Skip to main content

मिपा कट्टा, ३० जुलै

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी गुरुवार, 28/07/2011 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकरहो, आमचे मित्र सूड यांनी नुकताच काढलेला शतकी धागा वाचनमात्र झाला आहे. त्यामुळे कट्ट्याचे नक्की काय होणार हे कुणालाच कळले नाही. ते सांगण्यासाठी हा धागा काढत आहे. बेत आधी ठरलेलाच आहे. तपशील खालीलप्रमाणे स्थळ :- स्वाद (शाकाहारी थाळी) , ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे. (स्टेशन पासून जवळ आहे आणि प्रसिद्ध आहे, कुणालाही विचारा, प्रकारचे ) दिनांक :- शनिवार ३० जुलै रोजी संध्याकाळी ६:३० कार्यक्रम :- अमर्यादित थाळीचा आणि अमर्यादित गप्पाटप्पांचा आस्वाद. कुणाला काही शंका असेल तर प्रतिसादातून विचारा अथवा मला, स्पाला किंवा सुधांशू देवरुखकर उर्फ सूड याला व्यनि करा. सध्या ज्ञात असलेली कट्टेकरांची यादी . सदर यादी ही शतकी धागा आणि व्यनि यातून तयार केली आहे. कुणाची नावे कमीजास्ती करायची असतील तर तसे कळवा. ही यादी अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येईल
  • गगनविहारी
  • रामदास काका
  • स्पा
  • सूड
  • किसन शिंदे
  • विमे
  • लीमाऊजेट
  • विलासराव
  • इंटरनेटस्नेही
  • मिसळलेला काव्यप्रेमी
  • विजुभाऊ
  • निखील देशपांडे आणि मस्त कलंदर (यांना १ धरायचे की २ ? :-) )
  • अमोल खरे
  • वसईचे किल्लेदार
  • प्राची
कुंपणावरचे कट्टेकरी (म्हणजे ज्यांचे अजून नक्की ठरले नाही ते)
  • स्वानंद
  • सर्वसाक्षी
  • प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपला विनम्र (काय दिवस आलेत ;-) ) विश्वनाथ मेहेंदळे
लेखनविषय:

वाचने 14880
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

काका, दुसर्‍या मनाचं ऐकावं. म्हणजे हे माझं मत. खरं तर या धमक्यांना फाट्यावर मारण्याइतकीही किंमत देऊ नका. अगदीच वाटलं तर एखादा फाटा स्पॉन्सर करा, म्हणजे असल्या धमक्या वैगरे देणाराने त्या स्वतःच फाट्यावर मारुन घेऊ देत. एक सूचना मात्र लिहायला विसरु नका: धमकी/ प्रतिसाद फाट्यावर मारताना सदर धमकी/ प्रतिसाद मोडण्याचा आवाज येणार नाही याची खबरदारी घेणे, शेजार्‍यांनी शिव्या दिल्यास आम्ही जबाबदार नाही. -सदाशिव पेठकर

कट्ट्याला अवघे काही तास उरले आहेत! - वृत्तप्रतिनीधी, इंट्या चौरसिया.

वृत्तांत (फोटोसहित) न आल्यास, कट्टा रद्द झाला होता असे समजल्या जाईल!