स्टॅनली का डब्बा
खूप दिवस पाहायचा पाहायचा म्हणून हा पिक्चर पाहायचा राहूनच गेला होता. अलग वेळ देणं होत नसेल तर मी सिनेमे दहा-पंधरा मिनिटांच्या तुकड्यांत बघते. माझ्या या तंत्राला चांगले सिनेमे मात्र दाद देत नाहीत. ते एकाच बैठकीत कधी पाहायला भाग पाडतात हे कळतही नाही. बर्याच दिवसांनी असा पिक्चर पाहण्याचा योग आला.
डिस्क्लेमर: लेखावरून बरीचशी कथा कळतेय. ज्यांना असा रसभंग व्हायला नकोय त्यांनी इथंच थांबावं. नाहीतरी वरच्या चार वाक्यांतून पिक्चर चांगला आहे असं या लेखाचं तात्पर्य कळतं आहेच.
नेहमीसारखीच एक सकाळ. शाळेत सोडायला आलेली कुणाची आई प्रेमाने मुलाला झापतेय. आणि चौथीच्या वर्गात ढॅण्टॅढॅण म्हणत पोरासोरांनी सॉल्लीड धिंगाणा घातलाय. एकदम जिवंत, निरागस आणि तितकंच लोभसवाणं चित्र. सुखवस्तू घरातला अमन. हा खेळायला थांबला तर त्याच्या घरून त्याच्यासह सर्व मित्रांसाठी खाणं येतं. अभिषेक, आणि त्याच मुलांतला एक मुलगा स्टॅनली.
स्टॅनली वर्गातल्या मुलांहून थोडासा वेगळा आहे. नाचताना वर्गाचा हिरो आहे. आवडत्या टीचरसाठी तो कविता स्वत:हून पाठ करून म्हणतो, वर्गातल्या प्रोजेक्टसाठी दीपस्तंभाची छोटीशी प्रतिकृतीच उभारतो. तसा गोंडस आहे पण कधीमधी चेहरा मारामारी केल्यासारखा काळानिळा करून घेऊन, कधी सुजवून घेऊन येतो. म्हणे बाजारात कुण्या मुलीला वाचवताना त्याला हे इतकं लागलेलं असतं. तशी त्याला पुस्तकांची पानं फाडणारी लहान बहीण आहे, पटकन उडी मारून बस पकडणारी, धावत ट्रेन पकडणारी सुपरवुमन आई आहे, आणि बाबा आहेत. हे सगळं कधी दिसत नाही, पण त्याच्या निबंधांत, मित्रांबरोबरच्या गप्पांतून जाणवत राहातं. तसंही वर्गातल्या कुणाचंच घर किंवा घरचे सिनेमात नाहीत, त्यामुळे याच्या आईबाबांचं न दिसणं खटकत नाही.
शाळा बहुतेक सकाळची असावी. त्यामुळं छोट्या सुटीतला नाष्टाच सगळे डब्यातून आणतात. अमनचा डबा विशेष असावा. त्याची आई त्याला छान छान पदार्थ करून देते. तसे सगळेच डबे आणतात पण दोन लोक मात्र कधीच आणत नाहीत. सिनेमाच्या नावावरूनच कळतं, की यातला एक आहे स्टॅनली आणि दुसरे आहेत हिंदीचे टीचर बाबुभाई वर्मा. स्टॅनली डबा का आणत नाही कळत नाही. त्याला इतरांचा डबा खाणंही मनाला डाचतं. म्हणून तो कधी कधी नसलेल्या दोन रूपयांचा वडापाव खातो असं खोटंच सांगून थंडा फराळ करून येतो. पण त्याचे मित्र चांगले आहेत. विशेषत: अमन. त्याच्या घरचे पराठे तेही आईने बनवले म्हटल्यावर स्टॅनली एकदम असोशीने ते खायला जातो, पण....
बाबुभाई म्हणजे एक पात्र आहे.त्याला सगळेजण खडूस म्हणतात. वर्ग अर्ध्यावर सोडून तो सहकार्यांनी आणलेले डबे चोरून खातो, पुन्हा सगळे जेवताना मधी मागून तर कधी कधी मला नको आहे, पण आता तुम्ही देतच आहात तर खातो बापडा म्हणून सतत खात असतो. त्यातही हे नको ते नको असे त्याचे नखरे आहेत. आताशा सगळ्यांना त्याच्या या वागण्याची सवय झालीय आणि मनात ’घे मेल्या गिळ’ असंच म्हणत त्याला खाणं ऑफर करतात. तो स्वत: फुकटचं खातो पण स्टॅनली डबा आणत नाही म्हणून त्याचा सतत पाणउतारा करतो.
स्वाईन फ्ल्यूमुळं शाळांना दिलेली सुटी महागात पडते आणि शाळेला रोजचे तास वाढवणं भाग पडतं. आपसूक छोट्या सुटीसोबत आता एक मोठी सुटीही येते आणि स्टॅनलीचा डब्याचा प्रश्न आणखीच आ वासतो. अमनला तर आता चार कप्प्यांचा मोठा डबा येतो. साहजिकच वर्गातला सगळ्यात मोठा डबा आहे तो. खडूसचा त्या डब्यावर डोळा आहे. स्टॅनली एकदोनवेळा घरून जेऊन येतो म्हणून गेला पण त्याला फाटकापाशीच घुटमळताना अभिषेकनं पाह्यलंय. म्हणून स्टॅनलीची आई गावाहून येईपर्यंत अमनला स्टॅनली्सोबतच डबा शेअर करायचाय. यावरचा एकच उपाय आहे की वर्गात डबा खायचाच नाही. या उंदीर-मांजराच्या खेळात मुलं डबा खाण्याचं रोज एक वेगळं ठिकाण सांगतात आणि खडूस त्यांना वेड्यासारखा शोधत राहतो. मुलं जाऊन जाऊन जाणार कुठं? एक दिवस ही मंडळी त्याच्या तावडीत सापडतात आणि डबा घेऊन आल्याशिवाय शाळेत यायचं नाही अशी स्टॅनलीला तंबी मिळते.
आवर्जून सांगावंसं असं काही;-
१. तसं पाहायला गेलं तर सिनेमात काम करणं ही पण एक मजूरीच. बरेच बालकलाकार त्यासाठी शाळा बुडवतात आणि स्वत:चे खास टीचर्स ठेवतात. इथं अमोल गुप्तेने या चित्रपटाचं शूटिंग मुलांची शाळा बुडू न देता सुटीत आणि तेही मधल्या दोन मध्यतरांसह दररोज पाच तास याप्रमाणे पूर्ण केलंय. इतर चित्रपटनिर्माते आणि विशेषत: मालिकावाल्यांनी अमोलकडून काही शिकावं आणि त्या मुलांचं बालपण हिरावून घेणं थांबवावं.
२. एका फ्रेममधे घराबाहेर पडताना कोलॅप्सिबल दरवाज्याच्या आड स्टॅनली असतो आणि बाहेर रस्त्यावर उभा असतो ’कमवा आणि शिका’ चे प्रवर्तक आणि पुरस्कर्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांचा धीरगंभीर आश्वासक पुतळा!!!!
न बोलता हे दृश्य बरंच काही सांगून जातं. हा ’गुप्ते टच’ मला अगदी मनापासून आवडला. :-)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त परिक्षण आवडलं, पोरगा
वा देशपांडे बै वा !! तुमचे
मकमावशी छानच हो लेख !! थेटरात
चित्रपटाची छान ओळख करुन दिली
व्वा..
४ ओळी
व्वा! सुंदर सिनेमाची मस्त
चांगलं परिक्षण परवाच पाहीला.
मस्त गं मके!!
छान
मस्त परीक्षण
मस्त परिचय ग मके. चित्रपटाचा
गेल्याच आठवड्यात सलग २ वेळा
वा. सुंदरच ओळख. याआधी पण
मस्त परीक्षण. पहायला हवा हा
छानच ओळख करून दिलीस.
अलग वेळ देणं होत नसेल तर
उप्स..
छान
अतिशय सुरेख परीक्षण!
बघायला हवा.
अप्र्तीम चित्रपट
छानंच ओळख
मस्त ओळख. नक्की बघेन हा
मलाही आवडला हा
उत्तम परिक्षण
चिप आवडले. अभिज्ञ.
छान परिक्षण.. तात्या.
स्टॅनलीची गोष्ट आवडली.
सगळ्या वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार
लिहि लिहि वाट बघतोय
ह्म्म्म..बघायला हवा..
पाहिला..
ह्म्म्म्म.
मी पहायला