✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मजेशीर नावे

म
मनस्वी यांनी
Fri, 03/14/2008 - 12:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
40997 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

त
तात्याकाम जाबाली Fri, 03/14/2008 - 15:20 नवीन

मर्क्युरी पेंडसे! :)

आमच्या नात्यात एक पेंडसे फ्यॅमिली आहे त्यातील एकाचे नांव चक्क 'मर्क्युरी' असे आहे! :) ही माहिती सांगोवांगी किंवा ऐकीव नाही. कारण त्या मर्क्युरी पेंडसेच्या लग्नाची पत्रिका आजही माझ्याकडे आहे त्यात, आमचे येथे श्रीकृपेवरून आमचे सुपुत्र चि मर्क्यूरी असा उल्लेख आहे! या पेंडेसे पतीपत्नींनी आपल्या मुलाला पार्‍याचे नांव का द्यावे, याचे उत्तर मला अद्याप सापडलेले नाही! :) असो, मनस्वी तुझा हा उपक्रम छान आहे. यातून मजेमजेशीर नांवे ऐकायला मिळतील अशी आशा आहे! :) आपला, तात्याकाम जाबाली.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 03/14/2008 - 16:09 नवीन

अल्फा ओमेगा

माझ्या एका colleague चे नाव - अल्फा ओमेगा आधी नुसते डेस्क वरील व्हाइट बोर्डरील नाव वाचून कळलेच नाही मुलगा आहे की मुलगी.. मुलगी होती. मी तिला विचारले तुझ्या भावंडांची नावे बीटा आणि गॅमा आहेत का... नाही म्हणाली.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 03/14/2008 - 16:41 नवीन

एक मस्त किस्स सांगतो ...

मला आमच्या रोजच्या कामासाठी वारंवार "इटाली, जर्मनी, स्वीडन" वरैरे कॉल करावा लागतो... मागच्या आठवड्यात 'इटलीमधील वॅलरियो सालसिनी" नावाच्या व्य्क्तीला कॉल करायचा होता. आता "सालसिनी" हे नाव वाचून माझा एक colleague फार उत्साहित झाला व म्हणाला आधि मी बोलणार ... कारण त्याला वाटले मुलगी आहे... मग काय लावला कॉल, ह्याने जोशात सुरवात केली "हॅलो साल्सिनी , कार्तीक हिअर फ्रॉम अबक इंडिया ....." पलिकडून माणसाचा आवाज आला "हाय कार्तीक , टेल मी ..." ह्यावर आमच्या मित्राचा मूड जाऊन तो मला म्हणला "जाने दे, तू बात कर ...." मग मी आपले हसू आवरत "कार्तीक" बनून "साल्सिनीशी" डिस्कशन केले ..... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 03/14/2008 - 16:49 नवीन

अअम्म्म्म्म्

छोट्या डॉन्या विषयांतर करू नकोस.. मजेशीर नावे सांग. मनस्वी
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 03/14/2008 - 17:53 नवीन

बरं बाई, ठिक आहे ....

आमच्या गावात एक महाशय आहेत की ज्यांना "युद्ध , लढाई " वगैरे मध्ये इंटरेस्ट आहे. म्हणून त्यांनी आपल्या मुलांची नावे अनुक्रमे " रणविजय , संग्राम व ऍलेक्झांडर " अशी ठेवली आहेत ... आता त्याच्या लोकांनी अपभ्रंश अनुक्रमे "ईज्या , मोंट्या व टिंग्या " असा केला आहे .... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
ब
ब्रिटिश टिंग्या Fri, 03/14/2008 - 18:13 नवीन

तद माताय् .......

डॉनभाय आपुनका नाम युज कियेलाय वो साला ऍलेक्झांडरने..... साले का गेम बजा डाल दो..... - छोटा छत्री ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
सन्दीप Fri, 03/14/2008 - 17:00 नवीन

मजेशिर नावे

निव्वल नावेच का फार विचित्र आद्नावे देखिल आस्तात
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 03/14/2008 - 17:28 नवीन

तालतील

तंदीप आदनावे पन तालतील मनस्वी
  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा Fri, 03/14/2008 - 17:41 नवीन

माझ्या

माझ्या मामाच्या मित्राला एक मुलगा आणि दोन मुली त्याच्या नावे - भारत, अमेरिका आणि रशिया. कारण विचारल्यावर सांगतो मुलगा आपला आणि मुली परक्या. राजमुद्रा :)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 03/14/2008 - 18:33 नवीन

मनुका गोडसे

एका परिचित मावशींचे नाव. मनस्वी
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 03/14/2008 - 18:56 नवीन

अजुन काहि चिवित्र

आडनाव कालच एका दवाखान्यात वाचलेली ऍडमीट पेशंटची. कड खराबे बेंबलगे आता नाव प्रणय (केला हा सांगण्याचा एवढा का अट्टाहास :)) प्रणाली (हे ऐकुन मला तर जलप्रणाली तत्सम काहितरी आठवत भुगोलात शिकलेल.) योजना (हा काय मुलीच नाव ठेवण्याजोगा शब्द आहे का?? माणुस कितिही योजनाप्रिय असला तरी. पण नाही एका ठिकाणी मी पाहिलय हे नाव) अवांतर : मला हा धागा पाहुन "गोकुळ" हा आताच्या आठवीच्या पुस्तकात असलेला धडा आठवला. त्यात तो साक्ष द्यायला जाणार असतो. आणि त्याची बरीच पुर्व तयारी करतो. ती करता करताच त्याला कायद्याच्या पुस्तकातील पंचनामा, साक्ष, दफ्तरीनोंद, उलटतपासणी (चु भु द्या घ्या बर्‍याच दिवसापुर्वी वाचल असल्याने हेच ते शब्द असतीलच अस नाही) हे असले शब्द आवडु लागतात. कारण त्याच्या मते ते भारदस्त असतात. तो लग्गेच ठरवुन टाकतो की त्याच्या मुला मुलींची नाव तो अशीच ठेवणार अस.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 03/14/2008 - 19:02 नवीन

योजना...

बहुतेक "पंचवार्षिक योजने"नंतर झालेली मुलगी असावी... मनस्वी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
ग
गीतांजली Fri, 03/14/2008 - 18:57 नवीन

मि.पा. च्या

मि.पा. च्या सदस्यांची नावं काही कमी मजेशीर नाहीत हं..... आमच्या शाळेत दोन अत्रे बाई होत्या. कुमारी अत्रे आणि सौ. अत्रे. आम्ही त्याना कुअ आणि सौअ म्हणत असु. तसेच ३ कुलकर्णी बाई होत्या. त्यांचीही नावं अशीच होती. मकु (मधुरा कुलकर्णी), संकू (संगीताच्या कुलकर्णी) आणि पीकु (पीटी च्या कुलकर्णी)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 03/14/2008 - 23:01 नवीन

इऽऽश्य!! काहीतरीच काय?

मि.पा. च्या सदस्यांची नावं काही कमी मजेशीर नाहीत हं..... कोण म्हणतंय असं? साधी मेली सोप्पी, सरळ, चारचौघांत वापरली जाणारी नांवं आहेत आमची! उगीच बोल लावायचा म्हणजे काय! :))))) वेलकम टू मिसळपाव!!:))) -पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गीतांजली
छ
छोटा डॉन Fri, 03/14/2008 - 23:24 नवीन

हा ना राव ...

"कोण म्हणतंय असं? साधी मेली सोप्पी, सरळ, चारचौघांत वापरली जाणारी नांवं आहेत आमची!" "डांबिसकाकांच्या" म्हणण्याशी सहमत, काय प्रोब्लेम आहे हो आमच्या नावात ? "छोटा डॉन" किती साधे, सोपे, सरळ, सज्जन, सुसंस्कॄत [ याचा सॄलांच्या संस्कॄतशी काहिही देणे घेणे नाही ], सोज्वळ नाव आहे, ऐकले की कसे शांत, पवित्र , समाधानी वाटते [ वाटत नसल्यास तसे वाटवण्याचे आमच्याकडे बरेच मार्ग आहेत ...]. ऊगीच तिच्यायला आम्हाला बदमान करता का ? आता बाकिची नावे म्हणजे "धमु , डांबिसकाका , टिंग्या , इनोबा " ही पण वरच्या सारखीच गोड आहेत .... [ फुकट नाही म्हणून आमच्याशी पंगा घेऊ नका , कसे ??? ] छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
विजुभाऊ Fri, 03/14/2008 - 19:55 नवीन

"देशपांड्या काळे"

एका फासेपरधी मुलाचे नाव "देशपांड्या काळे" असे होते त्या मुलाला नावाचे विचारता तो म्हणाला की त्याची आइ जेल मधे बाळंत झाली.त्यावेळी तीला देशपांडे नावाचे जज्ज नी शिक्षेत सूट दीली होती बाकी फासे पारधी समाजात पिर्‍या , किरलोस्कर्‍या, इंजन्या , बॅटरी, अशी नावे सर्रास असतात
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 03/14/2008 - 20:16 नवीन

आमच्या

आमच्या एका स्नेह्यांच्या मुलाचे नाव अनंत आहे. तर त्याच्या लग्नात त्याने त्याच्या बायकोचे नाव.... 'अनादी' ठेवले... म्हणजे तिचे नाव अनादी अनंत ....... कर असे काहिसे... :)) - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
ट
टिउ Fri, 03/14/2008 - 22:11 नवीन

प्रिंस शिंदे

या नावाची एक व्यक्ती माझ्या परिचयाची आहे!
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 03/14/2008 - 22:25 नवीन

इनोसंट

माझ्या वर्गात एक अफ्रिकेहून आलेला मुलगा होता. त्याचे नाव होते "इनोसंट". एकदा त्याने माझ्या घरी फोन केला आणि मी आहे का म्हणून माझ्या रुममेटला विचारले. मी घरात नव्हतो म्हणून त्याने उत्तर दिले की नाही, मग त्यांच्यात पुढील संवाद झाला: माझा रूममेटः "मे आय नो हु इज कॉलिंग?" वर्गमित्र: " आय ऍम इनोसंट" माझा रूममेटः "ओके, बट व्हॉट इज युअर नेम?" वर्गमित्र: "आय टोल्ड यू आय ऍम इनोसंट" माझा रूममेटः "दॅट्स फाइन, नाउ फर्गेट द फन , जस्ट टेल मी युअर नेम सो दॅट आय कॅन टेल हिम" वर्गमित्र: (वैतागाने), "कान्ट यू अंडरस्टँड? माय नेम इज इनोसंट" माझा रूममेटः "उप्स! आय ऍम सॉरी!" या प्रसंगानंतर मला माझ्या रूममेट कडून जोरजोरात हसत हा किस्सा ऐकायला मिळाला तर "इनोसंट" कडून वैतागून :)) बाकी हा इनोसंट नंतर काम-धंदा शोधताना "नाव सोनूबाई .." सारखाच वागायला लागला.
  • Log in or register to post comments
स
सचिन Fri, 03/14/2008 - 23:06 नवीन

धन्य धन्य !

आमच्या ओळखीतल्या एका कुटुम्बात ६ मुली होत्या. मुलाची वाट पाहिल्यामुळे !! सहावीचे नाव ठेवले : इतीश्री ! मग सातव्यान्दाही मुलगी झाली. नाव ठेवले : प्रगती !!!!!!
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 03/14/2008 - 23:49 नवीन

गावी

अशा बर्‍याच मुली झाल्या की एक उपाय म्हणून मुलीचे नाव "नकोशी" ठेवत. किंवा "अंबु" ह्याचा अर्थ आता इतक्या मुली झाल्या की अंबुन गेलो. ह्याची आठवण झाली. :( हम्म. चला उगीच सिरियस नको व्हायला. एक प्रसिद्ध असे नाव आहे. बहुतेक कोणत्यातरी राजकारणी माणसाचे होते. "पंजाबराव देशमुख" :) अजुन एक "माँटुकसिंग अहलुवालिया" (हे असच आहे ना??) एक मुलगा आमच्या कालेजात होता. त्याच पुर्ण नाव होत "आशेर फिलिप मनपाडळेकर" :) माझ तो आधी आडनावानुसार हिंदु मग नावानुसार मुस्लिम आणि पुर्ण नाव ऐकुन गोंधळलेला चेहरा अस काहिस झाल होत. तो ख्रिस्चन होता. :) एक चांगला दोस्त होता तो माझा कालेजात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन
प
प्राजु Fri, 03/14/2008 - 23:32 नवीन

माझ्या

भावाच्या एका मित्राचं नाव आहे अभिनंदन. त्याने फोन केला . त्याला "हॅलो" ऐवजी डायरेक्ट नाव सांगायची सवय असावी. आमचा संवाद असा झाला.. मी : हॅलो तो : अभिनंदन मी : धन्यवाद, पण कशाबद्दल? तो : ताई ना? मी : हो. तो : अगं, अभिनंदन.. मी : ते ठिक आहे पण अभिनंदन कशाबद्दल? आणि कोण बोलतय?? तो : मी अभिनंदन्...विकी आहे का? मी : अच्छा... एक मिनिट.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
व
वरदा Fri, 03/14/2008 - 23:38 नवीन

बापरे

आमच्या ओळखीतल्या एका कुटुम्बात ६ मुली होत्या. मुलाची वाट पाहिल्यामुळे !! सहावीचे नाव ठेवले : इतीश्री ! मग सातव्यान्दाही मुलगी झाली. नाव ठेवले : प्रगती !!!!!! कसली लोकं असतात.... ह. ह. मु. व. माझ्या ओळखीत एका मुलाचे नाव हिरण्यगर्भ आहे...एवढे मोठे नाव..कशी हाक मारतात कोण जाणे.. बाबांच्या ऑफिस मधे एक प्युन होता त्याचं नाव मँगो कांबळे....त्याच्या वडिलांना हा एकच इंग्रजी शब्द कळला आणि त्यांना वाटलं इंग्रजांना आवडेल...:)))
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 03/15/2008 - 00:26 नवीन

माझ्या ओळखीत एकाचे नाव

'कल्पक' असे आहे. (अवांतर - त्याला मी म्हणालो मागून-पुढून 'कल्पक' आहेस! तर काही दिवस माझ्याशी बोलेनासाच झाला.;) पुण्यात पौड रस्त्याला एका बंगल्याचे नाव आहे 'येना' (अवांतर - तिथून जाताना नाव बघून आत जावेसे वाटले पण नंतर 'मग बघतो तुझ्याकडे' अशी पुढची अदृश्य अक्षरेही दिसली आणि मी विचार बदलला! ह्.घ्या:)) चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अनिता Fri, 03/14/2008 - 23:03 नवीन

येना

माझ्या ओळखीत एक आहे: मदत अग्रवाल अवांतर - पुण्यात पौड रस्त्याला एका बंगल्याचे नाव आहे 'येना' माझ्या माहितीप्रमाणे बंगल्याचे मालक फौजेत होते. ईम्फाळच्या लढईत जपानी सेनेशी लढले. जपानी शेवटचा जवान असेपर्यत लढले, त्या तुकडीचे नाव 'येना' होते. त्याची आटवण म्हणून बंगल्याचे नाव 'येना' अनिता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
च
चतुरंग Mon, 03/17/2008 - 19:08 नवीन

अनिता,

आपल्या माहितीबद्दल धन्यवाद! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिता
क
केशवराव Sat, 03/15/2008 - 01:51 नवीन

घटोत्कच ....!

माझ्या एका मित्राने लग्नाआधीच ठरवीले होते कि, पहीला मुलगाच होणार आणि त्याचे नांव मी घटोत्कच ठेवणार. या मागे त्याचे कारण असे ; ' महाभारतातली कितीतरी नांवे आपण आपल्या मुलांना ठेवतो , मग घटोत्कच काय वाईट ?[ माझा मित्र प्रकृतीने जरा भिमासारखाच आहे म्हणा.] - - - - - - - - - केशवराव .
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Fri, 03/14/2008 - 23:02 नवीन

गुण्यागोविंदाने!

ऐकलेली गोष्ट सांगतो. माझ्या एका मित्राच्या नातेवाईकाचे नाव आहे "गोविंद गुणे" सगळे त्यांना "गुण्यागोविंदाने" असेच हाक मारतात.
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे Mon, 03/17/2008 - 14:32 नवीन

मजेशीर नावे

आमच्या शाळेत (सन्मित्र मन्डळ विद्यामन्दीर्-गोरेगाव) एक "मोघे" नावाचा मुलगा होता-त्याचे वडील पदार्र्थविज्ञानाचे प्रोफेसर होते.त्या २ भावान्ची नावे : अपोलो आणि मर्क्युरी अशी होती ! नावपेक्षा आडनावान्ची मजा जास्त आहे : खानखोजे शौचे (ह्या आडनावाचा माणूस जेवायला बसला असता त्याला बाहेरुन कशी हाक मारणार? चोळले (काय काय?) उदास घायाळ ससाणे वाघमारे तुपे .....असो,, लिस्ट फारच मोठ्ठी आहे.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Tue, 03/18/2008 - 02:42 नवीन

मजेशीर

हगवणे असे पण एक मजेशीर आडणाव आहे. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय सप्रे
ठ
ठणठणपाळ Fri, 03/21/2008 - 10:23 नवीन

आमच्या

आमच्या वर्गात एक 'सुवर्णा हगवणे' नावाची मुलगी होती. कसली श्रीमंत असेल नाही ती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मनस्वी Mon, 03/17/2008 - 14:38 नवीन

ऑफीसमध्ये

ऑफीसमध्ये एका पात्राचे नाव : Sandeep Kizhekakoezhisseri काही बोध झाल्यास मलाही कळवावे. मनस्वी
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 03/17/2008 - 14:39 नवीन

टिंगटिंग, निलीशा इ.

लोकसत्तेत अविनाश बिनीवालेंचे पूर्वी एक सदर यायचे. त्यात त्यांनी नावांबद्दल लिहिताना, मोठ्या मुलीचे नाव शालिनी म्हणून धाकटीचे त्याच्या बरोबर उलटे निलीशा असे एक उदाहरण दिले होते. बाकी, आमच्या हपिसात टिंगटिंग झू म्हणून एक कर्मचारी आहे. 'युअर नेम हॅज अ रिंग इन इट' हा तिच्या नावावर वरचेवर होणारा विनोद आहे. बाकी 'हॅपिनेस' नावाची एक आफ्रिकन मुलगीही ओळखीची होती. बर्‍याचदा नावांचा अर्थ माहीत नसताना केवळ इंग्रजी शब्द म्हणून नाव ठेवलं जातं. 'टूमॉरो' हे नाव असलेल्या आफ्रिकन मुलाचा त्याच शीर्षकाचा चित्रपट दोन-तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 03/17/2008 - 14:45 नवीन

एका

लग्नाच्या पत्रिकेत नवरदेवाचे नाव "म्हातारबा पुंजाजी शिंदे" असे वाचले आहे.
  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा Mon, 03/17/2008 - 14:57 नवीन

आणखी एक!

मी मंगल कार्यालयाच्या बाहेर साईनबोर्ड पाहिला,लग्नातल्या वधू-वर पक्षाकडील आडनावे त्यावर लिहिली होती नावे होती 'तांबडे' आणि 'हिरवे'. बहुतेक वधु म्हणत असावी आधी तांबडी होते आता हिरवी झाले. तशीच एकदा लग्नपत्रिकेवर नावे वाचली होती 'उभे' आणि 'आडवे' राजमुद्रा :)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 03/17/2008 - 15:02 नवीन

लव्हली

जुन्या कंपनीतील सहकारी. सहकारी मुलगी नसून मुलगा होता. मनस्वी
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 03/17/2008 - 15:08 नवीन

पंजाबी

असणार. पंजाब्यांच्या पोरा-पोरींची नावे अन कुत्र्यांची नावे यात बरेच साधर्म्य असते असे अस्मादिकांचे मत आहे. उदा: पप्पी, डॉली, लव्हली ई.ई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
ध
धमाल मुलगा Mon, 03/17/2008 - 15:31 नवीन

ओ उर्दूशास्त्री.....

बाकी सगळी नाव॑ ठीक आहेत... लव्हली बद्दल काय बोलायच॑ नाय हा॑, पैलेच सा॑गून ठेवतोय. आपल॑ एके काळच॑ झाड व्हत॑ ते. - धमालसि॑ग भि॑द्रनवाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
आ
आनंदयात्री Mon, 03/17/2008 - 16:08 नवीन

१२ वाजले वाटते

१२ वाजले वाटते ... तिच्यायला धमाल्या सरकलं ! उगी उगी हं बाळा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मनस्वी Mon, 03/17/2008 - 15:21 नवीन

वर्गातील

वर्गातील एका मुलीचे नाव : विद्युत अवांतर : मी लहान असताना आमच्या वाड्यात एका वस्ताद आणी अगाऊ मुलीचे दात पुढे येउन गाल फुगलेले होते.. तिला आम्ही नाव ठेवलेले : चंबूराव गायतोंडे. अशीच हाक मारायचो आम्ही सगळे तिला.. तिची आज्जी जाम चिडायची. मनस्वी
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 03/17/2008 - 15:37 नवीन

चंबूराव

चंबूराव गायतोंडे.... लय लय भारी !!! विद्युत आमच्या आबा॑च्या मित्राच॑ नाव. त्याला आम्ही विद्युतकाका म्हणतो, आणि म्हणून काकूला बिजलीकाकू :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
ए
एक Tue, 03/18/2008 - 04:55 नवीन

माझ्या वर्गातपण एक

विद्युत होती . आम्ही एकाच बाकावर बसायचो.. इ. २ री तुकडी. ब उगाच डोक्यात काहीच्या काही विचार आणू नका ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
म
मनस्वी Mon, 03/17/2008 - 15:46 नवीन

भारदस्त

काहींना सवय असते भारदस्त नावे ठेवण्याची. आता हर्षवर्धन समजू शकते = आनंद वृद्धिंगत होणे. नाव कसं धष्टपुष्ट दिसलं पाहिजे.. अहो नाव ऐकून माणूस अर्धा गार झाला पाहिजे.. असा काहीजणांचा समज असतो. आमच्या एका परिचिताने सुपुत्राचे नाव ठेवले आहे - राजवर्धन याचा नक्की अर्थ काय? म्हणजे मलाच अर्थ माहित नाही हे सुद्धा शक्य आहे. म्हणजे नावे जरूर ठेवा. पण ती अर्थपूर्ण असावीत, नाही का. अवांतर : या राजवर्धनचे नंतर राजू/राज्या, नानासाहेबांचे नानू, बाळासाहेबांचे बाळू होते ती गोष्ट वेगळी. मनस्वी
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 03/17/2008 - 15:56 नवीन

माझा एक

माझा एक मित्र आमच्या सर्वा॑च्या मते ठार "येडा' आहे. त्याच्या मुलाच॑ नाव काय ठेवल॑ असाव॑? हव्यवाहन म्हणल॑, 'म्हणजे काय रे?' उत्तर: 'कोण जाणे. पण लय भारी वाटत॑य ना?' मी: 'कप्पाळ! लेका त्याला बोलता यायला लागल्यावर नाव विचारल॑ तर बिचारा नाव सा॑गता सा॑गता कोलमडून पडेल एव्हढ॑ भारी वाटत॑य'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
म
मनस्वी Mon, 03/17/2008 - 16:00 नवीन

अजबच दिसतोय

तुमचा मित्र.. भारी वाटतंय म्हणून काय मुलाचंच नाव ठेवायचं?? मनस्वी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Mon, 03/17/2008 - 16:04 नवीन

म्हणून तर ठार येडा म्हणतो...

कुठल्याशा काद॑बरीच्या नायकाच॑ नाव होत॑ म्हणे ते! धन्य ते लेखक, आणि धन्य तो आमचा सखाराम गटणे. -ध मा ल.(सरळ साधा..हाप-म्याड)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
स
स्वाती दिनेश Mon, 03/17/2008 - 16:01 नवीन

धमाल नावे..

माझ्या एका विद्यार्थिनीचे असेच एक असेच गमतीदार नाव लक्षात आहे...कु.कोकिळा पोपट मगर. तर एकीचे नाव 'टीनामुनी'..तिला विचारले अग हे कसले नाव? तर म्हणाली ती नटी नाही का? टीनामुनी... तिला टीना मुनीम म्हणायचे होते पण बिचारीच्या पालकांना बारशाच्या वेळी हे माहित नव्हते की टीनामुनी नाव नसून ती मुनीमांची टीना आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 03/17/2008 - 16:17 नवीन

सहीच

धमालच आहेत नावे एकदम कु.कोकिळा पोपट मगर :D टीनामुनी :O नारदमुनी ठेवले असते तर अर्थपूर्ण तरी झाली असते. मनस्वी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
प
प्रमोद देव Mon, 03/17/2008 - 17:01 नवीन

असे असते तर?

कु. कोकिळा पोपट मगर..... ऐवजी कु. कोकिळा मगर पोपट असे असते तर? कोकिळा...... मगर पोपट! असे म्हणता आले असते! असेच एक नेहमी ऐकतो असे एक सुप्रसिद्ध नाव आहे. ..... देवकी पंडीत आता प्रश्न हा पडतो की...... ह्या कोण आहेत? देव.... की.... पंडीत? नेहमीचेच एक आडनाव आहे "नातू" असे. आता त्याच्या पुढे एखादे नाव लावा अणि प्रश्न विचारून पाहा. उदा. अमोल नातू अमोल ना तू? आता हा कुणाचा तरी मुलगा आहे असे विचारायचे असेल तर...... नातूंचा ना तू? अमक्याचा ना तू? तमक्याचा ना तू? वगैरे वगैरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
व
विजुभाऊ Mon, 03/17/2008 - 16:29 नवीन

क्यों बे भूल गये क्या आपने दोस्त लोग कू........

तद माताय............ दामू सुकड्या ; पप्पू कंघी ; येडा याकूब ; कादर टकल्या ; जाड्या लाडू बब्बन पिस्तुल ; बाबू कळक ; राजू शाना ; पक्या खडूस( हे आमाला शाळेत गणीत शिकवायचे) दादू झुरळ( हे पी टी शिकवायचे) ; गोरा लुइस ; काल्या ऍन्थोनी ; गंग्या चड्डी क्यों बे भूल गये क्या आपने दोस्त लोग कू........ आपुन्का विनम्रसे गॅन्ग का अधिक्रुत प्रवक्ता विजुभाऊ( ३ बार एन्कौन्टर रीटर्न)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा