सिंघम - परीक्षण
बाजीराव सिंघम लै पावरफुल आहे. तो नुसता स्क्रीनवर एन्ट्री मारतो तेव्हा ढोल वाजतात. मारामारी करायला जातो तेव्हा वीररसातील श्लोक मागे वाजतात. तो त्याच्या गाडीला किक मारतो तेव्हा सिंहगर्जना होते. पूर्वी एखाद्याला वरून मारले की ते खाली पडत, किंवा फार फार तर सरळ जमिनीत आत जात. सिंघम एखाद्याच्या डोक्यावर हात मारतो तेव्हा न्यूटनला तिसरा नियम थोडा बदलावा लागेल (some thing like "every action has opposite and sometime ridiculously bigger reaction") एवढा तो माणूस पृथ्वीवरून रिबाउंड होउन दुप्पट तिप्पट अंतर आकाशात उडतो. सिंघम ने आडवा फटका मारला तर माणूस हवेतल्या हवेत स्वतःभोवती गरागरा फिरत राहतो. पण पृथ्वीला एखादा नवीन उपग्रह मिळतो की काय अशी शंका आपल्याला यायच्या आत सिंघम त्यांच्या अंगावर उडी मारून तिसर्यालाच तो सुमारे ५०-६० फूट लांब फेकला जाईल व while he is going there वाटेतील दोन चार जीप ची हुडे, सळया, काचा तोडत जाईल एवढी फाईट मारतो.
एवढ्या पावर्फुल माणसाला सर्व व्हिलन्स ना संपवायला तीन तास लागतात हेच आश्चर्य आहे. पण लगे हाथो पोलिस फोर्स चे डोळे उघडणे (झोपेतून नव्हे) ई. समाजोपयोगी कामे व "काव्या" हे "सिंघम" इतकेच अस्सल मराठी नाव असलेल्या हीरॉइन बरोबर "मौला मेरे मौला, शुकरन, सजदे करू" इत्यादी,शुद्ध मराठी भाषेत रोम्यांटिक गाणी म्हणणे ही खाजगी कामेही त्याला करायची असतात.
हा पिक्चर इतका अचाट आणि अतर्क्य आहे हे आत्ता कळते. पण खरे सांगायचे तर बघताना फुल टाईमपास झाला. काही पिक्चर बघताना आपण एन्जॉय करतो पण आवडला हे नंतर सांगायला जरा अवघड वाटते असे काही असेल तर हा त्यातलाच.
थिएटर मधे मित्रांबरोबर जाऊन तेथील माहौल मधे हा बघणे आणि घरी व्हिडीओ वर बघणे यात जमीनअस्मानाचा फरक आहे. त्यामुळे हा बहुतेकांना प्रचंड आवडेल किंवा एकदम प्रचंड अतर्क्य वाटेल.
सुरूवातीपासून एवढा वेग आहे की आपण पूर्ण एंगेज होतो. त्या एन्ट्री-ढोलांचा ताल एकदम मस्त आहे. पब्लिक जाम रिस्पॉन्स देते. अनेक शॉट्सला टाळ्या पडत होत्या. शेवटी एकदा मंत्री (अनंत जोग) च्या "खुर्चीवर बसताना आठवण यावी" म्हणून मारलेल्या लाथांना जो पब्लिक रिस्पॉन्स मिळतो तो सर्वांनी पाहावा.
बाकी सगळे सरधोपट आहे. मंत्री भ्रष्टाचारी म्हणजे सरळ खुर्चीवर बसून उघडपणे सर्व बोलणारा. राजकारणात मुरलेली व्यक्ती कशी वागेल/बोलेल यात खोल जाण्याचे कारणच नाही. भ्रष्ट पोलिस, नियमाने वागणारे पोलिस हे एकाच शॉट मधे क्लिअर होता. नो ग्रे एरिया. व्हिलन भाषणात बोबडी वळून सुद्धा निवडून येतो हे सध्या अशक्य वाटणार नाही पण तो आमदार की खासदार याचा पत्ता नसताना आपण मंत्री होणार हे त्याला नक्की माहीत असते.
बरेच सहकलाकार मराठी आहेत, जे प्रत्यक्षात मराठी नाहीत त्यांच्या व्यक्तिरेखांची नावे मराठी आहेत आणि संवादांत ही मराठीचा भरपूर वापर आहे. गोव्यात शूटिंग खरोखर झाले असावे. गाणे एकही नीट कळत नाही पण प्रभाव सर्व दाक्षिणात्य आहे. अशोक सराफ हिंदीत त्याच्या दहा टक्के कुवत नसलेल्या हीरोंपुढे दुय्यम रोल का करतो याचा मला नेहमी राग येतो, पण येथे निदान त्याला काही चांगले शॉट्स आहेत, थोडेफार त्याचे अस्सल विनोदी कौशल्य दाखवणारेही.
तर रेकमेण्ड करावा का नाही? बघा, हरकत नाही, शक्यतो ग्रूप मधे. दबंग, सनीचे ढाई किलो का हाथ वाले पिक्चर्स या पठतीतील कलाकृती आपण बघत आहोत याची कल्पना ठेवून जा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त
चिंगम चिंगम
हाहाहा!!! आता तुम्ही रेकमेंडच
:) मस्त!!
झक्कास परीक्षण...
हं!
पोकिरी सिनेमा मी पाहीला नाही.
जिंदगी ना मिले दोबारा...
कसलं ट्रीब्युट अन् काय. जास्त
सिनियर सिटीझन्सनाही तेवढीच
पोकिरी....
आयला...आम्ही तर कमनीय आणी
सही...
धनाजीराव वाकडे, तुम्ही किक
तुमच्या आयला.... वैनीबद्दल
धनाजीराव धन्यवाद...गलगल पाडतुन्ना
+१.
सोमवरचा फ्री पास मिळालाय, पण
सोमवरचा फ्री पास
तुम्हाला चित्रपटांचे फ्री
कालच पाहिला. हसून हसून
उत्तम चित्रपट परिक्षण.
मीही अगदी 'चिंगम' म्हणतच हा
मनमोहन सिंघम
आरारा... चला गाणी पाहुनच
संताप
परिक्षण आवडल्या गेले
बाकि शिव्या मात्र झकास
कुतुहल
आज मराठी चित्रपट कसे निघाले
गेल्याच आठवड्यात आधी दबंग आणि
आज मराठी चित्रपट कसे निघाले
मराठी संवाद
'शिंगम' आसंल तसा असूंदे... पन
छान परीक्षण अतर्क्य असुनही
कालच सिंघम पाहिला, एकदा
हे नाव तद्दन तमिळ (साउथ
ओके . असेल तमिळ मग नाव. मी
निदान उगाच हिरोईन ला किडनेप
परीक्षण आवडले
शेवती तेलिफोन बूथवर हताश होऊन