✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

भडक वक्तव्ये

न
नितिन थत्ते यांनी
Wed, 06/29/2011 - 20:58  ·  लेख
लेख
काल संध्याकाळी दोन तीन न्यूज चॅनेलवर एक बातमी सारखी सारखी सांगत होते. माओवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या पोलीसांच्या शवपेट्या वाहून न्यायला म्युनिसिपालिटीची कचर्‍याची गाडी वापरली गेली. सरकारने शहीदांचा अपमान केला वगैरे ठराविक प्रक्षोभक वक्तव्ये बातमीदार करीत होता. "सरकारको कोई हक नही कि इस प्रकार शहीदोंका अपमान करें" वगैरे. बातमी वाचल्यास असे दिसते की जिवंत असलेल्या जखमींना नेण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स वापरल्यामुळे मृतांसाठी कचर्‍याची गाडी वापरली. कचर्‍याची गाडी व्यवस्थित स्वच्छ करून घेतली होती. विपर्यास करून बातमी दाखवून लोकांना भडकावण्याची काय गरज?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14184 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

याबद्दल तक्रार करता येईल

यकु
Wed, 06/29/2011 - 21:05 नवीन
You can file a complaint either online or through post to Electronic Media Monitoring Center. To file an online complaint, you have to visit http://emmc.gov.in/ and register as a user. Alternatively, you can download the application format by clicking here and post it on the address provided in the application. On receiving a consumer complaint, the agency validates the information against the official records. If the complaint is valid, it is forwarded to the Ministry of Information and Broadcasting, which can then take strict action against the party that has violated the law. News Broadcaster Association (NBA) is another agency which seeks consumer complaints against unlawful reporting. It is an industry consortium for news broadcast channels and aims to promote self-regulation in news reporting. It is a private entity and not a government agency.
  • Log in or register to post comments

Thanks for info, there has to

नर्मदेतला गोटा
Wed, 06/29/2011 - 22:25 नवीन
Thanks for info, there has to be control over these people
  • Log in or register to post comments

पूर्ण सहमत आहे. आधी ती बातमी

बिपिन कार्यकर्ते
Wed, 06/29/2011 - 23:18 नवीन
पूर्ण सहमत आहे. आधी ती बातमी बघितली तेव्हा चक्रावलो पण नंतर काही अधिकार्‍यांचे खुलासे ऐकले ते पटण्याजोगे होते. विशेषकरून हिंदी न्यूज चॅनेल्स अतिशय खालच्या दर्जाचे वर्तन नेहमीच करतात. त्यांचा या निमित्ताने निषेध करतो.
  • Log in or register to post comments

>>त्यांचा या निमित्ताने निषेध

नर्मदेतला गोटा
Wed, 06/29/2011 - 23:28 नवीन
>>त्यांचा या निमित्ताने निषेध करतो. नूसता निषेध नाही टी व्ही चे बटन बंद करा शेवटी तूच आहेस बाबा तूझ्या जीवनाचा शिल्पकार
  • Log in or register to post comments

बंद करा!!

मी-सौरभ
Wed, 06/29/2011 - 23:32 नवीन
ही सगळी भिकारडी न्युज चॅनेल्स बंद करुन फक्त दूरदर्शन आणि बी बी सी ही दोनच ठेवली पाहिजेत :) त्यापेक्षा दोन - तीन फॅशन ची चॅनेल्स काढा की ;)
  • Log in or register to post comments

हो ना !!!

रामदास
गुरुवार, 06/30/2011 - 18:51 नवीन
(साधासुधा) सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

+१

पिवळा डांबिस
Fri, 07/01/2011 - 00:35 नवीन
त्यापेक्षा दोन - तीन फॅशन ची चॅनेल्स काढा की... (डांबिस) सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

+०.५

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/01/2011 - 01:40 नवीन
पुरूषांना त्यात फारश्या नोकर्‍या मिळणार नाहीत. मग युयुत्सुंना राग येईल बरं. (युयुत्सु, ह घ्या हो!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

बीबीसी दूरदर्शन मध्ये

प्यारे१
Sat, 07/02/2011 - 10:00 नवीन
बीबीसी दूरदर्शन मध्ये पुरुषांना का बरे नोकर्‍या मिळणार नाहीत? :P बाकी आपण फॅशन टीव्ही'देखील' बघतो हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

भडकपणा

विकास
गुरुवार, 06/30/2011 - 00:21 नवीन
विपर्यास करून बातमी दाखवून लोकांना भडकावण्याची काय गरज? सहमत. पण, भडकपणा फक्त बातम्यातूनच दिसतो अशातला भाग नाही. लेख, चर्चा, इतरांच्या श्रद्धांचा अनादर, वैचारीक मतभेदासंदर्भात पण दिसतो. नितिनरावांचा लेख आहे म्हणून पुढचे लिहीलेले नाही असे आधीच स्पष्ट करतो:
  1. पण गांधीचे खुनी अशी संघटना आणि (खुन्याव्यतिरीक्त) इतर व्यक्तींची हेटाळणी करणे, त्यात आततच्या पिढ्यांना सिद्ध न झालेल्या गिल्टवरून "गिल्ट बाय असोसिएशन" करणे ह्यात भडकपणा नाहीतर काय आहे?
  2. धर्मावरून, विशेष करून हिंदू धर्मियांना त्यांच्या ज्याकाही श्रद्धा-अंधश्रद्धा असतील (अर्थातच समाजाला प्रत्यक्ष घातक नसलेल्या - उ.दा. नरबळी वगैरे सारख्या सोडून), त्यावरून वाटेल ते बोलणे आणि सगळ्यांना कमी लेखणे, ह्यात भडकपणा नाहीतर काय आहे?
  3. ज्याविषयी कुठलाही पुरावा नाही अशा विषयात कुठल्यातरी सामाजिक क्षेत्रात, भले तुमच्या विचारांनी नसेल पण कार्यरत असलेल्या व्यक्तीवर लैंगिकतेवरून शिंतोडे उडवणे, ह्यात भडकपणा नाहीतर काय आहे?
  4. जेंव्हा एमएफ हुसैन स्वतः म्हणतात की मी टॅक्सऑफिसर्सच्या त्रासाला कंटाळलो आहे, चाळीशीत असतो तर दोन हात केले असते. पण त्यातील टॅक्स ऑफिसर्स काढून उरलेले सांगत, मग त्यांच्या चित्रांवरून झालेल्या वादामुळे त्यांनी भारत सोडला असे म्हणत वाणं वाटत हिंडणे, यात भडकपणा नाहीतर काय आहे?
दिग्विजय सिंग अथवा अगदी चिदंबरम सारख्यांची वक्तव्ये ही सरकारी भडकपणाचे नमुनेच आहेत... असे अनेक सांगता येईल. तुर्तास मुद्दा मांडण्यापुरते खूप झाले असे वाटते. असो.
  • Log in or register to post comments

+

नितिन थत्ते
गुरुवार, 06/30/2011 - 07:59 नवीन
सहमत आहे.... मी व्यक्तिशः नेहमीच या गोष्टींचा विरोध केलेला आहे. चालायचंच. कधीकधी अशा बिनबुडाच्या गोष्टी "झाकलेली सत्ये" म्हणून पुन्हापुन्हा सांगितली जातात. उदा. विशिष्ट व्यक्तींचे मूळ आडनाव अमूकतमूक होते. ते राजकीय फायद्यासाठी बदलून घेण्यात आले वगैरे. हुसेन यांनी जो "फक्त टॅक्सवाल्यांचा त्रास" सांगितला तस्साच त्रास तेहलकाने स्टिंग (बंगारू लक्ष्मण-जया जेटली-जॉर्ज फर्नांडिस वगैरे) ऑपरेशन केले तेव्हा त्यांना झाला होता. तेव्हा तो "फक्त टॅक्सवाल्यांचाच त्रास" नसू शकतो असे मानायला जागा आहे. उरलेल्यांनी त्रास दिला हे तर उघड सत्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

टॅक्स

चिरोटा
गुरुवार, 06/30/2011 - 09:13 नवीन
टॅकसवाल्यांनी टॅक्स भरायला सांगितला म्हणून त्रास की टेबलाखालून जास्त मागितले म्हणून त्रास हे कळायला मार्ग नाही. यॉडेलिंगसाठी प्रसिद्ध असणार्‍या एक दिवंगत हिंदी गायकालाही टॅ़क्सवाल्यांबद्दल मनस्वी चीड होती. ते उघडपणे तसे बोलूनही दाखवत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

फरक आहे.

विकास
गुरुवार, 06/30/2011 - 18:54 नवीन
उदा. विशिष्ट व्यक्तींचे मूळ आडनाव अमूकतमूक होते. ते राजकीय फायद्यासाठी बदलून घेण्यात आले वगैरे. फरक आहे: एखाद्याला आणि त्याच्या पुढच्या पिढ्यांना प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष खुनी ठरवणे आणि एखाद्या व्यक्तीस जर कोणी राजकीय फायद्यासाठी नाव बदलले असे म्हणणे या दोन्ही आरोपांत फरक आहे. त्यात काय भडक आहे हे सरळ सरळ आहे. तरी देखील कुठल्यातरी नाटकातील वाक्ये पुन्हा पुन्हा जणू काही ऐतिहासिक सत्य आहेत अशा पद्धतीने पसरवायचा प्रयत्न होतो.... हुसेन यांनी जो "फक्त टॅक्सवाल्यांचा त्रास" सांगितला तस्साच त्रास तेहलकाने स्टिंग (बंगारू लक्ष्मण-जया जेटली-जॉर्ज फर्नांडिस वगैरे) ऑपरेशन केले तेव्हा त्यांना झाला होता. यात देखील फरक आहे: हुसैन यांच्याकडून कदाचीत करभरतीत चूक झाली असेलही पण त्यांचे एकंदरीत व्यक्तीमत्व पहाता त्यात करचुकवेगिरी नसण्याची शक्यता आहे. तसेच जरी ती असली, तरी सरकारी अधिकारी म्हणून कसे वागावे यावर बंधन आहे. थोडे अवांतर - व्हिपि सिंग अर्थमंत्री असताना तत्कालीन ७५-८० वर्षे वयाच्या शंतनुराव किर्लोस्करांना टॅक्स ऑफिसर्सनी ओव्हरनाईट चौकशीकरता अडकवून ठेवले होते. शंतनुराव (चांगल्या अर्थाने) खमके निघाले. त्यांनी सगळी कागदपत्रे दाखवली आणि परीणामी काहीच करू शकले नाहीत. पण तसा त्रास होऊ शकतो. स्टींग ऑपरेशन त्याची विश्वासार्हता आणि त्यातील बायास्ड निकष (म्हणजे फक्त एनडीएच्या नेत्यांचे तसे स्टींग ऑपरेशन करणे आणि आपोआप काँग्रेस वगैरे जणू स्वच्छ आहेत असा गैरसमज अप्रत्यक्षपणे पसरवणे) यावर वाद होऊ शकतात. पण तो माध्यमांचा हक्क देखील आहे. त्यातही बंगारू रंगे हात पकडले गेले. जॉर्ज फर्नांडीस यांनी स्वतः काही केल्याचे कधीच सिद्ध झाले नाही. त्यांच्या बाहेरील व्यक्तीने घेतले होते. म्हणून अप्रत्यक्षपणे त्यांनी केले असे म्हणले गेले. मग तसे तर २जी च्या संदर्भात ३ "जी" ना (मनमोहनजी, सोनीयाजी, राहूलजी) भ्रष्ट म्हणता येईल. मनमोहनजींना तर नक्कीच... तेव्हा तो "फक्त टॅक्सवाल्यांचाच त्रास" नसू शकतो असे मानायला जागा आहे. उरलेल्यांनी त्रास दिला हे तर उघड सत्य आहे. मी त्यांना दिल्या गेलेल्या त्रासाच्या विरोधात आहे, तसेच त्यांना आणि इतरांना समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळण्याच्या समर्थनात आहे. हे आधी देखील सांगितले आहे. मुद्दा तो नाहीच. स्वतः हुसैन मुलाखतीत काय म्हणाले आणि ते त्याच मुलाखतीच्या सुरवातीस कसे ट्विस्ट करून सांगितले गेले हा आहे. आणि त्यात सामाजिक विष पसरवण्याचा भडकपणा आहे असे मला म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

बरोब्बर! बाकीचे "२जी" करून-सवरून नामानिराळे रहातात

सुधीर काळे
Sun, 07/03/2011 - 23:50 नवीन
मनमोहनजींना तर नक्कीच... बरोब्बर! बाकीचे "२जी" करून-सवरून नामानिराळे रहातात कारण ते 'रिमोट कंट्रोलद्वारा "करतात-सवरतात".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

फत्के द्य अ

कार्लोस
गुरुवार, 06/30/2011 - 01:02 नवीन
विक्रुतिआअहे हि
  • Log in or register to post comments

<<<विपर्यास करून बातमी दाखवून

शिल्पा ब
गुरुवार, 06/30/2011 - 04:27 नवीन
<<<विपर्यास करून बातमी दाखवून लोकांना भडकावण्याची काय गरज? म्हंजे काय हो!! तुम्हीपण ना!! टीआरपी कसा वाढायचा मग? तो महत्वाचा का बाकीच्या बारीकसारीक गोष्टी? आणि असं पण "बडे बडे देशोंमे ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है" असं खुद्द आबाच म्हणुन गेलेत हे विसलात का?
  • Log in or register to post comments

आबाच म्हणुन गेलेत

कुंदन
गुरुवार, 06/30/2011 - 13:22 नवीन
आबा गेले ? कधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

अर्र्र्र्र्र!!! तुम्ही पेपरात

शिल्पा ब
गुरुवार, 06/30/2011 - 13:28 नवीन
अर्र्र्र्र्र!!! तुम्ही पेपरात वाचलं नाही का? आँ!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

सहमत

जयंत कुलकर्णी
गुरुवार, 06/30/2011 - 08:36 नवीन
पुढच्यावेळी, शववाहीका मिळेतो पर्यंत थांबण्यात आले तर कोण जबाबदार ? हा सगळा मिडीयाचा मूर्खपणा आहे असे नाइलाजाने म्हणावे लागत आहे.
  • Log in or register to post comments

मटा मधे

फारएन्ड
गुरुवार, 06/30/2011 - 08:59 नवीन
आजच्या मटामधेही ही बातमी आली आहे. टायटल साधारण वरती लिहील्याप्रमाणेच. आतली बातमी वाचली तर हे खुलासेही आहेत. बातमी देताना आपले मत त्यात द्यायचे हा प्रकार सगळीकडेच दिसतो आजकाल. कचर्‍याची गाडी यासाठी वापरणे बरोबर वाटत नाही, पण कदाचितः १. दुसरी योग्य गाडी उपलब्ध नसावी आणि २. खाजगी गाड्यांपेक्षा स्थानिक सरकारकडे उपलब्ध असलेली गाडी वापरणे प्रोसीजर च्या दृष्टीने सोयीचे वाटले असावे. त्यात बातमीत पुढे सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार वगैरे केले का ते सांगितलेले नाही (पण एक फोटो आहे तसे वाटणारा).
  • Log in or register to post comments

कचर्‍याची गाडी स्वच्छ

मृत्युन्जय
गुरुवार, 06/30/2011 - 13:00 नवीन
कचर्‍याची गाडी स्वच्छ केल्यावर कितपत स्वच्छ होते हे कोणाला माहिती आहे का? त्याच कचरागाडीतुन राष्ट्रपतींचे (आता पती नाहीत म्हणा. मी केवळ उदाहरण दिले) शव आणले गेले असते तर मिपाच्या जनसामान्यांतुन हीच प्रतिक्रिया उमटली असती काय? स्थानिक अधिकार्‍यांनी अ‍ॅम्ब्युलन्सचा वापर जखमींसाठी केला हे स्तुत्य आहे. पण शवांसाठी कचरागाडी हा तरीही अयोग्य निर्णय होता असे म्हणावे लागेल. स्थानिक अधिकार्‍यांच्या हातात याहुन जास्त कदाचित काही नसेल आणि त्यांच्यावर होणारी टीका अनाठायी असेलही. पण अश्या अपवादात्मक परिस्थितींमध्ये उच्चपदस्था़ंकडे ही बाब एस्कॅलेट करण्यासाठी आणि योग्य ती व्यवस्था करण्याची यंत्रणा असायला हवी असे वाटते. त्या परिस्थितीत योग्य त्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास ती बाब आणली गेली असती आणि त्यांनी गंभीरपणे आणि प्रसंगाचे महत्व ओळखुन योग्य त्या सुविधा पुरवल्या असत्या (जे अशक्य नव्हते) तर मला वाटते हा वाद उद्भवलाच नसता. मिडीया मुर्ख आहे यात वाद नाही. घटना गरजेपेक्षा आणि प्रमाणापेक्षा जास्त टीकेची धनी झालेली आहे हे मान्य. पण मुळात हा प्रकार टाळता यायला हवा होता. टाळता आला असताच असे म्हणत नाही. पण जर तो सद्यपरिस्थितीत तसा टाळता येत नसेल (म्हणजे योग्य त्या लोकांना योग्य ते अधिकार नसतील किंवा त्यांना त्या अधिकारांची जाण नसेल किंवा त्यांना परिस्थितीचे गांभीर्य आणि महत्व कळत नसेल) तर सरकारी यंत्रणेत योग्य ते बदल केले जाउन, अपवादात्मक परिस्थितीत योग्यप्रकारे सुविधा उपल्ब्ध करुन देण्याचे अधिकार आणि साधनसंपत्ती यंत्रणेकडे उपलब्ध करुन दिली पाहिजे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments

सहमत

चिरोटा
गुरुवार, 06/30/2011 - 13:17 नवीन
अपवादात्मक परिस्थितीत योग्यप्रकारे सुविधा उपल्ब्ध करुन देण्याचे अधिकार आणि साधनसंपत्ती यंत्रणेकडे उपलब्ध करुन दिली पाहिजे असे मला वाटते.
ते अधिकार असले पाहिजेत. फक्त संबंधित अधिकर्‍यांनी त्या अधिकारांचा वापर केला नसावा.(पोलिसच मेले आहेत. त्यात काय एवढे असा विचार करुन). जवानांऐवजी कोणी मोठे अधिकारी,राजकरणी असते तर कचर्‍याच्या गाडीतून नेले नसते एवढे नक्की.भारतात लोकशाही असली तरी सरकारी यंत्रणेत Feudal Mentality अजूनही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तरी सरकारी यंत्रणेत Feudal

पांथस्थ
Fri, 07/01/2011 - 11:52 नवीन
तरी सरकारी यंत्रणेत Feudal Mentality अजूनही आहे.
सत्यवचन. आणि ह्या वागण्यामागे हेतुपुरस्सरता नसुन मानसिकता आहे असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

धागाकर्त्याच्या मताशी सहमत...

भडकमकर मास्तर
गुरुवार, 06/30/2011 - 13:40 नवीन
धागाकर्त्याच्या मताशी सहमत... हल्ली बातम्या पाहून भावना भडकावून न घेणे योग्य... अवांतर : आता एक भाषेचा अभ्यास म्हणून समजा ,.... जर शव न्यायला उत्तम गाडीची वाट पाहत देह तसेच ठेवले गेले असते तर शहीदांचा अपमान, नातेवाईकांना ताटकळत कसे ठेवले, सरकारी अनास्था यावर बातमी लिहून पाहता येइल
  • Log in or register to post comments

कच-याची गाडी व हुतात्म्यांचे शव

रणजित चितळे
गुरुवार, 06/30/2011 - 13:43 नवीन
कच-याची गाडी कच-याची गाडी असते. ती धुतली तरी कच-याचीच राहते. काल पर्यंत कचरा नेला. आज धुतली व हुतात्म्याचे शव नेले व उद्या पासून परत कचरा नेऊ वाः हे काही पटत नाही मनाला. जर गाडी नसेल तर बाहेरून हायर का नाही केली गेली. प्रत्येक संस्थेकडे अशी कामे करण्यासाठी पैशांची तरतूद असते, ती का वापरली गेली नाही. जर त्याच भागातला एखादा मिनीस्टर किंवा मॅजीस्ट्रेट किंवा एखादा सिनेमातला नट अपघात होऊन मृत्युमूखी झाला असता व त्यांना अश्या कच-याच्या धूतलेल्या गाडीतून घेऊन गेले असते तर अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया असत्या का हा प्रश्न पडतो . थोडी जास्त तसदी घेतली असती किंवा जास्त घडलेल्या घटनेत इनव्हॉलव्हमेंट असती तर मला नाही वाटत कच-याच्या गाडी व्यतिरीक्त त्यांना कोणतीही गाडी मिळाली नसती असे. माणसाच्या संवेदना बोथट होत चाललेल्या आहेत हेच खरे.
  • Log in or register to post comments

सहमत

मराठी_माणूस
गुरुवार, 06/30/2011 - 13:57 नवीन
माणसाच्या संवेदना बोथट होत चाललेल्या आहेत हेच खरे. सहमत . सर्वसामान्यांच्या बाबतीत तर त्या अती बोथट होत चालल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

अहो ज्यांना जिवंतपणी काडीची

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 06/30/2011 - 13:52 नवीन
अहो ज्यांना जिवंतपणी काडीची देखील किंमत मिळत नाही त्यांना मेल्यावर मिळेल असे वाटलेच कसे तुम्हाला ?
  • Log in or register to post comments

माझे मत वेगळे

रणजित चितळे
गुरुवार, 06/30/2011 - 14:03 नवीन
सैन्या मध्ये अशा गोष्टींचा फार प्रभाव पडतो. एक सैनीक बघत असतो आपल्या साथीदाराचे काय होते मेल्यावर. सैन्यात अशा गोष्टी साठी पैशाची तरतूद केलेली असते व सैन्य प्रशासन पण पुर्ण मदत करते. हुतात्म्याला त्याचा मान मिळालाच पाहीजे. म्हणूनच अशा गोष्टीचे वाईट वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

कचर्‍याची गाडी

एक तारा
गुरुवार, 06/30/2011 - 14:14 नवीन
हि माझी पहिली प्रतीक्रिया आहे. चुकिचे वाटल्यास क्षमस्व. ती गाडी कचर्‍याची होती हे मीडीयाला सांगायची काय गरज होती. ज्याने कोणी हे सांगीतले त्याचा हेतु काय होता?
  • Log in or register to post comments

कच-याची गाडी

रणजित चितळे
गुरुवार, 06/30/2011 - 14:27 नवीन
ती गाडी कच-याची आहे ही शंका बघितल्यावर आली असणार (धुतली की झाले म्हणा-यांसाठी). मग मिडीयाने विचारणा केली असेल. अशा गोष्टी लपू शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक तारा

सहमत आहे. ज्यांना ज्यांना हे

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 06/30/2011 - 15:15 नवीन
सहमत आहे. ज्यांना ज्यांना हे योग्य वाटत असेल त्यांनी हा विचार करावा की त्यांचा कोणी आप्तेष्ट निवर्तला आणि त्या वेळेला शववाहीनी उपलब्ध नसेल तर त्या वेळेला हे लोक स्वतः खाजगी (मित्राची किंवा स्वतःची, नात्यामधल्या एखाद्याची मोठी गाडी) वाहन मिळवतील? जर त्यांना त्यासाठी कचर्‍याची धुतलेली गाडी चालणार असेल तर ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रणजित चितळे

मी हाच विचार

एक तारा
गुरुवार, 06/30/2011 - 15:27 नवीन
पहिले केला. पण उत्तर आले कि जर माझा नाते॑वाईक एखाद्या दुर्गम भागात असेल आणि जर त्याला आणायला दुसरी कोणतीच गाडी उपलब्ध नसेल तर मला ही गाडी चालेल. सन्दर्भ हा कि ही घटना एका दुर्गम भागात घडली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

दुर्गम भागात कचर्‍याच्या

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 06/30/2011 - 15:32 नवीन
दुर्गम भागात कचर्‍याच्या गाड्या इतक्या सहज उपलब्ध (आणि ते सुधा धुवून)होत्या का? आणि हो असेल तर मग दुर्गम भागात एकही अन्य मालवाहू खाजगी गाडी नव्हती का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक तारा

ह्म्म्म

एक तारा
गुरुवार, 06/30/2011 - 15:41 नवीन
Point to be noted... चुकलेच, माझे आणि त्यांचे सुद्धा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

तुम्ही एक तारा का एक आगाउ का

५० फक्त
Fri, 07/01/2011 - 07:53 नवीन
तुम्ही एक तारा का एक आगाउ का एक आगाउ तारा हे निश्चित ठरवा बरं आधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक तारा

ह्याचं आपलं भलतच काहीतरी!

मी ऋचा
Fri, 07/01/2011 - 11:21 नवीन
ह्याचं आपलं भलतच काहीतरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

एक आगाउ तारा

एक तारा
Fri, 07/01/2011 - 11:48 नवीन
जास्त चांगलं वाटतयं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अवांतर - प्रसार माध्यमांची भाषा

सुनील
गुरुवार, 06/30/2011 - 15:12 नवीन
म्हटले तर हे अवांतर आहे पण गोष्ट प्रसार माध्यमांची सुरू आहे म्हणून येथेच देतो. मटातील ही बातमी वाचा. बातमी तशी नेहेमीचीच पण मराठी वृत्तपत्रात आढळणारे खास शब्द आणि वाक्यप्रयोग जसे की, "धनदांडगे" आणि "गाड्या उडवणे" ह्यांना फाटा देऊन चक्क "श्रीमंत" आणि "गाडी चालवणे/वाहन हाकणे" असे अत्यंत सामान्य शब्द वापरले आहेत!
  • Log in or register to post comments

मला तर मटा च्या बातमीतील

श्रीरंग
गुरुवार, 06/30/2011 - 17:35 नवीन
मला तर मटा च्या बातमीतील "फुल-टू" , "रॅश ड्रायव्हिंग", "रेस्टॉरन्ट", हे शब्द प्रचंड खटकले. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

खेदजनक.. हल्लीच्या बाजारु

गणपा
गुरुवार, 06/30/2011 - 15:23 नवीन
खेदजनक.. हल्लीच्या बाजारु मिडियापासुन कसलीच अपेक्षा नाही. नित्य काही ना काही सनसनाटी देण्याचा नादात हे लोक कधी कमरेच सोडुन डोक्याला गुंडाळतील भरवसा नाही. बिकाशी सहमत.
  • Log in or register to post comments

प्रस्तूत उदाहरण

Nile
गुरुवार, 06/30/2011 - 15:35 नवीन
बातमी मी वाचली/पाहिलेली नाही पण ही बातमी काळजी वाटावी अशी भडकावू नक्कीच नाही. वीरगतीला गेलेल्या जवानांचे अत्यंसंस्कार विशेष इतमामाने होत असतात आणि ते योग्यच आहे. कचर्‍याच्या गाडीतून जर देह नेले असतील तर ती घोडचूक आहे, जबाबदार व्यक्तींना इथे धारेवर धरण्यात काहीही चूक नाही. बातमीतील शब्द योग्य वापरून धार तशीच ठेवता येते हे मात्र मला मान्य आहे. पण शहिदांचा अपमान झाला नाही असे पटवून देणे या उदाहरणात फार अवघड वाटते.
  • Log in or register to post comments

हिंदी न्युज बद्दल बोलणे म्हणजे गटारात दगड मारुन

वेताळ
गुरुवार, 06/30/2011 - 17:06 नवीन
अंगावर घाण उडवुन घेण्याचा प्रकार आहे. तरी देखिल ,शववाहिका उपलब्द नसती तर मृतदेह बैलगाडीतुन देखिल नेता आले असते. कचर्‍याची गाडी वापरणे हे एकदम अयोग्य आहे. सदर अधिकारी भात मिळाला नाही तर शेण खातील का?
  • Log in or register to post comments

+१

गवि
गुरुवार, 06/30/2011 - 17:41 नवीन
+१ अगदी अगदी.. मृतदेह कचर्‍याच्या गाडीतून नेणे हे अत्यंत गलिच्छ वर्तन आहे. मृत देहच ते. वाट पाहू शकत होते थोडी. काही इमर्जन्सी तर नव्हती. अगदी शहरगावापासून एखादी गाडी तिथे पोचेपर्यंत धीर धरणं अशक्य होतं असं पटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

प्रसारमाध्यमे अधिक चवचाल की

नगरीनिरंजन
गुरुवार, 06/30/2011 - 18:01 नवीन
प्रसारमाध्यमे अधिक चवचाल की सरकारी यंत्रणा अधिक मुर्दाड असा इथे प्रश्न आहे. दोन्हीत कमीजास्त ठरवणे अवघड आहे. शहीदांची प्रेते न्यायला कचरागाडी धुऊन चालत असेल तर इतरही बर्‍याच गोष्टी चालल्या पाहिजेत. अनेक उदाहरणे सुचताहेत पण असो. बाकी बर्‍याच दिवसात पेपरात 'अक्षम्य' हा अत्यंत विनोदी शब्द वाचला नाही. सरकारची अक्षम्य हलगर्जी मंत्र्यांचा अक्षम्य भ्रष्टाचार पोलिसांची अक्षम्य मग्रूरी वगैरे वाक्यं वाचून छान करमणूक होते.
  • Log in or register to post comments

कोणाला फुरसत आहे बरे?

गंगाधर मुटे
गुरुवार, 06/30/2011 - 18:40 नवीन
जाऊ द्याहो नितीनजी, काही फारसं मनाला लावून घेऊ नका. तसं म्हणाल तर यापेक्षाही गलिच्छ वर्तणूक अधिकार्‍यांनी केली असती किंवा यापेक्षाही भडकाऊ निवेदन प्रसारमाध्यमाने केले असते तरी कोणीही भडकले नसते. शहिद झालेले जवान ना एका जातीचे होते, ना एका धर्माचे होते, ना एखाद्या पक्षाचे होते. त्यांच्या विषयी भडकून क्षोभ व्यक्त करण्यासाठी कोण कशाला रस्त्यावर उतरेल? या धावपळीच्या भाऊगर्दीत कोणाला फुरसत आहे बरे?
  • Log in or register to post comments

सहमत

तिमा
गुरुवार, 06/30/2011 - 19:14 नवीन
कचर्‍याची गाडी स्वच्छ होते असे वाटते त्यांनी त्याच्यातून खाण्याचे पदार्थ नेऊन दाखवावेत.
  • Log in or register to post comments

अश्या प्रकारची चॅनल्स आम्ही

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 06/30/2011 - 22:44 नवीन
अश्या प्रकारची चॅनल्स आम्ही टीव्ह वर ब्लॉक करुन ठेवतो. जेणेकरुन आपण टीव्ही विकत का घेतला असा प्रश्न पडुन नये!
  • Log in or register to post comments

दूरदर्शनच चांगलं

रेवती
गुरुवार, 06/30/2011 - 23:22 नवीन
दूरदर्शनच चांगलं होतं. लोकांनाही ना अतोनात माहिती देवूच नये. काहीतरी वाद घालत बसतात.
  • Log in or register to post comments

इतर

विकास
Fri, 07/01/2011 - 00:32 नवीन
दूरदर्शनच चांगलं होतं. हल्ली दूरदर्शन पेक्षा (इतर वाहीन्यांमार्फत) दुर्दर्शन जास्त असते. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

२४ तास कानी-कपाळी सांगणार तरी काय?

सुधीर काळे
Mon, 07/04/2011 - 00:03 नवीन
हल्ली भारतीय मीडियासुद्धा पाश्चात्य मीडियाचे अनुकरण करत आहे म्हणून असे होते असे वाटते. २४ तास बातम्या देणार्‍या वाहिन्या बंद करायला हव्यात. २४ तास कानी-कपाळी त्या सांगणार तरी काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा