वेताळणीनं वेताळाला सांगितली गोष्ट अन मग आमीबी म्हनलं जरा गुलुगुल बोलूयात पावन्यासंगं..... ;)
वाद असे बहरात वाचका, तुम्ही नका ना रुसू
पाव्हनं चला, झाडावरती बसू !
बघा थेरडा मेला 'घोडा'
शिव्या हासडून मारा जोडा
लाज संस्कृती सारी सोडा
उगा वाटतं खूप लिहावं
नकाच काही पुसू
पाव्हनं चला, झाडावरती बसू !
काढिल खोडी नव्या दमाच्या
पुचाट गप्पा स्वातंत्र्याच्या
स्टोरी सांगिल वेताळाची
जरा मोकळ्या ह्या जालावर
खविस नागरी हसू
पाव्हनं चला, झाडावरती बसू !
तीन गटांची थेरी मांडा
जुन्या दुव्यांची घेउन खांदा
हलक्या हाताने काड्या घाला
अता खातरी ही शतकाची
पब्लिक लागं फसू
पाव्हनं चला, झाडावरती बसू !
-केसुरंगा
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1357
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रासंगिक का काय ते पण चांगल
ह्या आयडीतुनही तेच चाळे ?
झाडामागं बसलात तरी चालेल