✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मजेशीर नावे

म
मनस्वी यांनी
Fri, 03/14/2008 - 12:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
41011 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

ध
धमाल मुलगा Mon, 03/17/2008 - 16:41 नवीन

मा॑ की किरकिरी...

क्या विजुभाऊ, तुमी अपने सलीम फेकू को तो भुलीच गये. ऐसा नक्को होना भाई ! और शरद का॑डी, दिन्या सॅटेलाईट, जगन भु॑डा इनका नाम नै आया तो गॅन्ग का रेप्युस्टेशन तो एकदम खल्लास. क्या...????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 03/18/2008 - 02:49 नवीन

टेक्सास गायकवाड

टेक्सास गायकवाड या नावाचे एक विद्रोही साहीत्यकार आहेत. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 03/18/2008 - 04:40 नवीन

तिकाराम गोटेफोडे ...

आमच्या घरासमोरच राहतात. आमच्या शाळेत मी जोईजोडे आणि डोकेफोडे आडनावाची मुले होती.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Tue, 03/18/2008 - 05:09 नवीन

तिकाराम गोटेफोडे

आमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहतात. सहाजिकच त्यांनी नावाची पाटी दरवाजावर लावलेली नाही.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 03/18/2008 - 08:01 नवीन

मी लहानपणी वाचलेली काही नावे

गोकुळ बोकेफोड वादूमल आलूमल झमटानी उम्मेदमल टहिलरामानी चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 03/18/2008 - 10:52 नवीन

सुंदरी आज्जी

आम्ही लहान असताना वाड्यात आमच्या वर रहायच्या. आम्ही त्यांना सुंद्री आज्जी म्हणायचो. लहानपणी काही कळत नसतं नावांना अर्थ वगैरे असतात. सुंद्री आज्जी अन्नपुर्णा होत्या. मनस्वी
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Wed, 03/19/2008 - 11:52 नवीन

गुपचुप

गुपचुप हे आडनाव असत. माझ्या एका मित्राच्या फ्लॅट समोर ह्याच आडनावाचे रहात होते. आणि माझ्या मित्राच इब्लिस पोरटं त्याच्या फ्लेट्ला हळुच जावुन कडी घालत असे. त्यावर माझा मित्र मला सांगत होता. की हा त्या गुपचुप च्या फ्लॅट ला गुपचुप जावुन कडी घालतो :)
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Wed, 03/19/2008 - 22:52 नवीन

तुफानीराम नेबूलाल

गंगाराम बिन गंगाराम लौटन हलबल ही उत्तर भारतीय नावे. विसरलोच होतो की. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
प
प्रा सुरेश खेडकर गुरुवार, 03/20/2008 - 20:21 नवीन

ड्राइव्हर.

नागपूरची एम्प्रेस मिल (स्थापना १८७४, पण आता संपूर्ण मोडित)म्हणजे टाटा उद्योगसमुहाचे पहिले अपत्य.मी तिथे काम करीत असतांना एकदा कामगारांचा संप झाला तेव्हा पोलिस अधिकारी आले होते.फोन समोर करून मी त्यांना म्हणालो,"जरा ड्राइव्हरसाहबसे बात किजिए." त्यावर चिडून ते म्हणाले," Why should I talk to a driver,I shall talk to the Manager." ह्यावर हंसू आवरित मी म्हटले "Sir, Mr. Driver is the Manager." पारशी लोकांमध्ये अशीच नावे असतात उदा.बाटलीवाला.
  • Log in or register to post comments
स
सभ्य इसम गुरुवार, 03/20/2008 - 21:27 नवीन

वाला वाली आडनावं....

बॉक्सवाला,बाटलीवाला,दारुवाला,झुनझुनवाला, मावावाला,बर्फीवाला.....आणि बरेच वाले... मिथुनचं एक गाणं पण ऐकलं आहे लहानपणी...आ गया आ गया हलवावाला आ गया.... मोहित्यांचा केतन...
  • Log in or register to post comments
भ
भोचक Fri, 03/21/2008 - 17:59 नवीन

घासकवळी

नाशिकला एके ठिकाणी शाकद्विपी आडनावाचा बोर्ड पाहिलाय. घासकवळी नावाचे एक स्थळ माझ्या बहिणीसाठी सांगून आले होते. आडनाव पाहूनच आम्ही नकार दिला. इकडे मध्य प्रदेशात आडनावांचा वेगळाच झमेला झालाय. काही अक्षरे हिंदीत नसल्यामुळे अनेकांची आडनावे बदलून गेलीत. उदा. धडफळे- धरफले, केळकर- केलकर. ज्यांच्या नावात ळ आहे त्याचा ल झाला. त्याचा फटकाही काहींना इतका बसला की त्यांनी आडनावे बदलली. उदा. वाळवडे नावाच्या आणि तशा प्रकारच्या आडनावे असणार्‍यांनी अखेर आपली आडनावे बदलली, अशी मौलिक माहिती इंदूरच्या एका बुजूर्ग मित्राने दिली. तसेच काही भागात मूळ मराठी आडनावे उडाली आणि ते ज्या गावात राहिले ती आडनावे आली. झाशीवाले, घडवईवाले आदी.
  • Log in or register to post comments
प
पक्या गुरुवार, 06/05/2008 - 08:38 नवीन

एका

एका मित्राच्या परिचितांच्या मुलीचे नाव विनंती आणि मुलाचे नाव विशेष. ऑफीस मधील एकाचे नाव जयगोबीराम. त्याला सगळे गोबी म्हणतात. एका ओळ्खीतल्या मुलीचे नाव धारा (त्यापेक्षा राधा बरे.) असेच अजून एका मुलाचे नाव ओनील लिमये. (ओनील नावाचा क्रिकेटवीर होता आणि वडील क्रिकेट चे फॅन म्हणुन हे नाव ठेवले) मजेशीर आडनावे: बुचके , बुचडे , भुतडा, मुंदडा , भोंगळे , बारसोडे , डुंबरे (डुंब- रे) कॉलेज मध्ये एक मुलगि होती तिचे नावः प्रतिमा नागवडे एका गांधी नावाच्या मित्राचे नुकतेच लग्न झाले. बायकोचे नाव काय असावे ? सोनिया. लग्नाआधी त्या मुलीला कधीही वाटले नसेल आपण सोनिया गांधी होऊ.
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 06/05/2008 - 05:26 नवीन

चक्रेश्वरी.

चक्रेश्वरी असे वर्गातील एका मुलीचे नाव होते, आणि आम्ही असा अ॑दाज बा॑धला की ती चक्रात जन्माला आलेली असल्याने चक्रेश्वरी. माझ्या मैत्रीनी ने तीला पहायला आलेल्या मुलाचे नाव बबन होते म्हणुन ते स्थळ नाकारले.
  • Log in or register to post comments
र
रम्या गुरुवार, 06/05/2008 - 12:16 नवीन

माझ्या

माझ्या भावाच्या ऑफिसमध्ये दोन गृहस्थ आहेत. एकाचं आडनाव नाग आणि दुसर्‍याचं गरूड. :D मारूति चितमपल्लींच्या रानवाटा या पुस्ताकातील माहीती. त्यांनी पाहिलेल्या तीन फासेपारध्यांची नावं होती, कायदेमंत्री, महागाई आणि वॅटरीलाल!! माझ्या एका मित्राचं नाव होतं विजय डोईफोडे. त्याला एकजण विडो म्हणून हाक मारायचा !! रम्या
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा गुरुवार, 06/05/2008 - 14:01 नवीन

माझ्या

माझ्या ओळखीत एक नाव "विभास" पण त्याला अर्थ विचारला तर माहीत नाही. (संस्कॄत मधे विभास म्हणजे घुबड) एक मराठी घरातील मुलाचे नाव्===जैश ( :W ) आमच्या गावातील आडनाव - दिसले (काय?) भुरके भाडभोके :( "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
र
रिमझिम गुरुवार, 06/05/2008 - 14:23 नवीन

माझ्या

वर्गातील एका मुलाचे आडनाव 'भुते' होते बिचारा नेहमी आडनाव सागायचे टाळायचा
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 06/05/2008 - 14:34 नवीन

पीटर दयानंद बारसे

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments
ग
गिरिजा गुरुवार, 06/05/2008 - 14:41 नवीन

जयंती गान्धी

एका मित्राच्या मैत्रिणिच नाव होत.. जयंती (आडनाव माहित नाही) पण तेव्हा मनात आलेल कि एखाद्या गांधी कुटुंबाने मुलीच नाव ठेवल हे.. तर काय धमाल! "आडनाव नाव" या प्रथेप्रमाणे.. गान्धी जयंती!!!! :S -- गिरिजा.. लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग -----------------------
  • Log in or register to post comments
म
मन गुरुवार, 06/05/2008 - 14:58 नवीन

माझा एक सहकारी

होता एम पी वाला; त्याचं नाव विनायक म्हणताना तो बिनायक म्हणायच आणि त्याला बोलावताना आम्ही नुसतएच "बिन" किम्वा "बिनु" म्हणायचो. मग त्याल "डोके" आडनाव असलेल्या मुलीवरुन चिडवु लागलो. झाला मग तो:- बिन्-डोके किंवा बिन्-डोक आपलाच, मनोबा
  • Log in or register to post comments
ऋ
ऋचा गुरुवार, 06/05/2008 - 15:00 नवीन

आमच्या

आमच्या वर्गात एक मुलगा होता त्याच आडनाव होत "गांडेकर" =)) मग त्याच्या वडीलांनी तो ९ वीत असताना आडनाव बदलून पालकर केलं. "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments
अ
अनन्त जोशि Mon, 06/30/2008 - 23:24 नवीन

स्कायलॅब आणि सॅम्पल....

मित्रानो... माझ्या आजोळी ....जवळपास १९७८ सालची गोश्ट...स्कायलॅब कोसळनार होती...तेव्हा...शेवटी रेडिओवर बातमि...."स्कायलॅब समुद्रात कोसळली"आणि त्याच दिवशी मावशिला मुलगा झाला..नाव ....."स्कायलॅब" अजून एक नाव्.......आमच्या होस्टेलच्या वाचमनच्या मुलाचे.....सॅम्पल....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा