Skip to main content

देशस्थ परदेशस्थ

लेखक अलख निरंजन यांनी शुक्रवार, 22/07/2011 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजुताईंच्या आपण सारे षंढ ह्या कवितेत एक उपचर्चा अशी सुरू आहे की परदेशी वास्तव्यास असणार्‍या भारतीयांना, भारतावर भारतीयांवर टिका करण्याचा नैतिक अधिकार कितपत आहे? भारताबाहेर सेटल होणार्‍यांनी (पोएटीक लायसन्स वापरुनही) 'सारे भारतीय षंढ आहेत' किंवा 'भारतीय लोकशाही भाडखाऊ आहे' अशी टोकाची प्रतिकिया द्यावी का? माझ्यामते परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना असा नैतिक अधिकार नसावा. नोकरीसाठी/कामा निमित्त किंवा उच्चशिक्षणासाठी देश सोडणे वेगळे आणि परदेशात स्थायिक होणे हे वेगळे.नोकरीसाठी/कामा निमित्त किंवा उच्चशिक्षणासाठी तात्पुरते परदेशी गेलेले हे देशवासीयांइतकेच टिका करण्यास पात्र आहेत पण लाँग टर्म वास्तव्य करणारे (ग्रीन कार्ड/ परदेशी नागरीकत्व घेतलेले) इतकी टोकाची टिका करण्याच माझ्या मते पात्र नाहीत. कुणी कुठे स्थायिक व्हावे हा सर्वस्वी ज्याचा त्याचा निर्णय असल्याने त्यावर कसलीही टिप्पणी करणे योग्य नाही. पण अशा लोकांनी भारतीयांना षंढ म्हणणे नक्कीच आक्षेपार्ह आहे. तुम्हाला काय वाटते? कवितेच्या धाग्यावर आणखी अवांतरे नकोत म्हणून इथे चर्चा करुया.

वाचने 9738
प्रतिक्रिया 68

प्रतिक्रिया

तुम्ही अजुन भारतातच आहात वाटतं!!! बाकी गंमत बघा हां....संधी मिळायच्या आधी " आम्ही आमचं भारतात काय ते बघुन घेउ, तुम्हाला अधिकार नाही" असं म्हणणारे संधी मिळताच (किंवा खटपट करुन का होइना) भारताबाहेर गेले की विचार कसे पट्टदिशी बदलतात. अमेरीकन शिल्पा

भारतीय लोकशाहीला असा अगदी टोकाचा दोष देऊ नये हे मान्य, पण तो चर्चेचा मुद्दा नाही. कारण तसे भारतात वस्तीला असलेल्या बहुतेक लोकांनीही करू नये. (लोकशाहीने नेमलेल्या पोलिसांनी कैदेत टाकलेला निरपराध वगैरे कोणी असेल, त्याने असे काही म्हटले तर समजून घेता येईल.) भारताबाबत जोपर्यंत आपुलकी आहे आणि नाळ जोडल्याचा भावनिक अनुभव आहे, तोपर्यंत कुठेही स्थायिक झालेले लोक पोटतिडकेने बोलतील. हे अपेक्षित आहे. त्यांना भावुक होण्याचा हक्कही आहे. आणि भावुक होऊन काहीबाही म्हणणे (तात्पुरते) आक्षेपार्हही नाही. अर्थात भारतात वस्तीला असलेल्या लोकांनी सुद्धा भावुक होऊन काहीबाही म्हणणे तात्पुरतेच आक्षेपार्ह नाही.

मला असं वाटतं की भावनेच्या भरात अशा प्रकारचे उद्गार अनेक जण काढतात. "सर्व राजकारण्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत" , "भारतीय क्रिकेट टीमला समुद्रात नेऊन बुडवलं पाहिजे" अशा स्वरूपाचे, फारसा कसलाच अर्थ नसलेले अभिप्राय आपण ऐकतोच. या मागे फार विचार केला आहे असं वाटत नाही. बाकी , धनंजयने म्हण्टल्याप्रमाणे , "भारताबाबत जोपर्यंत आपुलकी आहे आणि नाळ जोडल्याचा भावनिक अनुभव आहे, तोपर्यंत कुठेही स्थायिक झालेले लोक पोटतिडकेने बोलतील. हे अपेक्षित आहे" हे अर्थातच मान्य आहे. नाहीतर या न्यायाने परदेशस्थ व्यक्तीला मराठी /भारतीय विषयांबद्दल बोलणे/वाचणे/विचार करणे/चर्चा करणे/कृती करणे या कशाचा हक्क नाही असे म्हणावे लागेल. असो.

देश, परदेश, आतंकवादी, धर्मवेडे वगैरे विषय सुरू झाले की मला जॉन लेननचं इमॅजिन हे गाणं आठवतं. (लिंकवरच्या व्हिडियोत ४० सेकंद काहीच होत नाही, त्यानंतर बघावा...) इमॅजिन देअर्ज नो कंट्री... नथिंग टु किल ऑर डाय फॉर बच्चनांनी मधुशालामध्ये देखील लिहिलेलं आहे पंडित मोमिन पादरियोंके फंदो को जो काट चला.. कर सकती है आज उसीका स्वागत मेरी मधुशाला. सगळे धर्म बुडून गेले, देशादेशांमधल्या भिंती गळून गेल्या तर जग सुखकर होईल. मग मिपाकरांना वाद घालायला काय शिल्लक राहील हा मुद्दा आहेच... पण तो प्रश्न थोडा कमी महत्त्वाचा वाटतो.

In reply to by पंगा

अरेरे! काही उंदरांची घरात घुसायची सवय अद्यापही गेलेली दिसत नाही.

In reply to by राजेश घासकडवी

सगळे धर्म बुडून गेले, देशादेशांमधल्या भिंती गळून गेल्या तर जग सुखकर होईल.
हो पण हे तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही जन्मात शक्य नाही. मग त्यावर चर्चा करण्यात काय हशील? अजून तरी भारता नावाच्या देशाचा पासपोर्ट दाखवुनच यूएस नावाच्या देशामधे येता ना?

In reply to by अलख निरंजन

कदाचित ते अमेरिका नावाच्या देशाचा पासपोर्ट दाखवून विजा घेऊन भारत नावाच्या देशात येत असतील.

In reply to by अलख निरंजन

हो पण हे तुमच्या आणि माझ्या दोघांच्याही जन्मात शक्य नाही. मग त्यावर चर्चा करण्यात काय हशील?
तुमच्या लेखनातून तुम्ही खूप ठाम विचारसरणीचे आहात असं दिसतंय. इतकं एनल का होताय या बाबतीत? कोणाला कुठच्या देशात किती राहिल्यावर कुठच्या देशावर टीका करण्याचा किती हक्क वगैरेवर कशाला वाद घालता? थोडा वैचारिक मोकळेपणा ठेवा. थोडी स्वप्नं बाळगा. माझं तर असं स्पष्ट मत आहे की ही सगळी देशांची बंधनं मोडून पडणार. अहो, बर्लिन वॉल पडूनही वीस वर्षं होऊन गेली. माणसामाणसातले भेद सगळे दुय्यम ठरणार. सर्वत्र विश्वबंधुत्वाचे मळे फुलणार. खून, युद्ध, दहशतवाद हे सगळं या प्रेमाच्या त्सुनामीत वाहून जाणार. त्यातले काही थेंब तुमच्याही हृदयात पडून तिथे आशावादाची गर्द राई फुलो ही प्रार्थना... ज्ञानेश्वरांनी म्हटलेलंच आहे ना जो जे वांछिल तो ते लाहो - प्राणिजात.
यूएस नावाच्या देशामधे येता ना?
वा, तुम्ही युएस नावाच्या देशातलेच का? आधी सांगायचं ना. कुठे असता? भेटू आपण कधीतरी.

In reply to by राजेश घासकडवी

घासकडवीजी, अगदी मनातलं बोललात. देश-सीमांची ही कृत्रिम बंधनं गळून पडणार आहेत हे निश्चितच आहे ... प्रश्न फक्त 'पडणार का' हा नसून 'केव्हा पडणार' हाच आहे. आता चालू असलेली प्रक्रिया पाहिली व गेल्या १०-२० वर्षांतील स्थित्यंतरे पाहिली तर हे आपल्या जन्मात होण्याची सुध्दा चांगलीच शक्यता दिसते. पन्नास-शंभर-दोनशे वर्षांपूर्वी कोण्या राजकारण्यांनी आपापल्या पोळीवर तूप ओढण्यासाठी आखलेल्या देशांच्या मानवनिर्मित सीमेला धरुन बसण्यापेक्षा / वंद्य मानण्यापेक्षा 'हे विश्वचि माझे घर' ही माऊलींची संकल्पना खचितच आदरणीय आहे. रही बात 'देशस्थ वि. परदेशस्थ' इस घिसेपिटे पुराने मुद्देकी ... तर यासाठी माझे हे जुने प्रतिसाद माझ्या दृष्टीने पुरेसे आहेत ... http://www.misalpav.com/node/4579#comment-66962 http://www.misalpav.com/node/4579#comment-66983 http://www.misalpav.com/node/4579#comment-67002 http://www.misalpav.com/node/4579#comment-67048 http://www.misalpav.com/node/4579#comment-67353 - दिपोटी

In reply to by गणपा

हे इथे येऊन आवर्जुन सांगितल्याबद्दल आभारी आहे. 'मेदू वड्याला भोक कसे पाडावे' ह्यासारख्या विषयावर ही चर्चा नसल्याने तुमचा सहभाग नसणार जे गृहित धरले होतेच.

In reply to by अलख निरंजन

हॅ हॅ हॅ .. धागा खरंच फाट्यावर मारण्याच्या लायकीचा आहे, म्हणुन प्रतिसाद देत नाही. बाकी गणपा मेदुवड्याची रेशिपी फार छान होती रे, त्या दिवशीच करुन पाहिली. इथे अमेरिकेत किसलेले खोबरे फारच गोडसर मिळते मिळते त्यामुळे चटणी थोडी गंडली पण वडे बेष्ट झाल्ते. बाकी काकवांच्या प्रतिसादामुळे कोबी आयत्यावेळी मिसळला होता त्यामुळे पाणी सुटुन पीठ पातळ झाले नाही.

In reply to by आनंदयात्री

अमेरिकेत किसलेले खोबरे फारच गोडसर मिळते मिळते त्यामुळे चटणी थोडी गंडली अमेरिकेत राहून त्यांच्याच खोबर्‍याचा अपमान आम्ही सहन करणार नाही.;) बाकी चर्चा चालू द्या.......

In reply to by रेवती

काकू जरी मी परायक मेट्यांच्या ब्रिगेडमधलाच कार्यकर्ता असलो तरी सध्या माझी अवस्था भाजपाच्या मुख्तार नकवींसारखी आहें ;) (हे असंच थत्तेचिचा आणि सुनिल केतकरांशी मैत्री कायम रहावी म्हणुन) आणि चटणी गोडसर झाली होती ही फ्याक्ट आहे. मग नंतर कळले की वॉलमार्टात किंवा मायरमध्ये मुद्दाम गोड न केलेल्यापण खोबर्‍याचा कीस मिळतो म्हणुन. कृपया या शक्यतेवर जरा प्रकाश पाडावा.

In reply to by आनंदयात्री

आम्ही मिडवेष्टात नवीन असल्याने तुम्हीच आम्हाला माहिती पुरवा. आणि बाकी सगळं नंतर काकू कुणाला रे म्हणतोस?

In reply to by रेवती

आपली अमेरिकेतली जागा सांगण्याचा क्षीण प्रयत्न असं म्हणणार होते, पण आपली गर्ल कॉमरेडरी असल्यामुळे असं म्हणत नाही. हे सोड, तुझी ती आंब्याच्या पानांचा फोडणीवाला तिरामिसू करण्याची पाकृ टाक ना मिपावर.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मिडवेष्टात कोणी मिपाकर आहेत का? असा धागा कश्याला सुरु करायचा म्हणून एकात एक असं काम करून घेत होते. बरं ते जाऊ दे. तू जो फोडणीचा तिसामिसू म्हण्तियेस तो मिडवेष्टात होणे नाही. इथे कॉर्नचं पीक जास्त येत असावं असं दिस्तय्.आता मक्याच्या कणसाचा दांडोरा वापरून काही रेशिप्या शोधून कळवते. आपण या धाग्यावरची आपली चर्चा आवरती घेऊया बै! नाहीतर ते संपादक टपलेलेच अस्तात मेले!

In reply to by रेवती

नाहीतरी तुझी रजा आहे तर त्या मक्याच्या कणसाचा दांडोरा वापरून रेशिप्या शोधून काढ. किंवा मक्याचा कणसाचे दाणे काढले की उरलेल्याचं रसम कसं करता येईल याचाही विचार कर गं.

धनंजय,
भारतीय लोकशाहीला असा अगदी टोकाचा दोष देऊ नये हे मान्य, पण तो चर्चेचा मुद्दा नाही. कारण तसे भारतात वस्तीला असलेल्या बहुतेक लोकांनीही करू नये. (लोकशाहीने नेमलेल्या पोलिसांनी कैदेत टाकलेला निरपराध वगैरे कोणी असेल, त्याने असे काही म्हटले तर समजून घेता येईल.)
सहमत.
भारताबाबत जोपर्यंत आपुलकी आहे आणि नाळ जोडल्याचा भावनिक अनुभव आहे, तोपर्यंत कुठेही स्थायिक झालेले लोक पोटतिडकेने बोलतील. हे अपेक्षित आहे.
पोटतिडकेने बोलण्यात काहीच आक्षेपार्ह नाही.
त्यांना भावुक होण्याचा हक्कही आहे. आणि भावुक होऊन काहीबाही म्हणणे (तात्पुरते) आक्षेपार्हही नाही.
असहमत! भावुक होऊन काहीबाही लिहिणे हे आक्षेपार्हच वाटते. कितीही भावुक झालो तरी सार्वजनिक मंचावर आपण काय बोलतो/लिहितो ह्याचे तारतम्य बाळगले गेलेच पाहिजे. लोक कशावरुनही भावुक होऊ शकतात. उदा. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर भावुक होणार्‍यांची कमतरता नाही.
अर्थात भारतात वस्तीला असलेल्या लोकांनी सुद्धा भावुक होऊन काहीबाही म्हणणे तात्पुरतेच आक्षेपार्ह नाही.
भारत देश/ भारतातील लोकशाही ह्यावर विखारी टिका करण्याचा करण्याच हक्क जितका देशस्थांना आहे तितका परदेशीयांना असू नये. नाळ जोडली आहे पण तरीही वास्तव्य बाहेरच आहे. तिथून टोकाची भाषा वापरणे हे देशस्थांच्या भावना दुखावणे असे मला वाटते. परदेशात स्थायिक होताना स्थायिक होणार्र्‍याकडून प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या देशाचे नुकसान झाले आहे. असे माझे मत आहे. त्यामुळे निदान काहीबाबतीत तरी परदेशस्थांनी देशस्थांच्या बरोबरीने हक्क मागू नयेत. मुक्तसुनित,
मला असं वाटतं की भावनेच्या भरात अशा प्रकारचे उद्गार अनेक जण काढतात. "सर्व राजकारण्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत" , "भारतीय क्रिकेट टीमला समुद्रात नेऊन बुडवलं पाहिजे" अशा स्वरूपाचे, फारसा कसलाच अर्थ नसलेले अभिप्राय आपण ऐकतोच. या मागे फार विचार केला आहे असं वाटत नाही.
बरोबर. पण मग अशा अविचारी आणि निरर्थक वक्तव्ये सार्वजनिक मंचावरुन कुणी करत असल्यास ते आक्षेपार्ह समजू नये का? त्याचा वेळीच निषेध होऊ नये का?

In reply to by अलख निरंजन

आंतरजालावर अनेकदा आपल्याला न पटणारी मते, आपल्याला न आवडलेले ललित लिखाण , आपल्याला चुकीच्या वाटाव्यात अशा कृती हे सर्व आपण पहातोच. कशाकशाला विरोध करायचा, कशाकशावर निगेटीव्ह टिप्पणी करायची , कशाकशाची पातळी दाखवून द्यायची आणि असे करताना कितपत व्यक्तिगत हल्ले-प्रतिहल्ल्यांची धोरणे राबवायची हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जोवर काही मूलभूत स्वरूपाच्या मूल्यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधाने होत नाहीत, जोवर कुणाचा अपमान , व्यक्तिगत निंदा नालस्ती, हीन स्वरूपाची विधाने होत नाहीत तोवर निषेधाचे शस्त्र उपसावे असे मला वाटत नाही. प्रस्तुत धाग्यात निर्देश केलेली कविता मला आवडली नाही. त्यामधे दोष शोधायचे तर सांगता येतील पण अशा दोषास्पद कृती खंडोगणती सापडतील. निषेध करावा असं त्या कवितेमधे मला आढळलेलं नाही. मते न पटणे म्हणजे निषेधाला आवश्यक ते कारण सापडणे नव्हे. आणि निषेधाच्या आडून व्यक्तिगत हल्ले करणे फारसे योग्य नाही.

In reply to by मुक्तसुनीत

घातली का खीळ चांगल्या धाग्याला!;) काय हे? आज रात्री प्राजुला बीएमएमातनं उचलून (पिक करून) घरी आणायचं काम माझ्याकडेच आहे. तिला दाखवेपर्यंत तरी चर्चा चालू द्या.

In reply to by अलख निरंजन

मंचावर जाऊन भावुक होऊन काहीबाही बोलणे हे फारतर "आक्षेपार्ह आहे" असे कोणीतरी म्हणण्यापुरते आक्षेपार्ह आहे. आणि तुम्ही "आक्षेपार्ह आहे" असे म्हटलेच आहे, म्हणजे कोणीतरी "आक्षेपार्ह" म्हटलेच आहे. मी खुद्द "भावुकता आटोक्यात आल्यावर असे म्हणत राहू नका" इतकेच म्हटले. मला त्याहून अधिक आक्षेप घ्यावासा वाटला नाही. पण "देशस्थांच्या भावना दुखावणे" वगैरे उगाच लावून घेतलेले दुखणे आहे. त्या कवितेत स्वतःसकट कवयित्रीने सरसकट मायभूमीच्या लेकरांना दोष दिलेला आहे. त्यामुळे "परदेशस्थांनी स्वतःकडे मोठेपणा घेऊन देशस्थांचा अपमान केलेला आहे" असे काही मला कळत नाही. नाहीतरी कविता देशस्थाने लिहिली आहे की परदेशस्थाने लिहिली आहे, हे सांगण्यासाठी कवितेच्या अंतर्गत कुठलाच संदर्भ नाही.
परदेशात स्थायिक होताना स्थायिक होणार्‍यांकडून प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या देशाचे नुकसान झाले आहे. असे माझे मत आहे. त्यामुळे निदान काहीबाबतीत तरी परदेशस्थांनी देशस्थांच्या बरोबरीने हक्क मागू नयेत.
मला वाटते परदेशस्थांना मतदानाचा हक्क सध्या नाही. आणि तो नाही हे ठीकच आहे. मतदानाच्या हक्काबद्दल तुम्ही बोलत असाल, तर ठीक आहे. (आणि मतदानाच्या हक्कातच कर बसवण्याचा हक्क, नागरी सुरक्षा बदलण्याचा हक्क वगैरे प्रकार येतात.) पण तुम्ही अभिव्यक्तीच्या हक्काबाबत बोलत असावात, असे संदर्भावरून वाटते. तो हक्क कायद्यात जितपत आहे, तितपत सर्वांनाच असावा. परदेशगमनाने होणारे नुकसान हा मुद्दा, आणि ज्या कवितेत देशस्थ/परदेशस्थ असा कुठलाही उल्लेख नाही, त्या कवितेत देशस्थांचाच अपमान बघणे... ही वडाची साल पिंपळाला लावण्यासारखा प्रकार वाटतो. आता हक्क वगैरे मूलभूत प्रकार सोडले, तर हेसुद्धा तथ्य आहे : परदेशस्थ व्यक्तीला अद्ययावत परिस्थिती ठाऊक नसेल, तर त्यांनी केलेली टीका ही व्यवहार्य नसेल, किंवा खर्‍या परिस्थितीस लागूही नसेल. वाटल्यास भंपकही असेल. तरी, कमी माहिती असलेल्या किंवा भंपक लोकांकडून आपण काहीबाही बोलण्याचा हक्क खारीज करत नाही. त्यांचे खंडन करतो, भंपकपणा उघड करतो, इतकेच.

In reply to by धनंजय

पण तुम्ही अभिव्यक्तीच्या हक्काबाबत बोलत असावात, असे संदर्भावरून वाटते. तो हक्क कायद्यात जितपत आहे, तितपत सर्वांनाच असावा.
- परदेशस्थांच्या अभिव्यक्तीच्या संदर्भात नेमका कोणता कायदा लागू व्हावा? भारतातला, की परदेशातला? आणि का? - भारताचा कायदा लागू होणे असल्यास, भारतात कोणीही 'मायभूमीच्या लेकरां'ना सरसकट 'षंढ' म्हणण्यास प्रतिबंध करणारा कायदा तूर्तास बहुधा नसावा, त्यामुळे प्रश्न मिटला, धन्यवाद. (असा कायदा पुढेमागे झाल्यास तेव्हाचे तेव्हा पाहून घेऊ. आणि तशीही अशा कायद्यांची पोच ही सर्वसाधारणतः त्यांची अंमलबजावणी परदेशस्थांवर - भारतीयांवर अथवा अभारतीयांवर - करता येण्याइतकी नसावी, त्यामुळे असा कायदा झालाच, तरीही बाकी कोणी नाही तरी परदेशस्थ त्यातून सहीसलामत सुटतील; कोणासही काळजी नसावी.) - परदेशाचा (आणि त्यातही परदेशस्थ जेथून व्यक्त होत आहे त्या देशाचा) कायदा लागू होणे असल्यास, अभिव्यक्तीची कायद्याने मंजूर पातळी ही परदेशस्थाच्या स्थानाप्रमाणे कमीजास्त होऊ शकेल, असे वाटते. त्यामुळे एकाच धाग्यावर भारतभूमीच्या लेकरांस सरसकट 'षंढ' म्हटल्याबद्दल एकीकडे कोठेतरी काहीही न होणे, तर दुसरीकडे कोठेतरी चौकात बांबूच्या छडीने पार्श्वभागावर जोरदार फटके, अशी परस्परविरोधी चित्रे दिसू शकतील. (अर्थात, हे जर संबंधित देशात दुसर्‍या देशाच्या लेकरांस सरसकट 'षंढ' म्हणण्यास किंवा तत्सम कृतीस प्रतिबंध करणारा एखादा कायदा असेल, तर आणि तरच. मात्र, बहुसंख्य देशांत असा कायदा बनवण्यात स्वारस्य असेल असे वाटत नाही, आणि अशा प्रकारच्या विधानांवर कोठेही बंदी असल्यास ती 'संबंधित व्यक्ती ही एका विशिष्ट इतर देशाची नागरिक किंवा वंशीय व्यक्ती असूनही त्या देशाच्या नावाने खडे फोडत आहे' या कारणास्तव असू शकेल याबद्दल प्रचंड साशंक आहे.)
परदेशस्थ व्यक्तीला अद्ययावत परिस्थिती ठाऊक नसेल, तर त्यांनी केलेली टीका ही व्यवहार्य नसेल, किंवा खर्‍या परिस्थितीस लागूही नसेल. वाटल्यास भंपकही असेल. तरी, कमी माहिती असलेल्या किंवा भंपक लोकांकडून आपण काहीबाही बोलण्याचा हक्क खारीज करत नाही. त्यांचे खंडन करतो, भंपकपणा उघड करतो, इतकेच.
या विषयावर मला जे मांडायचे होते, ते अत्यंत नेमक्या आणि थोडक्या शब्दांत मांडून माझे स्वतंत्र प्रतिसाद टंकायचे कष्ट वाचवण्याबद्दल अत्यंत आभारी आहे. फक्त,
त्यांचे खंडन करतो, भंपकपणा उघड करतो, इतकेच.
यात 'वाटले तर' एवढ्याच शब्दांची भर घालू इच्छितो.

In reply to by पंगा

संकेतस्थळबाबत अधिकारी न्यायव्यवस्था (ज्युरिसडिक्शन) कुठली हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. यू. एस. अमेरिकेतील कोर्टांनी केलेल्या ऊहापोहाबद्दल दुवा येथे बघावा. मिसळपावाचे प्रमुख संकेतस्थळचालक ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणचा कायदा लागू आहे, असे ढोबळमानाने मानायला हरकत नाही. (मिसळपाव संकेतस्थळावर असे कुठेतरी लिहिलेले बघितले आहे की खुद्द मिसळपाव चालकांवर मुंबईतला कायदा लागू आहे.) (मात्र तुम्ही म्हणता तेही खरेच. एखाद्या देशाचे सरकार म्हणू शकेल, की मिसळपाव सदस्य त्या देशातून टंकत असेल, त्या लेखा-प्रतिसादापुरते त्या सरकारचे मिसळपावावर ज्युरिसडिक्शन आहे. हे सरकार भारत-यूएस देशांपेक्षा वेगळे असले, तर मिसळपावाचे काही वाकडे करू शकत नाही. मिसळपाव चालकांनी खुद्दच भारताचे शासन मान्य केले आहे, आणि मिसळपावाचा सर्व्हर यू. एस मध्ये असे. अजून आहे का? सदस्य राहातो त्या देशातले सरकार त्यांच्या देशात असलेल्या सदस्यावर कारवाई करण्यास मात्र समर्थ आहेत. या बाबतीत शंका असल्यास मिसळपाव सदस्याने राहात्या देशातील कायदाच पाळावा.)

In reply to by धनंजय

असं बोलुन तुम्ही या धाग्याचा उद्देश जो की मिपावर प्रसिद्ध होणे हा निष्फळ करताय. अगदीच क्रुर बै तुम्ही!!!

थत्तेचच्चांचा जयजयकार! ;) चार दिवस उलटून गेले तरी तेच गुर्‍हाळ? बाकी, प्राजुतै बीएमएम एंजॉय करत असतील. आम्ही घरातूनच या चर्चा एंजॉय करू. चालू द्या!!

हॅ हॅ हॅ .. धागा खरंच फाट्यावर मारण्याच्या लायकीचा आहे, म्हणुन प्रतिसाद देत नाही.

भारतात राहाणार्‍यांइतकाच (किंबहूना कधी कधी जास्तच) देशाभिमान भारताबाहेर राहणार्‍यांमधे दिसून येतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे. राहिला प्रश्न प्राजूताईंच्या कवितेचा, त्या जर भारतात राहात असत्या तरीही त्यांनी अशीच कविता केली असती असं वाटतं. >> माझ्यामते परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना असा नैतिक अधिकार नसावा. असं जर तुमचं ठाम मत असेल तर पुढे जास्त काही बोलण्याची इच्छा नाही.

In reply to by मराठे

>>भारतात राहाणार्‍यांइतकाच (किंबहूना कधी कधी जास्तच) देशाभिमान भारताबाहेर राहणार्‍यांमधे दिसून येतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे. यातला "दिसून येतो" हा "असतो" या ऐवजी वापरलेला शब्द अतिशय समर्पक आहे. ;)

In reply to by अर्धवट

मला पण वाटलं सध्या कोकणस्थांवर वगैरे धागे निघतायत हा त्यापैकीच आहे की काय! (म्हणजे परदेशातले देशस्थ ब्राह्मण इ.इ.)

माझी काही मते देत आहे भारता बाहेर गेलेले पण आपलेच आहेत (त्यांची मुले सोडली तर). त्यातले काही जण कधी परत पण येऊ शकतातच की. म गांधी सुद्धा देशाची परिस्थीती पाहून परत आले व इतिहास घडवला. कधी कधी बाहेर राहून आपल्या देशाच्या व्यवस्थेच्या चांगल्या वाईट गोष्टी प्रकर्शाने जाणवतात कारण तोलायला दुसरा देशाची स्थिती असते त्यांच्या जवळ. देशस्थ परदेशस्थ लोकं टिका करतात ह्याचाच अर्थ त्यांना भारता बद्दल प्रेम आहे व खंत पण आहे. नाहीतर कशाला करतील टिका. - देशस्थ परदेशस्थ नागरिकानी तेवढे जरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा हे लक्षात ठेवावे. आपण पण करतोच की अमेरीकेवर टिका (काही संबंध नसताना). मला हे स्पष्ट करायचे आहे की मी भारतातच आहे. ;-)

पण अशा लोकांनी भारतीयांना षंढ म्हणणे नक्कीच आक्षेपार्ह आहे. तुम्हाला काय वाटते? हो निश्चीत आक्षेपार्ह आहे. (अवांतर : एका प्रतिसादाच्या सही मधे "अमेरिकन ** *" बघुन गंमत वाटली. मान न मान मै तेरा मेहेमान)

भारताबाहेर सेटल होणार्‍यांनी (पोएटीक लायसन्स वापरुनही) 'सारे भारतीय षंढ आहेत' किंवा 'भारतीय लोकशाही भाडखाऊ आहे' अशी टोकाची प्रतिकिया द्यावी का?
पासपोर्ट भारताचा असेल तर प्रतिक्रियेत आक्षेपार्ह वाटू नये. नसेल तर आक्षेपार्ह आहे. भारताविषयी 'जिव्हाळा' असणार्‍या पण पाकिस्तानी पासपोर्ट असणार्‍या एखाद्याने अशी विधाने केली तर आपण ऐकून घेवू का?

परदेशी वास्तव्यास असणार्‍या भारतीयांना, भारतावर भारतीयांवर टिका करण्याचा नैतिक अधिकार कितपत आहे? भारताबाहेर सेटल होणार्‍यांनी (पोएटीक लायसन्स वापरुनही) 'सारे भारतीय षंढ आहेत' किंवा 'भारतीय लोकशाही भाडखाऊ आहे' अशी टोकाची प्रतिकिया द्यावी का?
अरे हा काय प्रश्न आहे का? भारतात राहून तुम्ही आम्ही भारतासाठी करत नाही येवढे कार्य हे भारताबाहेर राहून करतात. अहो साधे उदाहरण घ्या, नुसत्या अनिवासी मिपाकरांचेच भारतीय शेअर बाजारात किती पैसे गुंतलेले आहेत बघा. आपण तर बॉ अनिवासी भारतीयांच्या बाजूने आहोत. हो, उद्या उडी मारुन तिकडे जायची संधी मिळाली तर राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध असलेली बरी. मला तर टिपिकल भारतीय मेंटालिटीचीच किव वाटत आलेली आहे. काल आमच्या एका भारतीय मिपाकराने आखाडाचे बेत सांगायला सुरुवात केली. मी त्याला विचारले की 'बाबा रे तू श्रावण पाळतो का?' तर 'नाही' म्हणाला. मग हा जर श्रावण पाळतच नाही तर आखाड साजरा करायला जाऊन श्रावण पाळणार्‍यांचे एक टेबल उगाच अडवून धरायचे कशाला ? पण हे सांगणार कोण ? मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ? हा दूवा तर छप्परफाड आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

या विषयावर मला हाच दुवा द्यायचा होता, तो अत्यंत नेमक्या आणि थोडक्या शब्दांत देऊन माझे दुव्याचे सोपस्कार करण्याचे स्वतंत्र कष्ट वाचवल्याबद्दल अत्यंत आभारी आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आपण तर बॉ अनिवासी भारतीयांच्या बाजूने आहोत. हो, उद्या उडी मारुन तिकडे जायची संधी मिळाली तर राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध असलेली बरी.>> पराशेठ, कसं ब्यॅरिष्टर हुनार तुमी? आसं येकदम मनातलं जाहीर करायचं नसतं भाऊ.. समजा उडी मारुन तिकडं ग्येलात आनि तिकडच्या अणिवाशी भारतीयांनी हिंग लावूनबी इच्यारलं न्हाई तरीबी त्यांच्या आरत्या ववाळत बसनार? लगीच पक्ष बदलायचा, णिवासींच्या घोळक्यात जायाचं आन समोरच्या पार्टीला शिव्या द्यायला सुरवात करायची. :) लक्षात ठेवा, आपण भांडणे करुन मरण्यासाठीच जन्माला आलो आहोत. बहिणाबाई म्हणायच्या, 'माणूस उपाशीपोटी भांडण करतो आणि भरल्यापोटी विचार करतो.' पण भरल्यापोटीही माणसे भांडतच राहातात. कधी जातीवरुन, कधी धर्मावरुन, कधी प्रांतावरुन तर कधी देशावरुन. पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले, 'ब्राह्मण षंढ (नपुंसक टु बी प्रिसाईज. पण तेच ते) आहेत.' आमच्या अक्कासाब म्हणाल्या, 'मायभूमी तुझी लेकरे षंढ आहेत.' आता आपल्याला थांबायचं नाही. कुणीतरी एकदा म्हणून टाका, ' हे वसुंधरे (म्हणजे पृथ्वीमाता बरं का) तुझी लेकरे षंढ' म्हणजे मग कसं ग्लोबलायझेशन झाल्यासारखं वाटेल. अरेच्चा! पण ही षंढत्व तपासणीची मोहिम कधी होऊन गेली? जनगणना झाली, रेशनकार्ड तपासणी मोहिमेचा बट्ट्याबोळ उडला, हे वाचतोय तोवर आधार कार्ड मोहिमेसाठी लोकांची गडबड सुरु झालीय. जातीच्या दाखल्यासाठी पोरं वणवण हिंडतायत. पुणे जिल्ह्याच्या मतदारयादीतून १२ लाख मतदार गायब आहेत. त्यासाठी पुन्हा मोहीम हाती घेणार आहेत. आमच्यापैकी अनेकजण गाफील राहिल्याने त्यांच्याकडे 'षंढत्वाचा दाखला' नाही. हे डॉक्युमेंट नसल्याने आमच्या मुलाबाळांना काही अडचण तर येणार नाही ना? मिपावरचे धागे वाचून काल तर मी स्वप्नात चक्क अर्जुन आणि द्रोणाचार्यांशी वाद घालायला गेलो, पण दोघेही पक्के पोचलेले निघाले. अर्जुन भेटल्यावर मी त्याला म्हटलं, ' तुला स्तनाग्रे नव्हती म्हणून तू म्हणे 'पूर्णपुरुष'. त्यातून द्रौपदी, सुभद्रा, उलुपि, चित्रांगदा अशा चार-चार बायकांचा नवरा. तरीही 'बॄहन्नडा' म्हणून वावरलास. तू नक्की आहेस कोण?' त्यावर अर्जुनानेच मला विचारले, 'तुला काय वाटतं, मी कोण?' मी म्हटलो, 'हे बघ महाभारत युद्ध सुरु होण्यापूर्वीच श्रीकृष्णाने तुला 'षंढ' (क्लैब्य) अशी शिवी दिली आहे. शिवाय भीष्मांना तू शिखंडीच्या आडून बाण मारलास. म्हणजे तू नक्कीच षंढ.' त्यावर अर्जुन शांतपणे म्हणाला, 'तसे समज. पण कृष्ण काही एकटाच नव्हता ज्याने मला ही शिवी दिली. अरे कृष्णाने अवतार संपवताना माझ्यावर यादवस्त्रियांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवली होती. वाटेत चोरांनी हल्ला करुन धन आणि त्या स्त्रिया लुटल्या. मला त्यावेळी अस्त्रं आठवेनात. गांडीव धनुष्य पेलवेना. मी हतबल झालो. मी पराक्रमी अर्जुन आहे, असे नुसतेच ओरडायला लागलो. त्यावेळी त्या लुटारूंचा म्होरक्या फिदीफिदी हसून मला म्हणाला, 'तू कसला अर्जुन? तू तर षंढ दिसतोस.' अर्जुन फार वाद घालत बसला नाही म्हटल्यावर मी द्रोणाचार्यांकडे मोहरा वळवला. त्यांना विचारले, ' तुम्ही बिचार्‍या एकलव्याचा अंगठा मागितलात. केवळ तुम्ही अर्जुनाचे गुरु होतात म्हणून हा अन्याय? शोभतं का तुम्हाला?' त्यावर द्रोणाचार्यही शांतपणे म्हणाले, ' आधी एक गोष्ट स्पष्ट करतो. मी काही अर्जुनाचा गुरु नाही. मला फक्त पगाराच्या मोबदल्यात त्याला उत्तम शस्त्रास्त्रविद्या शिकवण्याचे काम दिले होते. कौरवांचा नोकर किंवा एक प्रोफेशनल कोच म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडले. अर्जुनाचा गुरु कृष्ण होता. उगाच 'कुणाचा गुरु कोण?' या वादात मला ओढू नका. राहता राहिला एकलव्याचा मुद्दा. माझ्याबद्दल नेहमी चुकीचे लिहिले आहे आणि त्यात मिडियाचा हात आहे. एकलव्य वयाने मोठा असुनही अंगठा चोखण्याची त्याची सवय गेली नव्हती. म्हणून मी त्याला अंगठा तोंडात घालायला बंदी केली. कौरव-पांडव महायुद्धात तोही लढला आहे. त्याचा अंगठा आधीच कापला असता तर तो बाण तरी सोडू शकला असता का?'

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिकांशी सहमत ! ह्या प्रतिसादाला उत्तर म्हणून मी 'मी हलकट कसा झालो.... काही आठवणी' ह्या धाग्याची घोषणा करत आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हीहीहीही!!! त्यापेक्षा चर्चा सुरू करा. आपण सर्वच हलकट कसे झालो यावर प्रत्येकाकडे एकदम चटकदार किस्से असतील. हलकट्ट सारी लेकरे रे संकेतस्थळा माफ कर...

In reply to by योगप्रभू

योगप्रभूंनी अर्जून आणि द्रोणाचार्यांशी केलेला वाद-संवाद आवडला. बाकी, लुटारुंचा म्होरक्या कोणत्या देशातला होता ते काही कळलं नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by योगप्रभू

पण प्रभु तुम्ही अर्जुनाला हे का नाही विचारलत की तो देशस्थ की परदेशस्थ ? ऑनसाईटवर होता ना १२ वर्ष तो (१ वर्ष फिरती वर पण होता म्हणे सगळी कडे). नंतर तर इंद्रप्रस्थाच ग्रिनकार्डच मिळवल होत त्याने. चांगल ठणकवायच नाही का हस्तिनापुरात असंतोष माजवणार्‍या त्या अतिरेक्याला.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>हा दूवा तर छप्परफाड आहे. सदर दुव्यात ५५ बिलियन डॉलर परदेशस्थ भारतीयांनी २०१० मध्ये 'रेमिट केले' असे म्हटले आहे. त्या माहितीचा या धाग्याच्या संदर्भात काय अर्थ लागतो हे कळले नाही.

खरच ह्या धाग्याला फाट्यावर मारा.. आज काल कूणीपण काहीपण बोलत असते.. जर केवळ बोलुन आणी टिप्पणी करुन प्रोब्लेम्स सॉल्व्ह झाले असते तर अण्णा हजारे यांना ऊपोष्णाला बसण्याची वेळ आली नसती..

धाग्याशी असहमत. नुसते कोणी 'षंढ' म्हणले तर लगेच आपण होतो का षंढ ? मग एवढे मनावर घ्यायचे कारण काय ? प्राजुताईंनी लिहिलेली ती कविता जास्त करुन या देशाच्या नेत्यांना उद्देशून होती. सामान्य माणूस अतिरेक्यांविरुध्द काय करु शकतो ? तो फक्त आपला संताप व्यक्त करु शकतो. आणि सर्व परदेशस्थ भारतीय, परदेशी का स्थायिक झाले ? याचाही विचार करावा. कोणी स्वखुशीने आपले आप्त सोडून परदेशी जात नाही. या देशात त्यांना समान संधी नाकारली गेली, हेही एक महत्वाचे कारण असू शकते.

"...एक उपचर्चा अशी सुरू आहे की...टोकाची प्रतिकिया द्यावी का?" "माझ्यामते..." "...तुम्हाला काय वाटते?" "...धाग्यावर आणखी अवांतरे नकोत म्हणून इथे चर्चा करुया."
ओळखीचं. अगदी ठरलेला नमुना आहे. गल्ली चुकली की काय? न पटलेली गोष्ट एकच.
"माझ्यामते परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना असा नैतिक अधिकार नसावा."
हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात जाते आहे. ओळखीच्या गोष्टींत हे बसत नाही. त्यामुळं आणखी एक शंका आली - हा डाव दिसतो. डाव असेलच तर मात्र हार्दीक अभिनंदन. कारण असला डावपेच हा निश्चितपणे तिरकस तल्लख डोक्यातूनच येऊ शकतो.

अनिवासी भारतीयांना किंवा कोणालाही चुकीच्या गोष्टीवर टीकेचा नैतिक अधिकार आहेच.पण एक गोष्ट मात्र निश्चित, कि ज्या वेळी अनिवासी भारतीयांच्या घोळक्यात बसले असताना भारतावर टीका होते तेव्हा वाईत जरूर वाटते. हे म्हणजे एखाद्या काकाने किंवा मामाने तुमच्या मुलावर कितीही योग्य टीका केली तर तुम्हाला वाईट वाटते. तसेच हे...