Skip to main content

...... नेहमीसारखा...

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 30/06/2011 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
आवडायला लागलाय मला आता तो कर्नकर्कश्य गोंगाट... कारण विसरायला लावतो तो मला स्वतःला... कुठेतरी त्या गोंगाटात दाबले जातात माझे हुंदके... एवढे कि स्वतःचेच स्वतःला ऐकू येत नाहीत... एकटेपणा खायला उठतो... एकटा असलो कि भूतकाळाच्या आठवणी फेर धरून नाचू लागतात भोवती.. जशी गिधाड घिरट्या घालतात आभाळात... वाट पहात कि कधी होतोय लाचार... मग तोडतात लचके... त्या वेळी मग मुठीत निखारे दाबून, गुढग्यात डोकं खुपसून बसतो...नेहमीसारखा... जगायलाच विसरलोय आता.. आता तर मला पावसाचीसुद्धा भीती वाटायला लागलीय... सरीबरोबर त्याच्या कोसळतात तुझ्या आठवणी अंगावर... त्या वेळी डोळे झाकून चिंब भिजण्याचा प्रयत्नही मी करतो... पण... पण शेवटी कोरडाच राहतो... नेहमीसारखा... माहिती आहे कि खूप दूर आलोय, इच्छा नसतानासुद्धा, पळतोय स्वतःपासून, दूर... पण विसरून देत नाही मागे उरलेल्या पाउल खुणा.. ज्या कितीही प्रयत्न केल्या तरी पुसल्या जात नाहीत... रात्रीच्या अंधारात दिसतात रोखलेले तुझे ते दोन डोळे... कितीही प्रयत्न करून, नाही लपू शकत त्याच्यापासून... नेहमीसारखा...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1534
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

मस्तच. आहेस कुठे तू रे?

In reply to by गणेशा

खरतर हि कविता म्हणून मला प्रकाशित करायची होती, पण चुकून "जनातलं, मनातलं" मध्ये टाकला गेला...

मस्त

>>>माहिती आहे कि खूप दूर आलोय, इच्छा नसतानासुद्धा, पळतोय स्वतःपासून, दूर... 'करावे तसे भरावे' असा अभिप्राय देणार होतो,,,,,,, पण 'नव्या लेखकांना प्रोत्साहन द्या', असं मालकांचं आवाहन आहे म्हणून... पुलेशु.....