Skip to main content

आईस क्रीम की.....????

लेखक छत्रपति यांनी मंगळवार, 14/06/2011 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
आईस्क्रीम खायला तसं सगळ्यांनाच आवडतं. आणि आता तर उन्हाळाच काय पण १२ महिने आईस्क्रीम खायची एक संस्कृती तयार झाली आहे. मधुमेही रुग्णांसाठी देखील शुगर फ्री पर्याय उपलब्घ झाले आहेत. बड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत. पण याच आईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत. कद...ाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत. मध्ये एका मिटींगसाठी आमच्या एका सरांनी मला हॉटेलमध्ये बोलावलं होत. तेव्हा माझ्या आधी सरांची अजून एका माणसाबरोबर मिटींग चालू होती. मी त्यांच्या मिटींगचा प्रेक्षक झालो गेलो. तो माणूस आईस्क्रीमचे निरनिराळे आणि नवनवीन फ्लेवर्स बनवतो आणि आईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे आउटलेट उघडायचे आहे. त्यासाठी फायनांस करा म्हणून तो त्या सरांना पटवत होता. तो जे काही सांगत होता ते ऐकून मी उडालोच. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने अनेक नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे काही कंपन्यांनी विकत घेतली असून सध्या मार्केटमध्ये लोकांना खूप आवडताहेत. ते आवडणाऱ्यात मीही एक होतोच. तो म्हणाला ; “आता मी लेमन आईस्क्रीम मध्ये ४ नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे मला कुठल्याच कंपनीला विकायचे नाहीयेत. हे फ्लेवर्स लोकांना खूप आवडणार आहेत. ज्याचा आपल्याला आउटलेट उघडून फायदा उठवता येईल. ” त्यावर सरांनी त्याला एक साधा प्रश्न विचारला की ; “समजा आपण आउटलेट उघडलं आणि तुझा हा लेमन फ्लेवर लोकांना आवडला नाही तर तू त्या लेमन फ्लेवरचे जे उत्पादन करशील ते किती दिवस राहू शकत? लोकांना ते आवडेपर्यंत जो काळ जाईल तोवर ते आईस्क्रीम वाया जाणार मग ते नुकसान कुणी सोसायच? ”. पुढे सरांचे अनेक प्रश्न होतेच. वीज खर्च, दुध , कच्चा माल इत्यादी. त्यावर तो आपले तंत्रज्ञान किती भारी आहे हे सांगताना म्हणाला की ; “त्याची काही काळजी करू नका. मुळात हे आईस्क्रीम कधीच खराब होत नाही. अगदी आठ दिवस लाईट नसले तरीही... ” आम्ही चकित झालो . सरांनी विचारलं ; “ते कस काय? दुध आहे ते खराब होणारच.” तो तत्काळ म्हणाला ; “छे छे. दुधापासून आईस्क्रीम बनवण्याचे दिवस केव्हाच संपलेत. ” “मग कशापासून बनवतोस बाबा आईस्क्रीम ?” “डालडा तुपापासून!” “डालडा तूऽऽऽऽप?” “आज काळ एखाद दोन कंपन्या सोडल्या तर सगळे डालडाच वापरतात आणि त्यामुळेच ते परवडतं. आता आईस्क्रीम मध्ये एकही थेंब दुध नसतं. डालडाला थोडी प्रोसेस केली आणि त्यात फ्लेवर्स मिक्स केले की कळतही नाही की डालडा तूप आहे. शिवाय ते दुधाच्या आईस्क्रीमपेक्षा खाताना जास्त मऊ लागतं. आणि तेच लोकांना आवडतं. डालडा आईस्क्रीम जिभेवर येताच त्वरित विरघळते आणि गिळले जाते. शिवाय थंडपणा आणि तुपकटपणा यामधून तोंडात जे तयार होते ते नक्की काय आहे हा विचार लोक करीत नाहीत. पण तेच लोकांना आवडते. लोक अशाच स्वादाला पसंती देतात. ” तो भरात येऊन त्याच्या तंत्राच मार्केटिंग करत होता आणि आम्ही आमचा इतिहास पोटात ढवळत बसलो होतो. पुढे तो सांगत होता; “डालडा आईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं की ते डालडा सामान्य तापमानात कितीही काळ राहिला तरीही अजिबात खराब होत नाही. याउलट दुधाला मात्र सारखं फ्रीजिंग लागतं. शिवाय दुधाच्या आईस्क्रीमला ८-१० दिवसांनी वास येतो. आणि १५ दिवसात ते खराब होऊन जातं. त्यामुळे खर्च वाढतो. डालडा आईस्क्रीम २ वर्ष फ्रीजच्या बाहेर राहिलं तरी फरक पडत नाही, त्याचे फ्लेवर्सही खराब होत. नाहीत. डालडा आईस्क्रीमसाठी लाईट खुपच कमी लागते. १० डिग्री तापमानातही त्याचा आईस्क्रीम फील येतो. तर दुधाच्या आईस्क्रीमसाठी उणे तापमानाची (नक्की किती ते लक्षात नाही.) गरज असते. सहाजिकच दुधाच्या आईस्क्रीमच्या विजेचा खर्च वाढतो. शिवाय दुधापेक्षा डालडा कच्चा माल म्हणून जास्त स्वस्त आहे. तस ते हाताळणी आणि प्रोसेसलाही खूप सोपे आहे. दुधाचे रोजचे कलेक्शन, त्याचे फ्रीजिंग आणि साठवण याचा विचार करता त्याची जी बेसिक किंमत होते. त्या किंमतीतही लोकांना ते आईस्क्रीम खाण परवडू शकत नाही. डालडा आईस्क्रीम मध्ये खूप मोठे प्रोफिट मार्जिन आहे. म्हणूनच आजकाल इतके पॉश आईस्क्रीम आउटलेट निघू शकतात. ” “डालडा आईस्क्रीम उत्पादनाचा आणखी एक फायदा असा आहे की एकच प्रोडक्शन युनिट चालवून भारत भर कुठेही आपण याचे वितरण करू शकतो. तेही कमी खर्चात. दुधाच्या आईस्क्रीमला तो बेनिफिट नाही. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शन युनिट सुरु करावे लागेल.” तो रंगात आला होता. त्याने त्याचे नवीन लेमन फ्लेवर टेस्ट करायला दिले. मला डालडा आईस्क्रिम खाल्ल्यामुळे नक्की काय तोटा होतो ते माहीत नाही. पण त्यानंतर आईस्क्रीम खायची मजा निघून गेली इतकं नक्की. कमलेश कुळकर्णी या॓ज कडून साभार...!!!

वाचने 25837
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

In reply to by नितिन थत्ते

>>म्हणून खारी बिस्किटं नेहमी डोक्यावर ट्रंक घेऊन येणार्‍या बेकरीवाल्याकडून घ्यावी. अनुस्वार वाचलाच नाही..... गडबडलो की... :) -सूर्यपुत्र.

बाकी लोकं ज्या जेलीज खातात (आणि तिचे भाऊबंद!!) त्या गुरांच्या हाडं आणि खुरांपासून कॉलेजेन काढून बनवलेल्या असतात जगभर!!!!! लोकं पांढरीशुभ्र साखर खातात ती पांढरीशुभ्र बनवण्यासाठी गुरांच्या हाडांपासून बनवलेला कोळसाच वापरतात जगभर!!!! ;)

In reply to by पिवळा डांबिस

आज या झाडावर बसायला भरपूर वेळ दिसतोय तुम्हाला! आज काय सगळ्यांच खाद्यपदार्थांचें पोस्ट्मॉर्टेम का? आणखी येऊ द्या! म्हणजे रेवतीचं काम वाढत जाईल!

In reply to by पैसा

दिवसांनी रेवती ताई शेती करायला लागतील .. मग गाय बकरी पण पाळतील. सर्व काही घरच्या घरीच.

In reply to by पैसा

इथे जे बीन बरीटो मिळतं त्यात डुकराचा (बेकनचा) स्टॉक घातलेला असतो.... फ्रेन्च फ्राईज गुरांच्या चरबीत तळलेल्या असतात... अगदी जिथे तेल वापरून फ्राईज तळल्यात अशा ठिकाणीदेखील फ्राईज आणि रक्ताच्छदित मांस एकाच तेलात तळतात.... कंट्री रेस्तॉरंटमधल्या भाज्या ह्या गाय/ डुकराचा स्टॉक घालून चविष्ट केलेल्या असतात!!!!! :) (बाकी आम्ही आईस्क्रिम घरीच बनवतो!! कारण आम्हाला आंबा आईस्क्रीम खूप आवडतं!!!!!)

In reply to by पैसा

रेवतीचं काम वाढत जाईल! अच्छा! पाशवी शक्तीच माझ्या विरुद्ध! आता बघा देते का प्रतिसाद कुठे! खरडीतून रिक्वेष्टा पाठवाल....... काही म्हणून टंकायची सोय राहिली नाही आजकाल!;)

In reply to by रेवती

आपलं ट्रेड शिक्रेट सगळ्याना काय सांगतेस! मी व्यनि करीन ना तुला! (आणि अजून भारत वर्ल्डकप जिंकल्याबद्दल मी तुला २५ प्रतिसाद देणारे ना पण एका धाग्यावर! ;) )

In reply to by वेताळ

तरीही साबुदाणे हे उपासाला न धुता फक्त पाण्याचा शिडकावा मारून वापरले जातात ना? बाकी आमचा ह्या साबुदाण्याच्या खिचडीवर अंमळ भारीच जीव हो!!!!! :)

केवळ नीलकांताने आमच्यावर अवांतर केल्याचा आरोप ठेवू नये म्हणुन.... ;) त्या आईस्क्रीमच्या कंपन्या जर दुधाच्या धंद्यात असतील उदा. आरे, अमूल वगैरे.... त्या अतिरिक्त दुघापासूनच आईस्क्रीम बनवतात असं समजायला प्रत्यवाय नसावा... कारण या कंपन्या स्वतःचे प्रॉडक्ट सोडून उगाच वनस्पती तूप विकत घेउन त्याचं आईस्क्रीम बनवायचा उपद्व्याप करतील असं वाटत नाही... द कॉस्ट ऑफ द गुडस मॅन्युफॅक्चर्ड वुड नॉट सपोर्ट दॅट!!!! एन्जॉय!!! || डांबिस म्हणे आता, उरलो उपकारापुरता || :)

लेखातली बरीचशी माहिती चुकीची आहे . ब्रॅण्डेड आइसक्रीम खायला काहीच हरकत नाही असे वाटते. कमलेश कुलकर्णी यांनी या माहितीची ऑथेंटिसिटी तपासली आहे का?

In reply to by नितिन थत्ते

लेखातली बरीचशी माहिती चुकीची आहे . इतका सात्विक उद्रेक? थत्तेकाकांना आईस्क्रीम भलतंच प्रिय दिसतंय!!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

आइसक्रीम आवडतेच पण सात्विक संताप नाही. :) सदरचा लेख आम जनतेच्या लिहिला असावा म्हणून माझ्या कडे असलेली माहिती शेअर करीत आहे. आइसक्रीम सदृश विकले जाणारे दोन प्रकार असतात. १ स्टॅण्डर्ड आइसक्रीम २. फ्रोझन डेझर्ट स्टॅण्डर्ड आइसक्रीम मध्ये मिल्क फॅट असणे आवश्यक. मात्र ती फ्रेश क्रीमच्याच स्वरूपात असेल असे नाही. बटर सुद्धा असते. (तूप नक्की नसते कारण ते मिक्स होऊन स्टेबल राहू शकत नाही). फ्रोझन डेझर्ट मध्ये मिल्क फॅट ऐवजी व्हेजिटेबल फॅट (म्हणजे डालडा असे नव्हे) असते ते सुद्धा काही प्रमाणात असते. म्हणजे मिल्क फॅट आणि वेजिटेबल फॅटचे मिश्रण. ही किंमतीला कमी असतात. बहुतेक आइसक्रीम उत्पादकांकडे दुधाचा पक्का सोर्स नसतो. दुसरे म्हणजे आइसक्रीमची मागणी जेव्हा उन्हाळ्यात सर्वाधिक असते तेव्हा दुधाचे उत्पादन सर्वात कमी असते. त्यामुळे मिल्क पावडर आणि व्हेजिटेबल आणि मिल्क फॅटचे मिश्रण वापरून फ्रोझन डेझर्ट हा प्रकार बनवला जातो. जेव्हा व्हेजिटेबल फॅट वापरलेले असते तेव्हा पी एफ ए (भेसळ प्रतिबंधक कायदा) नुसार ते फ्रोझन डेझर्ट म्हणूनच विकावे लागते आणि कन्टेन्स व्हेजिटेबल फॅट असे डिक्लरेशन छापावे लागते. हा प्रकार आइसक्रीम म्हणून विकता येत नाही. (अर्थात या दोन्ही गोष्टी सिगरेटच्य पाकीटावरील सूचनेसारख्याच बारीक अक्षरात कोपर्‍यात लिहिलेले असणार) माझ्या माहितीप्रमाणे जे ब्रॅण्ड पूर्वी फ्रोझन डेझर्ट बनवून विकत असत तेही हळू हळू मिल्क बेस्ड आइसक्रीम कडे वळत आहेत. म्हणजे लेखात म्हटल्याप्रमाणे दुधाकडून डालडाकडे नव्हे तर डालडाकडून दुधाकडे. नावे जाहीर करता येणार नाहीत. क्षमस्व. सदर लेखातील व्यक्ती जसा दावा करीत आहे की थंड ठेवले नाही तरी टिकून राहते वगैरे.... ही चुकीची आहे. फ्रोझन डेझर्टदेखील थंड (उणे १६ अंश सेल्शिअस चू भू दे घे) ठेवावे लागते कारण त्यातही मिल्क सॉलिड्स आनि मिल्क फॅटस असतातच. या तापमानाला ठेवलेले आइसक्रीम किंवा फ्रोझन डेझर्ट किमान सहा महिने टिकून राहते. म्हणून माझ्या मते ब्रॅण्डेड आइसक्रीम (फ्रोझन डेझर्टसुद्धा) खायला हरकत नाही. बाकी बाजारात अनेक लोकल ब्रॅण्ड्स असतात. त्याबाबत माहिती/खात्री नाही. अधिकची माहिती म्हणजे केटरिंग पॅक हे आइसक्रीम ऐवजी फ्रोझन डेझर्ट असण्याची खूप शक्यता असते. अवांतर: सर्व आइसक्रीम मध्ये सुमारे ४५ % हवा असते. आणि ती हवा एस्केप होऊ नये म्हणून काही गम्स. त्याला भेसळ म्हणावे का? अतिअवांतर: हल्ली बाजारात बटर सब्स्टिट्यूट म्हणून काही ब्रेडस्प्रेड मिळतात आणि ते बटरपेक्षा हेल्दी असल्याचे क्लेमही असतात. ते देखील असेच मिल्क फॅट आणि व्हेजिटेबल फॅटचे मिश्रण असते. त्याला टेक्निकल भाषेत मार्जरीन/मार्गारिन म्हणतात.

In reply to by नितिन थत्ते

काय वेळ आली आहे. थत्ते चाचांचा प्रतिसाद आवडला असे म्हणावे लागते आहे :) जोक्स अपार्ट. माहितीपुर्ण प्रतिसाद. चाचांची वेगवेगळ्या कायद्यांच्या तरतुदींवरचा अभ्यासही जबरदस्त आहे असे म्हणावे लागेल.

In reply to by नितिन थत्ते

खूप बोगस लागतं ते मार्गारिन....हे म्हणजे दारूला सब्स्टिट्यूट म्हणून कोरेक्स पिण्यासारखं आहे...आणि चिकन ला सब्स्टिट्यूट म्हणून सोयाबीन खाण्यासारखं आहे... ;) आपण बाबा अमूल बटर वर खुश आहोत....

In reply to by नितिन थत्ते

सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद! मुलांनो, यावरून थत्तेकाका हा एक निव्वळ चांचा नसून आपल्या सर्वांचा चाचा आहे हेच सिद्ध होते!!! आपला, पिडां स्कॉचवाले

In reply to by नितिन थत्ते

प्रतिसादातील माहिती योग्य आहे. अवांतर : 'क्वालिटी वॉल्स' पहा म्हणजे पटेल. आणि आईस्क्रीम ते आईस्क्रीम ! दुधाचं असलं काय? पाण्याचं असलं काय? किंवा डालड्याचं असलं काय? गारेगार गोड असलं म्हणजे झालं. :)

In reply to by नितिन थत्ते

थत्ते चाचा, >>कमलेश कुलकर्णी यांनी या माहितीची ऑथेंटिसिटी तपासली आहे का? अन्यथा त्यांनी गप्प रहावे असे सुचवायचे आहे का?? ;)

लेख वाचल्यापासुन आईस्किम खाताना डालड्याची चव शोधत होतो... नितिन थत्तेंचा प्रतिसाद वाचुन खरेच हायसे वाटले.. आता पुन्हा आईस्किम चविने (डालड्याच्या नव्हे) खाता येईल...

बरेचदा आइस्क्रीमचा घट्टपणा कायम रहावा म्हणुन त्या जिलेटीन घालतात. हे जिलेटीन सरसाप्रमाणेच प्रणीज पदार्थापासून बनवतात.

In reply to by विजुभाऊ

जिलेटिन प्राणीज असते हे बरोबर आहे. पण आइसक्रीममध्ये जिलेटिन नसते. त्या ऐवजी ग्वार गम हा व्हेजिटेबल गम वापरतात. (आइसक्रीम मिक्स म्हणून जे इन्स्टंट मिक्स मिळते -वेकफील्ड वगैरे- त्यात जिलेटिन असू शकेल).

In reply to by विवेक मोडक

तसेही एका पेग नंतर चव समजण्याच्या स्थितीत राहतोच कुठे आपण. चिंता करू नका विमो. अवांतरः या आईस्क्रीमवरील गरमागरम चर्चेवरून हा धमाल चित्रपट आठवला. (पुणेकरांना खुली ऑफर - हिंजवडीवाल्यांना प्राधान्य - आमच्याकडून घेऊन जाणे.)

हा धागा भलताच फेमस झालाय (कि कमलेश कुळकर्णी यांचा ब्लॉग) याची कल्पना नाही. परंतु अगदी कॉपी टू कॉपी हाच लेख मला ढकलपत्रातून मिळालाय! खाली अशी तळटीप आहे: http://mukamar.blogspot.com/2011/05/blog-post.html या अनुदिनीवरून साभार

क्वालिटी वाल्स जेंव्हा भारतात आइस्क्रीम घेवून आले त्यावेळेस त्यानी हे आइसक्रीम दुधापासून नव्हे तर वनस्पती तुपाचा बेस घेवून केलेले आहे असे सांगितले होते.