06/2011 - 02:16 नवीन
नमस्ते, तुम्हाला आठवत नसेल पण नक्की साल आठवत नाही बहुतेक २००२ असावे, पुणे फेस्टीवलमधे मराठी कवी संमेलनात आपण भेटलो होतो. तिथे तुम्ही हि कविता गायली होती. मी हि कविता लिहुन काढली होती आणि त्यावर आपण स्वाक्षरीही दिली होती. माझ्या जवळ ती अजुनही आहे. बर्‍याच दिवसांनी सर्व आठवणी ताज्या झाल्या. कविता मिसळपाववर टाकल्याबद्द्ल खुप खुप आभार. मला तुमची अजुन एक कविता आवडते "तुला पाहिले मी फुले वेचताना...".
  • Log in or register to post comments

फार फार वर्षांपुर्वी मी

गणा मास्तर
Sun, 08/07/2011 - 21:27 नवीन
फार फार वर्षांपुर्वी मी दूरदर्शनवर एका मुलाखतीत ही कविता ऐकलेली. पुर्ण कविता वाचुन आनंद झाला. वर निळी कौले नभाची,डोंगराची भिंत ती ते नदीकाठी भटकणे,हीच शाळा व्हायची ह्या ओळी खरडवहीत जाउन बसल्या आहेत.
  • Log in or register to post comments

सुरेख! धन्यवाद!

असंका
Wed, 07/01/2015 - 21:15 नवीन
सुरेख! धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा