
जून महिना तेच छान पावसाचे दिवस आणि शाळेची खरेदी. दरवर्षीची जून महिन्याची अगदी ठरलेली सुरुवात आहे. अगदी आपल्या लहान पणा पासून. गणवेश, वह्या, पुस्तकं, बूट मोजे , कंपास पेटी या सगळ्या ठरलेल्या पदार्थांची खरेदी. कधी कधी याच सामना बरोबर रंग पेटी सुद्धा- बाबांचे बजेट असेल तर नाई तर सप्टेंबर चे आश्वासन घेऊन शांत व्हायचे. रंग पेटी वा अन्य एखाद्या मागणीवर शांत करायला आणखी छान उपाय वापरला जायचा तो कंपास पेटीच्या brand चा. कॅम्लिन ची कंपास पेटी घेऊ या. असे म्हणता क्षणी बाकीच्या मागण्या विरघळून जायच्या. कॅम्लिन ची पेटी तुलनेने इतर पेट्यापेक्षा महाग असायची, त्यामुळे सुरुवात दुस-या कोणत्यातरी पेटीच्या खरेदीने व्हायची. पण कॅम्लिन ची कंपास पेटी हे एक पदक असायचे . त्यामुळे शाळेत ती एक पदक म्हणूनच मिरावायचो. कॅम्लिनचा शालेय जीवना पासुनच मनावर एक खोलवर एक ठसा उमटुन गेलाय. तो कॅम्लिनच्याच खोडरबरने अशात:ही न पुसला जाण्यासारखा आहे. आता बाप झाल्यावर मुलांच्या शाळेच्या चर्चा करताना , त्यांच्या शालेय सामानाची खरेदी करताना साहजिकच पिवळ्या रंगावर केशरी पट्टा असलेल्या आणि उंटाचे चिन्ह असणाऱ्या कंपास पेटी कडेच वळायला होतं. आणखी एका कारणांनी कॅम्लिन हे पदक गेल्या काही वर्षापासू वाटायला लागलं होतं. कॅम्लिन उद्योग समूह म्हणून. एक उद्योजक म्हणुन मला स्वत:ला कॅम्लिन कडे बघताना अभिमान वाटायचा. अभिमान विशेषत: याचा की कॅम्लिन हा एक मराठी उद्योग समूह आहे . सुरुवातीच्या कालावधी मध्येच नव्हे तर स्थिरस्थावर झाल्यावरही मलाच काय सगळ्याच उद्योजकांना काही ना काही समर प्रसंगाना सामोरं जावं लागतं. या प्रसंगातून फक्त आणि फक्त स्वत:लाच मार्ग काढावा लागतो. अशावेळी काही उद्योगांचा जवळून केलेला अभ्यास उपयोगी पडतो. त्यामुळे case studies म्हणुन अभ्यास्याला कॅम्लिन वा किर्लोस्कर यांच्या सारखे उद्योग समूह अधिक जवळचे - मराठी म्हणुन. काकासाहेब दांडेकरांनी पोटापाण्यासाठी १९३१ साली सुमारे ऐशी वर्ष पुर्वी गिरगावातल्या एका चाळीत शाई बनवून विकण्याचा उद्योग चालू केला. त्यांच्या बरोबर त्यांचे भाऊ नानासाहेब दांडेकर ही होते. कॅम्लिन हा ब्रांड जन्माला आला १९९४५ साली. त्या नंतर हा व्यवसाय सतत वाढत गेला. दांडेकरांच्या तीन पिढ्यांनी या व्यवसायाचा भार बऱ्यापैकी यशस्वीपणे पेलला होता. देशभरातल्या सहा कारखान्यांमार्फत त्यांची आगे कूच चालु होती. पण आता कॅम्लिनला जागतिकीकरणाच्या रेट्यात होणारे सोस कदाचित झेपत नसतील. विशेषत: मला कॅम्लिनची संशोधनाची बाजु कमकुवत वाटते. आज स्पर्धा जीवघेणी आहे. वर्षानुवर्षे संशोधन करून बाजारात आणलेल्या उत्पादनाचे बाजारातले आयुष्य एखादे वर्ष किंवा अगदी काही महिनेच असू शकते. त्यामुळे उद्योग जिवंत ठेवण्यासाठी अन्य उत्पादने वा बाजारातून नामशेष होणाऱ्या उत्पादनाची पुढची आवृत्ती लगेच वाजत गाजत उतरवावी लागते. किंबहुना आपले आजचेच उत्पादन उद्या आपल्या एका सुधारीत उत्पादनाने नामशेष करावे लागते. आपल्याकडून जर ही खबरदारी घेतली गेली नाही तर स्पर्धक त्याच्या खेळीनी आपले उत्पादन मारायला तयार असतोच. जशी ही प्रत्यक्ष्य स्पर्धेची तलवार सतत उत्पादकांच्या मानेवर असते तशी एक आणखी भीषण स्पर्धा हल्ली उत्पादकांना सतावत असते. ही स्पर्धा म्हणजे अंधारातली लढाई असते. समोर कोण असेल कशामुळे आणि कुठून घाव बसेल हे सांगताही येत नाही. उदाहरणार्थ सकाळी आपल्याला उठवणाऱ्या गजराची घड्याळे घ्या. एका घड्याळे बनविणाऱ्या 'अ' उत्पादकाने घड्याळेच बनविणाऱ्या "ब" उत्पादकाच्या घड्याळाहून वरचढ गुणवत्तेची घड्याळे सतत बाजारात आणण्यासाठी खूप परिश्रम घेतले , पैसा खर्च केला तर "अ" घड्याळे ज्यास्त विकली जातील ही साधीसरळ प्रत्यक्ष स्पर्धा झाली. आता भीती अशा प्रत्यक्ष स्पर्धेची नाही. आज गजर लावायला घड्याळाकडे जातो कोण? आपण गजर mobile वर लावतो ना! आपल्याला स्पर्धक म्हणुन बाजारात mobile फोन वापरले जातील याची कल्पनाही घड्याळ उत्पादकांना आली नसेल. कॅमेराचे ही तसेच. जगात सगळ्यात ज्यास्त कॅमेरे mobile उत्पादक बनवितात !!!! लिखाणाच्या , स्टेशनरीच्या बाजारात अशीच भीषण स्पर्धा आहे आणि आता ती जागतिक स्तरावर आहे. या स्पर्धेमध्ये टिकाव लागण्यासाठी प्रचंड भांडवलाची ही आवश्यकता असते आणि त्याही पेक्ष्या अधिक प्रमाणात लागते ती टिकून राहण्याची विजीगिषु वृत्ती आणि प्रचंड हिम्मत. या तीनही बाबतीत कॅम्लिनने हार मानली हे मराठी उद्योगाचे दुर्दैव आहे. आणि त्यामुळे आपल्या लाडक्या कॅम्लिनचा बळी गेला असेल. कॅम्लिन ही कंपनी जपानच्या कोकुयो कंपनीला मे महिन्याच्या अखेरीस विकली गेली. एक सामान्य मराठी नागरिक म्हणुन ही बाब धक्कादायक आहे आणि एक उद्योजक म्हणुन मला खंतावणारी आहे. युरोप, अमेरिकेतल्या कित्येक कंपन्या शंभर वर्षे जुनी कंपनी, दीडशे वर्षे जुनी कंपनी अशी बिरुदावली छातीवर मिरवतात. आणि हजारो, लाखो कोटींची उलाढाल करतात. मोटारींपासून कोक पर्यंत अगदी जॉकीची अंतर्वस्त्रे बनविणाऱ्या कंपनी पर्यंत कित्येक उद्योग शंभराहून अधिक वर्षे जुने आहेत. उलाढालीमध्ये जरी नसेल पण वय आणि ब्रांड या दोनहीच्या स्पर्धेत कॅम्लिनसारखी एखादी जुनी कंपनी मराठी झेंडा हातात घेवून उभी असावी असे मनोमन वाटत असताना मध्येच त्यांनी आपले हात पाय गाळुन बसावे हे क्लेशदाईच आहे. पण कॅम्लिनवाले म्हणतील की कंपनी आमची, उत्पादने आमची आम्ही काय करायचे ते आमचे आम्ही ठरवू ना! बाकीच्यांनी वैयक्तिक मामल्यात लुडबुड करायचे काही कारण नाही. हेही खरच म्हणा. कायद्याने आम्हाला त्यांच्या निर्णयावर भाष्य करण्याचाअधिकार नाही .पण माणसाच्या आयुष्यात फक्त कायदाच नसतो ना. बालपणीच ज्या ज्या म्हणून कशात आपण गुंततो , ते सगळेच आयुष्य भर आपल्याबरोबर राहते, एक उबदार आठवण म्हणून. आणि प्रचंड भावनिक गुंतवणूक झालेली बाब विरळ वा अदृश्य होणे असह्य होते. जरा संतापजनक बाब आहे ती अशी की एका बाजूला स्वदेशीची कास धरत कॅम्लिन हा उद्योग एका परदेशी कंपनीच्या घशात घातला गेलाय. ज्या जपानी कंपनीला कॅम्लिन शरण गेली ती १०५ वर्षे वयाची जुनी कंपनी आहे. म्हणजे कॅम्लिन पेक्षा सुमारे पंचवीस वर्षे च जुनी. आदरणीय काकासाहेब दांडेकरांनी चाळीमध्ये शाई बनविण्याचा उद्योग सुरु केला तसाच कोकुयो कंपनीचे संस्थापक कुरोडा यांनी अगदी छोट्या स्तरावर त्यांच्या घरामध्ये फाईली बनवायला चालु केल्या होत्या. कॅम्लिन ची उलाढाल आज सुमारे साडेतीनशे कोटी रुपये असेल तर जपानी कोकुयो कंपनीची वार्षिक उलाढाल पंधराशे कोटी रुपये आहे. आज दांडेकर कुटुंबीय जरी चेअरमन आमचाच असेल असे सांगून भारतीयांचे सांत्वन करीत असले तरी त्यांचा वाटा अल्प आहे आणि चेयरमनची अवस्था ही लगान चित्रपटा मध्ये कुलभूषण खरवंदा यांनी रंगविलेल्या "राजा" सारखी असणार का अशी शंका आहे. एका वृत्तपत्राने स्पष्ट लिहिल्याप्रमाणे कोकुयो कंपनी त्यांचा झेब्रा ब्रांड बाजारात आणेल आणि कॅम्लिनचा उंट हळूहळू गायब होईल. काकासाहेबांनी आधी त्यांचे चिन्ह घोडा ठरविले होते असे म्हणत्तात. पण उंट जसा पाणी धरून ठेवतो तशी फौंटन पेन शाई धरून ठेवतो म्हणून कॅमेल ब्रांड हा पुढे आला. त्या पुढे Camel आणि Ink हे शब्द मिसळून त्यांनी Camlin हा ब्रांड तयार झाला. पण आता आगामी पिढ्या या समृद्ध आणि उद्योग समूहाची चर्चा करतील ती फक्त त्या उंटाच्या जीवाश्माच्या…आधारे, कारण काळाच्या ओघात कॅम्लिनचा उंट कदाचित विस्मृतीत गेला असेल.
sudhirmutalik@gmail.com
प्रतिक्रिया
हम्म
अगदी मनातल्या आठवणी जाग्या
शाळेत बक्षिसम्हणून मिळालेली
भावनेच्या आहारी जाऊन लिहीलेला
मूळ लेख आणि प्रतिसाद !!
In reply to भावनेच्या आहारी जाऊन लिहीलेला by जयंत कुलकर्णी
भावनेच्या आधारावर मूळ लेख
In reply to मूळ लेख आणि प्रतिसाद !! by अर्धवटराव
+३
In reply to भावनेच्या आधारावर मूळ लेख by भडकमकर मास्तर
+४
In reply to +३ by सहज
१+
In reply to भावनेच्या आहारी जाऊन लिहीलेला by जयंत कुलकर्णी
छान...
In reply to भावनेच्या आहारी जाऊन लिहीलेला by जयंत कुलकर्णी
जयंत साहेब
In reply to भावनेच्या आहारी जाऊन लिहीलेला by जयंत कुलकर्णी
जयंत साहेब
In reply to भावनेच्या आहारी जाऊन लिहीलेला by जयंत कुलकर्णी
सुंदर लेख.. जुन्या आठवणी
जुन्या आठवणी
In reply to सुंदर लेख.. जुन्या आठवणी by गणेशा
झाकणात असलेल्या कागदावर बारीक
हां
In reply to झाकणात असलेल्या कागदावर बारीक by जयंत कुलकर्णी
अरेरे!
लेख आणि प्रतिसाद दोन्ही
‘उंटा’ची नवी ‘वाट-चाल’
छान लेख आणि मस्त प्रतिसाद.
+१ असेच म्हणतो.
In reply to छान लेख आणि मस्त प्रतिसाद. by ५० फक्त
छान लेख
भावपूर्ण लेख आणि मस्त चर्चा!
लेख आणि प्रतिसाद दोन्हीही
मूळ लेख छान व कुलकर्णींचा
दांडेकरांनी योग्य तेच केले...
+१
In reply to दांडेकरांनी योग्य तेच केले... by योगप्रभू