Skip to main content

भुंगा

लेखक आनंदयात्री यांनी सोमवार, 30/06/2008 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
अजाण भुंगा एका दिवशी बागेमध्ये भ्रमरत होता नाजुक सुंदर फुले आगळी अन थोडिशी कोळी जाळी अल्लड सावज अवचित आले भराभरा ते जाळे विणले कोळी वदला फुला आपला स्नेह निराळा सख्य निराळे त्या वेड्याला पाहुन पटकन फुलानेच एक जाळे विणले होता कोळी हरकामी तो भराभरा तो डाव मांडला उधळुन देता परागसुमने भुंगा वेडा धावत आला भुंगा वेडा असाच होता आप्तांपासुन दुरावलेला दिसता कोमल फुल आगळे वेडा भुंगा मोहित झाला झेप घेउनी मर्म स्थळावर गुज फुलाचे ऐकत बसला फुलही वदले शोककथा ते अनाघ्रात मी सुंदर होते पण जगाची तर्‍हाच न्यारी कुस्करले अन गचाळ म्हटले कोळ्याने मज घात हा केला सभोवती हे जाळे विणले तुच आगळा माझ्यासाठी पटकन उडला सत्वर आला वेडा भुंगा ऐकत बसला दु:खी झाला कष्टी झाला कोळ्याने तो करता इशारा फुल लागले पंख मिटाया समजुन कावा भुंगा वेडा यत्न निसटण्या करु लागला फुल म्हणाले वेड्या भुंग्या कावा तुज का नाही उमगला ये आता ये शोषुन घे मग मधुरस पाहिजे हवा तेवढा खजिल भुंगा शेवटचा तो प्रणय करण्यास अधिर झाला दुज्या सकाळी रविकिरणांनी फुलास नाजुक पुन्हा उठवले निसटुन गेले कलेवर काळे अनायसे ते जाळ्यात पडले. . .
लेखनविषय:

वाचने 12192
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

कविता आणि फोटो दोन्ही सुंदर..... (मिपा वरील भ्रमर ) मदनबाण.....

लेका कविता कधीपासून करायला लागला रे! कविता आवडली. अजून येउ दे! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

एक संस्कृत श्लोक...... रात्री: गमिष्यसि भविष्यसि सुप्रभात भास्वानुदेष्यसि हसिष्यसिपंकजश्री: इथ्यं विचियन्ती कोषगते द्विरेफे हा हन्त हन्त नलीनीं गज उच्चहारः रात्र जाईल सकाळ होईल सूर्य उगवेल आणि कमळ उमलेल ( मग मी बाहेर पडेन) असा विचार करत भुंगा (मिटलेल्या)कमळात बसून राहीला अरेरे..हत्ती नी ते कमळ (मिटलेल्या अवस्थेत) खुडुन टाकले की...... पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

चा॑गली केलीस रे कविता. अजुन येऊ देत. बाकी ईनोबाला पडलेला प्रश्न मला ही पडला.

In reply to by शितल

कविता तर चांगलीच भारी लिहली आहेस ... बाकी, हा नाद कधी लागला ... स्वगत : आयला मीच एकटा " दगड" राहिलो आहे असं वाटतयं .. छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

मला तर आंद्याची कविता वाचून धक्काच बसला. येवढी अप्रतिम कविता केली आहे कसे काय जमते राव लोकाना. ते अविनाशशेठ, पुष्कराज आता हा आंद्या काय भारी भारी कविता करतात राव. मस्तच. पण चला नुसताच दगड राहीलेला मी एकटाच नाहीये.. :) (खाणीतला दगड) पुण्याचे पेशवे

मस्त जमली आहे कविता..... आवडली ! ** राज जैन येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

मस्त लिहिलीय कविता... अगदी गुणगुणत राहावीशी वाटते..

छान आहे कविता आणि चित्र दोन्ही...

बहोत बढिया!

"भ्रमरत" मध्ये "भ्रम-रत" आणि "भ्रमत" असे दोन अर्थ निघून श्लेष होतो आहे.

In reply to by फटू

कविता आणि फोटो- दोन्ही सुंदर आहे!

आनंदा, काय सुरेख कविता केली रे !!! आवडली.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्म्म्म.... वो औरंगाबादको जाऊन आनेके बाद ये कविता बनी हैं ना??? आ रहा हैं मेरे ध्यानमें थोडा थोडा... आते आते रस्तेंमें लिख डाली क्या?? और लिख्खो! ;)

आयला आंद्या, कविता लै भारी रे! च्यामारी, तू पण एक कवी आहेस हे माहीतच नव्हतं! :) तात्या.

काय रावं मस्त कविता करता की. अजुन येउ द्यात भ्रमर चेतन

मस्त आहे रे कवीता. इथे सगळेच कवी आहेत. काही "दगड" आहेत. (काही दगडातली एक दगडी) -ऋचा "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

वा! काय सुंदर रचना केली आहे. वाचता वाचता भुंग्याच्या दु:खात नकळत समरस झाले. फोटो पण छान आहे.

पुढील ओळींवर थोडी मेहनत घ्यायला हवी होती. थोडा नादभंग झाला. त्या वेड्याला पाहुन पटकन फुलानेच एक जाळे विणले होता कोळी हरकामी तो
भराभरा तो डाव मांडला

छान लिहिल आहेस..असच लिहित रहा..

सर्वांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल केलेल्या कौतुकाबद्दल आभारी आहे. धन्यवाद. :)

कविता बेस झालीय. छानच. पुलेशु. अभिज्ञ.

आनंदयात्री छान कविता! रुपक सुंदर वापरले आहेस. मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."