तुमच्या लक्षात आलंच असेल की हा केवळ 'गाजर हलवा' नाहीये तर रितसर गाजराचा हलवा आहे ;)
लहानपणापासून मला गाजराचा हलवा फार आवडतो. आणि सध्या फ्युजन म्हणून गरम-गरम हलवा आणि त्यावर व्हॅनिला आइसक्रिम मिळते, ते तर... अहाहा!
अश्या या सदाबहार हलव्याची पाकृ मात्र एकदम सोप्पी आहे.
साहित्य:
मध्यम आकाराचे ६ गाजर
१ टेस्पून साजूक तूप
१ वाटी साखर
१ वाटी दूध
चिमूटभर वेलची पूड
सजावटीसाठी सुक्यामेव्याचे तुकडे
कृती:
गाजर स्वच्छ धुवून कोरडे करून किसून घ्यावे.
कढई किंवा पसरट भांड्यात मंद आचेवर तूप गरम करावे. त्यात गाजराचा किस घालून मध्यम आचेवर शिजवावे.
गाजराचा जरा मऊ झाला की त्यात साखर घालून हलक्या हाताने मिक्स करावे. साखरेमुळे मिश्रणाला पाणी सुटते. त्यामुळे भांड्याला मिळणारी आच वाढवायला हरकत नाही. पण अधूनमधून हलवत राहून खालून जळणार नाही याची खबरदारी घ्यावी.
मिश्रण कोरडे व्हायला लागले की आच पुन्हा मंद करून दूध घालावे. बरेच लोक आवडीप्रमाणे खवा/कन्डेन्स्ड मिल्क सुद्धा घालतात.
हलवा आपल्याला हवा तसा ओलसर/कोरडा झाला की त्यात वेलची पूड मिक्स करून आचेवरून उतरवून घ्यावा.
गरमागरम हलवा वाटीत काढून त्यावर सजावटीसाठी सुक्यामेव्याचे तुकडे पेरावे आणि....... पुढचे सांगायची गरज नाही :)

वाचने
9482
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा...................मस्तच
वा
तूप
In reply to वा by चिरोटा
त्यात खवा किंवा मिल्क पावडर घातल्यावर
In reply to तूप by स्मिता.
आपण तर बॉ काजु पेस्ट
In reply to त्यात खवा किंवा मिल्क पावडर घातल्यावर by सामान्य वाचक
काजु पेस्ट
In reply to आपण तर बॉ काजु पेस्ट by परिकथेतील राजकुमार
व्वा! पाकृ बुकमार्क्ड!
रेसिपी मस्त सध्या फ्युजन
मस्तच मला ही खुप आवडतो
+१
In reply to मस्तच मला ही खुप आवडतो by सानिकास्वप्निल
खवा
In reply to मस्तच मला ही खुप आवडतो by सानिकास्वप्निल
आयडियाची कल्पना
In reply to खवा by स्मिता.
ह्याला म्हणतात..
In reply to आयडियाची कल्पना by श्रावण मोडक
हा हा हा
In reply to आयडियाची कल्पना by श्रावण मोडक
मस्त
यम यम !!!
बायकोला करावयास सांगणे.
In reply to यम यम !!! by मदनबाण
अहाहा.. अतिशय आवडला.. - पिंगू
छान!
असा केशरी गजर हलवा??? मद्रासी
केशरी गाजर
In reply to असा केशरी गजर हलवा??? मद्रासी by स्पा
मद्रासी गाजर वापरली आहेत वाटत
In reply to असा केशरी गजर हलवा??? मद्रासी by स्पा
आभार
जरा (म्हणजे बरीच) उशिराने
In reply to आभार by स्मिता.
आवडता