✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वड बोलला यमाला

क — क्रान्ति, Wed, 06/15/2011 - 17:39
वटपूजेनिमित्त आमच्या वडाच्या भावना व्यक्त करायचा हा प्रयत्न! वड बोलला यमाला, "हा काय जाच आहे? बांधून घ्यायला का मी एकटाच आहे? पूजा इथे करावी, त्रागा घरी करावा नवर्‍यास त्या म्हणावे, "तू बावळाच आहे!" हा जन्म 'जी हुजूरी' करण्यात घालवी जो, ऐसा गुलाम साती जन्मी हवाच आहे? आंबे, फळे, सुपार्‍या अन् दक्षिणा भटाला, दोरेच फक्त माझे? ही शुद्ध लाच आहे! वैविध्य पाहु दे ना दोन्ही गटांस आता सांगेन जन्म त्यांचा हा सातवाच आहे!"

प्रतिक्रिया द्या
14154 वाचन

💬 प्रतिसाद (49)

अगदी

विनायक प्रभू
Wed, 06/15/2011 - 17:43 नवीन
क्रान्तिकारक
  • Log in or register to post comments

+१००००

नगरीनिरंजन
Wed, 06/15/2011 - 17:51 नवीन
वाचून सद्गदित झालो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

मस्तच अमोल

अमोल केळकर
Wed, 06/15/2011 - 17:55 नवीन
मस्तच :) अमोल
  • Log in or register to post comments

हेच

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 06/15/2011 - 17:56 नवीन
वैविध्य पाहु दे ना दोन्ही गटांस आता सांगेन जन्म त्यांचा हा सातवाच आहे!"
हेच काय ते खरे!! ;) बाकी कविता उत्तम आहे. मस्त जमलीये.
  • Log in or register to post comments

:)

आत्मशून्य
Wed, 06/15/2011 - 17:57 नवीन
.
  • Log in or register to post comments

सही आहे..

मस्त कलंदर
Wed, 06/15/2011 - 18:42 नवीन
एकदम आवडली..
  • Log in or register to post comments

एकदम आवडली.. ऑ ??? मत कविता

परिकथेतील राजकुमार
Wed, 06/15/2011 - 18:44 नवीन
एकदम आवडली..
ऑ ??? मत कविता ग तै. हलकी फुलकी झकास .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

तुला पण आवडली ?

वाहीदा
Wed, 06/15/2011 - 19:05 नवीन
कोणी आहे का (प्रेमाचा माणूस ) तिकडे मकी चा प्रतिसाद वाचायला ? ;-) क्रांती तुम्हारा पेड तो एकदम बगावत पर उतर आया है :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

खिक्क् !!

सूड
गुरुवार, 06/16/2011 - 14:06 नवीन
खिक्क् !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

वाहव्वा

अत्रुप्त आत्मा
Wed, 06/15/2011 - 18:57 नवीन
कडक....लै भारी...सेकंड लास्ट... ही शुद्ध लाच आहे...येक नंबर
  • Log in or register to post comments

बुकिंग कॅन्सल करण्याची सोय असते..

योगप्रभू
Wed, 06/15/2011 - 19:20 नवीन
बायकांनी वडाला फेर्‍या मारुन त्याच नवर्‍याचे सात जन्माचे बुकिंग केले तरी ते कॅन्सल करण्याचा उपाय पुरुषांकडे आहे. पुरुषांनी येड्या बाभळीला उलट्या सात फेर्‍या माराव्यात :) ..कविता मस्त जमलीय..
  • Log in or register to post comments

मस्त!!

प्रभो
Wed, 06/15/2011 - 19:45 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments

तुफ्फान!!!!

प्राजु
Wed, 06/15/2011 - 19:49 नवीन
तुफ्फान!!!! :)
  • Log in or register to post comments

कविता मस्तंच .. बाकी हे

टारझन
Wed, 06/15/2011 - 20:08 नवीन
कविता मस्तंच .. बाकी हे वटपौर्णिमा , आणि तत्सम सण केवळ मुर्खपणाचे कळस आहेत , असे माझे मत आहे ;) - पिंपळ
  • Log in or register to post comments

मस्त आवडली कविता, नेहमीपेक्षा

५० फक्त
Wed, 06/15/2011 - 22:15 नवीन
मस्त आवडली कविता, नेहमीपेक्षा वेगळं लिहिलंस तु, लिहित रहा ,आम्ही वाचत जाउ.
  • Log in or register to post comments

मस्त कविता!

पैसा
Wed, 06/15/2011 - 22:22 नवीन
बिचार्‍या वडाला किती वर्षानी कोणीतरी समजून घेतलं ना!
  • Log in or register to post comments

मस्त विनोदी

धनंजय
Wed, 06/15/2011 - 22:54 नवीन
मस्त विनोदी
  • Log in or register to post comments

हाहाहाहा

श्रावण मोडक
Wed, 06/15/2011 - 23:36 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

क्या बात है!

चतुरंग
गुरुवार, 06/16/2011 - 05:09 नवीन
कविता आणि विडंबन एकदमच साधल्यासारखं वाटलं! ;) -(डेरेदार)रंगा
  • Log in or register to post comments

वा वा वा

नारयन लेले
गुरुवार, 06/16/2011 - 08:48 नवीन
कवीता सुन्दर, आज पेपर मध्ये बातमी वाचली बायको बरोबर नवर्यानेही वडाची पुजा केल्याचे.मस्तच ना,सुधारणा होती आहेना समजात. विनित
  • Log in or register to post comments

मस्तच.:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 06/16/2011 - 09:08 नवीन
:) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सुंदर मस्त झकास

रणजित चितळे
गुरुवार, 06/16/2011 - 09:16 नवीन
सुंदर मस्त झकास
  • Log in or register to post comments

स्वतः एक स्त्री असूनही एवढं

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/16/2011 - 09:22 नवीन
स्वतः एक स्त्री असूनही एवढं कटू सत्य मांडायचे धाडस केल्याबद्दल क्रांतीताईचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

मस्त.. उत्तम रचना

भडकमकर मास्तर
गुरुवार, 06/16/2011 - 09:50 नवीन
मस्त.. उत्तम रचना
  • Log in or register to post comments

हा.. हा.. फारच छान. सगळी कडवी

दत्ता काळे
गुरुवार, 06/16/2011 - 10:26 नवीन
हा.. हा.. फारच छान. सगळी कडवी छान जमलीयेत. हा जन्म 'जी हुजूरी' करण्यात घालवी जो, ऐसा गुलाम साती जन्मी हवाच आहे? :O
  • Log in or register to post comments

वडाला फेर्या मारते राउन्ड बाय

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 06/16/2011 - 10:44 नवीन
वडाला फेर्या मारते राउन्ड बाय राउन्ड, वडाला फेर्या मारते राउन्ड बाय राउन्ड, पुढच्या जन्मी हाच पती, शुड नॉट बी फाऊन्ड ;)
  • Log in or register to post comments

पुढच्या जन्मी हाच पती, शुड

टारझन
गुरुवार, 06/16/2011 - 11:35 नवीन
पुढच्या जन्मी हाच पती, शुड नॉट बी फाऊन्ड
यु वील नॉट गेट एनिथिंग एल्स , प्लिज कम डाउन टु द ग्राउंड - कर्नल वडे बटाटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

(No subject)

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 06/16/2011 - 11:47 नवीन
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अगं बाबो

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/16/2011 - 12:43 नवीन
काय कडक छकडी मारली राव...हा हा हा,ही ही ही...हू हू तळ...ले...ले...पराठे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

आता हे कोण अजुन नविन दिवे

पर्नल नेने मराठे
गुरुवार, 06/16/2011 - 12:45 नवीन
आता हे कोण अजुन नविन दिवे लावणारे :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

पॉवर हाउस

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/16/2011 - 16:03 नवीन
दिवे जुनेच असतात हो,आपण नव्यानी लावायचे नविन मिपाकरांच्या प्रतिक्रीये वर,असे पटकन नाही कावायचे....////....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

अगागागा....

धन्या
गुरुवार, 06/16/2011 - 21:24 नवीन
दिवे जुनेच असतात हो,आपण नव्यानी लावायचे नविन मिपाकरांच्या प्रतिक्रीये वर,असे पटकन नाही कावायचे....////....
भारीच राव...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

क्या बात है!

पिवळा डांबिस
Fri, 06/17/2011 - 04:10 नवीन
क्रान्तीची कविता आणि दिवेकरांची प्रतिक्रिया दोन्ही आवडल्या!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हॅ हॅ हॅ

रमताराम
Sat, 06/18/2011 - 19:34 नवीन
चुचुकाकूचे चुचुकाकाच प्रयत्न करत असतील तिने वड पुजू नये म्हणून......सात जन्मांची जन्मठेप वाचावी म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

अरेरे ..

दत्ता काळे
गुरुवार, 06/16/2011 - 11:01 नवीन
पुढच्या जन्मी हाच ब्लड हाऊंड शुड नॉट बी फाऊन्ड .... ? नाही म्हणालात हे त्याचं नशीब.
  • Log in or register to post comments

छान.

जागु
गुरुवार, 06/16/2011 - 14:51 नवीन
छान.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

क्रान्ति
गुरुवार, 06/16/2011 - 16:19 नवीन
धन्यवाद मंडळी. आपल्या उस्फूर्त प्रतिसादांनी आमच्या कल्पनेतला वटवृक्ष मोहरून आला. या रचनेची प्रेरणा आहे काल सकाळी चेपुवर वाचलेल्या धोंडोपंत आपटे यांच्या भिंतीवरच्या इलाही जमादार यांच्या ओळी आणि त्या अनुषंगानं घडलेल्या जालचर्चेतील इतर काव्यं, उखाणे, प्रतिसाद यांचं मनसोक्त रसपान! ते वाचून आमच्या कल्पनेच्या वडालाही या अशा पारंब्या फुटल्या!
  • Log in or register to post comments

फुटु दे...

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/16/2011 - 19:28 नवीन
फुटु दे,फुटु दे अशाच अजूनी पारंब्या सुटु दे सुटु दे प्रतिक्रियांच्या गारंब्या कितिही कुणी.... फोडू दे मुक्त टाहो आपुला (चा)वट व्रुक्ष,सदा बहरत राहो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति

अंमळ उशीर..

स्वाती दिनेश
गुरुवार, 06/16/2011 - 16:38 नवीन
उशीरानेच वाचली गेली कविता, मस्तच! आवडली.. स्वाती
  • Log in or register to post comments

खुसखुशीत कविता

संदीप चित्रे
गुरुवार, 06/16/2011 - 19:10 नवीन
आवडली... लिखते रहो :)
  • Log in or register to post comments

आवडली

तिमा
गुरुवार, 06/16/2011 - 21:06 नवीन
कविता आवडली, आणखी थोडी विस्ताराने हवी होती.
  • Log in or register to post comments

कविता आवडली. मस्त आहे.

सुधीर काळे
Fri, 06/17/2011 - 07:31 नवीन
क्रांतीताई, कविता आवडली. मस्त आहे.
  • Log in or register to post comments

भारी

दिपक
Sat, 06/18/2011 - 10:12 नवीन
भारी कविता क्रांतीतै! :-)
  • Log in or register to post comments

वड

चन्द्रशेखर गोखले
Sat, 06/18/2011 - 18:43 नवीन
वा मस्तच ,,,वट वट सवित्री ...!!!
  • Log in or register to post comments

एकदम

रमताराम
Sat, 06/18/2011 - 19:36 नवीन
रोकठोक उत्तर देणारी कविता आवडली हे वे.सां.न.ल.
  • Log in or register to post comments

फर्मास..

एस
Sat, 10/26/2013 - 20:30 नवीन
पुढच्या वटपौर्णिमेला गावातल्या समस्त वटवृक्षांवर ह्याच्या छापील प्रती चिटकवण्यात येणार आहेत. बाकी मिसेस वटवृक्ष काय बोलल्या असाव्यात बरं... ;)
  • Log in or register to post comments

वटपौर्णिमेनिमित्त...

एस
Tue, 06/02/2015 - 18:16 नवीन
'क्रांतिकारक' धागा वर काढण्याची आमची प्रेरणा :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

वा! फार उत्तम केलेत!

चुकलामाकला
Tue, 06/02/2015 - 18:37 नवीन
वा! फार उत्तम केलेत!
  • Log in or register to post comments

मस्तच! :)

शब्दबम्बाळ
Tue, 06/02/2015 - 18:40 नवीन
मस्तच लिहिली आहे!! :)) धागा वर आणल्याबद्दल स्वॅप्स यांचे आभार!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा