✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भडक वक्तव्ये

न
नितिन थत्ते यांनी
Wed, 06/29/2011 - 20:58  ·  लेख
लेख
काल संध्याकाळी दोन तीन न्यूज चॅनेलवर एक बातमी सारखी सारखी सांगत होते. माओवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या पोलीसांच्या शवपेट्या वाहून न्यायला म्युनिसिपालिटीची कचर्‍याची गाडी वापरली गेली. सरकारने शहीदांचा अपमान केला वगैरे ठराविक प्रक्षोभक वक्तव्ये बातमीदार करीत होता. "सरकारको कोई हक नही कि इस प्रकार शहीदोंका अपमान करें" वगैरे. बातमी वाचल्यास असे दिसते की जिवंत असलेल्या जखमींना नेण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स वापरल्यामुळे मृतांसाठी कचर्‍याची गाडी वापरली. कचर्‍याची गाडी व्यवस्थित स्वच्छ करून घेतली होती. विपर्यास करून बातमी दाखवून लोकांना भडकावण्याची काय गरज?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14184 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

लोकांनाही ना अतोनात माहिती

भडकमकर मास्तर
Fri, 07/01/2011 - 01:10 नवीन
लोकांनाही ना अतोनात माहिती देवूच नये. काहीतरी वाद घालत बसतात. अहा.स्स्सार्‍या चर्चेचे सार आवडले...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

दूरदर्शन

अजातशत्रु
Fri, 07/01/2011 - 15:13 नवीन
लोकांनाही ना अतोनात माहिती देवूच नये. काहीतरी वाद घालत बसतात.
असे काही झाले तर या पुढे आदर्श अन लवासा सारखी प्रकरणे अन् त्यांच्या मागे असणारे खरे हात समोर येणार नाहीत. सगळेच संक्षिप्त स्वरुपात असेल,दूरदर्शन सारखेच, जाता जाता: जवानांना नेहमीच व्हेपन मशीन समजून त्यांच्या बरोबर हवे तसे व्यवहार करणारे अधीकारी,नेते लोक आप्त स्वकियांवर असा प्रसंग ओढवला तर असे करतील काय? काहींनी तर शहीदांच्या शवपेटितही भ्रष्टाचार केला आहे ही विटंबना नव्हे काय? याला म्हणतात मृताच्या टाळूवरचे लोणी खाने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

भ्रष्टाचार करावा असे मी

रेवती
Sat, 07/02/2011 - 01:50 नवीन
भ्रष्टाचार करावा असे मी कुठेही म्हटले नाहीये. कचर्‍याच्या गाडीतून मृतदेह न्यावेत हेही पसंत पडले नाहिये. तिथे नक्की अजून कोणती व्यवस्था होवू शकत होती/नव्हती याची सगळी कल्पना आपल्याला घरात बसून येवू शकत नाही. नाईलाजाने तशी व्यवस्था करावी लागली असेल असे गृहीत धरले आहे. त्यावर लोकांची टीका त्या निर्णयकर्त्याला सहन करावी लागतेच. अश्या वेळेस लोकांना फार गोष्टी नाही कळल्या तर बरं असं वाटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजातशत्रु

बरोबर

अजातशत्रु
Sat, 07/02/2011 - 14:04 नवीन
पण जर घटनेची(बातमी) माहिती इत्यंभूत नसेल तर, त्यातून नको तेवढे गैरसमज पसरणार ना. अर्धवट अपुर्‍या माहितिने नुकसानच जास्त होते. म्हणून लोकांना अतोनात गोष्टिची माहिती दिली तर योग्य असावे, अवांतरः सत्य हे लोकांसमोर यावे इतकाच आमचा नेहमि हट्ट असतो, घटना/बातमितील दुसरी बाजू समोर यायलाच हवी,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मॄतदेहाला दोन हार घातले तर

अप्पा जोगळेकर
Fri, 07/01/2011 - 00:16 नवीन
मॄतदेहाला दोन हार घातले तर उद्या पाच हार का घातले नाहीत बरं ? शहीदांचा अपमान झाला असे म्हणून देखील गळे काढले जातील. जाता जाता - एक पाद्री युरोपातील एका शहरात गेला जे वेश्याव्यवसायासाटी प्रसिद्ध होते. त्याने पत्रकारांना विचारले ,"हाऊ मेनी ब्रॉथेल्स आर देअर इन अ सिटी ?" दुसर्या दिवशी वर्तमानपत्रात मथळा होता,"फादर आस्क्ड फॉर अ ब्रॉथेल". या घटनेची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

अण्णा...

चिगो
Sun, 07/03/2011 - 16:35 नवीन
हाच किस्सा मी असा ऐकलाय... एक पाद्री एका शहरात गेल्यावर पत्रकारांनी त्यांना विचारलं, " आर यु प्लानिंग टू विसीट द रेड लाईट एरीया हिअर?" पाद्रीने विचारले, " आर देअर ब्रॉथेल्स हीअर?" दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात मथळा होता,"फादर आस्क्ड फॉर अ ब्रॉथेल"... चालायचंच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

एक रजत कपूर, प्रणय राय,

नर्मदेतला गोटा
Fri, 07/01/2011 - 02:00 नवीन
एक रजत कपूर, प्रणय राय, मराठीत विजय कुवळेकर, अरुण टिकेकर मेडीयामधे बाकी सगळा गाळच असायचा एवढे चॅनेल २४/७ चालतात सगळ्यांना कुठले हे आघाडीचे लोक मिळणार ? मग ३५ % पास वाले घ्यावे लागतात काही महाभागांना तर विषय काय आहे हेही कळत नाही एखादी चर्चा चालू असते, टी व्ही वरचा एखादा सूत्रसंचालक मधेच एक वाक्य टाकतो "हो पण मग त्यातून आम आदमीचा काय फायदा" दादोजी कोंडदेव प्रकरणाच्यावेळी टी व्ही वाले काय पण बडबडत होते असतात अशे नर्मदेतले गोटे काय करणार ?
  • Log in or register to post comments

विटाळ

राजेश घासकडवी
Fri, 07/01/2011 - 08:10 नवीन
भारतीय समाजमनातून विटाळाची संकल्पना काही जात नाही हेच खरं. अस्पृश्यता इतका काळ का टिकली हे काही प्रतिक्रिया वाचून लक्षात येतं. सोनखतात पिकलेलं धान्य चालतं, पण मैला वाहून नेणाऱ्या मनुष्याने कितीही आंघोळ केली तरी त्याची सावलीदेखील पडू द्यायची नाही हा दुटप्पीपणाही आहेच. म्हटलं आपणही थोडी भडक विधानं करून बघू....
  • Log in or register to post comments

म्हटलं आपणही थोडी भडक विधानं

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/01/2011 - 13:19 नवीन
म्हटलं आपणही थोडी भडक विधानं करून बघू....
शेवटी तुम्हीही विटाळलातच ना? पुढच्या वेळी तुम्हाला भेटायचं की नाही ते ठरवायाला हवं आता. कमीत कमी घरी तरी नाहीच बोलावणार तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

बापरे...

राजेश घासकडवी
Fri, 07/01/2011 - 18:53 नवीन
संपादकांकडून असे धमकीवजा प्रतिसाद आले की भीती वाटते. माझा मिसळपाववरचा आयडी शहीद होईल याची. आयडी मेल्यावर त्याला मिपाबाहेर काढताना कचऱ्याची गाडी तरी मिळेल की नाही या शंकेने काळीज थरकतं. तरी संपादकसाहेब, एक ध्यानात घ्या मला खरोखरच भडकाऊपणा करायचा असता तर मी प्रतिसादकांची जात काढून आत्मपरीक्षण करा वगैरे नसतं का लिहिलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

>>एक ध्यानात घ्या मला खरोखरच

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 07/05/2011 - 18:33 नवीन
>>एक ध्यानात घ्या मला खरोखरच भडकाऊपणा करायचा असता तर मी प्रतिसादकांची जात काढून आत्मपरीक्षण करा वगैरे नसतं का लिहिलं? जमणारच नाही तुम्हाला. त्यासाठी मूर्खपणाची जी पातळी लागते ती तुम्हाला या जन्मात गाठणे शक्य होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

खोली, खोली...

श्रावण मोडक
Tue, 07/05/2011 - 18:48 नवीन
पातळी नाही, खोली... खोली म्हणा त्याला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मिडीया मुर्ख आहे यात वाद

नर्मदेतला गोटा
Fri, 07/01/2011 - 17:09 नवीन
मिडीया मुर्ख आहे यात वाद नाही. घटना गरजेपेक्षा आणि प्रमाणापेक्षा जास्त टीकेची धनी झालेली आहे हे मान्य. पण मुळात हा प्रकार टाळता यायला हवा होता. टाळता आला असताच असे म्हणत नाही. --- काय गोलमाल लिवताय
  • Log in or register to post comments

या वृत्तपत्रांवर बंदीच घातली पाहिजे

विसुनाना
Fri, 07/01/2011 - 18:10 नवीन
कायच्या काय छापतात. आता हेच पहा ना - टाईम्स ऑफ इंडियाला पण असली पीतपत्रकारिता करण्याचा मोह आवरत नाही. -Image removed. गव्हर्नरबरोबर फोटो काढायचा म्हणजे काय खाऊ वाटला काय? लागली थोडावेळ वाट पहायला तर काय झालं? बाई अडाणीच दिसते. असं भिकार्‍यासारखं दारात कशाला उभं रहायचं? निदान खुर्चीवर तरी बसायचं की नाही? (फेसबुकावर हल्ली काहीही येतं.) :)
  • Log in or register to post comments

>>>>गव्हर्नरबरोबर फोटो

यकु
Sun, 07/03/2011 - 21:32 नवीन
>>>>गव्हर्नरबरोबर फोटो काढायचा म्हणजे काय खाऊ वाटला काय? लागली थोडावेळ वाट पहायला तर काय झालं? बाई अडाणीच दिसते. असं भिकार्‍यासारखं दारात कशाला उभं रहायचं? निदान खुर्चीवर तरी बसायचं की नाही? ही वाक्ये तुम्ही उपरोधिकपणे लिहीली असावीत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

यातच सारे आले

विसुनाना
Mon, 07/04/2011 - 11:30 नवीन
ही वाक्ये तुम्ही उपरोधिकपणे लिहीली असावीत..
- ती वाक्ये आपल्याला उपरोधिक वाटली यातच सारे आले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

हे (वक्तव्य) पण त्यातलेच!

नंदू
Sun, 07/03/2011 - 17:22 नवीन
हे (वक्तव्य) पण त्यातलेच!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा