कौस्तुभ "आयर्नमॅन" राडकर
लेखनविषय (Tags)
नाईस - फ्रांस येथे २६ जून रोजी पार पडलेली "आयर्नमॅन" ही ट्राएथ्लॉन स्पर्धा ११ तास ४६मि. इतक्या वेळेत पूर्ण करून पुण्याच्या कौस्तुभ राडकर याने ५०७ वा क्रमांक मिळवला. ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारा तो आजपर्यंतचा एकमेव भारतीय ट्राएथ्लॉनपटू आहे. एवढेच नव्हे, तर ही अत्यंत कठीण स्पर्धा पूर्ण करण्याची ही त्याची चौथी वेळ आहे.
आयर्नमॅन विषयी :
आयर्नमॅन ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक समजली जाते. जलतरण, धावणे, व सायकलिंग या तिन्हीचा समावेश असलेल्या ट्राएथ्लॉन या क्रीडाप्रकारातिल ही स्पर्धा युरोप व अमेरिकेतील विवइध ठिकाणी भरवली जाते. जगभरात या अत्यंत मानाच्या मानल्या जाणार्या स्पर्धेसाठी नामांकित ट्राएथलीट्स वर्षभर तयारी करत असतात. नुसते पार करायचे अंतर जरी लक्षात घेतले तरी या स्पर्धेच्या दर्जाची कल्पना येईल.
पोहणे : ३.८ किमी
सायकलिंग : १८० किमी
धावणे : ४२ किमी
कौस्तुभ राडकर विषयी :
पुण्यात टिळक तलावावर लहानपणापासून सराव करणार्या कौस्तुभने जलतरणात राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके जिंकली आहेत. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत स्थाईक झाल्यानंतर तो ट्राएथ्लॉन या प्रकाराकदे वळला. त्यानंतर एकामागोमाग एक अशा ४ आयर्नमॅन स्पर्धा त्याने पूर्ण केल्या आहेत.
या वेळी तर स्पर्धेतील जलतरण या आपल्या आवडत्या प्रकारात त्याने नोंदवलेली वेळ ही २००० हून अधिक स्पर्धकांत सर्वोत्तम आठवी वेळ होती.
शिक्षण - नोकरी - सराव याचा योग्य समतोल सांभाळून त्याने केलेली ही कामगिरी खरोखरच कौतुकास पात्र आहे.
ट्राएथ्लॉन हा क्रीडाप्रकार भारतात फारसा लोकप्रीय नाही. तसेच, आपल्या प्रसारमाध्यमांमध्ये या कामगिरीस प्रसिध्दी मिळण्याची फारशी शक्यता नाही. म्हणूनच प्रचंड मेहनत घेऊन केलेल्ई ही कामगिरी लोकांसमोर तरी यावी यासाठी हा लेखनप्रपंच.
आयर्नमॅन स्पर्धेविषयी अधिक माहिती www.ironman.com येथे मिळेल.
प्रतिक्रिया
कौस्तुभ 'आयर्नमॅन' राडकरचं
+१
कौस्तुभचे हार्दिक अभिनंदन.
प्रसंगच असा आहे की लाज वाटून
कौस्तुभचे अभिनंदन!
कौस्तुभचे अभिनंदन. रंगोबा
कौस्तुभचे हार्दिक अभिनंदन.. -
तपशीलात थोडीशी चूक झाली. २६
कौस्तुभ 'आयर्नमॅन' राडकरचं
अभिनंदन कौस्तुभ 'आयर्नमॅन'
अभिनंदन
+१
+२
+३
कालच 'लेक प्लॅसिड - अमेरिका"
मस्त.
अरे वा!
पराक्रमी कौस्तुभला बहुत बहुत
क्या बात !!