✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दहशतवाद आणि प्रतिक्रीया

व
विकास यांनी
Fri, 07/15/2011 - 05:06  ·  लेख
लेख
गेल्या दशकापासून भारतास दहशतवादी हल्ल्यांनी ग्रासले आहे. तसे म्हणायचे झाले तर पंजाब प्रश्न जेंव्हा भडकला होता तेंव्हा देखील भारतात अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले होतेच. पण (त्या हल्ल्यांची बाजू न घेता) फरक म्हणाल तर इतकाच होता की त्यांच्यावर (शिखांवर) झालेल्या अथवा त्यांना वाटणार्‍या अन्यायाने आणि त्यासंदर्भात स्वतःची पोळी टिकवण्यासाठी त्यांना खेळवाणार्‍या तत्कालीन राज्यकर्त्यांमुळे उठलेला पण मर्यादीत भूभाग आणि राजकीय कारणांवरून उडालेला तो भडका होता. त्यामुळे त्यावर शस्त्र आणि समझौता या तोडग्यांनी पायबंद घालता आला. कारण एकूण शिख समाजाच्या भारताविषयीच्या आस्थेबद्दल कोणी शंका घेऊ शकत नाही. मात्र गेल्या दशकापासून चालू झालेल्या दहशतवादाचे स्वरूप हे बघता बघता भारतापुरते न रहाता जगभर पसरत गेले. भारतातील दहशतवादी हल्ल्यांची मुळे पण भारताबाहेरच असल्याचे दिसते. १९९० च्या दशकापासून सर्व हल्ले आणि त्यातील हानी पहायचे ठरवले तर भरपूर वेळ लागेल म्हणून तुर्तास फक्त मुंबईतील हल्ले पाहूया: (संदर्भ: विकी)
  1. 12 March 1993 - Series of 13 bombs go off, killing 257
  2. 6 December 2002 - Bomb goes off in a bus in Ghatkopar, killing 2
  3. 27 January 2003 - Bomb goes off on a bicycle in Vile Parle, killing 1
  4. 14 March 2003 - Bomb goes off in a train in Mulund, killing 10
  5. 28 July 2003 - Bomb goes off in a bus in Ghatkopar, killing 4
  6. 25 August 2003 - Two Bombs go off in cars near the Gateway of India and Zaveri Bazaar, killing 50
  7. 11 July 2006 - Series of seven bombs go off in trains, killing 209
  8. 26 November 2008 to 29 November 2008 - Coordinated series of attacks, killing at least 172.
  9. 13 July 2011 - 13 July 2011 Mumbai bombings
आता या सर्व हल्ल्यांनंतर एकही दंगल उसळलेली दिसत नाही की प्रतिक्रीयात्मक हिंसेत कोणाला मारले गेल्याचे दिसते. हेच जर चित्र अजून व्यापक केले आणि भारतभर झालेले सर्व दहशतवादी हल्ले पाहीले तर त्यात पण कुठेच प्रतिक्रीयात्मक दंगल झाल्याचे दिसणार नाही आणि या उपजत भारतीय मनाचे आपल्या सर्वांनाच कौतुक वाटले पाहीजे. मला तर नक्कीच वाटते. पण, मग प्रश्न पडतो, की जेंव्हा केंव्हा (आणि दुर्दैवाने अजूनही थांबवता न येणारे) दहशतवादी हल्ले होतात तेंव्हा त्याचा कुठेही स्पष्ट शब्दात निषेध न करता, केवळ जे यात होरपळले जात आहेत आणि तरी देखील कुठलीही हिंसा न करणार्‍या अशा सामान्य नागरीकांना, शांततेचे पाठ का पढवले जातात? या वृत्तीस नक्की काय म्हणावे? या नागरीकांना वाटेल ते बोलताना, त्यांना taken for granted करणे ह्यात नक्की काय दिसते? वास्तवीक यात सर्वधर्मीय भारतीय नागरीक होरपळले जात आहेत. पण तरी देखील ज्या पद्धतीने बोलले जाते त्यातून फक्त गैरसमज पसरू शकतात. त्यातूनच समाजात फूट पडू शकते असे वाटत नाही का? आधीच पिचलेल्या सामान्य माणसास अजून कमी लेखायला लावणारी ही वैचारीक हिंसाच नाही का? हे "स्पिरीट"चे भूत मानगुटीवरून कधी उतरवणार?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24782 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

द्वेष

सहज
Tue, 07/19/2011 - 09:27 नवीन
याच धाग्यात वरती माझ्या पहील्या प्रतिसादाला उत्तर देताना विकासराव लिहतात की आता या दहशतवादी हल्ल्याचे उदाहरण घेऊया, नक्की तुम्ही कुठे धार्मिक द्वेष बघितला म्हणून धर्माधारीत शांततेचे पाठ देणे गरजेचे वाटते? श्री पंगा यांनी ते सोदाहरण दाखवूनही दिले. तर त्यांच्यावरच दुही माजवत आहे. किरकोळ गोष्टीचे भांडवल केले जात आहे, संस्थळ बदनाम केले जात असे आरोप, लांछन वगैरे वगैरे लावले जात आहे. वा वा!! भले शाबास!! कोण म्हणतो की शांततेचा पाठ पढवणार्‍यांचे काम सोपे आहे? :-) या अश्या राजकीय प्रेरीत धागे, अमुक जमातीनेच का नेहमी सहन करायचे, ही बघा आमची सहनशक्तीची यादी करत रहाणे व ललकारत रहाणे की आता बास झाले, उद्रेक करुया, 'फायनल सोल्युशन'. यालाही मी वर्षानुवर्षे द्वेषाला पोषक वातावरण ठेवणे असेच म्हणतो. त्याकरता जेव्हा संधी आहे तेव्हा शांततेचा पाठ पढवणे गरजेचे आहेच. म्हणुन मग धर्माभिमान, राष्ट्राभिमान यांच्या चकचकत्या मशाली घेउन तुम्ही कोण सुधारक व्हा बाजुला असा सूर असतो. यात नवे काही नाही. म्हणुन तर प्रसिद्ध म्हण आली आहे ना - Patriotism is the last refuge of the scoundrel... असो सुधारक बाजुला होणार नाही. जे आहे ते असे आहे सांगीतल्याशिवाय रहाणार नाही. कोणाला किती पटते न पटते हे ज्याची त्याची जाण वगैरे वगैरे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

इमेज

राजेश घासकडवी
Tue, 07/19/2011 - 09:57 नवीन
पंगा यांनी मिपाची इमेज त्यांना कशी प्रतीत होते हे सांगितलं. त्यावर अनेकांनी अंतर्मुख झाल्याचं कबुलही केलं. मला वाटतं तसा आत्मपरीक्षण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणं हे मॅच्युरिटीचं लक्षण आहे. पंगांचं म्हणणं बरोबर वाटलं नाही तर त्याचा प्रतिवाद करणं किंवा इतर उदाहरणं दाखवून देणं ठीक. मात्र त्यांना दिसलेलं चित्र आवडलं नाही म्हणून 'मिपाची इमेज खालावण्याचा प्रयत्न' म्हणणं बरोबर वाटत नाही. डोंट शूट द मेसेंजर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

होय

आनंदयात्री
Tue, 07/19/2011 - 18:23 नवीन
>>डोंट शूट द मेसेंजर असा काही प्रयत्नच नाहीये. पंगाशेठला जे चूक वाटले ते त्यांनी लिहले, ते तुम्हाला योग्य वाटते. मला त्यांचे तसे लिहणे ठिक नाही वाटले ते मी कारणासहित लिहले आहे. ते तुम्हाला ईमॅचुअर वाटत असेल तर हरकत नाही, कदाचित मला माझे मत नीट समजावता आले नसावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

=)) =)) मध्ये वाहिदा उभी

परिकथेतील राजकुमार
Tue, 07/19/2011 - 18:29 नवीन
=)) =)) मध्ये वाहिदा उभी आहे, तिच्या ह्या खांद्यावर त्या दिशेला तोंड केलेली दंबूक आहे आणि त्या खांद्यावर ह्या दिशेला तोंड केलेली एक दंबूक आहे आणि दोन बाजुला दोन गट उभे आहेत असे चित्र समोर उभे राहिले :) वाहिदा विषयी मिपाकरांना अचानक वाटू लागलेली आत्मियता बघून भरुन आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

??

पैसा
Sun, 07/17/2011 - 13:00 नवीन
मला वाटतं, विकास यांचा लेख शांत असलेल्या सामान्य नागरिकांना शांततेचे पाठ देणार्‍यांचा निषेध करणारा आहे, पण बहुतेक प्रतिक्रिया हा विषय सोडून आणखी इतर अनेक दिशांना धावत आहेत!
  • Log in or register to post comments

शांततेचे आवाहन

नितिन थत्ते
Sun, 07/17/2011 - 13:28 नवीन
>>मला वाटतं, विकास यांचा लेख शांत असलेल्या सामान्य नागरिकांना शांततेचे पाठ देणार्‍यांचा निषेध करणारा एखाद्या घटनेनंतर शांतता राखणारे सामान्य लोक प्रक्षुब्ध झाले तर त्याचे भांडवल करून दंगल करणार्‍यांना लेजिटिमसी मिळते. सामान्य लोक प्रक्षुब्ध झाले नाहीत (कापा, ठोका, मारा असे म्हणू लागले नाहीत) तर दंगल करणार्‍यांना उघडपणे दंगलीची हाक (उत्स्फूर्त प्रतिक्रियेच्या नावाखाली) देणे कठीण जाते. म्हणून आवाहन सामान्यांना* करायचे असते. *अलिकडे बाबरीप्रकरणी न्यायालयाचा निकाल लागल्यावर सामान्य मुसलमानांना शांततेचे आवाहन आणि सामान्य हिंदूंना 'विजय साजरा न करण्याचे आवाहन' केले गेले. त्याचा उद्देश मुस्लिम समाजातील संभाव्य दंगेखोरांना लेजिटिमसी मिळू नये हा होता. १९९३ च्या दंगलीत (जानेवारीत पुन्हा उसळलेल्या) आणि गोध्रा प्रकरणानंतर सामान्य हिंदू लोकही दंगल व्हावी (पक्षी - मुसलमानांना अद्दल घडवावी) अशा मताचे बनले होते त्याचा फायदा शिवसेना व भाजप यांनी घेतला. तसाच तो १९९२ च्या डिसेंबरच्या दंगलीत मुस्लिम दंगेखोरांनी घेतला होता. आता अशा आवाहनामुळे लोक शांत राहिले तर दंगल करता येत नाही म्हणून कोणाची चरफड होत असेल तर त्याला इलाज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

@पैसा: मला वाटतं, विकास यांचा

विकास
Sun, 07/17/2011 - 17:51 नवीन
@पैसा: मला वाटतं, विकास यांचा लेख शांत असलेल्या सामान्य नागरिकांना शांततेचे पाठ देणार्‍यांचा निषेध करणारा आहे, पण बहुतेक प्रतिक्रिया हा विषय सोडून आणखी इतर अनेक दिशांना धावत आहेत! सहमत. @नितिन थत्ते: एखाद्या घटनेनंतर शांतता राखणारे सामान्य लोक प्रक्षुब्ध झाले तर त्याचे भांडवल करून दंगल करणार्‍यांना लेजिटिमसी मिळते. म्हणूनच दहशतवादी घटनांनंतर कितीवेळेस दंगली झाल्या या संदर्भातील ऐतिहासीक दाखला दिला. तो (चर्चेतील विदा)मुंबईपुरता मर्यादीत असला तरी भारतभर झालेल्या सर्व दहशतवादी कृत्यांना दिलेल्या प्रतिक्रीया पाहील्या तर तेच दिसते की कोणीही शांतता सोडली नाही की कोणी त्या दहशतवादाचे दंगलीकरण्यासाठी म्हणून भांडवल केले नाही. अर्थात ह्याकडे सोयीने दुर्लक्ष केले जाते आणि तेच वरील प्रतिसादात पण दिसते. त्यावर आक्षेप आहे. १९९३ च्या दंगलीत (जानेवारीत पुन्हा उसळलेल्या) आणि गोध्रा प्रकरणानंतर सामान्य हिंदू लोकही दंगल व्हावी (पक्षी - मुसलमानांना अद्दल घडवावी) अशा मताचे बनले होते त्याचा फायदा शिवसेना व भाजप यांनी घेतला. तसाच तो १९९२ च्या डिसेंबरच्या दंगलीत मुस्लिम दंगेखोरांनी घेतला होता. मूळ चर्चेसाठी अवांतरः हा सामाजीक प्रश्न होता दहशतवादाशी संबंध नव्हता. आधी वर इतर प्रतिक्रीयेत म्हणल्याप्रमाणे, कुठल्याही हिंसेचे समर्थन करण्याचा प्रश्न नाही आणि मी करत देखील नाही. निषेधच करेन. मात्र बर्‍याचदा शांततेचे तथाकथीत प्रेमी तसे करताना दिसत नाहीत. अगदी उदाहरणादाखल दोन पटकन आठवणारी उदाहरणे: गोध्रा येथे कारसेवकांचा रेल्वे डबा जाळल्यावरदेखील, अगदी स्वत:ला सेक्यूलर समजण्यार्‍या राजकारण्यांनी कारसेवकांमुळेच (पक्षी: रामजन्मभूमी मुळेच) झाले असे म्हणण्यात वेळ घालवला आणि कुठेही झालेल्या हिंसेचा निषेध करण्याचा प्रयत्न देखील केला नाही. मिपावर देखील २६/११ नंतर देखील लेख काय आला होता तर हे रामजन्मभूमीमुळे झाले आणि त्याला अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रीया दिल्याचे आठवते. असो. चर्चा प्रस्ताव दहशवतादानंतरच्या प्रतिक्रीया कशा असतात या संदर्भातील आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

?

नितिन थत्ते
Sun, 07/17/2011 - 20:28 नवीन
दहशतवाद आणि इतर (प्रक्षोभक) घटना यांना वेगळे समजणे पटत नाही. असो. मी सामान्यांना शांतीचे पाठ पढवण्याचे कारण स्पष्ट केले. तुम्ही दिलेल्या यादीनुसार दहशतवादी घटनांनंतर दंगल झाली नाही यावरून त्या शांतीचे पाठ पढवण्याचा उपयोग होत असण्याची शक्यता आहे असे दिसते. मग ते करत राहणे चांगलेच ना? पाठ पढवल्यामुळे दंगल होत नाही यालाच ज्यांचा आक्षेप असेल त्यांनी पाठ पढवण्याबाबत दु:ख करावे. तुम्ही का करता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

उलट आहे

विकास
Sun, 07/17/2011 - 20:36 नवीन
तुम्ही दिलेल्या यादीनुसार दहशतवादी घटनांनंतर दंगल झाली नाही यावरून त्या शांतीचे पाठ पढवण्याचा उपयोग होत असण्याची शक्यता आहे असे दिसते. मग ते करत राहणे चांगलेच ना? उलट आहे. दहशतवादी हल्ल्यांनंतर अमूक "भारतातीलच एका समाजास, हाणा-मारा-मुडदे पाडा" , अशा पद्धतीची प्रक्षोभक अथवा हिंस्त्र म्हणून निषेधार्ह विधाने झालेली दिसलेली नाहीत. कारण समाज दहशतवाद हा वेगळा प्रकार आहे हे जाणून आहे. आणि तरी देखील शांततेचे तथाकथीत प्रेमी धर्माच्या चष्म्यातून शांततेचे पाठ पढवत समाजात दुही माजवतात असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

?

नितिन थत्ते
Sun, 07/17/2011 - 20:43 नवीन
>>तरी देखील शांततेचे तथाकथीत प्रेमी धर्माच्या चष्म्यातून शांततेचे पाठ पढवत समाजात दुही माजवतात असे वाटते. कळले नाही. धर्माच्या चष्म्यातून शांततेचे पाठ म्हणजे काय? आणि शांततेचे पाठ पढवल्याने समाजात दुही माजते म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

पाठ आणि दुही

श्रावण मोडक
Sun, 07/17/2011 - 20:55 नवीन
तुमचे मुद्दे 'अतिरेकी हल्ल्यांविरोधात हिंसा न करणारा समुदाय' या गृहितकावर आधारलेले दिसतात. तुम्ही वर एके ठिकाणी म्हटले आहे -
ज्यांनी आजतागायत एकाही अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात हिंसा केली नाही त्यांना तसे धरून सतत धोपटणार्‍यांना म्हणत आहे.
अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात हिंसा म्हणजे कोणाच्या, कोणी, कुठं, कशी, केव्हा करायची? अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात हिंसा केली नाही हे ठीक; पण करायची असेल तर अतिरेकी कुणाला, कुणी, कसे, वगैरे, ठरवायचे? मग त्यानंतर, एक तर परदेशातील दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करावे लागेल. देशांतर्गत काय करणार? हिंदूंनी मुस्लिमांना, आणि 'समझौता'सारख्या घटनांबाबत मुस्लिमांनी हिंदूंना? तुम्ही आत्ता म्हणत आहात की,
दहशतवादी हल्ल्यांनंतर अमूक "भारतातीलच एका समाजास, हाणा-मारा-मुडदे पाडा" , अशा पद्धतीची प्रक्षोभक अथवा हिंस्त्र म्हणून निषेधार्ह विधाने झालेली दिसलेली नाहीत. कारण समाज दहशतवाद हा वेगळा प्रकार आहे हे जाणून आहे.
या जाणत्या समाजात चॅनेलवर झळकण्याची किंवा आंतरजालावर लिहिण्याची संधी असणारी (माझ्यासह) आपल्यासारखी मंडळी (किंवा दंगलीतच ज्यांचा हितसंबंध थेट गुंतलेला आहे अशी मंडळी) समाविष्ट नसावीत बहुदा.
शांततेचे तथाकथीत प्रेमी धर्माच्या चष्म्यातून शांततेचे पाठ पढवत समाजात दुही माजवतात असे वाटते.
शांततेचे पाठ पढवण्याने समाजात दुही माजते, हे कसे हे कळत नाही. शांततेचे पाठ पढवणाऱ्यांना समाज खूपच सिरियस घेतो असे गृहीतक त्यामागे असावे. हे पाठ गंभीरपणे घेऊन त्याउलट समाज रिअॅक्ट होतो, असा या विधानात दडलेला अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

दुही...

विकास
Sun, 07/17/2011 - 21:32 नवीन
शांततेचे पाठ पढवण्याने समाजात दुही माजते, हे कसे हे कळत नाही (श्रामोनी आणि थत्त्यांनी विचारलेल्या समान प्रश्नाबाबत) शांततेचे पाठ पढवणारे हे धर्माधारीत पाठ पढवतात. वर थत्यांना एकेठिकाणी या संदर्भात गोध्रा रेल्वे आणि २६/११ नंतरच्या प्रतिक्रीयांसदर्भात दिलेली उदाहरणे बोलकी आहेत. त्यामुळे कळत आणि नकळत समाजातील सर्वसामान्य माणसे देखील धर्माधारीत बाजू घेऊ लागतात. वर वाहीदांचा संदर्भ आणत पण जे काही दुर्दैवाने झाले आहे ते त्याचेच द्योतक आहे. हेच वेगळ्या संदर्भात आधी इतरांनी आणि आत्ता प्रत्यक्ष जगतात जातींच्या बाबतीतही होताना दिसते. आता इतकेच उत्तर दिले तर असे वाटू शकेल की मी केवळ (अशांच्या चष्म्यातून) हिंदूंनाच शांततेचे पाठ पढवले जातात म्हणून तक्रार करत आहे. पण माझा मुद्दा आहे तो समोरचा कुठलाही धर्माचा असेल म्हणून काही फरक पडत नाही. धर्माधारीत नको इतकेच. आता दुसरा अजून एक मुद्दा पहा: बाँबस्फोट झाले म्हणून काही प्रतिक्रीया संताप व्यक्त करणार्‍या आल्या तर त्यावर आपण लगेच, असे कशाला , अनाठायी, वगैरे म्हणतो. पण मग या एका लेखात (जो बाँब नाही की काही जखम देखील करत नाही) जे काही लिहीले त्यावरून व्यक्तीगत वाटून तिळपापड होत माझ्यावर टिका होतेच ना? मी ती व्यक्तीगत घेत नाही आहे, पण दिसते काय तर कुणाला कशाचा तरी त्रास होतो. मग तो एखाच्यास देशाविरुद्धच्या, आपल्या माणसांविरुद्धच्या केलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे झाला तर तो लगेच चुकीचा ठरतो आणि येथे टिकात्मक कोणी केला तर झाला तर ते चालते... असे कसे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा