क्या विजुभाऊ, तुमी अपने सलीम फेकू को तो भुलीच गये. ऐसा नक्को होना भाई ! और शरद का॑डी, दिन्या सॅटेलाईट, जगन भु॑डा इनका नाम नै आया तो गॅन्ग का रेप्युस्टेशन तो एकदम खल्लास.
क्या...????
आम्ही लहान असताना वाड्यात आमच्या वर रहायच्या.
आम्ही त्यांना सुंद्री आज्जी म्हणायचो.
लहानपणी काही कळत नसतं नावांना अर्थ वगैरे असतात.
सुंद्री आज्जी अन्नपुर्णा होत्या.
मनस्वी
गुपचुप हे आडनाव असत.
माझ्या एका मित्राच्या फ्लॅट समोर ह्याच आडनावाचे रहात होते.
आणि माझ्या मित्राच इब्लिस पोरटं त्याच्या फ्लेट्ला हळुच जावुन कडी घालत असे.
त्यावर माझा मित्र मला सांगत होता. की हा त्या गुपचुप च्या फ्लॅट ला गुपचुप जावुन कडी घालतो :)
नागपूरची एम्प्रेस मिल (स्थापना १८७४, पण आता संपूर्ण मोडित)म्हणजे टाटा उद्योगसमुहाचे पहिले अपत्य.मी तिथे काम करीत असतांना एकदा कामगारांचा संप झाला तेव्हा पोलिस अधिकारी आले होते.फोन समोर करून मी त्यांना म्हणालो,"जरा ड्राइव्हरसाहबसे बात किजिए." त्यावर चिडून ते म्हणाले," Why should I talk to a driver,I shall talk to the Manager." ह्यावर हंसू आवरित मी म्हटले "Sir, Mr. Driver is the Manager." पारशी लोकांमध्ये अशीच नावे असतात उदा.बाटलीवाला.
बॉक्सवाला,बाटलीवाला,दारुवाला,झुनझुनवाला, मावावाला,बर्फीवाला.....आणि बरेच वाले...
मिथुनचं एक गाणं पण ऐकलं आहे लहानपणी...आ गया आ गया हलवावाला आ गया....
मोहित्यांचा केतन...
नाशिकला एके ठिकाणी शाकद्विपी आडनावाचा बोर्ड पाहिलाय. घासकवळी नावाचे एक स्थळ माझ्या बहिणीसाठी सांगून आले होते. आडनाव पाहूनच आम्ही नकार दिला. इकडे मध्य प्रदेशात आडनावांचा वेगळाच झमेला झालाय. काही अक्षरे हिंदीत नसल्यामुळे अनेकांची आडनावे बदलून गेलीत. उदा. धडफळे- धरफले, केळकर- केलकर. ज्यांच्या नावात ळ आहे त्याचा ल झाला. त्याचा फटकाही काहींना इतका बसला की त्यांनी आडनावे बदलली. उदा. वाळवडे नावाच्या आणि तशा प्रकारच्या आडनावे असणार्यांनी अखेर आपली आडनावे बदलली, अशी मौलिक माहिती इंदूरच्या एका बुजूर्ग मित्राने दिली. तसेच काही भागात मूळ मराठी आडनावे उडाली आणि ते ज्या गावात राहिले ती आडनावे आली. झाशीवाले, घडवईवाले आदी.
एका मित्राच्या परिचितांच्या मुलीचे नाव विनंती आणि मुलाचे नाव विशेष.
ऑफीस मधील एकाचे नाव जयगोबीराम. त्याला सगळे गोबी म्हणतात.
एका ओळ्खीतल्या मुलीचे नाव धारा (त्यापेक्षा राधा बरे.)
असेच अजून एका मुलाचे नाव ओनील लिमये. (ओनील नावाचा क्रिकेटवीर होता आणि वडील क्रिकेट चे फॅन म्हणुन हे नाव ठेवले)
मजेशीर आडनावे: बुचके , बुचडे , भुतडा, मुंदडा , भोंगळे , बारसोडे , डुंबरे (डुंब- रे)
कॉलेज मध्ये एक मुलगि होती तिचे नावः प्रतिमा नागवडे
एका गांधी नावाच्या मित्राचे नुकतेच लग्न झाले. बायकोचे नाव काय असावे ? सोनिया. लग्नाआधी त्या मुलीला कधीही वाटले नसेल आपण सोनिया गांधी होऊ.
चक्रेश्वरी असे वर्गातील एका मुलीचे नाव होते,
आणि आम्ही असा अ॑दाज बा॑धला की ती चक्रात जन्माला आलेली असल्याने चक्रेश्वरी.
माझ्या मैत्रीनी ने तीला पहायला आलेल्या मुलाचे नाव बबन होते म्हणुन ते स्थळ नाकारले.
माझ्या भावाच्या ऑफिसमध्ये दोन गृहस्थ आहेत. एकाचं आडनाव नाग आणि दुसर्याचं गरूड. :D
मारूति चितमपल्लींच्या रानवाटा या पुस्ताकातील माहीती. त्यांनी पाहिलेल्या तीन फासेपारध्यांची नावं होती, कायदेमंत्री, महागाई आणि वॅटरीलाल!!
माझ्या एका मित्राचं नाव होतं विजय डोईफोडे. त्याला एकजण विडो म्हणून हाक मारायचा !!
रम्या
माझ्या ओळखीत एक नाव "विभास"
पण त्याला अर्थ विचारला तर माहीत नाही. (संस्कॄत मधे विभास म्हणजे घुबड)
एक मराठी घरातील मुलाचे नाव्===जैश ( :W )
आमच्या गावातील आडनाव -
दिसले (काय?)
भुरके
भाडभोके :(
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
एका मित्राच्या मैत्रिणिच नाव होत.. जयंती (आडनाव माहित नाही)
पण तेव्हा मनात आलेल कि एखाद्या गांधी कुटुंबाने मुलीच नाव ठेवल हे.. तर काय धमाल!
"आडनाव नाव" या प्रथेप्रमाणे.. गान्धी जयंती!!!! :S
--
गिरिजा..
लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------
होता एम पी वाला; त्याचं नाव विनायक म्हणताना तो बिनायक म्हणायच आणि त्याला बोलावताना आम्ही नुसतएच "बिन"
किम्वा "बिनु" म्हणायचो.
मग त्याल "डोके" आडनाव असलेल्या मुलीवरुन चिडवु लागलो.
झाला मग तो:-
बिन्-डोके किंवा बिन्-डोक
आपलाच,
मनोबा
आमच्या वर्गात एक मुलगा होता त्याच आडनाव होत "गांडेकर" =))
मग त्याच्या वडीलांनी तो ९ वीत असताना आडनाव बदलून पालकर केलं.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
मित्रानो...
माझ्या आजोळी ....जवळपास १९७८ सालची गोश्ट...स्कायलॅब कोसळनार होती...तेव्हा...शेवटी रेडिओवर बातमि...."स्कायलॅब समुद्रात कोसळली"आणि त्याच दिवशी मावशिला मुलगा झाला..नाव ....."स्कायलॅब"
अजून एक नाव्.......आमच्या होस्टेलच्या वाचमनच्या मुलाचे.....सॅम्पल....
प्रतिक्रिया
मा॑ की किरकिरी...
टेक्सास गायकवाड
तिकाराम गोटेफोडे ...
तिकाराम गोटेफोडे
मी लहानपणी वाचलेली काही नावे
सुंदरी आज्जी
गुपचुप
तुफानीराम नेबूलाल
ड्राइव्हर.
वाला वाली आडनावं....
घासकवळी
एका
चक्रेश्वरी.
माझ्या
माझ्या
माझ्या
पीटर दयानंद बारसे
जयंती गान्धी
माझा एक सहकारी
आमच्या
स्कायलॅब आणि सॅम्पल....