✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आईस क्रीम की.....????

छ
छत्रपति यांनी
Tue, 06/14/2011 - 14:42  ·  लेख
लेख
आईस्क्रीम खायला तसं सगळ्यांनाच आवडतं. आणि आता तर उन्हाळाच काय पण १२ महिने आईस्क्रीम खायची एक संस्कृती तयार झाली आहे. मधुमेही रुग्णांसाठी देखील शुगर फ्री पर्याय उपलब्घ झाले आहेत. बड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत. पण याच आईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत. कद...ाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत. मध्ये एका मिटींगसाठी आमच्या एका सरांनी मला हॉटेलमध्ये बोलावलं होत. तेव्हा माझ्या आधी सरांची अजून एका माणसाबरोबर मिटींग चालू होती. मी त्यांच्या मिटींगचा प्रेक्षक झालो गेलो. तो माणूस आईस्क्रीमचे निरनिराळे आणि नवनवीन फ्लेवर्स बनवतो आणि आईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे आउटलेट उघडायचे आहे. त्यासाठी फायनांस करा म्हणून तो त्या सरांना पटवत होता. तो जे काही सांगत होता ते ऐकून मी उडालोच. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने अनेक नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे काही कंपन्यांनी विकत घेतली असून सध्या मार्केटमध्ये लोकांना खूप आवडताहेत. ते आवडणाऱ्यात मीही एक होतोच. तो म्हणाला ; “आता मी लेमन आईस्क्रीम मध्ये ४ नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे मला कुठल्याच कंपनीला विकायचे नाहीयेत. हे फ्लेवर्स लोकांना खूप आवडणार आहेत. ज्याचा आपल्याला आउटलेट उघडून फायदा उठवता येईल. ” त्यावर सरांनी त्याला एक साधा प्रश्न विचारला की ; “समजा आपण आउटलेट उघडलं आणि तुझा हा लेमन फ्लेवर लोकांना आवडला नाही तर तू त्या लेमन फ्लेवरचे जे उत्पादन करशील ते किती दिवस राहू शकत? लोकांना ते आवडेपर्यंत जो काळ जाईल तोवर ते आईस्क्रीम वाया जाणार मग ते नुकसान कुणी सोसायच? ”. पुढे सरांचे अनेक प्रश्न होतेच. वीज खर्च, दुध , कच्चा माल इत्यादी. त्यावर तो आपले तंत्रज्ञान किती भारी आहे हे सांगताना म्हणाला की ; “त्याची काही काळजी करू नका. मुळात हे आईस्क्रीम कधीच खराब होत नाही. अगदी आठ दिवस लाईट नसले तरीही... ” आम्ही चकित झालो . सरांनी विचारलं ; “ते कस काय? दुध आहे ते खराब होणारच.” तो तत्काळ म्हणाला ; “छे छे. दुधापासून आईस्क्रीम बनवण्याचे दिवस केव्हाच संपलेत. ” “मग कशापासून बनवतोस बाबा आईस्क्रीम ?” “डालडा तुपापासून!” “डालडा तूऽऽऽऽप?” “आज काळ एखाद दोन कंपन्या सोडल्या तर सगळे डालडाच वापरतात आणि त्यामुळेच ते परवडतं. आता आईस्क्रीम मध्ये एकही थेंब दुध नसतं. डालडाला थोडी प्रोसेस केली आणि त्यात फ्लेवर्स मिक्स केले की कळतही नाही की डालडा तूप आहे. शिवाय ते दुधाच्या आईस्क्रीमपेक्षा खाताना जास्त मऊ लागतं. आणि तेच लोकांना आवडतं. डालडा आईस्क्रीम जिभेवर येताच त्वरित विरघळते आणि गिळले जाते. शिवाय थंडपणा आणि तुपकटपणा यामधून तोंडात जे तयार होते ते नक्की काय आहे हा विचार लोक करीत नाहीत. पण तेच लोकांना आवडते. लोक अशाच स्वादाला पसंती देतात. ” तो भरात येऊन त्याच्या तंत्राच मार्केटिंग करत होता आणि आम्ही आमचा इतिहास पोटात ढवळत बसलो होतो. पुढे तो सांगत होता; “डालडा आईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं की ते डालडा सामान्य तापमानात कितीही काळ राहिला तरीही अजिबात खराब होत नाही. याउलट दुधाला मात्र सारखं फ्रीजिंग लागतं. शिवाय दुधाच्या आईस्क्रीमला ८-१० दिवसांनी वास येतो. आणि १५ दिवसात ते खराब होऊन जातं. त्यामुळे खर्च वाढतो. डालडा आईस्क्रीम २ वर्ष फ्रीजच्या बाहेर राहिलं तरी फरक पडत नाही, त्याचे फ्लेवर्सही खराब होत. नाहीत. डालडा आईस्क्रीमसाठी लाईट खुपच कमी लागते. १० डिग्री तापमानातही त्याचा आईस्क्रीम फील येतो. तर दुधाच्या आईस्क्रीमसाठी उणे तापमानाची (नक्की किती ते लक्षात नाही.) गरज असते. सहाजिकच दुधाच्या आईस्क्रीमच्या विजेचा खर्च वाढतो. शिवाय दुधापेक्षा डालडा कच्चा माल म्हणून जास्त स्वस्त आहे. तस ते हाताळणी आणि प्रोसेसलाही खूप सोपे आहे. दुधाचे रोजचे कलेक्शन, त्याचे फ्रीजिंग आणि साठवण याचा विचार करता त्याची जी बेसिक किंमत होते. त्या किंमतीतही लोकांना ते आईस्क्रीम खाण परवडू शकत नाही. डालडा आईस्क्रीम मध्ये खूप मोठे प्रोफिट मार्जिन आहे. म्हणूनच आजकाल इतके पॉश आईस्क्रीम आउटलेट निघू शकतात. ” “डालडा आईस्क्रीम उत्पादनाचा आणखी एक फायदा असा आहे की एकच प्रोडक्शन युनिट चालवून भारत भर कुठेही आपण याचे वितरण करू शकतो. तेही कमी खर्चात. दुधाच्या आईस्क्रीमला तो बेनिफिट नाही. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शन युनिट सुरु करावे लागेल.” तो रंगात आला होता. त्याने त्याचे नवीन लेमन फ्लेवर टेस्ट करायला दिले. मला डालडा आईस्क्रिम खाल्ल्यामुळे नक्की काय तोटा होतो ते माहीत नाही. पण त्यानंतर आईस्क्रीम खायची मजा निघून गेली इतकं नक्की. कमलेश कुळकर्णी या॓ज कडून साभार...!!!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25708 वाचन

💬 प्रतिसाद (105)

प्रतिक्रिया

आई ग्गं..

मस्त कलंदर
Tue, 06/14/2011 - 15:09 नवीन
फेसबुकावर या लेखाची फीड पाहून पुन्हा एकदा स्वतः 'खादाड' असूनही आम्हांला हे खाणं कसं चांगलं नाही आणि ते खाणं कसं चांगलं नाही असं सांगणार्‍या अमिताबैंचा लेख असेल असं वाटलं होतं. तरी हिय्या करून मिपा रिफ्रेश केलं, आणि लेखकाचं नांव पाहून 'किमान आईस्क्रीम खाऊ नका' असं म्हणणारा लेख नसेल असं वाटलं. पण लेख वाचून अमिताचं सांगणं परवडलं असं वाटतंय. छे:, इथून पुढे आईस्क्रीम खाववणार नाही.. :-( आता आणखी कोणत्या गोष्टीत कशाची भेसळ असेल असे प्रश्न पडायला लागलेयत..
  • Log in or register to post comments

अरे देवा!

पैसा
Tue, 06/14/2011 - 15:17 नवीन
आईस्क्रीम म्हटलं की आता "आय स्क्रीम" असं म्हणायची वेळ आली!
  • Log in or register to post comments

भयंकर

मराठी_माणूस
Tue, 06/14/2011 - 15:27 नवीन
हे वाचुन धक्काच बसला ? कोलेस्ट्रोलचे काय ? आज काळ एखाद दोन कंपन्या सोडल्या तर सगळे डालडाच वापरतात ह्या एक दोन कंपन्या कोणत्या ? माहीती बद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments

अरे बापरे.....

नन्दादीप
Tue, 06/14/2011 - 15:31 नवीन
अरे बापरे..... परवाच अमुलच्या "५० रु.त अनलिमिटेड" ऑफर मधे चेपून आईस्क्रीम खाल्ल.... आता काय होणार ??? किती कॅलरीज, फॅट्स वाढल्या असतील?? देवा.....
  • Log in or register to post comments

कमलेश कुळकर्णी या॓ज कडून

परिकथेतील राजकुमार
Tue, 06/14/2011 - 15:31 नवीन
कमलेश कुळकर्णी या॓ज कडून साभार...!!!
??? म्हणजे त्यांच्या परवानगीने की सरळ उचलले आहे ?
  • Log in or register to post comments

अर्थ?

धमाल मुलगा
Tue, 06/14/2011 - 15:46 नवीन
साभार ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? आणि उचललेले असलेच तरी आपल्यासोबत आणखी चारजणांना कळावे अशा उद्देशानं दिलेलं दिसतंय. उगा ह्याची कविता, त्याची गोष्ट चोरून आणलेली नाही असं दिसतंय. शिवाय, मुळ लेखकाला द्यायचे ते क्रेडिट दिले गेलेले दिसतंय. मग उगाच तिरकं जाण्यात काय हशील?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आणि उचललेले असलेच तरी

परिकथेतील राजकुमार
Tue, 06/14/2011 - 16:11 नवीन
आणि उचललेले असलेच तरी आपल्यासोबत आणखी चारजणांना कळावे अशा उद्देशानं दिलेलं दिसतंय. उगा ह्याची कविता, त्याची गोष्ट चोरून आणलेली नाही असं दिसतंय. शिवाय, मुळ लेखकाला द्यायचे ते क्रेडिट दिले गेलेले दिसतंय. मग उगाच तिरकं जाण्यात काय हशील?
मान्य. मस्तारामच्या काही कथा तरुण वाचकांना वाचायला मिळाव्यात ह्या उद्देशाने श्री. मस्ताराम ह्यांच्या नावासहीत इथे दिल्यास चालतील काय ? पराराम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

टोकच गाठायचं का?

धमाल मुलगा
Tue, 06/14/2011 - 16:26 नवीन
मस्तरामच्या कथा/पुस्तकं हे माझ्या माहितीप्रमाणे पोलिस कारवाई होण्याच्या भानगडीचं आहे. ह्या धाग्यात तसं काय आढळते? हे म्हणजे, एखाद्यानं फिरायला गेलं असताना एखाद्या भिजलेल्या माकडिणीचा फोटो काढून (स्वतः अथवा इतर कोणी) इथे चिकटवला म्हणून तुम्ही एखाद्या पॉर्नसाइटवरच्या विवस्त्र ओलेत्या स्त्रियांचे फोटो चढवण्याबद्दल विचारणा केल्यासारखे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मस्तरामच्या कथा/पुस्तकं हे

परिकथेतील राजकुमार
Tue, 06/14/2011 - 16:36 नवीन
मस्तरामच्या कथा/पुस्तकं हे माझ्या माहितीप्रमाणे पोलिस कारवाई होण्याच्या भानगडीचं आहे. ह्या धाग्यात तसं काय आढळते?
सगळ्याच कथा वा पुस्तके तशी आहेत कय? सदर लेखकाची अनके पुस्तके बस स्टँड, रेल्वे स्थानक, वृतपत्राचे स्टॉल्स, चौकीशेजारी विक्रीसाठी ठेवलेली सहज आढळतात.
हे म्हणजे, एखाद्यानं फिरायला गेलं असताना एखाद्या भिजलेल्या माकडिणीचा फोटो काढून (स्वतः अथवा इतर कोणी) इथे चिकटवला म्हणून तुम्ही एखाद्या पॉर्नसाइटवरच्या विवस्त्र ओलेत्या स्त्रियांचे फोटो चढवण्याबद्दल विचारणा केल्यासारखे झाले.
अंमळ गल्लत होते आहे काय? 'जे जे आपणास ठावे...' ह्या नात्याने सदर कथा इथे देण्यास काही हरकत आहे काय असा आमचा प्रश्न होता. आपण लगेच नको त्या (म्हणजे तुम्हाला हव्या त्या) विषयाकडे घसरलात. असो.. डान्रावांना सांगुन तुमचे एक चित्र काढू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

बरं..

धमाल मुलगा
Tue, 06/14/2011 - 16:46 नवीन
सगळ्याच कथा वा पुस्तके तशी आहेत कय? सदर लेखकाची अनके पुस्तके बस स्टँड, रेल्वे स्थानक, वृतपत्राचे स्टॉल्स, चौकीशेजारी विक्रीसाठी ठेवलेली सहज आढळतात.
त्या स्टॉलवाल्यांना विचारलं का कधी, किती हप्ता पोहोचतो राउंडच्या वेळी ते? (आता, हे असंच कशावरुन वगैरे मुर्ख आदर्शवादी स्टान्स घेऊ नका म्हणजे झालं. ) >>अंमळ गल्लत होते आहे काय? मुळीच नाही. >>'जे जे आपणास ठावे...' ह्या नात्याने सदर कथा इथे देण्यास काही हरकत आहे काय असा आमचा प्रश्न होता. आणि त्यावरचे आमचे मत आम्ही दिले. >>आपण लगेच नको त्या (म्हणजे तुम्हाला हव्या त्या) विषयाकडे घसरलात. अंहं, आमच्या की तुमच्या? मस्तरामसंबंधी अधिकारवाणीने बोलणारे तुम्ही की आम्हे? >>डान्रावांना सांगुन तुमचे एक चित्र काढू. =)) बोंबला! आम्ही काय भारतमाता आहोत की सरस्वती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

राष्ट्रपती

श्रावण मोडक
Tue, 06/14/2011 - 17:16 नवीन
आम्ही काय भारतमाता आहोत की सरस्वती?
नाहीच. त्यासाठी जे लागतं ते तुमच्याकडं नाही. आम्ही तुम्हाला राष्ट्रपुत्र म्हणू. बास्स? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

धन्यवाद.

धमाल मुलगा
Tue, 06/14/2011 - 18:07 नवीन
परंतु गरज नाही. आमची वंशावळ शुध्द आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

बोंबला! आम्ही काय भारतमाता आहोत की सरस्वती?

यकु
Tue, 06/14/2011 - 18:11 नवीन
बोंबला! आम्ही काय भारतमाता आहोत की सरस्वती? खि:खि:खि:!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

बापरे..

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/14/2011 - 15:38 नवीन
अहो, ईतका खत्री प्रकार चाल्लाय,मागे एका हिंदी न्युज चेनलवर पनीर आणी चक्क्याचा पंचनामा पाहिला होता...ही बातमी कशीही करुन एखाद्या पत्रकाराला पास ऑन करायला हवी...
  • Log in or register to post comments

म्हणजे?

धमाल मुलगा
Tue, 06/14/2011 - 15:43 नवीन
>>ही बातमी कशीही करुन एखाद्या पत्रकाराला पास ऑन करायला हवी... तुम्हाला असं वाटतं, की ही बातमी त्यांना ठाऊक नसेल? साहेब, भोळे असतो ते फक्त आपण... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बापरे..

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/14/2011 - 15:38 नवीन
अहो, ईतका खत्री प्रकार चाल्लाय,मागे एका हिंदी न्युज चेनलवर पनीर आणी चक्क्याचा पंचनामा पाहिला होता...ही बातमी कशीही करुन एखाद्या पत्रकाराला पास ऑन करायला हवी...
  • Log in or register to post comments

उत्तम!

धमाल मुलगा
Tue, 06/14/2011 - 16:03 नवीन
आता एकदा जन्माला येताना मानवी डिएनए मध्येही भेसळ सुरु झाली, की मग चक्र पुर्ण होईल. :) असो, बाकी, दुधाऐवजी वनस्पतीतूपापासून आईसक्रिम बनवण्याची युक्ती मात्र नामी आहे. आता, त्या कोणत्या एकदोन कंपन्या, ज्या अजूनही आईसक्रिम बनवण्यासाठी दुधाचा वापर करतात, त्यांची नावे/ब्रँड्स इथे द्या, म्हणजे लोकांना काय घ्यावं आणि काय टाळावं हेही कळेल. ------------ एकदम एक गोष्ट आठवली. जर आपण हे आईसक्रिम थोडा वेळ तसंच उघड्यावर ठेवलं तर ते वितळलेलं दिसतं. अगदी बर्‍यापैकी पातळ झालेलं असतं. वर लेखात म्हणल्याप्रमाणं, फ्रीझिंगशिवायही हे आईसक्रिम नीट राहू शकतं, तर मग पुठ्ठ्याच्या खोक्यांमधून वितरीत केलेले आईसक्रिम नीट कसे राहते? वितळत कसे नाही? त्यामुळं प्रश्न असा उभा राहिला, की हे सांगितलेलं नक्की खरं आहे का?
  • Log in or register to post comments

आपण खातोय ते भेसळयुक्त

कानडाऊ योगेशु
Tue, 06/14/2011 - 15:54 नवीन
आपण खातोय ते भेसळयुक्त (डालडा) आईसक्रिम आहे हे ओळखायचे कसे? म्हणजे काही वेळ फ्रिजबाहेर ठेवले तर हे आईसक्रिम इतर (दुधापासुन बनवलेले) आईसक्रिमप्रमाणे विरघळते का?
  • Log in or register to post comments

एक सोपी टेस्ट सांगतो.. वाटीभर

शैलेन्द्र
Tue, 06/14/2011 - 16:24 नवीन
एक सोपी टेस्ट सांगतो.. वाटीभर आईसक्रीम बाहेर ठेवा, नीट वितळल की जरा गरम करा.. आणी त्यात लींबु पिळा.. दुधाचे असेल तर आईसक्रीम फाटेल.. अमुलचे, नॅचरल्चे फाटते.. ईतर मी खात नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

एकदम लॉजिकल. आणि समजा

कानडाऊ योगेशु
Tue, 06/14/2011 - 18:12 नवीन
एकदम लॉजिकल. आणि समजा आईसक्रिम नाहीच फाटले तर आईसक्रिम घेणार्याची फाटेल..! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

खी खी खी ....

सोत्रि
Tue, 06/14/2011 - 20:42 नवीन
>>आईसक्रिम घेणार्याची फाटेल..! पोट फुटेपर्यंत हसलो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

आणि समजा आईसक्रिम नाहीच फाटले

मितभाषी
Sat, 06/18/2011 - 16:33 नवीन
आणि समजा आईसक्रिम नाहीच फाटले तर आईसक्रिम घेणार्याची फाटेल..!
फुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र हहह्ह्हाआआआहा मेलो हसुन. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

त्यापेक्षा एक अजून सोपी टेस्ट आहे...!!!

छत्रपति
Tue, 06/14/2011 - 20:17 नवीन
वाटीभर आईस क्रीम वाया घालवण्या पेक्षा, एखादी वात आईस क्रीम मधे भिजवून पेटवून बघा...!!! तेवत राहिली तर तुपा ऐवजी खुशाल आईस क्रीम वापरा...!!! तुमचे देव पण खुश होतील...!!! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

+१

सांगलीचा भडंग
Wed, 06/15/2011 - 08:39 नवीन
हि टेस्ट मस्त आहे ...पुढ्च्या वेळि आइस क्रिम आनले कि नक्कि करुन बघेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

चायला!!

स्वानन्द
Tue, 06/14/2011 - 15:55 नवीन
चायला!! :O
  • Log in or register to post comments

डालडा तरी अस्सल वापरतात का ते

स्पा
Tue, 06/14/2011 - 15:58 नवीन
डालडा तरी अस्सल वापरतात का ते सुद्धा ...... हॅ हॅ हॅ
  • Log in or register to post comments

मला आता असा प्रश्न पडलाय...

सूर्यपुत्र
Tue, 06/14/2011 - 15:59 नवीन
की डालड्यात कशा-कशाची भेसळ असेल?? -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments

+१ टु धमु, खरंच मी तरी

५० फक्त
Tue, 06/14/2011 - 16:18 नवीन
+१ टु धमु, खरंच मी तरी आजपर्यंत आईस्क्रिम कधीच न विरघळता तसंच राहिलेलं बहितलं नाही. पण डालडा मात्र थोडासा पातळ झालेला पाहिला आहे, तो सुद्धा धारा कंपनीचा. पण आपण अशाही एवढ्या गोष्टी भेसळ युक्त खातो त्यात अजुन आईस्क्रिमनं काय फरक पडणार आहे, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारी भेसळ कधीच कुणाच्या लक्षात आली नसेल हे थोडंसं अवघड वाटतंय.
  • Log in or register to post comments

ओव्हरफेचड

Nile
Tue, 06/14/2011 - 16:26 नवीन
डालडा तूपाबद्दल केलेले दावे ओव्हरफेच्ड वाटत आहेत. तूपाबद्दल फारशी माहिती नसल्याने कोणा जाणकाराने माहिती दिल्यास आवडेल, नाहितर शोधाशोध करता येईल. बाकी जरी डालडा तूपा पासून आईसक्रीम बनवलं तरी ते थंड ठेवायला पैसे जाणारच आहेत. थंड नसलेलं आईसक्रीम फार खपत असेल असं वाटतं नाही. तुपकटपणा घालवायला अन आईसक्रीमसारखी चव/फील यायला नक्की कीती प्रोसेसिंग खर्च येतो हे ही जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments

यात नवीन काही नाही

शरद
Tue, 06/14/2011 - 16:36 नवीन
सर्व जगभर दूध नसलेले आईसक्रीम तयार केले जाते. दुधाच्या आईसक्रीममध्ये व यामध्ये फरक एवढाच की दुधातील प्रोटिन्स व कार्बोहायड्रेट्स यात नसतात. पण या दोन गोष्टींकरता कोणी आईसक्रीम खात नाही. तेव्हा फार आरडाओरड करण्याचे कारण नाही. तक्रार करावयाची असेल तर ती "डालडा" बद्दल करा. डालडा म्हणजे हायड्रोजनेटेड फ़ॅट्स. तो नक्कीच आरोग्याला हानीकारक आहे. पण त्याला भारतात बंदी नाही. अमेरिकेत आहे (असे वाटते) व म्हणून मॅकडोनाल्डला एकदा उकळलेले तेल परत वापरता येत नाही. तेल उकळल्याने त्यातील नॉन-सॅच्युरटेड फ़ॅट्सचे रुपांतर सॅच्युरेटेड फ़ॅट्समध्ये होते. जर तुम्हाला डालडामध्ये केलेले फ़रसाण व जिलबी चालत असेल तर नवीन आईसक्रीम बिनधास्त खा. शरद
  • Log in or register to post comments

ग्लासभर दूध आणि ग्लासभर तूप (

स्वानन्द
Tue, 06/14/2011 - 16:55 नवीन
ग्लासभर दूध आणि ग्लासभर तूप ( तेही डालडा ) यामध्ये प्रमाण सारखे असले तरी कंटेंट चा फरक प्रचंड नाही का??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरद

थोडा शोध घेतल्यावर हे सापडले.

सूर्य
Tue, 06/14/2011 - 16:38 नवीन
थोडा शोध घेतल्यावर हे सापडले. मेलोरिन (?) म्हणजे वनस्पती तुपापासुन बनवलेले आईस्क्रीम. इथे एक प्रॉडक्ट बघा. अर्थात भारतात मिळते ते आईस्क्रीम मेलोरिन असते की दुधापासुन बनवलेले असते ही कल्पना नाही. - सूर्य.
  • Log in or register to post comments

चला ह्या वर्षी पाणीपुरी नंतर

माझीही शॅम्पेन
Tue, 06/14/2011 - 16:41 नवीन
चला ह्या वर्षी पाणीपुरी नंतर आईस-क्रीम सुध्धा वर्ज करावे लागणार ! मागे ठाण्याच्या मामालेदार मिसळपाव मध्ये जनावरांची चरबी टाकत असलेल्याची अफवा(?) होती (चु.भु.द्य.घ्या) भेसळीचा धंदा जोरात असल्याने भेसळ-पाव.कॉम सकेन्त स्थळ सुरू करावे म्हणतो !
  • Log in or register to post comments

अगदी! यावर्षीपासून पाणीपुरी

रेवती
Tue, 06/14/2011 - 18:40 नवीन
अगदी! यावर्षीपासून पाणीपुरी आणि आईस्क्रीम वर्ज्य. अमेरिकेत तरी दूध वापरतात असा अंदाज आहे. मागल्यावर्षी बेन अँड जेरी आईस्क्रीमची फ्याक्टरी बघायला गेलो होतो तेंव्हा तरी दूध दिसले बुवा! हे फक्त दाखवण्याचे दात होते कि काय असा प्रश्न पडलाय. आता काय काय म्हणून घरी बनवायचे? मिपावर चर्चा झाल्यापासून मी दही घरीच विरजायला सुरुवात केलिये. ब्रेडमेकर आणून त्यात ब्रेड तयार करून झालाय्.......बरेचदा! ज्याम घरीच करते. आता अजून कोणते काम वाढवून ठेवायचे? पापड कुर्डयांसारखी वाळवणेही करायची का? दुकानातून आणताना मनात सारखे प्रश्न असतात की ह्या पापड्या कुठे वाळवल्या असतील? घटक पदार्थ कोणत्या प्रतिचे असतील वगैरे. चांगल्या प्रतिचे, स्वच्छ खाद्यपदार्थ बनवून विकताना काय त्रास होतो ते काही कळत नाही. तसेही महाग असतातच.......आपल्याकडून पैसे घेतल्याशिवाय सोडतात का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

दहि का बुवा घरी?

मिसळपाव
Tue, 06/14/2011 - 21:44 नवीन
...........मिपावर चर्चा झाल्यापासून मी दही घरीच विरजायला सुरुवात केलिये....... दुवा देशील का? (आत्तापर्यंत अज्ञानात आनंद होता! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

बघते मिळतोय का. बराच जुना आहे

रेवती
Wed, 06/15/2011 - 00:23 नवीन
बघते मिळतोय का. बराच जुना आहे धागा. दह्याबद्दल अतोनात वाईत नाहीये काही तरी एकंदरीत बाजारचे चांगल्यात चांगल्या ब्रँडचे दही तारा असलेले येऊ लागले तसे खावेसे वाटत नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

इथे मिळेल ती माहिती

बहुगुणी
Wed, 06/15/2011 - 02:59 नवीन
या चर्चेत दह्याचा उल्लेख आला होता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ग्वार गम नाहि घालत आता पण ...

मिसळपाव
Wed, 06/15/2011 - 03:43 नवीन
...'पेक्टिन' घालतात. पेक्टिन फळात असतं आणि जॅम्/जेली ला घट्टपणा त्यामुळे येतो. घट्टपणा नाहि खरं - 'थलथलीत' पणा (रविवार सकाळ मधे ईडलीच्या रेसेपीत जसं थलथलीSSSSत भिजवायला सांगितलंय ना, तस्स्सं !!) तर दह्याच्या डब्यावर Ingredients बघ आणि फक्त 'Grade A Pasteurized Milk' असलेलंच दहि घे. आपली पट्टी जमवणारा पानवाला जसा थोडा हुडकावा लागतो ना, तसा थोडा शोध घ्यायला लागेल. उदा. हॅरिस-टीटरच स्टोअर ब्रँड. पण एकदा का समगोत्री दुकान/ब्रँड सापडला की 'जान जाय पण ब्रँड वही लाय' :-) सध्या Chobani वगैरे ग्रीक योगर्टसनी धुमाकूळ घातलाय. Ingredientsची यादी चार चार ओळीभर असते. एकदा(च) खाल्लं. छ्या - पेक्टिनमधे थोडं दुध घालून विरजतात बहुतेक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

घरीच विरजलेलं दही आता आवडायला

रेवती
Wed, 06/15/2011 - 04:52 नवीन
घरीच विरजलेलं दही आता आवडायला लागलय. बाजारातून एकदा जसा डबा आणला जातो तसेच अठवड्यातून एकदा, दोनदा विरजावे लागते. चिकट तारा अजिबात नाही येत. पूर्वी मुलाला दही खाल्ले की खोकला सुरु व्हायचा. आता वाटीवाटी दही खाल्ले तरी काही त्रास नाही. मी दूध व दही स्टोनीफिल्ड फार्मचे, ऑर्ग्यानिक आणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

तुम्हाला महिती नसलेली दह्याच॑ विरजण लावायची एक सर्वोत्तम पद्धत.

वायुपुत्र
गुरुवार, 06/16/2011 - 09:36 नवीन
१) दूध कोमट करुन घेणे. २) १ चमचा लोण्याचे विरजण लावणे. करून पहा. इतक॑ नैसर्गिक गोड दही जन्मात कधी खाल्ल॑ नसेल तुम्ही. खात्रीशीर वायुपुत्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

लोण्याच्या विरजणाची कल्पना

गवि
गुरुवार, 06/16/2011 - 10:19 नवीन
लोण्याच्या विरजणाची कल्पना नवीन आहे. साधारण किती महिन्यांत होते हे दही तयार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वायुपुत्र

साधारण किती महिन्यांत होते हे दही तयार ?

वायुपुत्र
गुरुवार, 06/16/2011 - 10:33 नवीन
आपल्याला जमिनीवर रहायची इच्छाच होत नाही की, आपला तो manufacturing defect आहे??? च्या मारी..., धू म्हणल॑ की धूवून बघा की एकदा तरी... का अग्निशामक दलाची गाडी बोलवायची आता त्या साठी???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हलके घ्या..

गवि
गुरुवार, 06/16/2011 - 10:48 नवीन
चिडलेत की काय भलतेच एवढ्यावरुन ? रेडिएटरमधे पाणी टाका हो.. गंमत केली हो जरा. साध्याशा कोपरखळीवरुन लगेच आमच्यातल्या मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टवर, धुण्याबिण्यापर्यंत आणि कमी पडेल म्हणून च्या मारी बिरी पर्यंत पोचलात.. की हा एक तुमचाही "मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट"च.. ? तुमची चूक नाही म्हणा.. असो. आयडिया चांगली आहे तुमची. कदाचित करुन पाहीन कधीतरी. हलके घ्या..शांत व्हा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वायुपुत्र

चिडलेत की काय भलतेच एवढ्यावरुन ? रेडिएटरमधे पाणी टाका हो..

वायुपुत्र
गुरुवार, 06/16/2011 - 10:59 नवीन
आम्हाला चिडायला जमतच नाही हो. आमच्या कूल॑ट ची टाकी कायमची भरलेली असते. राहिली गोष्ट कोपरखळीची, वायुपुत्रा ला कोपरखळी मारल्यावर तुम्ही काय त्याच्या कडून पान सुपारिची अपेक्षा ठेवणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

"तुमची चूक नाही म्हणा.. असो"

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/16/2011 - 13:12 नवीन
का हो, गवि? हे वायुपुत्रसाहेब पण पंढरपूरचेच आहेत काय? नाही म्हणजे, त्या तुमच्या वाक्यावरून मला 'त्याची काहीही चूक' नसलेला एक मित्र आठवला. त्याचाही असाच काही प्रॉब्लेम आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

शांत गदाधारी भीम, शांत !!!

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 06/16/2011 - 17:00 नवीन
शांत गदाधारी भीम, शांत !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वायुपुत्र

भेसळीचा धंदा जोरात असल्याने

सुहास..
Tue, 06/14/2011 - 16:46 नवीन
भेसळीचा धंदा जोरात असल्याने भेसळ-पाव.कॉम सकेन्त स्थळ सुरू करावे म्हणतो ! >>> =)) =)) आईसक्रीम, चॉकलेट आणि बिस्किटांपासुन खुप दुर असलेला
  • Log in or register to post comments

३ महीन्या पुर्वी मी

आनंद
Tue, 06/14/2011 - 16:57 नवीन
३ महीन्या पुर्वी मी वाडीलालवाल्यांचा प्लांट मध्ये २/३ दिवस होतो तेव्हां तरी दुधच वापरताना दिसत होत ती लोक.
  • Log in or register to post comments

चला म्हणजे वाडीलाल सेफ आहे

अमोल केळकर
Tue, 06/14/2011 - 17:47 नवीन
चला म्हणजे वाडीलाल सेफ आहे म्हणायला हरकत नाही :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

पण डालड्यावर काहीही प्रक्रिया

गवि
Tue, 06/14/2011 - 17:52 नवीन
पण डालड्यावर काहीही प्रक्रिया केली तरी दुधाच्या आईसक्रीमला लहानपणापासून चाखत आलेल्या आपल्या जिभांना वेगळी चव कळणार नाही का ? एवढे बेमालूम साम्य असेलसे वाटत नाही. की लहानपणापासून डालड्याचेच खात आलो?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा