✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी मुंबई बोलतेय...

म
मड्डम यांनी
Wed, 11/25/2009 - 22:11  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7892 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

माझं

सुहास
Wed, 11/25/2009 - 23:16 नवीन
माझं 'स्पिरिट' लोकांमध्ये शिगोशिग भरलंय. कसलं "स्पिरिट" डोंबलाचं? सगळेच मुर्दाड झालेत.. राज्यकर्तेही आणि काही प्रमाणात लोकही... :< --सुहास
  • Log in or register to post comments

सुहास राजा

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 11/26/2009 - 16:50 नवीन
सुहास राजा जरा ये ईकड ईकडचे लोक मुर्दाड नाहीत एक वेळ राज्यकर्ते असतील पण ईकडचे लोक नाहीत अरे घड्याळ्याच्या काट्या प्रमाणे मुंबईतील लोक पळत असतात अरे २६ जुलै असो की २६ नोव्हेंबर मुंबई २७ तारखेला परत धावत होती आणी धावणार आहे हेच आहे आम्हा मुंबईकरांच स्पिरिट मुंबई मेरी जान!!! माझी जन्मभुमी ! कर्मभुमी माझी मुंबई!! ************************************************************** बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास

हॅ हॅ हॅ

पाषाणभेद
गुरुवार, 11/26/2009 - 02:28 नवीन
हॅ हॅ हॅ मला वाटल की मटा वरची बातमीए की काय? ------ आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही. पासानभेद बिहारी
  • Log in or register to post comments

शेवटी मी

मेघवेडा
गुरुवार, 11/26/2009 - 16:35 नवीन
शेवटी मी मुंबई आहे. मुंबई. कधीच न थांबणारी. अखंड वाहत रहाणारी..... पाण्याच्या काठावर माणसांचा समुद्र पुन्हा एकदा माझ्यात हेलकावू लागला. अत्यंत सूचक! बॉम्बस्फोट असोत, दंगली असोत, सुनामी/ पूर असोत की भूकंप असोत, मुंबई कालचे घाव विसरून आज त्याच वेगाने वाहत राहणार हे अगदी खरंय!! आज आपण यातून वाचलोय ना, उद्याचं उद्या बघून घेऊ!!! खरंच, मुंबई .. मेरी जान!!
  • Log in or register to post comments

मुंबै चं

टारझन
गुरुवार, 11/26/2009 - 17:00 नवीन
मुंबै चं स्पिरीट =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) म्हणे मुंबैचं स्पिरीट .. कैच्या कै !! मुंबै पुन्हा धावते कारण त्याला पर्याय नाही. घाबरून घरात बसुन चुल पेटणार नाही ! जंगलात सिंह शिकार करतो तेंव्हा झेब्य्रांचा कळप सैरभैर होतो.. शिकार झाली की पुन्हा कळप आपला चरण्यात मग्न होतो. वा .. काय झेब्य्राचं स्पिरीट ! - टारझन
  • Log in or register to post comments

टार्‍या

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 11/26/2009 - 17:10 नवीन
टार्‍या लेका तु म्हणतोस त्याच्याशी १०१% सहमत पण मला सांगा नेहमी मुंबई टार्गेट होते पुण्यनगरीत कधी असे हल्ले झालेत का ? नाही ना अरे मग तुम्हाला कशी असेल सवय अशा गोष्टींची तु कधी लोकलने प्रवास केला आहेस का? तीकडे पण आपल उत्तर माझी फटफटी आहे अरे मग तु अशी हसणारी स्मायली टाकुन काय फायदा... ************************************************************** बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

डोक्यावर

मेघवेडा
गुरुवार, 11/26/2009 - 17:41 नवीन
डोक्यावर सतत टांगती तलवार असते. कधी पुन्हा हल्ले होतील सांगता येत नाही. अतिरेक्यांचं लक्ष्य आपली मुंबईच आहे याची पुरेपूर जाणीव आहेच. या परिस्थितीत "कालच्या बॉम्बस्फोटातून तर वाचलो, परत कधी होतील तेव्हा काय होईल ते देवच जाणे! ते नंतर बघू, उद्या सकाळी ९.३२ चर्चगेट फास्ट पकडायचीय!" असा विचार एक मुंबईकर करू शकतो हे मुंबईचं स्पिरीट! मुंबै पुन्हा धावते कारण त्याला पर्याय नाही. घाबरून घरात बसुन चुल पेटणार नाही ! सहमत! पण असुरक्षिततेची भावना मनात असूनही पुन्हा दुसर्‍या दिवशी पूर्वीच्याच जोमाने कामाला लागणे हे मुंबईचे स्पिरीट!! तुम्ही दिलेले उदाहरण फारच समर्पक आहे. परंतु, सिंहाने झेब्र्याची शिकार करणे हा निसर्गनियमच आहे की! अतिरेकी आणि मुंबईकरांच्या बाबतीत मात्र तसे नाही ना! असो. मुंबई म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय असल्याने आपल्या या असंख्य स्माईलीज् पचनी पडल्या नाहीत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अतिरेकी

टारझन
गुरुवार, 11/26/2009 - 18:15 नवीन
अतिरेकी आणि मुंबईकरांच्या बाबतीत मात्र तसे नाही ना!
मी ह्यावर कोणतंही वक्तव्य केलं नाही .. फक्त वृत्ती स्पष्ट पणे समोर मांडली आहे. ह्यात योग्य-अयोग्य दाखवण्याचा प्रयत्नंही नाही. झेब्रा आणि मुंबै एकसारखी वाटते. स्मायली ह्या उपहासात्मक होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

ज्याचा

मेघवेडा
गुरुवार, 11/26/2009 - 21:42 नवीन
ज्याचा त्याचा दृष्टीकोन .. ! असो. चूभूद्याघ्या.! -- मुंबईवेडा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

काय

विजुभाऊ
Fri, 11/27/2009 - 09:18 नवीन
काय झेब्य्राचं स्पिरीट ! टार्‍याशी १००००००% सहमत. पडल्यानन्तर एखाद्याने उठून उभे राहिल्यावर उठून उभा राहीला म्हणून त्याचे स्पिरीट असे बोलण्यासारखे आहे. ही तर भेकडांची अंहिंसा पुन्हा ठेच लागू नये म्हणून काही केले तर ते खरे स्पिरीट. एक ट्वीन टॉवर उध्वस्त झाल्यावर ते करणारांचा आख्खा देश बेचिराख करणारांचे स्पिरीट. एंटेबे विमानतळावरून ओलीस ठेवलेले सारे प्रवासी लढून परत आणणारांचे ते स्पिरीट. ( कुसूमाग्रजांची एक ओळ आठवते.... " नको शृंगार क्षुद्र दुर्बळांचा...तूझी दूरता त्याहूनी साहवे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

स ला म मुं ब ई

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 11/26/2009 - 17:46 नवीन
=D> सू हा स...
  • Log in or register to post comments

कसला आलय स्पिरिट...

प्रशु
गुरुवार, 11/26/2009 - 20:25 नवीन
कसला आलय स्पिरिट... स्पिरिट बिरिट या सगळ्या मेणबत्ती छाप, टाईम्स सारख्या लोकांच्या रिकाम्या ऊठाठेवी आहेत. घरी बसुन आम्हाला कोण पोसणार? म्हणुन आम्हि रोज बाहेर पडतो. मागच्या लोकल मधल्या स्फोटाच्या वेळी फ्क्त त्या दिवशी मुलाखतीला गेलो म्हणुन वाचलो... पण दुसर्या दिवशी कामासाठी बाहेर पडावेच लागले. स्पिरिट बिरिट असते तर या सगळ्या गोष्टीचा तमाशा करणार्यांना घरी बसवले असते... पण झाले काय? मुख्य ध्यान आज मस्त दिल्लीत आहे आणि उप ध्यान ( छोटे छोटे शहर फेम) आज परत त्याच खुर्चित आहे....
  • Log in or register to post comments

बिंगो !!!

टारझन
गुरुवार, 11/26/2009 - 21:19 नवीन
बिंगो !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशु

२६/११ च्या

अनामिका
Sun, 11/29/2009 - 02:14 नवीन
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला वर्ष पुर्ण होत असताना एक अत्यंत विनोदी लेख चक्क लोकसत्तात आणि तो देखिल विद्वान कुमारांच्या लेखणीतुन जन्मास आलेला वाचनात आला.....आजतागायत उभी हयात संघाच्या नावाने गळेकाढुपणा करत घालवणार्‍या केतकरांनी आता भारताचा एक नविन शत्रु निर्माण झाल्याचा जावईशोध २६/११ च्या हल्ल्याच्या निमित्ताने काढलाय.....केतकरांची शोध पत्रकारीता नव्यानेच प्रसवतेय .लेख वाचुन अंमळ करमणुक झाली इतकच या लेखा सारखा मोठा विनोद असु शकत नाही निदान माझ्यामते. =)) http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=25208:2009-11-20-05-31-05&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117 "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा