मागे ती लुगडी
मागे ती लुगडी
एके काळी मराठी काव्य म्हणजे भक्ती काव्य व सोबतीला पंचपक्वांनांनी भरलेल्या ताटात थोडीशी झणझणित चटणी असावी तसे शाहीरांचे शृंगार काव्य. साहित्यात विनोद शोधावयास लागावयाचा. "विनोद आवडे टवाळा " ही समर्थांची उक्ती प्रातिनिधिक म्हणावयास हरकत नाही. तर अशा काळात अमृतराय या कवीची एक आल्हादकारक रचना मिळाली तेव्हा सगळ्या मित्रांना एक मेजवानीच मिळाली म्हणावयास पाहिजे. आणि हो, हा अमृतराय म्हणजे " अजी मी ब्रह्म पाहिले" या सुप्रसिद्ध रचनेचा कर्ता. अमृतराय (१६९८-१७५३) हा कटावाकरिता प्रसिद्ध.
मराठीत त्यानेच तो सुरू केला म्हाणावयास हरकत नाही. तर असा हा कवी कटाव सोडून भक्तीमार्गाकडे का वळला असावा याची उत्सुकता
लागली असेल तर त्याचे उत्तर पुढील कवितेत मिळेल.
मागे ती लुगडी सकाम बुगडी आठा दिसा बांगडी
घालिते फ़ुगडी कधी न रगडी, फ़ाडितसे आंगडी !!
खैराची शगडी तशी धडधडी तोंडाळ मोठी खुडी
सोन्याच्या लगडीस देखुनि रमे ऐशी महा धांगडी !!
दारा देत कडी, सदा बडबडी बोले महा वाकडी
दाणे चोरुन फ़ाकडी न कळता घेते मुळे काकडी !!
खाते ती जशी माकडी वसवसी दांती दिसे खोकडी
यालागी अमृतेश्वरासि रुचली गंगातिरी झोपडी !!
बुगडी ----- कर्णभूषण
शगडी ---- शेगडी असावयास पाहिजे
खुडी --- कजाग,दुष्ट, दांडगी
धांगडी --- उद्धट, आडदांड मुलगी [आणखी एक अर्थ - खोडकर घोडी ]
फ़ाकडी --वितंडवादी, फ़ाटे फ़ोडणारी
खोकड -- कोल्ह्याच्या जातीचे जनावर
अमृतराय आपल्या बायकोचे वर्णन करत आहे. लुगडी, कर्णफुले व दर आठां दिशी नवीन बांगड्या तर मागतेच ; पण एखादे दिवशी" अंग रगडून दे " म्हटले तर थयथयाट करत कपडेच फाडून टाकत असे. आपणापैकी बर्याच जणांनी शेगडीच पाहिली नसेल तर त्यातील खैराची लाकडे कशी धडाधडा पेटत ते कसे क:ळणार म्हणा ! द्या सोडून. पण पुढे कवी त्राग्याने तिला माकडी, खोकडी म्हणतो त्याचे कारण त्याने मधेच अगदी थोडक्यात दिले आहे. 'दारा देत कडी ". तुम्ही जरा रंगात येता आहात असे पाहिल्यावर जरतुम्हाला बाहेर काढून, बायको दाराला आंतून कडी लावत असेल तर तुम्हीही म्हणाल की या संसारापेक्षा सर्व त्याग करून गंगेकाठी एखादी झोपडी बांधून त्यात ईश्वर भजनात वेळ घालवणेच बरे ! ( आता नवरोजीच्या या त्राग्याला बायको काय उत्तर देते तेही कळेलच लवकर !)
शरद
याद्या
4324
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
मस्त.
वाट
+१
In reply to वाट by श्रावण मोडक
+२
In reply to +१ by सूड
श्री.रंगाशेट प्रसन्न
In reply to वाट by श्रावण मोडक
हाहाहाहा
In reply to श्री.रंगाशेट प्रसन्न by शरद
क ड क
In reply to श्री.रंगाशेट प्रसन्न by शरद
छान
मस्त. आणि जरासं अवांतर.
छान माहिती आणि अजून थोडे अवांतर
In reply to मस्त. आणि जरासं अवांतर. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संत कवींचे लेखन, पंडिती
In reply to छान माहिती आणि अजून थोडे अवांतर by सुनील
सुनिल यांच्या टंकसूचनेला अनुमोदन
In reply to संत कवींचे लेखन, पंडिती by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार.....!
In reply to सुनिल यांच्या टंकसूचनेला अनुमोदन by धनंजय
मस्त! बिरुटे सरांचा
छान
छान
मस्त रसग्रहण
मस्त धागा!