✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुंबईमध्ये बॉम्बस्फोट?

ध
धमाल मुलगा यांनी
Wed, 07/13/2011 - 19:30  ·  लेख
लेख
नमस्कार मित्रहो, नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार मुंबईमध्ये दादर-कबुतरखाना, ऑपेरा हाऊस आणि झवेरीबाजार इथे बॉम्बस्फोट झाले आहेत असे कळते. नक्की काय आहे ते कळत नाही. :( ही बातमी खरी आहे काय? असल्यास सदरहू ठिकाणी वावरणारे, राहणारे, कामानिमित्त जाणारे आपले सर्व मिपाकर बंधूभगिनी सुखरुप असावेत अशी प्रार्थना! आपला, -(भयभीत आणि काळजीत पडलेला) धम्या.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
40183 वाचन

💬 प्रतिसाद (108)

प्रतिक्रिया

मी

तिमा
Wed, 07/13/2011 - 20:53 नवीन
मी तिरशिंगराव सुखरुप घरी पोचलो. बायको पण नुकतीच घरी पोचलीये. दिग्विजयसिंगांना आत्तापर्यंत हे बाँबस्फोट हिंदुंनीच केल्याचा साक्षात्कार झालाच असेल.
  • Log in or register to post comments

मी मुंबईत नसतोच. पण आमच्या

नितिन थत्ते
Wed, 07/13/2011 - 20:58 नवीन
मी मुंबईत नसतोच. पण आमच्या घरचे सुखरूप.
  • Log in or register to post comments

कालच मुंबई ट्रेन स्फोट

गणपा
Wed, 07/13/2011 - 21:04 नवीन
कालच मुंबई ट्रेन स्फोट मालिकेला ५ वर्ष पुर्ण झाली. आमचे एक नातेवाईक त्यात गेले. :( त्यांचीच आठवण काढत होतो आत्ता इतक्यात ही बातमी आली. :( उद्या सकाळी हातावर पोट असणारे (आणि जिवंत असणारे) सगळे परत कामाला लागतील. आणि हे मिडीयावाले परत बोंबलायला मोकळे. "मुंबई पुन्हा धाऊ लागली." "बेडर मुंबईवासी आतंकीयोंसे नही डरे"
  • Log in or register to post comments

>>आणि हे मिडीयावाले परत

स्वानन्द
Wed, 07/13/2011 - 21:09 नवीन
>>आणि हे मिडीयावाले परत बोंबलायला मोकळे. ते तोंडावर पोट असलेले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

"बेडर मुंबईवासी आतंकीयोंसे

घाशीराम कोतवाल १.२
Wed, 07/13/2011 - 21:18 नवीन
"बेडर मुंबईवासी आतंकीयोंसे नही डरे" बेडर नाय रे गणपा निडर कामावर न जाउन सांगता कोणाला हे लोक कसाब ला पोसतायत आम्हाला थोडीच पोसणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

काहीच सुचत नाहीये. सारखे

शिल्पा ब
Wed, 07/13/2011 - 21:35 नवीन
काहीच सुचत नाहीये. :( सारखे हल्ले होऊनही या राजकारण्यांना अक्कल काही येत नाही. अर्थात त्यांना फक्त त्यांचे कुटुंब आणि पैसा यांचीच काळजी असल्याने बाकी काहीही झाले तरी काय फरक पडतो. :( आपणही भयंकर आहे असं म्हणण्यापलीकडे काय करू शकतो? :(
  • Log in or register to post comments

हे तर नेहमीचच झालय

सचिन जाधव
Wed, 07/13/2011 - 21:47 नवीन
हे तर नेहमीचच झालय.....अस काहितरी होत अन आपन केवळ हळ्ह्ळ व्यक्त करत्तो.आता खरच हे थाबल पाहिजे. आता आर. आर. आबा काय राजिनामा परत देनार काय?
  • Log in or register to post comments

अजुन ऑफिसलाच आहे ११ वाजे

गणेशा
Wed, 07/13/2011 - 21:54 नवीन
अजुन ऑफिसलाच आहे ११ वाजे पर्यंत आज. झाले हे खरेच वाईट आहे. १३ आणि २६ तारिख या तारखांनाच हे होते आहे कायम. सामान्य माणासांना मारुन यांना काय मिळते काय माहित .. असे वाटते.. अगळॅ आतंकवादी एकत्र आणावेत आणि उडवुन द्यावे भडव्यांना ...
  • Log in or register to post comments

सहमत

चिरोटा
Wed, 07/13/2011 - 22:19 नवीन
अगळॅ आतंकवादी एकत्र आणावेत आणि उडवुन द्यावे भडव्यांना ...
फक्त आतंकवादीच नाहीत तर स्वतःची पोटे भरण्यासाठी मुंबईत अंडरवर्ल्ड जाणीवपूर्वक पोसणार्‍यांनाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

निरीक्षणे

विकास
Wed, 07/13/2011 - 22:38 नवीन
सर्वांच्या कडील खुशाली समजली त्यामुळे बरे वाटले. काहीवेळा पुर्वी बर्‍याच दिवसांनी मिपावर परत काहीतरी टंकायला म्हणून आलो आणि धमुने दिलेली बातमी पाहीली. मग बराच वेळ लाईव्ह एनडीटीव्ही पाहीला... काही निरीक्षणे:
  1. तीन बाँबस्फोट झालेले आहेत, डोळ्यासमोर जखमी-मृत्यू दोन्ही आहेत. अजून बॉम्ब असतील का हे शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. तरी देखील जनता त्यात गोंधळ घालत हिंडत होती. आपण शूर आहोत, इग्नोरंट आहोत का निर्विकार-निर्ढावलेले?
  2. केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम बाहेर येऊन बाँबस्फोट कितीवाजता झाला, किती जण मृत्यूमुखी पडले आणि किती जखमी याची आकडेवारी सांगण्यात वेळ घालवत होते. ही अधिकृत माहिती देण्यासाठी मंत्री कशाला हवा? मंत्र्याने नेतृत्व दाखवायला हवे ते अशातून दिसते का? नंतर म्हणाले की मी सीएमना फोन केला आणि ते बॉंबस्फोट होता क्षणी आपल्या कार्यालयात गेले आहेत आणि मंत्रालयात बसून या संदर्भातील काम करत आहेत! पुढे असे देखील म्हणाले की तीन बाँबस्फोट झालेत, अजून जास्तीचे ऐकले नाहीत आणि धोका (threat) वाटत नाही. मुंबई हाय अ‍ॅलर्टवर ठेवली आहे!
  3. ब्रेकींग न्यूज मधे खाली मथळा येत होता, पिएमनी सीएमना फोन केला म्हणून! नंतर बातमीत सांगितले की पिएमनी सिएमना फोन करून अधिक माहिती मागितली! ही काय बातमी आहे का?
  4. सिएमनी अर्थातच नंतर अफवांवर विश्वास ठेवू नका, हा दहशतवादी हल्ला आहे का, कोणी केला वगैरे आत्ता महत्वाचे नाही असे नेहमीचे पालूपद लावले...
बाकी आता अजून काही बातम्या-विश्लेषणे येउंदेतच. पण कृपया "स्पिरीट ऑफ मुंबई अँड मुंबईकर्स" वगैरे म्हणू नका...त्या बाँबस्फोटाइतकाच त्याचा देखील वाचताना त्रास होतो... कारण यात स्पिरीट वगैरे काही दिसत नाही, दिसते ती एकतर निर्विकार भावना अथवा त्याहूनही अधिक, असहाय्यता. असो.
  • Log in or register to post comments

मनातले!

निनाद
गुरुवार, 07/14/2011 - 04:44 नवीन
अगदी मनातले लिहिले आहे. सहमत आहे. यातला एक स्फोट मी जेथून नेहमी जात असे तेथेच झाला आहे. :( काळजी घ्या! अजून काय म्हणू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

पण कृपया "स्पिरीट ऑफ मुंबई

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 07/14/2011 - 09:54 नवीन
पण कृपया "स्पिरीट ऑफ मुंबई अँड मुंबईकर्स" वगैरे म्हणू नका... हज्जारदा सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मदतीसाठी बरेच हात पुढे येत आहेत.

मस्त कलंदर
Wed, 07/13/2011 - 22:49 नवीन
फेसबुकावर आताच ही लिंक मिळाली. आणि त्यात भर पडतेच आहे. माणूसकीच्या नात्याने लोक उत्स्फूर्तपणे पुढे होऊन जमेल ती मदत करायला तयार आहेत. त्यात अगदी घरी राहणं, खाणं, फोन, मेल, ट्वीट पासून अगदी कारने घरी सोडण्यापर्यंत आणि वैद्यकीय मदत देण्याचा अंतर्भाव आहे. (इथे दिलेल्या फोन नंबरांचा नंतर दुरूपयोग होऊ नये हीच एक आशा) पण प्रत्येकवेळेस अशी घटना घडल्यावर तिथे पोलिस आणि सरकारी मदत किती वेळाने पोचली याचा खल करण्या/पाहण्यापेक्षा अशी विधायक मदत केलेली बरी. (कीस पाडायला नंतर वेळ आहेच की) ही ती लिंकः https://spreadsheets.google.com/spreadsheet/lv?hl=en_US&key=tE-okpwwYgQavia5opgZSEA&toomany=true#gid=0
  • Log in or register to post comments

चांगला दुवा

विकास
Wed, 07/13/2011 - 22:59 नवीन
चांगला दुवा आहे. मी देखील तो इतरत्र शेअर करत आहे. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

+१

चित्रा
गुरुवार, 07/14/2011 - 02:29 नवीन
पण प्रत्येकवेळेस अशी घटना घडल्यावर तिथे पोलिस आणि सरकारी मदत किती वेळाने पोचली याचा खल करण्या/पाहण्यापेक्षा अशी विधायक मदत केलेली बरी. याला +१, पण विधायक मदत करावी असे वाटतानाही डोक्यात यायचे ते येतच राहते, हेही खरेच आहे. अनेक मुंबईकर निरपराधांना कोणाच्या तरी दुष्ट, दहशतवादी कृत्यांमुळे जीव गमावावा लागला, त्यांच्या मुलाबाळांबद्दल आणि नातेवाईकांबद्दल अतिशय वाईट वाटते आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

अवघड आहे

स्मिता.
Wed, 07/13/2011 - 22:49 नवीन
आशा आहे की सर्व मिपाकर आणि हल्ल्यात न सापडलेले मुंबईकर सुरक्षीत असोत. NDTV वर सध्या मृतांची संख्या २१ दाखवत आहेत. हे सर्व अवघड होत आहे. अनेक वर्षांपासून मुंबईत स्फोट होतच आहेत आणि त्यात सामान्य माणूस जनावरासारखा बळी दिला जातोय. पण आपले सरकार 'हल्ल्याचा कडक शब्दात निषेध, तातडीची बैठक, एखादी कमिटी, इ.' च्यापुढे आणखी काही करेल याची शंकाच आहे.
  • Log in or register to post comments

पुन्हा तेच ते आणि तेच ते !

माझीही शॅम्पेन
Wed, 07/13/2011 - 23:03 नवीन
पुन्हा तेच ते आणि तेच ते ! मृतांच्या नातेवाईकणा घाऊक मदत , स्फोटाचा तीव्र निषेध , पाकिस्तानचा सक्त ताकीद , अजुन एक कमिटी , संशयितना अटक , लांबलेले खटले , कधीही न होणारी फाशी , पुन्हा हल्ला पुन्हा एकदा क्रांतीच्या प्रतीक्षेत असणारा मी एक भारतीय !
  • Log in or register to post comments

यातलं 'कनेक्शन' काय असेल?

बहुगुणी
Wed, 07/13/2011 - 23:40 नवीन
मी आज 'स्फोट कसाबच्या वाढदिवशी झाले' असं इथे वाचल्यावर लगेचच (१०-१५ सेकंदात) ajmal kasab असा सर्च केला, तर हे विकीपेडियावरचं पान सापडलं, ज्यात त्यावेळी 'Born on July 13, 1987' अशी माहिती पहिल्याच ओळीत होती. तेंव्हा कदाचित या स्फोटाशी ही तारीख खरोखर संबंधित असावी असा विचार केला. पण जेंव्हा वरील धाग्यात काही विरोधी मतं (असा कसाबच्या जन्मदिवसाशी संबंध नसल्याची) वाचली, तेंव्हा तेच पान १५ मिनिटांनी परत जाऊन पाहिलं तर ते वाक्य आता काढलेलं आहे. कुणीतरी मधल्या काळात ते पान update केलं आहे. तळाशी पाहिलं तर (आतातरी) हे दिसतं: This page was last modified on 13 July 2011 at 17:28 केवळ अफवा पसरवण्यासाठी कुणीतरी मुद्दाम हे आधी पोस्ट केलं होतं, की आणखी भडका उडू नये म्हणून पोलिस वा इतर कोणी हे पान आता 'अपडेट' केलं आहे?
  • Log in or register to post comments

त्या पानावर कसाबच्या फोटोखाली

शुचि
Wed, 07/13/2011 - 23:52 नवीन
त्या पानावर कसाबच्या फोटोखाली पुढील शब्द आहेत - Born 13 September 1987 (1987-09-13) (age 23)[१] or 13 July 1987 (1987-07-13) (age 24)[२]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

हेच म्ह्णतो........

श्री
गुरुवार, 07/14/2011 - 10:24 नवीन
हेच म्ह्णतो........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

नमक हराम, लेकाचे, इथ राहुन

स्पंदना
गुरुवार, 07/14/2011 - 07:37 नवीन
नमक हराम, लेकाचे, इथ राहुन खातात पितात, अन उलटतात.
  • Log in or register to post comments

घरचे सगळे सुखरुप

ऋषिकेश
गुरुवार, 07/14/2011 - 09:13 नवीन
मुंबईत नसतो.. मात्र घरचे सगळे सुखरुप आहेत. काळजी घ्या मित्रांनो
  • Log in or register to post comments

खुप भिति वाटलि

रुतिका
गुरुवार, 07/14/2011 - 10:03 नवीन
माझे सासरे काल गेले होते झवेरि बाजारात पण स्फोटच्या अर्ध्या तासापूर्वीच तिकडून निघाले होते.
  • Log in or register to post comments

मुर्दाड लोक षंढ, सरकार नंपुंसक, विरोधी पक्ष

हुप्प्या
गुरुवार, 07/14/2011 - 10:25 नवीन
लोक स्फोटबीट दोन दिवसात विसरून जाणार. सरकार लाख दोन लाख दरडोई वाटणार, निदान घोषणा तरी करणार. विरोधी लोक दोन दिवस बोंब मारणार आणि मग गपगार. पोलिस मिळतील तितक्या दोन, चार, सहा मुस्लिम लोकांना अटक करणार. आणि खटला झाला की पुराव्याअभावी सगळे सुटणार. हे एखाद्या फॉर्म्युल्याप्रमाणे होत आले आहे आणि होत रहाणार. असल्या षंढ, मुर्दाड समाजावर आपल्या अतिरेकी कारवायांचा काहीही परिणाम होत नाही असे जाणवून अतिरेकीच तो नाद सोडतील अशी आशा करु.
  • Log in or register to post comments

खरे आहे

ब्रिजेश दे.
गुरुवार, 07/14/2011 - 10:30 नवीन
मला तर वाटत की शाळेच्या इतीहासात आता मुंबई स्फोट यावर विशेष धडा घालतील ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

धडा घालू शकतील पण घेउ शकतील

मी ऋचा
गुरुवार, 07/14/2011 - 14:29 नवीन
धडा घालू शकतील पण घेउ शकतील असं काही वाटत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिजेश दे.

मंगळवारी रात्री उशीरा

मनिष
गुरुवार, 07/14/2011 - 10:52 नवीन
मंगळवारी रात्री उशीरा मुंबईहून परत आलो (खर तर काल दादरहून येणार होतो) आणि आज ही बातमी. कसाबला फाशी करून हे संपणार नाही, पण निदान स्फोटात मेलेल्यांची चेष्टा होतेय असे तरी वाटणार नाही. खरे तर लवकरात लवकर पाकिस्तानात 'कारवाई' करून ज्ञात अतिरेक्यांना मारले पाहीजे, थोडी तरी लाज राखली जाईल.
  • Log in or register to post comments

काल त्यावेळेस पार्ल्यात घरीच

विजुभाऊ
गुरुवार, 07/14/2011 - 11:04 नवीन
काल त्यावेळेस पार्ल्यात घरीच होतो. वडीलांचा गावाहून फोन आला.संभाळून रहा म्हणून........ पण सांभाळून रहायचे म्हणजे नक्की काय करायचे? घरातच बसायचे? आपले दुबळे राज्यकर्ते जनतेला वेठेस धरतात.( वेंगसरकराना विरोध करताना काहीजणाना अतीआदाणीय क्रिकेट्कृषीमंत्री सुरक्षीत क्रिकेट मॅचबद्दल बोलतात..... बहुतेक त्याना दंगेधोपे/बॉम्ब स्फोट करणारे माहीत असावेत)
  • Log in or register to post comments

ह्म्म..

स्वाती दिनेश
गुरुवार, 07/14/2011 - 11:06 नवीन
काल रात्री उशीरा ही बातमी समजली, पहिल्यांदा आपल्या तेथे असलेल्या लोकांचा विचार मनात आला, सगळे नातेवाईक,मित्र, सुहृद सुखरुप आहेत हे समजल्यावर सुटकेचे हुश्श केले पण कोणाचे तरी मित्र, नातेवाईक.. आपल्यासारखेच सामान्य ह्या बाँबस्फोटात जखमी झाले, मृत्यूमुखी पडले हे वाचून, पाहून खिन्नही झाले.. हे असं किती दिवस चालायचं? स्वाती
  • Log in or register to post comments

काल काही चॅनेल्सवर उत्तेजित

गवि
गुरुवार, 07/14/2011 - 11:07 नवीन
काल काही चॅनेल्सवर उत्तेजित रिपोर्टर्स गळ्याच्या शिरा ताणताणून ओरडत होते, “ये खून जो रस्तेमें गिरा है वो आम आदमीका है. सरकार क्या कर रही है आम आदमी की सुरक्षा के लिये. आम आदमी का सरकारने विश्वासघात किया है.. उनका पर्दाफाश होगया है..” वगैरे भडकावणे चालू होते. आपण मुंबईसारख्या शहरात आणि फॉर दॅट मॅटर भारतासारख्या देशात कितीही सुरक्षितता ठेवायची म्हटले तरी प्रत्येकाची पिशवी, छत्री, खिसे चेक करणे चोवीस तास शक्य नाही. त्याउप्पर पोटात बाँब लपवून हाराकिरी करणारे दहशतवादीही आहेतच (नाईन इलेव्हन आठवा.. विमानासोबत स्वतःचाही जीव दिलाच की..) तेव्हा काय काय चेक करत बसणार. निराशाजनक आहे सगळं. आणी आता फोरेन्सिक तज्ञ येऊन त्यांनी म्हटलंय की या स्फोटांत काहीतरी आयईडी की तत्सम तंत्र वापरलंय.. मी म्हणतो की असले शोध लावून पुढे काय होणार? समजा अगदी सापडले आरडीएक्स.. किंवा कळले की १००% हे काम अल कायदाचे आहे, तरी आपण अफगाणिस्तान्-पाकिस्तानात शिरुन त्या अल कायदाची दाढी धरणार आहोत का? काय उखाडणार आपण. जाऊ दे. संताप आणि निराशा एकाचवेळी ओव्हरव्हेल्मिंग होत आहेत.
  • Log in or register to post comments

१०१% सहमत!!! खूप असहाय्य

मनिष
गुरुवार, 07/14/2011 - 11:23 नवीन
१०१% सहमत!!! खूप असहाय्य वाटते.
संताप आणि निराशा एकाचवेळी ओव्हरव्हेल्मिंग होत आहेत.
अगदी, अगदी!!! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अगदी मनातलं

मराठे
गुरुवार, 07/14/2011 - 20:13 नवीन
अगदी मनातलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

घाबरु नका

मराठी_माणूस
गुरुवार, 07/14/2011 - 11:14 नवीन
अजिबात घाबरु नका, पिएम नि कडक शब्दात निषेध व्यक्त केला आहे. आता काळजीचे कारण नाही. (अवांतरः सीएम म्हणतात अफवावर विश्वास ठेउ नका . आम्ही राजकारणी बोलतात त्याच अफवा समजतो)
  • Log in or register to post comments

मी सुरक्षित आहे. बातमी

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 07/14/2011 - 11:20 नवीन
मी सुरक्षित आहे. बातमी येईपर्यंत घरी पोचलो होतो.
  • Log in or register to post comments

सर्व प्रथम धमालराव तुमचे आणि

मदनबाण
गुरुवार, 07/14/2011 - 11:22 नवीन
सर्व प्रथम धमालराव तुमचे आणि मग माझे अभिनंदन करतो ! कारण तू हा धागा काढायला आणि मी हा धागा वाचायला जिवंत आहोत... आपला देश महासत्ता होतोय ! जीडीपी ग्रोथ होतोय... त्याचीच तर सुमधुर फळे आपण चाखत आहोत नाही का ? रस्त्यात खड्डे नव्हे तर देशच खड्यात गेला असुन राजकारणी मात्र आनंदात आहेत... ओहो पगारवाढ करुन मिळते ना त्यांना ! त्यासाठी सर्व लगेच एकत्र आले की नाही ? मग अशी देश सेवा करतात तर त्यांना पगार नको का वाढवुन द्यायला ! आपण आहोतच टॅक्स भरायला तयार... आता मॄतांचे आकडे कळतील,सरकार मॄत व्यक्तींच्या नातेवाईकांना "मदत" जाहीर करेल... "उच्च" स्तरीय बैठका / चौकश्या होतील आणि त्याचा अहवाल लवकारात लवकर जाहीर केला जाईल असे आपल्याला कळेल... चूकुन एखाधा अपराधी सापडलाच तर त्याची सुद्धा कसाब प्रमाणेच व्यवस्था होईल... सगळ कसं नेहमी घडतं तसचं. वेगळ काही घडेल याची शक्यता मात्र नाहीच नाही. जनता जनार्दन त्यांच्या नावाने फक्त बोटेच मोडु शकते त्यावर त्यांच्या हातात काहीच उरले नाही... कारण षंढपणा बरोबरच आपण या षंढपणात निर्ढावले देखील आहोत. कुत्र्या सारखे आयुष्य जगायचे आणि मग अशाच एखाद्या स्फोटात कुत्ते की मौत मरायचे हेच आपले "सुखी" जीवन. जाता जाता :---- धमालराव ते वाक्य विसरायच नाही बरं... कुठल ? तेच :--- बडे बडे शेहरों मै ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है |
  • Log in or register to post comments

बडे बडे शेहरों मै ऐसे छोटे

सुधीर१३७
गुरुवार, 07/14/2011 - 11:37 नवीन
बडे बडे शेहरों मै ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है | हेच लक्षात ठेवा आणि विसरुन जा........................ (बाकी सर्व)
  • Log in or register to post comments

विनम्र आदरांजली !!

अमोल केळकर
गुरुवार, 07/14/2011 - 11:56 नवीन
ज्या क्षणी सरकार ताब्यात असलेल्या अतिरेक्यांना ताबडतोब फासावर लटकत नाही तोपर्यंत वचक रहाणार नाही. आणि ज्या वेळेला हे घडेल त्यावेळेला तमाम मुंबईकर हा सोहळा शिवजयंती तसेच गणपती उत्सव सारखाच साजरा करेल. खालचे वाक्य अजून कितीदा लिहावे लागणार देव जाणे ! या स्फोटात मृत झालेल्या व्यक्तिंच्या आत्म्याला शांती लाभो. माझी विनम्र आदरांजली !! अमोल केळकर
  • Log in or register to post comments

लोकांची जबाबदारी?

हुप्प्या
गुरुवार, 07/14/2011 - 11:59 नवीन
ठाकर्‍यांनी आपल्या स्टाईलने डायलॉगबाजी सुरु केली की लोकांनीच आता अतिरेक्यांचा निकाल लावावा वगैरे. पण जोवर ज्या सरकारच्या अधिकाराखाली बॉम्बस्फोट होतायत त्यांना त्या मुद्द्यावरून खुर्ची गमवावी लागेल अशी भीती वाटत नाही तोवर ते असेच निष्क्रिय रहाणार. विरोधी पक्षाला जर असला बॉम्बस्फोट म्हणजे सत्ता मिळवायची हमखास संधी वाटत नाही तोवर असेच होणार. उलट जर सत्ताधारी पक्षाला अशी भीती वाटली तर आपले गुप्तचर खाते, खबर्‍यांचे जाळे पणाला लावून अशा गोष्टी होण्यापासून वाचवेल वा झालेल्या गोष्टींचा छडा लावून लोकांना शासन करेल. खरे तर सामान्य जनतेला आपल्यापैकी डझन दोन डझन मेल्याचे फार वाईट वाटत नाही. त्यामुळे नेत्यांचे सोकावते आहे. उद्या जर लाखोंच्या संख्येने मोर्चा काढून कसाबच्या कोठडीवर चाल करुन गेले आणि असे पुन्हा पुन्हा होत रहिले तर झक मारत सरकारला फाशीची शिक्षा त्वरेने द्यावी लागेल. अजून एक गोष्ट म्हणजे तमाम मंत्री संत्री, आमदार खासदार भक्कम सुरक्षा कडे बाळगून असतात. त्यांना असल्या प्रकारापासून काहीही धोका नाही. कुणी अण्णा, अप्पा, दादा, मामा, रामदेव, नामदेव, कामदेव बाँबस्फोटचा तपास लागो, असल्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना फाशी मिळो म्हणून उपोषण का करत नाही? छ्या. पुढच्या स्फोटाची वाट बघावी हेच खरे!
  • Log in or register to post comments

गौप्यस्फोट ?

नितिन थत्ते
गुरुवार, 07/14/2011 - 12:19 नवीन
>>विरोधी पक्षाला जर असला बॉम्बस्फोट म्हणजे सत्ता मिळवायची हमखास संधी वाटत नाही तोवर.... म्हणून स्फोट घड(वले जा)त आहेत की काय ? [आम्ही यांनी सत्ता मिळवण्याची संधी साधावी म्हणून बॉम्बस्फोट घडवत आहोत पण यांना त्याचे काहीच नाही हे] गुपित असे उघडे करून येथे का बरे सांगितले ? [ते खाजगीत विरोधी पक्षाला नसते का सांगता आले?] असो. विरोधी पक्षाला ही सत्ता मिळवण्याची संधी कशी काय? लोक बहुधा विरोधी पक्षाच्या कारकीर्दीतल्या घटना जाणून असतीलच. काळेकाकांच्या सल्ल्यानुसार पंतप्रधानांना सत्ता विरोधी पक्षाकडे सोपवण्यासाठी पत्र लिहावे म्हणतो. निदान विरोधी पक्षाला सत्ता मिळवण्यास मदत म्हणून जे स्फोट घडवले जात असतील ते तरी थांबतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

खरोखरंच, तोड नाही तुमच्या

श्रीरंग
गुरुवार, 07/14/2011 - 12:25 नवीन
खरोखरंच, तोड नाही तुमच्या काँग्रेस भक्तीला. आत्ताही तुम्हाला "विरोधकांच्या कारकिर्दीतल्या घटनांबद्दल" गळा काढावासा वाटतो.... कमाल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

काँग्रेसभक्ती?

नितिन थत्ते
गुरुवार, 07/14/2011 - 12:45 नवीन
छे बुवा. मी तर उलट विरोधी पक्षाच्या काळात "कणखरपणे पाकिस्तानवर हल्ला न केल्याच्या/आर या पार की लदाई न केल्याच्या कृतीचं" वेळोवेळी समर्थनच केलंय. दुवे हवे असल्यास शोधून देईन. इथे हुप्प्या यांना असे बॉम्बस्फोट ही विरोधी पक्षांसाठी सत्ता मिळवण्याची संधी वाटते आहे म्हणून हा प्रतिसाद दिला. शिवाय मी तर काँग्रेसने सत्ता सोडून विरोधीपक्षांकडे सत्ता द्यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे याचे कारण "बॉम्बस्फोट ही सत्ता मिळवण्याची संधी आहे" असे काँग्रेसभक्त नसलेल्या सदस्याचे म्हणणे आहे. निदान त्यामुळे असे घडवले जाणारे बॉम्बस्फोट थांबतील अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

"राष्ट्रीय सुरक्षेसारख्या

श्रीरंग
गुरुवार, 07/14/2011 - 13:42 नवीन
"राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्वाच्या आघाडीवरही साफ अपयशी ठरून सुध्दा, आपल्याला सत्तेवरून कोणीही खाली खेचू शकत नाही, या आत्मविश्वासापोटी सरकार सुरक्षीततेच्या बाबतीत ढिलाई दाखवत आहे." या मताशी आपण सहमत आहात का थत्ते साहेब? का अजूनही "विरोधकांकडे सत्ता होती तेव्हा तरी त्यांनी काय दिवे लावले होते!" असा टिपिकल पळपुटा युक्तिवाद आपल्याला समर्थनीय वाटतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

नाही.

नितिन थत्ते
गुरुवार, 07/14/2011 - 14:08 नवीन
नाही. सहमत नाही. विरोधकांकडे सत्ता असताना काय दिवे लावले? असा माझा (पळपुटा ऑर अदरवाइज) युक्तिवाद नाही. त्याही वेळच्या सरकारने जे करणे आवश्यक आणि शक्य होते ते केलेच होते . आणि आजचेही सरकार जे करणे आवश्यक आणि शक्य आहे ते करीतच आहे इतकेच माझे म्हणणे आहे. सध्याचे सरकार कदाचित तुमच्या नावडत्या पक्षाचे असल्यामुळे माझ्या प्रतिसादात तुम्हाला बायस दिसत असावा. [काही तथाकथित कणखर देशांनी वेळोवेळी कठोर कारवाया केल्या होत्या पण दहशतवाद संपुष्टात आल्याचे ऐकिवात नाही. तसेच येथल्या परक्या आणि मतांची फिकीर आजिबात करावी लागत नसणार्‍या जुलमी वगैरे सरकारने अनेक लोकांना फाशी/जन्मठेप वगैरे शिक्षा सुनावल्या/अंमलात आणल्या. पण ती कृत्ये करणारे आणखी लोक तयार होतच राहिले]].
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

खरे आहे

आनंदयात्री
गुरुवार, 07/14/2011 - 20:36 नवीन
>>काही तथाकथित कणखर देशांनी वेळोवेळी कठोर कारवाया केल्या होत्या पण दहशतवाद संपुष्टात आल्याचे ऐकिवात नाही. खरे आहे थत्ते काका, आपण त्यांनाही आपली गांधीगिरी शिकवुयात. आपण आजवर गांधीगिरीने दहशतवादाला जे सडेतोड उत्तर दिलेय त्याला तोड नाही, बघा ना या वेळेच चक्क त्यांनी आरडीएक्स वापरले नाही, अशीच हळुहळु सुधारणा होईल, मला दहशतवाद्यांचा त्यांच्या या मवाळ धोरणाबद्दल आदर वाटतो. मुंबई हा एक गाल झाला आता आपण मुजाहिदीनला दिल्लीत स्फोट करायला सांगु म्हणजे दुसर्‍या गालावर तोंडात मारुन घेतल्यासारखे होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

दहशतवाद संपल्याचे ऐकिवात नाही

हुप्प्या
गुरुवार, 07/14/2011 - 21:31 नवीन
बलात्कार, चोरी, दरोडे ह्याविरुद्ध कायदे आहेत. वेळोवेळी अशी कृत्ये करणार्‍यांना शिक्षाही झालेल्या आहेतच. म्हणून हे गुन्हेही संपल्याचे ऐकिवात नाही. म्हणून ह्या गुन्ह्यांविरुद्ध कायदे बनवणे, ते कठोर करणे, आधुनिक पद्धतीने पुरावे गोळा करुन आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असा प्रयत्न करणे बंद करावे की काय? कणखर देश उदा. इस्रायल हे दहशतवादाशी लढत आहेत. त्याने दहशतवाद कमी झाला आहे. आणि दहशतवाद संपण्याचे सोडा, जर हे लोक असे लढले नाहीत तर ते स्वतःच संपतील अशी जिवाची भीती असल्यावर ते कारवाया करणारच. आजचे सरकार दहशतवादाविरुद्ध जे काही करायचे आहे ते करतच आहे असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. ज्या पद्धतीचे वक्तव्ये काँग्रेसी नेते करत आहेत त्यावरुन त्यांचा राजकीय स्वार्थीपणा दिसतो आहे. हिंदूंचा दहशतवाद त्यांना बोचतो. त्याला ते स्वच्छ हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणतात. मात्र मुस्लिम अतिरेक्यांनी कारवाया केल्या की दहशतवादाला धर्म नसतो असा त्यांना साक्षात्कार होतो. निव्वळ आकडेवारी बघितली तरी कळेल की मुस्लिमांनी केलेला दहशतवाद कितीतरी जास्त आहे. असे असताना गृहमंत्री म्हणतात की भारताला सगळ्यात जास्त धोका भगव्या दहशतवादाचा. भाजपासारख्या बुळचट, निष्क्रिय, हतबल, हतवीर्य पक्षाचा हवाला देऊन त्यांनीही तसे केले म्हणून कॉंग्रेस तसेच करते हे म्हणणेही चूक आहे. भाजप नालायक होता म्हणून तो हरला. आता जे जिंकले आहेत त्यांनी काही तरी करून दाखवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

चश्मे !!

अर्धवटराव
Fri, 07/15/2011 - 02:22 नवीन
विचारवंतांचे रंगीत चश्मे देशाच्या मूळावर ऊठलेत भाऊ. त्याला इलाज नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग

रागावु नको यार धम्या पण

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 07/14/2011 - 12:04 नवीन
रागावु नको यार धम्या पण प्रतिक्रियापण द्यावीशी वाटत नाही राव आजकाल :( बाकी काल दादरच्या घटनास्थळावरच्या अधिकार्‍याला 'मिटरबॉक्स मध्ये शॉर्टसर्किटने स्फोट झाला आहे' हे सांगताना बघून इतके भरुन आले म्हणून सांगतो ना... ह्या अशा अधिकार्‍यांची सार्वजनीक दृष्ट वैग्रे का काढत नाहीत ?
  • Log in or register to post comments

हे असंच चालू राहणार. दोन दशकं

श्रीरंग
गुरुवार, 07/14/2011 - 12:12 नवीन
हे असंच चालू राहणार. दोन दशकं होत आली मुंबईतील ९३ च्या स्फोटांना. आजवर आपण काहीही उपटू शकलो नाहिये पाकड्यांचं. ते मात्र हव्या त्या क्षणी भारतात हवे तिथे स्फोट घडवू शकतात. सैन्याचा उपयोग १५ ऑगस्ट ची परेड, आणी हवाईदलाचा वापर फक्त क्रिकेटपटू व सेलेब्रिटीजच्या हवाई सफरींसाठी असतो, एवढेच आम्हाला माहित आहे.
  • Log in or register to post comments

दादरला

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 07/14/2011 - 12:40 नवीन
दादरला झालेल्या बाँबस्फोटातील मृत व्यक्तींना विनम्र आदरांजली!! आपण आणि आपले सर्व सहृदय सुरक्षीत आहेत अशी आशा करतो. ज्यांनी हे स्फोट घडवून आणले त्यांना उत्तम चिकन बिर्याणी आणि उत्तम प्रतिची दारु तिहारला कधी मिळेल याची वाट बघत बसण्यावाचून आपण काहीच करु शकत नाही याची लाज वाटते. जरी त्याचा काही उपयोग नसला तरी त्यांचा तिव्र निषेध नोंदवतो आणि गप कामाला लागतो. :(
  • Log in or register to post comments

प्रतिक्रिया

शाहिर
गुरुवार, 07/14/2011 - 13:37 नवीन
आबा : झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे ..याचा तपास चालु आहे ..कोणाचीही गय केली जाणार नाही ..दोषी ना कडक कारवाइ ल सामोरे जावे लागेल..[ ( आणि बडे बडे देशो मे ऐसि छोती छोटी बाते होती है)] बाबा .(आपले सी. एम) : झालेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करतो..तथापि , जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी मुंबईकरांनी शांतता राखावी..मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत करण्यात येईल. तसेच जखमींवर उपचारांचासाठी होणारा सर्व वैद्यकीय खर्च सरकार करेल.[. (झाला माझा काम)]
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा