✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

आईस क्रीम की.....????

छ
छत्रपति यांनी
Tue, 06/14/2011 - 14:42  ·  लेख
लेख
आईस्क्रीम खायला तसं सगळ्यांनाच आवडतं. आणि आता तर उन्हाळाच काय पण १२ महिने आईस्क्रीम खायची एक संस्कृती तयार झाली आहे. मधुमेही रुग्णांसाठी देखील शुगर फ्री पर्याय उपलब्घ झाले आहेत. बड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत. पण याच आईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत. कद...ाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत. मध्ये एका मिटींगसाठी आमच्या एका सरांनी मला हॉटेलमध्ये बोलावलं होत. तेव्हा माझ्या आधी सरांची अजून एका माणसाबरोबर मिटींग चालू होती. मी त्यांच्या मिटींगचा प्रेक्षक झालो गेलो. तो माणूस आईस्क्रीमचे निरनिराळे आणि नवनवीन फ्लेवर्स बनवतो आणि आईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे आउटलेट उघडायचे आहे. त्यासाठी फायनांस करा म्हणून तो त्या सरांना पटवत होता. तो जे काही सांगत होता ते ऐकून मी उडालोच. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने अनेक नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे काही कंपन्यांनी विकत घेतली असून सध्या मार्केटमध्ये लोकांना खूप आवडताहेत. ते आवडणाऱ्यात मीही एक होतोच. तो म्हणाला ; “आता मी लेमन आईस्क्रीम मध्ये ४ नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे मला कुठल्याच कंपनीला विकायचे नाहीयेत. हे फ्लेवर्स लोकांना खूप आवडणार आहेत. ज्याचा आपल्याला आउटलेट उघडून फायदा उठवता येईल. ” त्यावर सरांनी त्याला एक साधा प्रश्न विचारला की ; “समजा आपण आउटलेट उघडलं आणि तुझा हा लेमन फ्लेवर लोकांना आवडला नाही तर तू त्या लेमन फ्लेवरचे जे उत्पादन करशील ते किती दिवस राहू शकत? लोकांना ते आवडेपर्यंत जो काळ जाईल तोवर ते आईस्क्रीम वाया जाणार मग ते नुकसान कुणी सोसायच? ”. पुढे सरांचे अनेक प्रश्न होतेच. वीज खर्च, दुध , कच्चा माल इत्यादी. त्यावर तो आपले तंत्रज्ञान किती भारी आहे हे सांगताना म्हणाला की ; “त्याची काही काळजी करू नका. मुळात हे आईस्क्रीम कधीच खराब होत नाही. अगदी आठ दिवस लाईट नसले तरीही... ” आम्ही चकित झालो . सरांनी विचारलं ; “ते कस काय? दुध आहे ते खराब होणारच.” तो तत्काळ म्हणाला ; “छे छे. दुधापासून आईस्क्रीम बनवण्याचे दिवस केव्हाच संपलेत. ” “मग कशापासून बनवतोस बाबा आईस्क्रीम ?” “डालडा तुपापासून!” “डालडा तूऽऽऽऽप?” “आज काळ एखाद दोन कंपन्या सोडल्या तर सगळे डालडाच वापरतात आणि त्यामुळेच ते परवडतं. आता आईस्क्रीम मध्ये एकही थेंब दुध नसतं. डालडाला थोडी प्रोसेस केली आणि त्यात फ्लेवर्स मिक्स केले की कळतही नाही की डालडा तूप आहे. शिवाय ते दुधाच्या आईस्क्रीमपेक्षा खाताना जास्त मऊ लागतं. आणि तेच लोकांना आवडतं. डालडा आईस्क्रीम जिभेवर येताच त्वरित विरघळते आणि गिळले जाते. शिवाय थंडपणा आणि तुपकटपणा यामधून तोंडात जे तयार होते ते नक्की काय आहे हा विचार लोक करीत नाहीत. पण तेच लोकांना आवडते. लोक अशाच स्वादाला पसंती देतात. ” तो भरात येऊन त्याच्या तंत्राच मार्केटिंग करत होता आणि आम्ही आमचा इतिहास पोटात ढवळत बसलो होतो. पुढे तो सांगत होता; “डालडा आईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं की ते डालडा सामान्य तापमानात कितीही काळ राहिला तरीही अजिबात खराब होत नाही. याउलट दुधाला मात्र सारखं फ्रीजिंग लागतं. शिवाय दुधाच्या आईस्क्रीमला ८-१० दिवसांनी वास येतो. आणि १५ दिवसात ते खराब होऊन जातं. त्यामुळे खर्च वाढतो. डालडा आईस्क्रीम २ वर्ष फ्रीजच्या बाहेर राहिलं तरी फरक पडत नाही, त्याचे फ्लेवर्सही खराब होत. नाहीत. डालडा आईस्क्रीमसाठी लाईट खुपच कमी लागते. १० डिग्री तापमानातही त्याचा आईस्क्रीम फील येतो. तर दुधाच्या आईस्क्रीमसाठी उणे तापमानाची (नक्की किती ते लक्षात नाही.) गरज असते. सहाजिकच दुधाच्या आईस्क्रीमच्या विजेचा खर्च वाढतो. शिवाय दुधापेक्षा डालडा कच्चा माल म्हणून जास्त स्वस्त आहे. तस ते हाताळणी आणि प्रोसेसलाही खूप सोपे आहे. दुधाचे रोजचे कलेक्शन, त्याचे फ्रीजिंग आणि साठवण याचा विचार करता त्याची जी बेसिक किंमत होते. त्या किंमतीतही लोकांना ते आईस्क्रीम खाण परवडू शकत नाही. डालडा आईस्क्रीम मध्ये खूप मोठे प्रोफिट मार्जिन आहे. म्हणूनच आजकाल इतके पॉश आईस्क्रीम आउटलेट निघू शकतात. ” “डालडा आईस्क्रीम उत्पादनाचा आणखी एक फायदा असा आहे की एकच प्रोडक्शन युनिट चालवून भारत भर कुठेही आपण याचे वितरण करू शकतो. तेही कमी खर्चात. दुधाच्या आईस्क्रीमला तो बेनिफिट नाही. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शन युनिट सुरु करावे लागेल.” तो रंगात आला होता. त्याने त्याचे नवीन लेमन फ्लेवर टेस्ट करायला दिले. मला डालडा आईस्क्रिम खाल्ल्यामुळे नक्की काय तोटा होतो ते माहीत नाही. पण त्यानंतर आईस्क्रीम खायची मजा निघून गेली इतकं नक्की. कमलेश कुळकर्णी या॓ज कडून साभार...!!!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25708 वाचन

💬 प्रतिसाद (105)

प्रतिक्रिया

एवढ्यात तरी भारतात आईस्क्रीम

रेवती
Tue, 06/14/2011 - 18:45 नवीन
एवढ्यात तरी भारतात आईस्क्रीम खाण्याचा योग आला नाही (तेच बरे झाले!) पण मागे एकदा खाल्लेल्या आईस्क्रीमबद्दल हा प्रश्न मनात येऊन गेल्याचे आठवते आहे. ते आईस्क्रीम खाल्ल्यावर तोंडात ओशटपणा राहिला होता. नंतर मी आईस्क्रीम बनवायच्या क्लासला गेले होते त्यात त्यांनी चोकोबार तयार करताना चॉकलेट वितळवून त्यात डालडा घालायला सांगितल्याचे आठवते आहे. अर्थात पूर्ण डालड्याचे नव्हते ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

टरकल्या गेली आहे.. अन

वपाडाव
Tue, 06/14/2011 - 18:57 नवीन
टरकल्या गेली आहे.. अन नॅचरल्सचे नाव एका सदस्याने घेतले असल्याने अजुनच बी.पी. वाढले आहे.... इथुन फुडे आइसक्रीम खाउ नये या विचारा पर्यंत येउन पोहोचलो आहे.... कृतीत घडु नये असे वाट्टे.... बाकी.. ही माहीती खोटी निघावी हीच इ. प्रा.
  • Log in or register to post comments

अन नॅचरल्सचे नाव एका सदस्याने घेतले असल्याने .............

सुधीर१३७
Tue, 06/14/2011 - 19:55 नवीन
>>>>>>>> अन नॅचरल्सचे नाव एका सदस्याने घेतले असल्याने अजुनच बी.पी. वाढले आहे.... ........................ मजकूर नीट वाचा..... एक सोपी टेस्ट सांगतो.. वाटीभर आईसक्रीम बाहेर ठेवा, नीट वितळल की जरा गरम करा.. आणी त्यात लींबु पिळा.. दुधाचे असेल तर आईसक्रीम फाटेल.. अमुलचे, नॅचरल्चे फाटते.. .. .....म्हणजेच नॅचरल्सचे आईसक्रीम दुधाचे आहे. :) बी. पी. वाढवायचे कारण नाही........ :wink:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

डालडा तुप?

भारी समर्थ
Tue, 06/14/2011 - 19:09 नवीन
फारा वर्षांनी डालड्यास कोणी तुप संबोधिले आणि बेकरीत भाजलेल्या नानकटची आठवण झाली. तसं वनस्पती तुपाने फारसं काही बिघडलं नाही आमचं. पण उगीचच वाचलं असं वाटतंय. सुकोबारायांनी म्हणून ठेवलेच आहे- कसा काय देवा| झाला चमत्कार| डालड्याचे ऐस्क्रीम| कोण वितळे|| पाहून विडीओ| दाटे मळमळ| प्रत्येक पुरीतले पाणी| भासे पिवळे|| बोला जय हारी विट्ठल| भारी समर्थ
  • Log in or register to post comments

अगायायायाया....

धमाल मुलगा
Tue, 06/14/2011 - 19:53 नवीन
समर्थांचा अश्वमेध बर्‍याच दिवसांनी चौखूर उधळलेला दिसतोय. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारी समर्थ

हाहाहाहाहा

इष्टुर फाकडा
Sat, 06/18/2011 - 14:16 नवीन
कसा काय देवा| झाला चमत्कार| डालड्याचे ऐस्क्रीम| कोण वितळे|| पाहून विडीओ| दाटे मळमळ| प्रत्येक पुरीतले पाणी| भासे पिवळे|| नम्बर १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारी समर्थ

पर्यायी

तिमा
Tue, 06/14/2011 - 19:35 नवीन
दुधाशिवाय सेल्युलोज(सीएमसी), वनस्पती तेल, कुठल्याही स्त्रोतापासून मिळवलेली चरबी, इत्यादि कच्च्या मालापासून 'आइसक्रीम' तयार करता येते व ते खाल्लेही जाते. ज्यांना शुध्द दुधापासून केलेले आइसक्रीमच खायचे असेल त्यांनी ते घरीच बनवावे. शुध्द आइसक्रीम बाजारात कुठेही मिळणार नाही, अगदी 'नॅचरल्स' असे लिहिले असले तरी.
  • Log in or register to post comments

बाकी सर्व पिणार्‍यांना फक्त

सुधीर१३७
Tue, 06/14/2011 - 20:08 नवीन
बाकी सर्व पिणार्‍यांना फक्त डालडाची अलर्जी का ?.......................... :wink:
  • Log in or register to post comments

कारण...

पिवळा डांबिस
Wed, 06/15/2011 - 09:43 नवीन
डालडा 'चढत' नाही!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर१३७

मस्तारामच्या काही कथा तरुण

अविनाशकुलकर्णी
Tue, 06/14/2011 - 21:24 नवीन
मस्तारामच्या काही कथा तरुण वाचकांना वाचायला मिळाव्यात ह्या उद्देशाने श्री. मस्ताराम ह्यांच्या नावासहीत इथे दिल्यास चालतील काय ? --------------------------------------------------- मस्त राम जुना झाला...अर्थात पराला सांगणे न लगे... सा~या साईट्स कोळुन प्यायल्या असतिल ह्या विभुतिने....... ========================================== पाहून विडीओ| दाटे मळमळ| प्रत्येक पुरीतले पाणी| भासे पिवळे| साष्टांग दंडवत.....हसुन ठार मेलो
  • Log in or register to post comments

आइस्क्रीम घरी बनवणे फारसे

पक्या
Wed, 06/15/2011 - 01:32 नवीन
आइस्क्रीम घरी बनवणे फारसे अवघड नाहिये. पण वे़ळखाऊ काम आहे कारण दूधाला उकळी आणणे, ते गार करणे मग आईस्क्रिम ला लागणारे घटक पदार्थ दूधात मिक्स केल्यावर ते फ्रिजर मधे गोठवायला ठेवणे ह्यात बराच वेळ जातो. पण चविष्ठ आइस्क्रीम तयार होते. हल्ली आइस्क्रिम मेकर पण मिळतात बाजारात . त्याने ही प्रक्रिया अजून सोपी होत असावी. बाहेरचे खाण्यापेक्षा घरी आइस्क्रीम बनवलेले केव्हाही चांगले. पण आता खावेसे वाटले म्हणुन केले आणि लगेच खाल्ले असे घरी करता येणार नाही.
  • Log in or register to post comments

ऑइल स्प्रेड हा प्रकार काय

अभिज्ञ
Wed, 06/15/2011 - 05:05 नवीन
ऑइल स्प्रेड हा प्रकार काय असतो? हा दिसायला व चवीला देखील आपल्या साध्या बटर सारखाच असतो. ह्यात देखील डालडाच वापरतात का? अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

स्वस्त तूप

हुप्प्या
Wed, 06/15/2011 - 05:16 नवीन
तूप स्वस्तात बनवणारे लोक चक्क प्राण्याची चरबी वापरतात असे आढळले आहे. मेलेले उंदीर, कुत्रे, मांजरे, पक्षी, घुशी जे काही प्राणी मिळतील त्यांची चरबी वापरुन त्यांचा वापर मिठाया, अन्य तळलेले पदार्थ यात केला जातो. अर्थातच अनधिकृत रित्या. मागे पाकिस्तानमधे कुण्या पत्रकाराने ह्या इंडस्ट्रीचा पर्दाफाश केला होता. पाकिस्तानी लोक बहुतांशी मांसाहारी असले तरी त्यांनाही असे वाट्टेल ते खाणे आवडत नाही. अमके हलाल, तमके हराम असे त्यांचेही मांसाहाराचे निकष असतात. त्यामुळे ह्या रिपोर्टनंतर तिथे खळबळ माजली होती. पाकिस्तानात होते तर भारतात होणे सहज शक्य आहे. इथे पहा. http://www.youtube.com/watch?v=i8iRxwyPst0 तेव्हा आईस्क्रीममधे दूध न वापरता वेगळे काही वापरले तर ते रुचेलच असे नाही. विशेषतः डालड्याचे प्रतिस्पर्धी असे उकिरड्यावरील प्राण्यांपासून बनत असतील तर.
  • Log in or register to post comments

विनाशकाले.....

पिवळा डांबिस
Wed, 06/15/2011 - 09:20 नवीन
पाकिस्तानी लोक बहुतांशी मांसाहारी असले तरी त्यांनाही असे वाट्टेल ते खाणे आवडत नाही. अमके हलाल, तमके हराम असे त्यांचेही मांसाहाराचे निकष असतात. काहीतरीच काय सांगता? असं काही बोलू नका राव!!! काय इथून तडीपार व्हायचंय का? पाकिस्तानात होते तर भारतात होणे सहज शक्य आहे. आता तर नक्कीच तडीपार होणार!!! चला, चपला शोधायला लागा!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

१००%

गोगोल
Wed, 06/15/2011 - 09:28 नवीन
>>> पाकिस्तानी लोक बहुतांशी मांसाहारी असले तरी त्यांनाही असे वाट्टेल ते खाणे आवडत नाही. अमके हलाल, तमके हराम >>> असे त्यांचेही मांसाहाराचे निकष असतात. १००% खरे आहे. कधी पाकीस्तानी लोकांबरोबर बाहेर खायला गेलात तर ते नेहमीच व्हेजिटेरियन खातात हे कळून येईल. त्यांना माहीत असलेल्या पाकीस्तानी रेस्तेरां मध्येच (की जिथे हलाल मिळते) ते मांसाहार करतात. ईतकेच काय तर वॉलमार्ट सारख्या ठिकाणावरून मीट पण विकत घेत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

मी शिंचा सहमत हो!!! मी इथे

पिवळा डांबिस
Wed, 06/15/2011 - 09:34 नवीन
मी शिंचा सहमत हो!!! मी इथे फक्त हुप्प्याला चपला घालायला मदत करतोय!!!! :) आता जाकार्ताला जाऊन राहू देत आणि डॉनमध्ये प्रतिकिया देऊ देत!!!!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल

यावरुन एक आठवल..

शैलेन्द्र
Wed, 06/15/2011 - 09:33 नवीन
यावरुन एक आठवल.. मिठायांपेक्षाही, बेकरी आयटेममधे अ‍ॅनीमल फॅट(दुधाचे सोडुन) सर्रास वापरले जाते. खास्करुन "बडेका" फॅट.. कारण बीफ सगळे एक्स्पोर्ट होते, स्थानीक बाजरपेठ जवळ जवळ नाहीच, आणी एक्स्पोर्टला जास्त फॅट चालत नाही. त्यामुळेच खारी, बटर, मावा केक असे पदार्थ बनवताना सर्रास चरबी टाकतात. जर तुम्ही निरीक्षण केलेत तर अशा बेकर्‍या या कत्तल्खान्याच्या जवळ असतात.. कुर्ला/ देवनार- कल्याण भिवंडी ही काही उदाहरण..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

चव!

पिवळा डांबिस
Wed, 06/15/2011 - 09:35 नवीन
त्यामुळेच खारी, बटर, मावा केक असे पदार्थ बनवताना सर्रास चरबी टाकतात. पण लागतात मस्त!!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

मग काय.. तसही डालडापेक्षा

शैलेन्द्र
Wed, 06/15/2011 - 10:06 नवीन
मग काय.. तसही डालडापेक्षा जनावराची चरबी खाण कधिही चांगल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

सहमत आहे. म्हणून खारी

नितिन थत्ते
Fri, 06/17/2011 - 18:54 नवीन
सहमत आहे. म्हणून खारी बिस्किटं नेहमी डोक्यावर ट्रंक घेऊन येणार्‍या बेकरीवाल्याकडून घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

डोक्यावर ट्रंक....

सूर्यपुत्र
Fri, 06/17/2011 - 22:22 नवीन
>>म्हणून खारी बिस्किटं नेहमी डोक्यावर ट्रंक घेऊन येणार्‍या बेकरीवाल्याकडून घ्यावी. अनुस्वार वाचलाच नाही..... गडबडलो की... :) -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

जेली?

पिवळा डांबिस
Wed, 06/15/2011 - 09:42 नवीन
बाकी लोकं ज्या जेलीज खातात (आणि तिचे भाऊबंद!!) त्या गुरांच्या हाडं आणि खुरांपासून कॉलेजेन काढून बनवलेल्या असतात जगभर!!!!! लोकं पांढरीशुभ्र साखर खातात ती पांढरीशुभ्र बनवण्यासाठी गुरांच्या हाडांपासून बनवलेला कोळसाच वापरतात जगभर!!!! ;)
  • Log in or register to post comments

ओ पि.डां.

पैसा
Wed, 06/15/2011 - 09:45 नवीन
आज या झाडावर बसायला भरपूर वेळ दिसतोय तुम्हाला! आज काय सगळ्यांच खाद्यपदार्थांचें पोस्ट्मॉर्टेम का? आणखी येऊ द्या! म्हणजे रेवतीचं काम वाढत जाईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

काही

गोगोल
Wed, 06/15/2011 - 09:51 नवीन
दिवसांनी रेवती ताई शेती करायला लागतील .. मग गाय बकरी पण पाळतील. सर्व काही घरच्या घरीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

डांबिस कशाला बसतोय झाडावर?

पिवळा डांबिस
Wed, 06/15/2011 - 10:01 नवीन
इथे जे बीन बरीटो मिळतं त्यात डुकराचा (बेकनचा) स्टॉक घातलेला असतो.... फ्रेन्च फ्राईज गुरांच्या चरबीत तळलेल्या असतात... अगदी जिथे तेल वापरून फ्राईज तळल्यात अशा ठिकाणीदेखील फ्राईज आणि रक्ताच्छदित मांस एकाच तेलात तळतात.... कंट्री रेस्तॉरंटमधल्या भाज्या ह्या गाय/ डुकराचा स्टॉक घालून चविष्ट केलेल्या असतात!!!!! :) (बाकी आम्ही आईस्क्रिम घरीच बनवतो!! कारण आम्हाला आंबा आईस्क्रीम खूप आवडतं!!!!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

रेवतीचं काम वाढत जाईल! अच्छा!

रेवती
Wed, 06/15/2011 - 15:42 नवीन
रेवतीचं काम वाढत जाईल! अच्छा! पाशवी शक्तीच माझ्या विरुद्ध! आता बघा देते का प्रतिसाद कुठे! खरडीतून रिक्वेष्टा पाठवाल....... काही म्हणून टंकायची सोय राहिली नाही आजकाल!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अग अग,

पैसा
Wed, 06/15/2011 - 18:57 नवीन
आपलं ट्रेड शिक्रेट सगळ्याना काय सांगतेस! मी व्यनि करीन ना तुला! (आणि अजून भारत वर्ल्डकप जिंकल्याबद्दल मी तुला २५ प्रतिसाद देणारे ना पण एका धाग्यावर! ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

उपवासाचे शाबु तयार करताना

वेताळ
Wed, 06/15/2011 - 09:56 नवीन
त्याना गोल गोळी सारखा आकार प्राप्त होण्यासाठी कातडी पिशवीत ते घोळावे लागते.
  • Log in or register to post comments

काय्पण..

शैलेन्द्र
Wed, 06/15/2011 - 10:02 नवीन
काय्पण..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

तरीही साबुदाणे हे उपासाला न

पिवळा डांबिस
Wed, 06/15/2011 - 10:06 नवीन
तरीही साबुदाणे हे उपासाला न धुता फक्त पाण्याचा शिडकावा मारून वापरले जातात ना? बाकी आमचा ह्या साबुदाण्याच्या खिचडीवर अंमळ भारीच जीव हो!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

बाकी आईस्क्रिमबद्दल!

पिवळा डांबिस
Wed, 06/15/2011 - 10:15 नवीन
केवळ नीलकांताने आमच्यावर अवांतर केल्याचा आरोप ठेवू नये म्हणुन.... ;) त्या आईस्क्रीमच्या कंपन्या जर दुधाच्या धंद्यात असतील उदा. आरे, अमूल वगैरे.... त्या अतिरिक्त दुघापासूनच आईस्क्रीम बनवतात असं समजायला प्रत्यवाय नसावा... कारण या कंपन्या स्वतःचे प्रॉडक्ट सोडून उगाच वनस्पती तूप विकत घेउन त्याचं आईस्क्रीम बनवायचा उपद्व्याप करतील असं वाटत नाही... द कॉस्ट ऑफ द गुडस मॅन्युफॅक्चर्ड वुड नॉट सपोर्ट दॅट!!!! एन्जॉय!!! || डांबिस म्हणे आता, उरलो उपकारापुरता || :)
  • Log in or register to post comments

+१ एकदम पटलं काकानु!!

प्राजु
Wed, 06/15/2011 - 20:53 नवीन
+१ एकदम पटलं काकानु!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

पण वाडीलाल ,अमुल किंवा नॅचरल्सचे

वेताळ
Wed, 06/15/2011 - 10:18 नवीन
आईस्क्रिम सगळीकडे उपलब्द होणे कठिण आहे म्हणुन डालडा कंपण्यानी डालडा आईस्क्रिम बाजारात आणले असावे.
  • Log in or register to post comments

आँ

नितिन थत्ते
Wed, 06/15/2011 - 10:36 नवीन
लेखातली बरीचशी माहिती चुकीची आहे . ब्रॅण्डेड आइसक्रीम खायला काहीच हरकत नाही असे वाटते. कमलेश कुलकर्णी यांनी या माहितीची ऑथेंटिसिटी तपासली आहे का?
  • Log in or register to post comments

आँ?

पिवळा डांबिस
Wed, 06/15/2011 - 10:40 नवीन
लेखातली बरीचशी माहिती चुकीची आहे . इतका सात्विक उद्रेक? थत्तेकाकांना आईस्क्रीम भलतंच प्रिय दिसतंय!!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

आइसक्रीम आवडतेच पण

नितिन थत्ते
Wed, 06/15/2011 - 11:50 नवीन
आइसक्रीम आवडतेच पण सात्विक संताप नाही. :) सदरचा लेख आम जनतेच्या लिहिला असावा म्हणून माझ्या कडे असलेली माहिती शेअर करीत आहे. आइसक्रीम सदृश विकले जाणारे दोन प्रकार असतात. १ स्टॅण्डर्ड आइसक्रीम २. फ्रोझन डेझर्ट स्टॅण्डर्ड आइसक्रीम मध्ये मिल्क फॅट असणे आवश्यक. मात्र ती फ्रेश क्रीमच्याच स्वरूपात असेल असे नाही. बटर सुद्धा असते. (तूप नक्की नसते कारण ते मिक्स होऊन स्टेबल राहू शकत नाही). फ्रोझन डेझर्ट मध्ये मिल्क फॅट ऐवजी व्हेजिटेबल फॅट (म्हणजे डालडा असे नव्हे) असते ते सुद्धा काही प्रमाणात असते. म्हणजे मिल्क फॅट आणि वेजिटेबल फॅटचे मिश्रण. ही किंमतीला कमी असतात. बहुतेक आइसक्रीम उत्पादकांकडे दुधाचा पक्का सोर्स नसतो. दुसरे म्हणजे आइसक्रीमची मागणी जेव्हा उन्हाळ्यात सर्वाधिक असते तेव्हा दुधाचे उत्पादन सर्वात कमी असते. त्यामुळे मिल्क पावडर आणि व्हेजिटेबल आणि मिल्क फॅटचे मिश्रण वापरून फ्रोझन डेझर्ट हा प्रकार बनवला जातो. जेव्हा व्हेजिटेबल फॅट वापरलेले असते तेव्हा पी एफ ए (भेसळ प्रतिबंधक कायदा) नुसार ते फ्रोझन डेझर्ट म्हणूनच विकावे लागते आणि कन्टेन्स व्हेजिटेबल फॅट असे डिक्लरेशन छापावे लागते. हा प्रकार आइसक्रीम म्हणून विकता येत नाही. (अर्थात या दोन्ही गोष्टी सिगरेटच्य पाकीटावरील सूचनेसारख्याच बारीक अक्षरात कोपर्‍यात लिहिलेले असणार) माझ्या माहितीप्रमाणे जे ब्रॅण्ड पूर्वी फ्रोझन डेझर्ट बनवून विकत असत तेही हळू हळू मिल्क बेस्ड आइसक्रीम कडे वळत आहेत. म्हणजे लेखात म्हटल्याप्रमाणे दुधाकडून डालडाकडे नव्हे तर डालडाकडून दुधाकडे. नावे जाहीर करता येणार नाहीत. क्षमस्व. सदर लेखातील व्यक्ती जसा दावा करीत आहे की थंड ठेवले नाही तरी टिकून राहते वगैरे.... ही चुकीची आहे. फ्रोझन डेझर्टदेखील थंड (उणे १६ अंश सेल्शिअस चू भू दे घे) ठेवावे लागते कारण त्यातही मिल्क सॉलिड्स आनि मिल्क फॅटस असतातच. या तापमानाला ठेवलेले आइसक्रीम किंवा फ्रोझन डेझर्ट किमान सहा महिने टिकून राहते. म्हणून माझ्या मते ब्रॅण्डेड आइसक्रीम (फ्रोझन डेझर्टसुद्धा) खायला हरकत नाही. बाकी बाजारात अनेक लोकल ब्रॅण्ड्स असतात. त्याबाबत माहिती/खात्री नाही. अधिकची माहिती म्हणजे केटरिंग पॅक हे आइसक्रीम ऐवजी फ्रोझन डेझर्ट असण्याची खूप शक्यता असते. अवांतर: सर्व आइसक्रीम मध्ये सुमारे ४५ % हवा असते. आणि ती हवा एस्केप होऊ नये म्हणून काही गम्स. त्याला भेसळ म्हणावे का? अतिअवांतर: हल्ली बाजारात बटर सब्स्टिट्यूट म्हणून काही ब्रेडस्प्रेड मिळतात आणि ते बटरपेक्षा हेल्दी असल्याचे क्लेमही असतात. ते देखील असेच मिल्क फॅट आणि व्हेजिटेबल फॅटचे मिश्रण असते. त्याला टेक्निकल भाषेत मार्जरीन/मार्गारिन म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

थत्ते काकांचा प्रतिसाद

अभिज्ञ
Wed, 06/15/2011 - 12:14 नवीन
थत्ते काकांचा प्रतिसाद आवडला. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

छान!

धमाल मुलगा
Wed, 06/15/2011 - 13:33 नवीन
माहितीपुर्ण प्रतिसाद. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अरे क्या हो दादा तुमने तो

इरसाल
Wed, 06/15/2011 - 14:47 नवीन
अरे क्या हो दादा तुमने तो सबके फसफसनारे बुडबुडे पे पानीच डाल दिया ये अच्चा प्रतिसाद देके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

काय वेळ आली आहे. थत्ते

मृत्युन्जय
Wed, 06/15/2011 - 16:01 नवीन
काय वेळ आली आहे. थत्ते चाचांचा प्रतिसाद आवडला असे म्हणावे लागते आहे :) जोक्स अपार्ट. माहितीपुर्ण प्रतिसाद. चाचांची वेगवेगळ्या कायद्यांच्या तरतुदींवरचा अभ्यासही जबरदस्त आहे असे म्हणावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

खूप बोगस लागतं ते

मालोजीराव
Wed, 06/15/2011 - 18:01 नवीन
खूप बोगस लागतं ते मार्गारिन....हे म्हणजे दारूला सब्स्टिट्यूट म्हणून कोरेक्स पिण्यासारखं आहे...आणि चिकन ला सब्स्टिट्यूट म्हणून सोयाबीन खाण्यासारखं आहे... ;) आपण बाबा अमूल बटर वर खुश आहोत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

थत्तेकाका आईस्क्रीमवाले,

पिवळा डांबिस
Fri, 06/17/2011 - 09:46 नवीन
सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद! मुलांनो, यावरून थत्तेकाका हा एक निव्वळ चांचा नसून आपल्या सर्वांचा चाचा आहे हेच सिद्ध होते!!! आपला, पिडां स्कॉचवाले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

योग्य माहिती

विसुनाना
Fri, 06/17/2011 - 17:32 नवीन
प्रतिसादातील माहिती योग्य आहे. अवांतर : 'क्वालिटी वॉल्स' पहा म्हणजे पटेल. आणि आईस्क्रीम ते आईस्क्रीम ! दुधाचं असलं काय? पाण्याचं असलं काय? किंवा डालड्याचं असलं काय? गारेगार गोड असलं म्हणजे झालं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

आवडले

अनुराग
Sat, 06/18/2011 - 13:08 नवीन
योग्य प्रतिसाद, आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

थत्ते चाचा, >>कमलेश कुलकर्णी

अन्या दातार
Wed, 06/15/2011 - 10:50 नवीन
थत्ते चाचा, >>कमलेश कुलकर्णी यांनी या माहितीची ऑथेंटिसिटी तपासली आहे का? अन्यथा त्यांनी गप्प रहावे असे सुचवायचे आहे का?? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

हायसे वाटले!

मॉर्फिअस
Wed, 06/15/2011 - 15:48 नवीन
लेख वाचल्यापासुन आईस्किम खाताना डालड्याची चव शोधत होतो... नितिन थत्तेंचा प्रतिसाद वाचुन खरेच हायसे वाटले.. आता पुन्हा आईस्किम चविने (डालड्याच्या नव्हे) खाता येईल...
  • Log in or register to post comments

बरेचदा आइस्क्रीमचा घट्टपणा

विजुभाऊ
Wed, 06/15/2011 - 18:27 नवीन
बरेचदा आइस्क्रीमचा घट्टपणा कायम रहावा म्हणुन त्या जिलेटीन घालतात. हे जिलेटीन सरसाप्रमाणेच प्रणीज पदार्थापासून बनवतात.
  • Log in or register to post comments

प्राणीज

नितिन थत्ते
Wed, 06/15/2011 - 20:14 नवीन
जिलेटिन प्राणीज असते हे बरोबर आहे. पण आइसक्रीममध्ये जिलेटिन नसते. त्या ऐवजी ग्वार गम हा व्हेजिटेबल गम वापरतात. (आइसक्रीम मिक्स म्हणून जे इन्स्टंट मिक्स मिळते -वेकफील्ड वगैरे- त्यात जिलेटिन असू शकेल).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

>> पण आइसक्रीममध्ये जिलेटिन

पक्या
गुरुवार, 06/16/2011 - 12:19 नवीन
>> पण आइसक्रीममध्ये जिलेटिन नसते. काही आइसक्रीममध्ये जिलेटिन वापरलेले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

>> पण आइसक्रीममध्ये जिलेटिन

पक्या
गुरुवार, 06/16/2011 - 12:19 नवीन
>> पण आइसक्रीममध्ये जिलेटिन नसते. काही आइसक्रीममध्ये जिलेटिन वापरलेले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा