Skip to main content

मुंबईमध्ये बॉम्बस्फोट?

लेखक धमाल मुलगा यांनी बुधवार, 13/07/2011 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो, नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार मुंबईमध्ये दादर-कबुतरखाना, ऑपेरा हाऊस आणि झवेरीबाजार इथे बॉम्बस्फोट झाले आहेत असे कळते. नक्की काय आहे ते कळत नाही. :( ही बातमी खरी आहे काय? असल्यास सदरहू ठिकाणी वावरणारे, राहणारे, कामानिमित्त जाणारे आपले सर्व मिपाकर बंधूभगिनी सुखरुप असावेत अशी प्रार्थना! आपला, -(भयभीत आणि काळजीत पडलेला) धम्या.

वाचने 40417
प्रतिक्रिया 108

प्रतिक्रिया

In reply to by नितिन थत्ते

नेमक्या ह्या धाग्यासाठी आपण स्वाक्षरी बदललेली पाहून डोळे पाणावले .... आपल्यासारखे महान लोक ह्या भारतात आहेत, हे पाहून मला एकदम समृद्ध अशा ग्रीक / रोमन (चू.भू.द्या.घ्या.) संस्कृतीच्या, (त्या काळच्या) क्रूर, हिंस्र आणि रानटी अशा 'स्पार्टन' लोकांकडून झालेल्या पराभवाची आणि नंतर झालेल्या र्‍हासाची आठवण होतेय. आपली (म्हणजे आम्हा केविलवाण्या) सामान्य भारतीयांची सध्याची स्थिती बरीचशी त्या काळच्या ग्रीकांशी मिळती-जुळती असावी.

In reply to by sagarparadkar

स्वाक्षरी धाग्यासाठी बदलता येत नाही. सध्या (मी माझ्या खात्याच्या सेटिंग मध्ये बदल करेपर्यंत) मी कुठल्याही धाग्यावर प्रतिसाद दिला तरी हीच स्वाक्षरी दिसेल. आणि मी वर्ष-दोन वर्षापूर्वीच दिलेल्या प्रतिसादांखालीसुद्धा हीच स्वाक्षरी आत्ता अपेण्ड झालेली असेल. पंगा मोड ऑन> ही स्वाक्षरी घेण्याचं कारण काल मला स्फोटांनंतर अनेकांच्या लेखनात कसाबला फाशी न झाल्याविषयी त्रागा दिसला. कसाबला फाशी आज, काल किंवा खूप पूर्वीच दिली असती तरी कालचे स्फोट कसे टळले असते ते काही केल्या (माझ्या अधू बुद्धीला) लक्षात येईना. तेव्हा कसाबच्या फाशीची मागणी करणे हा देशभक्ती व्यक्त करण्यासाठीचा एक वाकप्रचार असावा ("जयहिंद" किंवा "भारतमाता की जय" सारखा) असे वाटून तो रोज न करणारे म्हणजे देशद्रोहीच असणार असा माझा समज झाला. तेव्हा तो वाक्प्रचार रोज वापरण्याची आठवण सर्व देशभक्तांना रहावी म्हणून ही स्वाक्षरीच बनवून घेतली. :) पंगा मोड ऑफ> . . .

In reply to by नितिन थत्ते

घटनेला अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही गुन्हेगाराला सुनावलेली शिक्षा अंमलात आणावी असा आग्रह धरणे हे टवाळी करणार्‍यांचे 'टार्गेट' ठरू नये. >> कसाबला फाशी आज, काल किंवा खूप पूर्वीच दिली असती तरी कालचे स्फोट कसे टळले असते ते काही केल्या (माझ्या अधू बुद्धीला) लक्षात येईना. कारण तुम्ही स्व्तःच कंसात उद्धृत केले आहे ... तरी पण एकूणातच इतर देशांतील न्यायव्यवस्था पहावी. तुम्ही किंवा तेथील कोणताही नागरीक असाच प्रतिवाद सौदी मधे जाऊन करू शकाल का? तिथे आपल्यापेक्षा गुन्हेगारी खूपच कमी आहे कारण गुन्हेगाराला कडक शिक्षा होते आणि त्या शिक्षेचा इतर गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक बसतो. मी स्वतः हे पाश्चात्य देशांत पाहिलेले आहे आणि सौदीमधील व्यवस्थेचं वर्णन जवळच्या नातेवाईकांकडून ऐकले आहे जे स्वत: तिथे अनेक वर्ष राहिले आहेत. पण जाऊ दे हे बोलून काय उपयोग? शेवटी कंसातील कबुलीच खरी म्हणायची :) एकच विनंती: कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादाचे परीणाम आपल्या जवळच्यांना भोगायला लागतील (असं होवू नये ही सदिच्छा) तेव्हासुद्धा हाच युक्तिवाद कायम ठेवा. आत्ता जे तळ्तळाट ऐकू येत आहेत ते अशाच बळींशी सहनुभूती बाळगणार्‍यांचे आहेत.

In reply to by sagarparadkar

>>घटनेला अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही गुन्हेगाराला सुनावलेली शिक्षा अंमलात आणावी असा आग्रह धरणे हे टवाळी करणार्‍यांचे 'टार्गेट' ठरू नये. धन्यवाद. परंतु आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या गुन्हेगारांत कसाब येत नाही, त्याला विशेष न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयाने ती कन्फर्म केली आहे. तसेच त्याची शिक्षा अंमलात आणू नये असे मी (किंवा अन्य कोणीही) कुठेही सुचवल्याचे स्मरत नाही. (माझे त्यावेळचे म्हणजे त्याच्यावर खटला चालू होण्यापूर्वीचे आणि अजूनही मत आहे की तो भारताचा नागरिक नसल्याने भारतीय घटनेनुसार दिले जाणारे हक्क त्याला लागू होत नाहीत. त्यावर खटला चालवण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. फारतर तो सीसीटिव्हीवर दिसणारा गोळीबार करणारा माणूस तोच आहे एवढेच सिद्ध करण्याची गरज होती). एखादा जवळच्याचा मृत्यू झाल्यावर छाती पिटून मोठ्याने रडला नाही म्हणजे त्याला दु:ख झालेले नसते असे नाही. स्फोटात मृत झालेल्यांबद्दल सहानुभूती आहेच.

In reply to by धमाल मुलगा

Emergency Numbers: 022-22621855, 022-22621983, 022-22625020 Helpline Numbers: के.ई.म. ईस्पितळ (022-24136051), नायर ईस्पितळ (022-23085379), हरकिसन्दास ईस्पितळ(23855555 / 30095555), सैफी ईस्पितळ चर्नीरोड (22 6757 0111)Please share

खरीच बातमी आहे. तपशीलांसाठी वाट पहावी हे उत्तम.

हो ब्लास्ट ची बातमी आत्ताच टिव्ही वर पाहतोय.. आम्ही दोघेही घरीच आहोत, मुंबईतल्या ईतर मिपाकरांना संपर्क करायचा प्रयत्न चालु आहे.

दहशतवादी हल्ला असल्याचं गृहखात्याने सांगितलं आहे. एक न फुटलेला बाँब दादरला सापडला. ६ लोकं मेल्यांची बातमी एन.डी.टि.व्ही. च्या साईटवर आहे.

समस्त मुंबईकर मिपाकरांना विनंती- बाबांनो कोण कुठल्या भागात जातो, राहतो आम्हाला काही ठाऊक नसतं. आपली खुशाली कळवा रे.

In reply to by धमाल मुलगा

समस्त मुंबईकर मिपाकरांना विनंती- बाबांनो कोण कुठल्या भागात जातो, राहतो आम्हाला काही ठाऊक नसतं. आपली खुशाली कळवा रे. आम्ही गोरेगाव्/जोगेशवरी (अ‍ॅज द केस मे बी) येथे राहतो. नुकताच घरी पोहचलो आणि बघतो तर ही बातमी.. मी तरी ठीक आहे. होप, बाकीचे मिपाकर देखील फाईन असतील.

याक्षणी ३ लोक मृत तर १०० जखमी असं सांगत आहेत. आता हाय अलर्ट काय कामाचा ? आणी मंत्रायलात तातडीची बैठक सुरू :( तातडीने कृती करायची वेळ असताना बैठका कसल्या घेताय .............

In reply to by आत्मशून्य

असंच असतं बाबा, बैल गेल्यावरच झोपा करायची आठवण होते यांना. जे काय झालं ते जाईल कुठच्या कुठे आणि हे राजकारणी या गोष्टीचं राजकारण करायला मोकळे होतील.

:(

स्फोट मुंबईत आणि एनएसजी दिल्लीत! च्यायला..! आणि पुन्हा मुंबई वाचवायला दिल्लीतून (पक्षी उत्तरेतून ) कमांडो पाठवले म्हणायला मोकळे... एनएसजी मुंबईतच ठेवा ना..

I hv reached safe place. They are telling in news that its Kasab' birthday. Get to hear there are many many more deaths. All mumbai mipakars, pls let all know you are safe. ViMe.. Dadar madhe rahtaat. Pls let us know.

In reply to by गवि

मी आणि माझ्या ओळखीतील सगळे व्यवस्थित आहेत. स्फोट झाला तेव्हा मी दादर पूर्व येथे होतो. अर्ध्या तासापूर्वीच दादर स्टेशन वरून आलो होतो. कधी संपणार हे सगळे आणि कसे संपणार ?

In reply to by गवि

मी आणि माझ्या ओळखीतील सगळे व्यवस्थित आहेत. स्फोट झाला तेव्हा मी दादर पूर्व येथे होतो. अर्ध्या तासापूर्वीच दादर स्टेशन वरून आलो होतो. कधी संपणार हे सगळे आणि कसे संपणार ?

In reply to by गवि

They are telling in news that its Kasab' birthday. उगाच अफवा पसरवू नका. कुठल्याही बातम्यांमधे असे सांगितलेले नाही. कसाबचा जन्मदिन १३ सप्टेंबर आहे. आहे त्या गोंधळात भर घालू नका. निदान अशावेळी चुकीची माहिती पसरवु नये इतके तरी कळले पाहिजे आपल्याला. That is the least we can do!

In reply to by अलख निरंजन

thats why I specifically said that they are telling in the news. This is going around in news everywhere. I am not telling any 'afava' If news on all channels is not to be believed or mentioned also,then how we believe news for blasts also?

मी स्फोट व्हायच्या आधी दोन तास त्या(दादर) भागातूनच घरी पार्ल्याला आलो.

मुंबईतील अनेक दुकानातून तात्काळ मेणबत्या मिळवून वाघासरहद्दीवर त्या पेटवून निषेध व्यक्त करायला पाकीप्रेमी निघाले आहेत असे कळते.

In reply to by शशिकांत ओक

ह्युमन राईटसवाले विसरलात का? त्यांच्यामुळे तर मेणबत्त्यांचा धंदा जोरात चालतो. आता स्फोट घडवणार्‍या अतिरेक्यांना वाईट वागणूक दिल्याबद्दल मोर्चा काढावा लागेल ना त्यांना. त्यांचीही मेणबत्त्यांसाठी धावाधाव चालली असेल.

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

त्याला कसले लटकवतायत हे...स्वतःच लटकलेले...आज म्हणे त्या भ***चा वाढदिवस आहे... त्या जव्हेरी बजारातल्या एका/दोघांचे साफ तुकडे उडालेले दिसतायत...भयंकर आहे हे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

आज म्हणे त्या भ***चा वाढदिवस आहे... हे कुठे समजले तुम्हाला? निदान अशावेळी चुकीची माहिती पसरवु नये इतके तरी कळले पाहिजे आपल्याला. That is the least we can do!

In reply to by अलख निरंजन

मालक कोर्टाची दिशाभूल करण्यासाठी त्याची जन्मतारीख कायमच वेगवेगळी सांगीतली गेली आहे. http://en.wikipedia.org/wiki/Ajmal_Kasab http://www.washingtonpost.com/blogs/blogpost/post/mumbai-attacks-on-ter…

काहीही सुचत नाहिये...हे सगळं घडल्याचं कळताचं(नेहमीप्रमाणे)टीव्हीवर चेनल सर्फिंग करत होतो...वेगवेगळ्या बातम्या तर येत होत्याच,म्हटलं रात्रीपर्यंत काय काय अजुन घडणारे कोणास ठाऊक?...तेवढ्यात लोकसभा चेनलवर कुणुसा एक राजकीय विश्लेषक भारतीय जनतेची अवस्था मनुस्म्रुतितल्या शूद्रांसारखी झाल्याचं समर्पक पणे सांगत होता...काय वेगळं बोलला तो?एक तर जनावरांसारखे जगा/नाहीतर त्यांच्यासारखेच मारले जा...कधिही कुठेही नी केंव्हाही... अवांतर-बरेचसे न्युजचेनल रिपोर्टर नेहमी सारखे मढं फाडत बसलेले दिसतायत...ह्या चेनल रिपोर्टरना पाहिलं की प्र के अत्र्यांचा ''रिपोर्टर आणी कावळा" हा लेख आठवल्यावाचुन रहात नाही...

In reply to by अत्रुप्त आत्मा

एक सल्ला: ५ मिनिटांच्या वर कुठले ही न्युज चॅनेल बघू नका. तसं ही काही नीट माहिती मिळणार नाही. नक्की काय घडलंय हे उद्या वर्तमानपत्रात व्यवस्थीत कळेल.

मारी टोपी एवढा पावूस पडतोई आणि मुंबई मध्ये हे बिन दिवाळीचे फटाके कसले फुटले ???????? बुधवार ह्या हिंदी चित्रपटाची खूप आठवण आली पण But at this stage iam searching that kind of common man showed in the movie.

बातमी वाचुन कळत नाही ही शिक्षा गरीब सामान्य लोकांनाच का? का त्यांना "Z secirity" नाही म्हणुन कोणीही या काहीही करा.

आम्ही हिंदुत्ववाद्यांवर कारवाई केल्यापासून बॉम्बस्फोट होणे बंद झाले आहे इति दिग्विजय सिंह

हेच म्हणतो आणि पाकचा निषेध करतो (मेणबत्ती ही पेटवणार) . आता कोणतरी गृहसचिव वैगेरे पाकची आंतराष्ट्रीय पातळीवर वैगेरे निर्भत्सना करेल मग चांगलाच धडा मिळेल या पाकड्यांना.

मी तिरशिंगराव सुखरुप घरी पोचलो. बायको पण नुकतीच घरी पोचलीये. दिग्विजयसिंगांना आत्तापर्यंत हे बाँबस्फोट हिंदुंनीच केल्याचा साक्षात्कार झालाच असेल.

कालच मुंबई ट्रेन स्फोट मालिकेला ५ वर्ष पुर्ण झाली. आमचे एक नातेवाईक त्यात गेले. :( त्यांचीच आठवण काढत होतो आत्ता इतक्यात ही बातमी आली. :( उद्या सकाळी हातावर पोट असणारे (आणि जिवंत असणारे) सगळे परत कामाला लागतील. आणि हे मिडीयावाले परत बोंबलायला मोकळे. "मुंबई पुन्हा धाऊ लागली." "बेडर मुंबईवासी आतंकीयोंसे नही डरे"

In reply to by गणपा

"बेडर मुंबईवासी आतंकीयोंसे नही डरे" बेडर नाय रे गणपा निडर कामावर न जाउन सांगता कोणाला हे लोक कसाब ला पोसतायत आम्हाला थोडीच पोसणार

काहीच सुचत नाहीये. :( सारखे हल्ले होऊनही या राजकारण्यांना अक्कल काही येत नाही. अर्थात त्यांना फक्त त्यांचे कुटुंब आणि पैसा यांचीच काळजी असल्याने बाकी काहीही झाले तरी काय फरक पडतो. :( आपणही भयंकर आहे असं म्हणण्यापलीकडे काय करू शकतो? :(

हे तर नेहमीचच झालय.....अस काहितरी होत अन आपन केवळ हळ्ह्ळ व्यक्त करत्तो.आता खरच हे थाबल पाहिजे. आता आर. आर. आबा काय राजिनामा परत देनार काय?

अजुन ऑफिसलाच आहे ११ वाजे पर्यंत आज. झाले हे खरेच वाईट आहे. १३ आणि २६ तारिख या तारखांनाच हे होते आहे कायम. सामान्य माणासांना मारुन यांना काय मिळते काय माहित .. असे वाटते.. अगळॅ आतंकवादी एकत्र आणावेत आणि उडवुन द्यावे भडव्यांना ...

In reply to by गणेशा

अगळॅ आतंकवादी एकत्र आणावेत आणि उडवुन द्यावे भडव्यांना ...
फक्त आतंकवादीच नाहीत तर स्वतःची पोटे भरण्यासाठी मुंबईत अंडरवर्ल्ड जाणीवपूर्वक पोसणार्‍यांनाही.

सर्वांच्या कडील खुशाली समजली त्यामुळे बरे वाटले. काहीवेळा पुर्वी बर्‍याच दिवसांनी मिपावर परत काहीतरी टंकायला म्हणून आलो आणि धमुने दिलेली बातमी पाहीली. मग बराच वेळ लाईव्ह एनडीटीव्ही पाहीला... काही निरीक्षणे:
  1. तीन बाँबस्फोट झालेले आहेत, डोळ्यासमोर जखमी-मृत्यू दोन्ही आहेत. अजून बॉम्ब असतील का हे शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. तरी देखील जनता त्यात गोंधळ घालत हिंडत होती. आपण शूर आहोत, इग्नोरंट आहोत का निर्विकार-निर्ढावलेले?
  2. केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम बाहेर येऊन बाँबस्फोट कितीवाजता झाला, किती जण मृत्यूमुखी पडले आणि किती जखमी याची आकडेवारी सांगण्यात वेळ घालवत होते. ही अधिकृत माहिती देण्यासाठी मंत्री कशाला हवा? मंत्र्याने नेतृत्व दाखवायला हवे ते अशातून दिसते का? नंतर म्हणाले की मी सीएमना फोन केला आणि ते बॉंबस्फोट होता क्षणी आपल्या कार्यालयात गेले आहेत आणि मंत्रालयात बसून या संदर्भातील काम करत आहेत! पुढे असे देखील म्हणाले की तीन बाँबस्फोट झालेत, अजून जास्तीचे ऐकले नाहीत आणि धोका (threat) वाटत नाही. मुंबई हाय अ‍ॅलर्टवर ठेवली आहे!
  3. ब्रेकींग न्यूज मधे खाली मथळा येत होता, पिएमनी सीएमना फोन केला म्हणून! नंतर बातमीत सांगितले की पिएमनी सिएमना फोन करून अधिक माहिती मागितली! ही काय बातमी आहे का?
  4. सिएमनी अर्थातच नंतर अफवांवर विश्वास ठेवू नका, हा दहशतवादी हल्ला आहे का, कोणी केला वगैरे आत्ता महत्वाचे नाही असे नेहमीचे पालूपद लावले...
बाकी आता अजून काही बातम्या-विश्लेषणे येउंदेतच. पण कृपया "स्पिरीट ऑफ मुंबई अँड मुंबईकर्स" वगैरे म्हणू नका...त्या बाँबस्फोटाइतकाच त्याचा देखील वाचताना त्रास होतो... कारण यात स्पिरीट वगैरे काही दिसत नाही, दिसते ती एकतर निर्विकार भावना अथवा त्याहूनही अधिक, असहाय्यता. असो.

In reply to by विकास

अगदी मनातले लिहिले आहे. सहमत आहे. यातला एक स्फोट मी जेथून नेहमी जात असे तेथेच झाला आहे. :( काळजी घ्या! अजून काय म्हणू?

फेसबुकावर आताच ही लिंक मिळाली. आणि त्यात भर पडतेच आहे. माणूसकीच्या नात्याने लोक उत्स्फूर्तपणे पुढे होऊन जमेल ती मदत करायला तयार आहेत. त्यात अगदी घरी राहणं, खाणं, फोन, मेल, ट्वीट पासून अगदी कारने घरी सोडण्यापर्यंत आणि वैद्यकीय मदत देण्याचा अंतर्भाव आहे. (इथे दिलेल्या फोन नंबरांचा नंतर दुरूपयोग होऊ नये हीच एक आशा) पण प्रत्येकवेळेस अशी घटना घडल्यावर तिथे पोलिस आणि सरकारी मदत किती वेळाने पोचली याचा खल करण्या/पाहण्यापेक्षा अशी विधायक मदत केलेली बरी. (कीस पाडायला नंतर वेळ आहेच की) ही ती लिंकः https://spreadsheets.google.com/spreadsheet/lv?hl=en_US&key=tE-okpwwYgQ…

In reply to by मस्त कलंदर

पण प्रत्येकवेळेस अशी घटना घडल्यावर तिथे पोलिस आणि सरकारी मदत किती वेळाने पोचली याचा खल करण्या/पाहण्यापेक्षा अशी विधायक मदत केलेली बरी. याला +१, पण विधायक मदत करावी असे वाटतानाही डोक्यात यायचे ते येतच राहते, हेही खरेच आहे. अनेक मुंबईकर निरपराधांना कोणाच्या तरी दुष्ट, दहशतवादी कृत्यांमुळे जीव गमावावा लागला, त्यांच्या मुलाबाळांबद्दल आणि नातेवाईकांबद्दल अतिशय वाईट वाटते आहे. असो.

आशा आहे की सर्व मिपाकर आणि हल्ल्यात न सापडलेले मुंबईकर सुरक्षीत असोत. NDTV वर सध्या मृतांची संख्या २१ दाखवत आहेत. हे सर्व अवघड होत आहे. अनेक वर्षांपासून मुंबईत स्फोट होतच आहेत आणि त्यात सामान्य माणूस जनावरासारखा बळी दिला जातोय. पण आपले सरकार 'हल्ल्याचा कडक शब्दात निषेध, तातडीची बैठक, एखादी कमिटी, इ.' च्यापुढे आणखी काही करेल याची शंकाच आहे.

पुन्हा तेच ते आणि तेच ते ! मृतांच्या नातेवाईकणा घाऊक मदत , स्फोटाचा तीव्र निषेध , पाकिस्तानचा सक्त ताकीद , अजुन एक कमिटी , संशयितना अटक , लांबलेले खटले , कधीही न होणारी फाशी , पुन्हा हल्ला पुन्हा एकदा क्रांतीच्या प्रतीक्षेत असणारा मी एक भारतीय !

मी आज 'स्फोट कसाबच्या वाढदिवशी झाले' असं इथे वाचल्यावर लगेचच (१०-१५ सेकंदात) ajmal kasab असा सर्च केला, तर हे विकीपेडियावरचं पान सापडलं, ज्यात त्यावेळी 'Born on July 13, 1987' अशी माहिती पहिल्याच ओळीत होती. तेंव्हा कदाचित या स्फोटाशी ही तारीख खरोखर संबंधित असावी असा विचार केला. पण जेंव्हा वरील धाग्यात काही विरोधी मतं (असा कसाबच्या जन्मदिवसाशी संबंध नसल्याची) वाचली, तेंव्हा तेच पान १५ मिनिटांनी परत जाऊन पाहिलं तर ते वाक्य आता काढलेलं आहे. कुणीतरी मधल्या काळात ते पान update केलं आहे. तळाशी पाहिलं तर (आतातरी) हे दिसतं: This page was last modified on 13 July 2011 at 17:28 केवळ अफवा पसरवण्यासाठी कुणीतरी मुद्दाम हे आधी पोस्ट केलं होतं, की आणखी भडका उडू नये म्हणून पोलिस वा इतर कोणी हे पान आता 'अपडेट' केलं आहे?