Skip to main content

माझी पहिली कादंबरी ................

माझी पहिली कादंबरी ................

Published on 12/06/2011 - 12:15 प्रकाशित मुखपृष्ठ
रसिक आणि मिसळपावकर मित्र हो ................. माझी पहिली वहिली मराठी कादंबरी " सर्गारंभ" ही नुकतीच प्रकाशित झाली(मनोरमा प्रकाशन). सत्य आणि आभास ह्यांच्या सीमारेषा जेव्हा पुसट होतात, तेव्हा जाणीव आपल्याला नक्की काय दाखवतेय हेच कळेनासे होते. बौध्द वैज्ञानवाद्यांच्या मते, इंद्रियांना येणारे अनुभव व ज्या वस्तुंचे अनुभव येतात त्यांमध्ये भिन्नता नसते. आकाशात दिसणारा चंद्र व मी चंद्र पाहिला हे मनाला होणारे ज्ञान, एकच आहे. वेदान्तातला दृष्टि-सृष्टिवाद ही असाच काहीसा आहे. त्यामुळे भ्रम आणि सत्य ह्यांच्यात फार पुसट सीमारेषा असते. जर कुणी ह्या सीमारेषांमध्ये फसला तर ??????????????????????????
लेखनप्रकार

याद्या 4278
प्रतिक्रिया 26

अभिनंदन..........! एखादी भेट प्रत मिळेल काय ? ;) -दिलीप बिरुटे (फुकटा वाचक)

अभिनंदन ! आपले हे पुस्तक प्रकाशित करताना आलेले अनुभव वाचायला आवडतील. मलाही जरा मदत होईल. अर्थात प्रांजळ मत पाहिजे आहे.

सर्वांचे आभार............ सर्गारंभ म्हणजे... सर्गाची सुरुवात.. आता सर्ग म्हणजे उत्पत्ति-स्थिती-लय ह्यांचे चक्र .......... इंद्रियांना होणारा भास हा इंद्रियांसाठी सत्यच असतो, व इंद्रियांना अनुभवायला येणारे सत्य हे ही निरपेक्ष दृष्टीने भासापेक्षा वेगळे असते असे म्हणता येउ शकत नाही.... हा ह्या कादंबरीचा मुख्य आधारविषय आहे........... :)

In reply to by ईश आपटे

योगकारा ! मला वाटते हे तेच असावे. ह्युएनत्संगने यावर काम करण्यात त्याचे आयुष्य खर्ची घातले. महायानातील हा एक समजायला अत्यंत अवघड असा विषय आहे. मी याच्यावर पुर्वी बरेच वाचले होते. अर्थात इंग्लीशमधून. आपले पुस्तक घेऊन जरूर वाचेन.

In reply to by आत्मशून्य

अहो व्यासंग कसला ? मी Monkey चे मराठीकरण केले त्याच वेळी ह्युएनसंगचाही आभ्यास केला त्यात जे जे उल्लेख केले त्याचा थोडाफार अभ्यास केला एवढेच. एकूण तीन पुस्तके लिहायचा मानस आहे. मर्कटलीळामृत - Monkey - पूर्ण केले आहे. ह्युएअन्संगचा प्रवास - चालू केले आहे जमिनीवरून १०,००० मैल - चालू करायचे आहे. हे भाषांतर आहे. 10000 miles without a cloud या पुस्तकाचे. एवढे झाले की बौध्द धर्माला शब्दांची पुष्पांजली वहायची हा माझा संकल्प पूर्ण होईल. :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

त्याला संस्कृतमध्ये " योगाचार " असे म्हणतात. होय. डोक्याचा भुगा करणारे अनेक ग्रंथ नागार्जुनाने महायानात रचले आहेत :)

In reply to by ईश आपटे

इंद्रियांना होणारा भास हा इंद्रियांसाठी सत्यच असतो, व इंद्रियांना अनुभवायला येणारे सत्य हे ही निरपेक्ष दृष्टीने भासापेक्षा वेगळे असते असे म्हणता येउ शकत नाही हल्युसनेशन म्हणतात तसं काही का? नाही म्हणजे त्यात पण इंद्रियांना जे भासते तेच सत्य आहे असं पीडीत लोकांना वाटतं असं ऐकुन आहे.

In reply to by शिल्पा ब

हॅलोसिएशन हे ज्याला होत असते त्याला सत्यच वाटत असते. तसच काहीस. जे सत्य अनुभवयाला येत असेल ते ही हॅलोसिएशन नसेल कशावरुन ? असा काहीसा विषय आहे...........

पुस्तक कुठे मिळेल ? PDF download (विकत घेउनच म्हनत आहे मी, बरंका !) करता येइल काय ? चित्रावरुन तर पुस्तक छान वाटत आहे. शुभेच्छा !

In reply to by नरेशकुमार

चित्रावरुन तर पुस्तक छान वाटत आहे. काय राव... हा तुमचा निष्कर्श एसटी स्टँड आणि रेल्वे स्टेशनवरील बुक स्टॉलमधील पुस्तकाआड लपलेल्या पुस्तकांना कदाचित लागू होत असेल. पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहून पुस्तक कसे असेल हा निष्कर्श कसा काढता येईल? त्यासाठी पुस्तक वाचावेच लागेल. तुमच्या मतानुसार बरेचसे धार्मिक ग्रंथ उघडायलाही नकोत. कारण त्यांच्या मुखपृष्ठावर फक्त ग्रंथाचे नाव असते. चित्र वगैरे काहीही नसते. हलके घ्या :) - धनाजीराव वाकडे

मन:पुर्वक अभिनंदन !!! पुस्तक प्रकाशित करणे हे एक दिव्य असतं असं खुप लेखकांच्या आत्मपरीचयातून वाचलेले आहे. जर तुमचे जे काही पुस्तक छापण्याच्या वेळचे भले बुरे अनुभव लिहू शकलात तर उत्तम होईल. तुमचे हे पुस्तक पुण्यात कुठे मिळेल? - धनाजीराव वाकडे

विषय तितकास आवडीचा नसल्याने विकत घेणार नाही बहुदा.. मात्र कधी लायब्ररीत दिसलं तर नक्की वाचेन. पुलेशु. बाकी स्कित्झोफ्रेमियाच्या स्थितीबद्दलही यात उहापोह असावा अशी इच्छा आणि नसेल अशी अपेक्षा करतो :)