✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फिरती इमारत - स्पीनिंग टॉवर

स
सहज यांनी
Wed, 06/25/2008 - 15:29  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6829 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

अ
अमोल केळकर Wed, 06/25/2008 - 15:47 नवीन

सहजच

सहजच विचार आला , हे डिझाईन मुकेश अंबानीला त्यांच्या नवीन महालासाठी दाखवलेतर? म्हणजे बघा आपल्या महालातील वरच्या मजल्यावरुन सी फेस बघणार्‍या मुकेशभाईंना दिवसातुन काही वेळा तरी मजला फिरत असल्याने अस्सल मुंबईचे / मुंबईकरांचे दर्शन घडेल. ;;)
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Wed, 06/25/2008 - 15:58 नवीन

जबरदस्त

सी फेस बघणार्‍या मुकेशभाईंना दिवसातुन काही वेळा तरी मजला फिरत असल्याने अस्सल मुंबईचे / मुंबईकरांचे दर्शन घडेल.
हम्म्म.. खरंय!... पण..... त्याने त्याला काही फरक पडेल असं वाटतं? बाकी इमारतीची संकल्पना अदभुत आणि सुरेख!
आपल्या घरातुन ३६० अंशात शहराचे दर्शन घडवणारी एकमेव इमारत ह्या वैशिष्ट्यामुळे सर्व युनिट्स हातोहात खपतील असा फिशर यांचा दावा.
हा माझाही दावा आहे! मनस्वी "मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
स
स्वाती दिनेश Wed, 06/25/2008 - 15:48 नवीन

मस्त!

बाहेरुन इमारतीचा आकार म्हणजे एक वेगळेच लाटेसारखे बदलते स्वरुप असणार. कविकल्पनाच वाटते आहे! मस्त चित्र आणि अचंबित करणारी माहिती! टॉवरवर असलेले फिरते रेस्टॉरंट माहित होते पण आता सगळा टॉवरच्या टॉवर फिरणार म्हणजे.. कल्पनेच्या पलिकडचेच आहे! स्वाती
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Wed, 06/25/2008 - 16:45 नवीन

जागेचा दर

साधारण ३३० मिलीयन यु एस डॉलर्स ही तितकी महाग किंमत नाही म्हणजे चौरस फुटाला किती पडतील?
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 06/26/2008 - 08:47 नवीन

यु एस डॉलर ३००० प्रति चौरस फूट

चित्राताईंनी दिलेल्या ह्या दुव्यावरच्या माहीतीनुसार चौरस फुटाचा भाव -यु एस डॉलर ३००० १३३० चौ फू लहान गाळा साधारण ४ मिलीयन व १२९०० चौ फू चा ३८.७ मिलीयन Sales of individual apartments will begin in September, with asking prices of around $3,000 per square foot. The smallest, at 1,330 square feet, would cost about $4 million and the largest, a 12,900-square-foot villa, $38.7 million.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Wed, 06/25/2008 - 16:49 नवीन

छान आहे

:) छान आहे प्रोर्जेक्ट चलचित्रे देखील पाहीली... राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Wed, 06/25/2008 - 18:17 नवीन

भारीच

फिरतं घर सोडाच, दोन्ही हात लांब करून फिरता येईल इतकं तरी घर मुंबईत असावं असं माझं स्वप्न आहे :) आपला, चाळकरी ऍडी जोशी ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 06/25/2008 - 19:58 नवीन

वाव

काय मस्त कल्पना.... ह्या इमारतीत एकदा जायचा मला चान्स मिळाला तरी पुरे.....
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 06/25/2008 - 20:00 नवीन

या बिल्डिंग मध्ये...

या बिल्डिंग मध्ये दक्षिणेकडे पाय न करता झोपायचं कसं? आपला, अनामिक
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 06/28/2008 - 00:36 नवीन

शीर्षासन

झोपताना शीर्षासन करणे हा एकमेव पर्याय आहे. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/25/2008 - 20:46 नवीन

अफलातून माहिती.

सहजा, आपली माहिती अजबच आहे !!! चलचित्र पाहिली, अद्भुतच !!! मोठ्या राहाटपाळण्यात बसल्यावर डोळे गरगरतात आपलं कसं जमायचं राव !!! :( वास्तु विशारद डेव्हीड फिशरला साष्टांग दंडवत !!!
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 06/25/2008 - 21:18 नवीन

फार्र भारी

फार्र भारी प्रकार दिसतोय हा! चित्रं पाहून तर चाट पडले! स्ट्रॅटोस्फिअरच्या फिरत्या रेस्टॉरंट मधे पहील्यांदा गेले होते, तेव्हा इतकी अवाक झाले होते की धड जेवण पण गेले नाही, नुस्तेच वरून लास वेगास पाहणे चालले होते.. ! या बिल्डींग मधे राहीले तर काय होईल!! खूप मस्त !! काय एकेक चमत्कार येतात ना...! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चित्रा गुरुवार, 06/26/2008 - 03:56 नवीन

अरेच्चा!

या बातमीबद्दल धन्यवाद, हे अजिबात माहिती नव्हते.. अत्यंत धाडसी आणि आकर्षक कल्पना, पण ही आपल्याला का बरे आधी सुचले नाही असे अनेक आर्किटेक्ट लोकांना वाटले असणार! जे काही वाचले त्यावरून अशी इमारत बांधणे आजच्या घडीला अशक्य वाटत नाही, पण अत्यंत अवघड आहे. कुठच्याही बिल्डिंग कोडमध्ये अशा इमारतीसाठी कलमे नसणार, त्यामुळे अशी इमारत बांधणे हे इंजिनीअर लोकांसाठी दिव्य काम होणार :-) आणि त्यांच्या आजवरच्या सगळ्या शिक्षणाची परीक्षा पाहणारी असणार. :-) त्यातच एबीसी न्यूजवर वरील इमारतीच्या आर्किटेक्टबद्दल अविश्वास दाखवणारी बातमी आहे - . http://abcnews.go.com/International/wireStory?id=5241644 आणि यावरून लोकांचे चर्वितचर्वण इथे पहा :-) http://www.inhabitat.com/2007/05/16/david-fishers-twirling-wind-power-tower/
  • Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ गुरुवार, 06/26/2008 - 07:45 नवीन

एका दिवसात एक प्रदक्षिणा?

मागील वर्षी दुबई प्रॉपर्टी रिंग ह्या कंपनीने २०० गाळे असलेली फिरती इमारतीच्या आराखडा प्रसिद्ध केला होता. सोलार पॉवर ने नियंत्रीत तंत्रज्ञानावर आधारीत इमारतीत एक मजला गोलाकार फिरायला एक दिवस लागणार आहे. म्हण्जे काही मजल्यांना सतत सूर्य आणि काहींना अजिबात नाही, असे नाहीका होणार? मला आपले स्थिर घरच बरे!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 06/26/2008 - 08:35 नवीन

छान छान!

छान छान! च्यामारी ऐकावं ते नवलंच...! पण खरं सांगायचं तर माझ्यासारख्या दोन मजल्याच्या जुन्या इमारतीत राहणार्‍या आणि दोन टायमाचा डाळभात मिळवण्याची चिंता असलेल्या मुंबईकराला अश्या हालणार्‍या डुलणार्‍या अन् मारे फिरणार्‍या इमारतींचं काय पण कवतिक नाय! :) बाकी चालू द्या.. :) आपला, तात्या बर्वा. -- "काय अंतुशेठ, रत्नागिरी झकपक झाली हो तुमची! विजेचे दिवे आले. तुमच्या घरी आली की नाही वीज?" "अहो छे हो! काळोख आहे तो बरा आहे. उद्या वीज येऊन बघायचं काय, तर पोफडे उडालेल्या भिंती अन् गळकी कौलच ना? ते बघायला वीज हो कशाला पाहिजे? आमचं दळिद्र आपलं अंधारातच दडलेलं बरं! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा