आवडायला लागलाय मला आता तो कर्नकर्कश्य गोंगाट... कारण विसरायला लावतो तो मला स्वतःला...
कुठेतरी त्या गोंगाटात दाबले जातात माझे हुंदके... एवढे कि स्वतःचेच स्वतःला ऐकू येत नाहीत...
एकटेपणा खायला उठतो... एकटा असलो कि भूतकाळाच्या आठवणी फेर धरून नाचू लागतात भोवती..
जशी गिधाड घिरट्या घालतात आभाळात... वाट पहात कि कधी होतोय लाचार... मग तोडतात लचके...
त्या वेळी मग मुठीत निखारे दाबून, गुढग्यात डोकं खुपसून बसतो...नेहमीसारखा...
जगायलाच विसरलोय आता..
आता तर मला पावसाचीसुद्धा भीती वाटायला लागलीय...
सरीबरोबर त्याच्या कोसळतात तुझ्या आठवणी अंगावर...
त्या वेळी डोळे झाकून चिंब भिजण्याचा प्रयत्नही मी करतो...
पण... पण शेवटी कोरडाच राहतो... नेहमीसारखा...
माहिती आहे कि खूप दूर आलोय, इच्छा नसतानासुद्धा, पळतोय स्वतःपासून, दूर...
पण विसरून देत नाही मागे उरलेल्या पाउल खुणा..
ज्या कितीही प्रयत्न केल्या तरी पुसल्या जात नाहीत...
रात्रीच्या अंधारात दिसतात रोखलेले तुझे ते दोन डोळे...
कितीही प्रयत्न करून, नाही लपू शकत त्याच्यापासून... नेहमीसारखा...
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा
मस्तच.
आहेस कुठे तू रे?
अप्रतिम लिहिले आहे. ..
अप्रतिम लिहिले आहे.
.. 'पाउलखुणा' हे नाव हि समर्पक वाटते आहे ना यासाठी ?
खरतर...
In reply to अप्रतिम लिहिले आहे. .. by गणेशा
खरतर हि कविता म्हणून मला प्रकाशित करायची होती, पण चुकून "जनातलं, मनातलं" मध्ये टाकला गेला...
छान
मस्त
हं!!!!
>>>माहिती आहे कि खूप दूर आलोय, इच्छा नसतानासुद्धा, पळतोय स्वतःपासून, दूर...
'करावे तसे भरावे' असा अभिप्राय देणार होतो,,,,,,,
पण 'नव्या लेखकांना प्रोत्साहन द्या', असं मालकांचं आवाहन आहे म्हणून...
पुलेशु.....