रागांचा महासागर आता एका क्लिकवर
बाराशे रागांचा डेटाबेस आणि सहाशे रागांच्या ऑडिओ क्लिप्स उपलब्ध करून देणारी 'ओशन ऑफ रागाज्' ही वेबसाइट म्हणजे संगीतप्रेमींसाठी तसेच अभ्यासकांसाठी एक पर्वणीच ठरली आहे. यामुळे भारतीय संगीतातील सगळी घराणी जवळ आली आहेत. त्याविषयी...
[ सौजन्यः म. टा. ]
टाटा मोटर्स कंपनीतून निवृत्त झालेले गदे यांचा हा वैयक्तिक संग्रह वेबसाइटवर आल्यामुळे आता सर्वांसाठी खुला झाला आहे. आपल्या पंचवीस वर्षांच्या संग्रहाचे रुपांतर 'ओशन ऑफ रागाज्' मध्ये करण्यासाठी त्यांना दीड वर्ष लागलं. गदे सांगतात, 'माझंही 'संगीत प्रभाकर' परीक्षेपर्यंत संगीताचं शिक्षण झालेलं आहे. पण नोकरीमुळे गाण्यासाठी वेळ देता येत नसे याची खंत वाटायची. गाणं पुढे नेता आलं नसलं तरी किमान गाण्याच्या सतत सानिध्यात राहावं म्हणून मग मी संग्रह करू लागलो. माहिती जमा करीत गेलो. ऑडिओ क्लिप्स जमवल्या. शेवटी माझ्या संग्रही एवढी माहिती जमली की आता या माहितीचा काहीतरी उपयोग केला पाहिजे असा विचार मनात आला. संगीत म्हणजे आनंद आहे. हा आनंद इतरांनाही मिळावा असा विचार करीत असताना वेबसाइटची कल्पना सुचली.'
संकेतस्थळ : http://oceanofragas.com/home.aspx
वाचने
4333
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
हात्त
In reply to हात्त by आनंदयात्री
>>>>या साल्या शास्त्रीय
In reply to >>>>या साल्या शास्त्रीय by यकु
आता
In reply to आता by आनंदयात्री
कस्च..कस्चं.. मी आपली सहज
ही लिंक वापरा
साईट ओपन होत नाहीये .. शुल्लक
धन्यवाद
कालच बघितली. चांगली वाटली.
शतःश
वाहव्वा!
धन्यवाद साइट मस्तच
छान माहिती
खूप छान माहिती!